धागा धागा पिंजत बसुया
प्रतिसादांची चळत रचूया
अक्षांशाचे अयनांशांशी
बादरायणी सूत जुळवूया
धागा विषया फोडुनी फाटे
भरकटवुनी तो मजा बघूया
अध्यात्माच्या मागावरती
शब्दछलाचे तंतू टाकूया
वस्त्र विणूया भरडे तरिही
महावस्त्र त्यालाच म्हणूया
पडलो तोंडावरती तरीही
"जितं मया"चा घोष करूया
धागा धागा पिंजत बसुया...
(नंब्र विनंती: धागाभरकटतज्ञांनी कृ.ह.घे.)
(प्रेर्ना: कवी पी. सावळाराम यांचे गीत " धागा धागा अखंड विणूया)
प्रतिक्रिया
12 Jun 2020 - 9:16 pm | गणेशा
:-)) :-))
12 Jun 2020 - 9:28 pm | वीणा३
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
13 Jun 2020 - 8:37 am | ज्ञानोबाचे पैजार
झकास एकदम झकास
पैजारबुवा,
13 Jun 2020 - 12:24 pm | संजय क्षीरसागर
धागा धागा अखंड काढू या
भक्तीभोळ्यांचे कंपू करुया ।
चमत्कारांचे अंधश्रद्धांचे,
बाळबोध बालामृत पिऊया
अधांतरी फेकंफाक करोनी
डोळे मिटूनी नाम घेऊ या ।
भक्तीरसाच्या उकळीवरती
उगीच मोठी नांवे तळूया
वस्त्रहरण होऊ दे कितीही
भंपकपणाला ज्ञान म्हणूया ।
झाली जगभर हेटाई तरी
प्रसाद म्हणूनी भक्षण करुया ।
धागा धागा अखंड काढू या
भक्तीभोळ्यांचे कंपू करुया ।
14 Jun 2020 - 9:27 am | अनन्त्_यात्री
देणार्या सर्वांना धन्यवाद.
21 Jun 2020 - 10:37 am | मन्या ऽ
मस्त