स्वच्छतेचं सोवळं की सोवळ्यातील स्वच्छता!?

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in काथ्याकूट
18 Apr 2020 - 1:59 am
गाभा: 

सध्या सोशल मीडियावर कोरोना कोविड19 या रोगाच्या अनुषंगाने याप्रकारचं समर्थक लेखन आढळत आहे. यातले भेद ,हेतू दुसऱ्या उदाहरणांवरून दाखवून देणे हा सदर लेखनाचा हेतू आहे.

1)भस्मधारण विधी:- हा विधी धर्मशास्त्रात (शरीर)शुद्धीचा विधी म्हणून(अनेक ठिकाणी) सांगितला गेलेला आहे. सामान्यतः भस्म म्हणजे होमहवनातील आहुती दिलेल्या पदार्थांची राख. या राखेत लाकडं गोवऱ्या तूप तीळ भात दुर्वा असे बरेच घटक जळालेल्या अंश रूपांनी येतात. स्वाभाविकच याचे काही रासायनीक गुणधर्म त्यात असतात. जे शरीराच्या त्वचेला-अंगाला उपकारक/अपकारक असे दोन्ही असू शकतात.आता समजा, समाजात (एखाद्या) त्वचारोगाची साथ आली तर याचा उपयोग झालेलाही दिसून येईल किंवा तेच उलट आणखी त्रासदायकही झालेलं दिसून येईल. या दोन्ही गोष्टींबाबत धर्म व परंपरा ,रूढी इत्यादींचे समर्थन करणाऱ्या लोकांची विधानं अथवा लेखन दिसून येतं. म्हणजे-"आपल्याकडे अश्या गोष्टींची काळजी 'आधीच' घेतलेली आहे." हा त्यांच्या बोलण्यातला कळीचा/महत्वाचा मुद्दा असतो. जे कधीच माहीत नव्हतं त्याची काळजी आधीच कशी घेतली जाऊ शकते? ही सामान्य गोष्ट यात नजरेआड केली जाते. पूर्वेतिहास म्हणून प्लेगची साथ पाहिली तरी तेव्हा ह्या असल्या "आधीच" माहीत असलेल्या गोष्टींचा तेव्हा काहीही उपयोग झालेला नव्हता, अश्या गोष्टी(पुराव्यांसह) दाखवून दिल्या तरी या समर्थन करणाऱ्यांकडून धर्मप्रेमाच्या लालसेपोटी याकडे सम्पूर्ण दुर्लक्ष केलं जातं.

आता गम्मत अशी असते की त्वचारोगाची साथ असेल तर शरीराला जे लोक दररोज भस्म लावतात..त्यांना त्यातील काही घटकांमुळे फायदा झाला असं जरी दिसून आलं तरी भस्म हे त्या त्वचारोगाचं "औषध" ठरत आहि. तो असतो त्यातल्या काही घटकामुळे त्या व्यक्तीला मिळालेला (तिच्या आरोग्याला सापेक्ष असलेला) परिणाम. शिवाय त्वचेला भस्म हे विधीनुसार सगळ्या अंगाला फासल जात नाही.रोगाचा विचार भस्म धारण विधी वाल्या ऋषींनी/व्यक्तींनी केला असता तर तो विधी इलाजाच्या स्वरूपात तयार झाला असता,ही गोष्ट तर नाकबूल करता येत नाही ना? शिवाय काही जणांना याच भस्मानी तो त्वचारोग आणखी वाढलाही असता कारण त्यांच्या त्वचेचा व एकूण शरीराचा जो प्रकार आहे त्यानुसार हे भस्म त्यांना लागूही पडलं नसतं. यावरून तरी ते औषध नव्हतं केवळ त्या काळात वाटलेल्या(धार्मिक) गोष्टींच्या मनोधारणेचा भाग होता हे तर नक्की आहे(ना?)
मग आपल्या धर्मप्रेमापोटी आपल्याला वाटलेल्या अश्या गोष्टींमुळे व त्याचा आपण प्रसार केल्यामुळे आपल्या धर्म,रूढी,परंपरा यांचा अपमान होतो की गौरव!? याच भान का येत नाही? (सूर्यनमस्कारा सारख्या काही गोष्टी ह्या मात्र आरोग्यकारक म्हणूनच जन्माला आलेल्या आहेत.त्याबद्दलचा रास्त मान धर्माला रूढी परंपरेला मिळालेला आहेच. ह्या गोष्टी आमच्या सारखे लोक मुळीच नाकारत नाहीत.)
समजा इमारतीचे जिने चढल्यानी(तेव्हढाच?) व्यायाम(?) होतो असं आपलं म्हणणं असेल तर जिने तयार करण्याचा "हेतू" व्यायाम होणे हा होता की इमारतीत येजा करणे हा होता??? नक्की काय निष्कर्ष काढायचा? आणि स्वतःचा वेगळा व्यायाम न करण्यातला आळस दडवायला लिफ्टला जिन्याच्या हिशोबात पाखंड का ठरवायचं???आणि लिफ्ट पाखंडच ठरवायची असेल तर त्याच आपल्या लाडक्या व्यायामी आयामानुसार, हातानी दरवाजा लावायची लिफ्ट दरवाजे लावता उघडताना खांद्याना व हाताला व्यायाम होतो म्हणून आपोआप उघडझाप होणाऱ्या दरवाजेवाल्या लिफ्टपेक्षा कमी पाखंड समजायची काय??? आपण धर्मप्रेमात वहात वहात जाऊन अजून किती हास्यास्पद व्हायचं आहे?

तसेच जर जिने चढण्यानी-व्यायाम होतो या निष्कर्षाशी आपण प्रामाणिक असू तर मग जेवायला वापराच्या धर्मातल्या प्राणप्रिय पत्रावळीद्रोण,केळीची पाने जाऊन त्याजागी आलेल्या ताट वाटी भांड्यांमुळे जेवणानंतर ती खराब होऊन घासायला लागतात तर त्या भांडी घासण्याचा हात व खांद्याना व्यायाम होतो म्हणून धर्मातल्या पत्रावळी द्रोणा पेक्षा ताट वाटी भांडी(च) योग्य,या त्याच नियमाला धरून काढलेला निष्कर्ष खरा मानायला हवा ना? पण मग मात्र तो निष्कर्ष धर्मातल्या पत्रावळी द्रोणा विरुद्ध जातो म्हणून धर्मप्रेमी मंडळी तो अमान्य करतात.. ही धर्म परंपरांच्या आंधळ्या समर्थनाची रीत नाही,तर दुसरं काय आहे?

(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!)

जगातल्या सगळ्या धर्मविधी रूढी परंपरा या तयार होण्यामागची खरी कारणं काय आहेत? यांचा अभ्यास आपण कधी करणार?
जर धर्मातल्या सगळ्या सोवळ्या ओवळ्या कथित साधनशुचितेचा हेतू फक्त स्वच्छता हाच होता तर पूजेला बसताना मग स्वच्छ धुतलेले कपडे हे तेव्हढ्याच स्वच्छ (नेसायाच्या) सोवळ्यापेक्षा कमी दर्जाचे किंवा कट्टर सनातनी मतांनुसार अयोग्य कसे होतात?
मग दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे हेच त्यामागचं मूलभूत अंग आहे,असा आरोप धर्म,रूढी,परंपरा यांच्यावर होतो तो खोटा कसा मानायचा? जर 1+1 याचं धर्मातील,रूढी,परंपरेतील उत्तर 5 अस असेल,तर ते 2 आहे असं दाखवून देणाऱ्यावर आपण प्रतिवादी,शाब्दिक,शारीरिक हल्ला चढवताना आपली(नेहमीच्या कौतुकातली) सहिष्णुता जाते कुठे? (ती कुठेही जात नाही,कारण तीही धर्माच्याच बाजूनी वागणारी आहे. त्या त्यांच्या सहिष्णूतेला मानवता शहाणपण यांच्याशी काहीएक कर्तव्य नाही! हा आमचा गेल्या 22 वर्षातला असल्या धर्म अंध प्रेमी लोकांकडून वादविवादातआलेला अनुभव आहे.)
शेवटी काहीश्या खिन्न व दुःखी मनानी एकच सांगतो -"आपलं मूल चोरी करत असेल तर आईनी त्याला 'तू चोर आहेस.' असं खडसावण हेच खरं अपत्यधर्मप्रेमाचं लक्षण की त्याला पदराआड लपवणं, त्यांचं हेतू न अभ्यासता समर्थन करणं ,हे खरं प्रेम? याचा हिशोब धर्मप्रेमी माणसं करणार नसतील तर गुंडगिरी हाच धर्म होईल व धर्म ही (सगळी) गुंडगिरीच आहे हा आरोप आपोआपच सिद्ध होईल."
जय हिंद!जय भारत!

प्रतिक्रिया

माहितगार's picture

18 Apr 2020 - 7:33 am | माहितगार

आपण श्रद्धा डोळस असाव्यात यासाठी प्रयत्न करता हे स्तुत्य आहे. सद्द चर्चांमधील मुख्य विषय कोविड१९ वीषाणू पासून सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे पालन आणि सामाजिक अंतर हा आहे.

सोवळ्याचा उद्देश्य आणि अंशतः संबंध स्वच्छतेशी होता हे खरे आहे. अर्थात रेशमी वस्त्र धुतलेले नसले तरी सोवळ्यास स्विकार्य समजणे म्हणजे किमतीने भारी गालीच्यावर वीषाणू पसरणार नाहीत असे समजण्यासारखे असावे. सोवळे सुती असो वा रेशमी त्याचे साबणाच्या पाण्याने निर्जंतुकीकरण आवश्यक असावे असे आधुनिक विज्ञान सांगते. आणि अधिक नविन वैज्ञानिक ज्ञान मोकळ्या मनाने स्विकारले जावयास हवेच.

पुर्वी सोवळे पाळणार्‍या व्यक्ती सोवळ्यात नसलेल्या व्यक्तींपासून सामाजिक अंतर पाळत (पण आपापसात पाळत नसत) आता संसर्गजन्य वीषाणू संसर्ग पसरवताना कुणी सोवळ्यात आहे की नाही हे बघत नाही, सोवळ्यातील व्यक्तींनी परस्परात सामाजिक अंतर पाळले नाही आणि त्यापैकी एकास वीषाणूचा संसर्ग असेल तर तो दुसर्‍या सोवळ्यातील व्यक्तीस पोहोचवू शकतोच.

अर्थात सोवळ्यात स्वच्छतेची जी इतर काही बंधने पाळली जात जसे की, वस्त्रे स्नानाच्याच वेळी धुवावीत आणि स्नान केल्यानंतर मागच्या स्नानाच्या वेळी धुतलेली वस्त्रेच वापरावीत, सोवळ्यातील स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन न केलेल्यांपासून सामाजिक अंतर पाळणे आणि स्वयंपाक हा सोवळ्यातच करणे याचे स्वच्छता पालनाच्या दृष्टीने अंशिक फायदे होतेच.

वर नमुद केल्या प्रमाणे वीषाणूपासून सुरक्षेसाठी सामाजिक अंतर सोवळ्यातील व्यक्ती सोबत सुद्धा पाळले जावयास हवे आणि सोवळ्याची सर्वच वस्त्रे साबण अथवा निर्जंतुकीकरण अल्कोहोलने आणि अथवा कडत पाण्याने निर्जंतुक करुन घेणे गरजेचे असावे.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 7:55 am | अत्रुप्त आत्मा

@अर्थात सोवळ्यात स्वच्छतेची जी इतर काही बंधने पाळली जात जसे की, वस्त्रे स्नानाच्याच वेळी धुवावीत आणि स्नान केल्यानंतर मागच्या स्नानाच्या वेळी धुतलेली वस्त्रेच वापरावीत, - आहो पण याचा हेतू स्वच्चता हा नाही! अपवित्रता हा आहे. नसला अस म्हणायचं असेल,तर रेशमी सोवळं वाली व्यक्ती तितकंच स्वच्छ व अस्पर्श धोतर नेसलेल्या (स्नान झालेल्या) व्यक्तीकडून पाणी घेत नाही, ते का? हे आम्ही अनुभवलेलं आहे.
उद्या एखाद्या देवळातला पुजारी तिथल्या एखाद्या सेवकाकडून पूजेचा द्यायचा नारळ स्पर्श न करता वरून ओंजळीत टाकतो,या मागे काय कारण असतं?(अस तुम्हाला वाटत?)
शरीराने व मनानेही स्वच्छ असलेल्या चार दिवसातल्या स्त्री ला मंदिरात प्रवेश का नसतो? स्वच्छतेचाच निकष आहे ना? मग काय हरकत आहे.
आंबेडकरांसारख्या स्वच्छ बुद्धीमान दलितांचा मंदिर प्रवेश नक्की कोणत्या अस्वच्छतेच्या कारणांनी अडवला जात होता?

मदनबाण's picture

18 Apr 2020 - 11:32 am | मदनबाण

शरीराने व मनानेही स्वच्छ असलेल्या चार दिवसातल्या स्त्री ला मंदिरात प्रवेश का नसतो? स्वच्छतेचाच निकष आहे ना? मग काय हरकत आहे.
या नाजुक काळात स्त्रीस शारिरिक कष्ट होत असतात, तसेच त्यांचे मन देखील प्रसन्न नसते. इतर दिवशी कुठलीही आडकाठी नसतान, याच काळात मंदिर प्रवेशाचा अट्टहास करणे हे मी बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण समजतो. !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat

चौकस२१२'s picture

18 Apr 2020 - 1:32 pm | चौकस२१२

मुळात पूर्वी, त्या चार दिवसात स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून काही प्रथा पडल्या असाव्यात . दुर्दैवाने त्या कालानुरूप नष्ट व्हायला पाहिजे होत्या ...
पुरेश्या झाल्या नाहीत... हे हिंदू धर्माचे दुर्दैव ...
दुसरे दुर्दैव असे कि याचा बरोबर मशिदीत स्त्रियांना वेगळ्या भागात का बसावे लागते यावर चकार शब्द कोणी बोलणार नाही... या दुटप्पी पणाचा राग येतो
अर्थात फक्त मुस्लिमांच्यात नाही तर " स्वामिनारया" या "पंथा " मध्ये पण स्त्रियांवर जी बंधन आहेत ती पण अतिशय चुकीची आहेत ( मी मुद्डमून याला पंथ म्हणतोय... धर्म नाही कारण हि मंडळी जरी वरवर हिंदू दिसत असली तरी "मेनस्ट्रीम" हिंदू म्हणून घेत नाहीत स्वतःला )

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 7:46 am | अत्रुप्त आत्मा

आता आपल्याला बाहेरून आल्यावर घरात कुठेही स्पर्श न करता बाथरुमात जाऊन आधी हात साबणाने 25 सेकंद धुवून, सर्व कपडे बदलावे यातल्या कुठेही कोणालाही स्पर्श न करण्याचा आरोग्य शास्त्राचा धर्मप्रेमी लोक धर्मातील अस्पृश्य/अस्पर्श शास्त्राशी संबंध जोडत आहेत. धर्मातील शिवाशिव , अस्पर्श याचा मानसिक संबंध अपवित्रतेशी आहे, अनारोग्याशी नाही..हे ते दाखवून दिलं/प्रतिवाद केला, तरी दडवत आहेत..

मला वाटते काही अल्कोहोल युक्त हँडसानीटायझर ज्वलनशील असतात (चुभूदेघे) ती पुजादी कार्ये करताना दिव्यांपासून दूर ठेवण्याची दक्षता घेणे श्रेयस्कर असावे.

आणि अगदी निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने मुर्तींनाही साबणाच्या पाण्याने धुणे श्रेयस्कर असावे असे वाटते. पुजाकरतानाची पुसण्याची अनेक वस्त्रे प्रत्यक्षात अत्यंत अस्वच्छ असतात तीही साबणाच्या गरम पाण्याने धुऊन घेणे बंधन कारक समजणे श्रेयस्कर असावे.

हे अतृप्त आत्म्या ....
आपल्या लेखातील मूळ मुद्दा बऱयापैकी पटला आणि त्याचं सार मला कळलेलं असे कि
" परंपरा, संस्कृती , धर्म यातून येणाऱ्या काही गोष्टी आणि खास करून आरोग्याशी निगडित असेलेल्या गोष्टी आंधळेपणाने स्वीकारू नयेत? त्यामागे काही तर्कसंगत विचार आहे का? असले तर तो सिद्ध झाला आहे का याचा विचार करावा "
यात न पटण्यासारखेच काही नाहीये खास करून ते भस्माचे उदाहरण... किंवा आपण हवनातील धुराचे उदाहरण म्हणू...
दुर्दैवाने आपल्या समाजात या विषयवार नेहमीच दोन टोकांच्या भूमिका असतात एक तर "आहे ते नं प्रश्न विचारता स्वीकारा किंवा दुसरे टोक म्हणजे "हे धर्मात/ परंपरेत लिहिले आहे ना म्हणजे सगळेच ( यातील "च" वर भर) खोटे आणि फालतू असले पाहिजे "
मध्य गाठणारे पण अनेक आहेत नाही असे नाही पण कमी ....
मग हे असा का? एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितले तर

यांवरून एक विधान आठवले ( यात पूर्व आणि पश्चिमेकडील विचारसरणी तील फरक दाखवला आहे )
त एम्हणजे = पूर्वकडची विचारसरणी म्हणजे "आधी विश्वास ठेवा, अनुभव घ्या आणि मग ठरवा "
आणि पश्चिमेकडची विचारसरणी म्हणजे = " आधी सिद्ध होतंय की नाही ते पहा , मग अनुभवा आणि मग ठरवा कि विश्वास ठेवायचा कि नाही तो "
यातील कोणता विचार अंगिकार्याचा ते प्रतेय्कने ठरवावे

पारंपरिक औषधी वैगरे मध्ये तर्कसंगत चाचण्या ना असण्यामागची जुनी करणे अनेक आहेत ..
१) खोल अभ्यास करून निष्कर्ष काढयनासाठी लागणार वेळ आणि पैसे कदाचित नवहता
२) तंत्रन्यान नवहते
हे मुद्दे आता जरी सोपे झाला असले तरी स्वार्थ आडवा येत असेल म्हणजे .. एखादा बलाढ्य "पारपरंपरिक " औषधे बनवणारा उद्योग . कशाला "मूळ संशोधनावर " पैसे खर्च करेल .. चालतंय ना गल्ला जमतेय ना चालू द्या...
(अर्थात यात ऍलोपॅथी चे उद्योग सुद्धा काही कमी पापी नाहीयेत... एकाच पॅरासिटामोल त्याला पाठीसाठीचे वेगळे, हाडांसाठी वेगळे असे करून पैसा कसा जास्त मिळेल असले उद्योग करीत असतो आणि रेग्युलेटर कधी कधी पकडतो हि )
आता थोडे ना पटणारे :
ना पटणारे असे नाहीच फक्त एक टीका होऊ शकते ती का होईल ते मात्र समजवून घ्या
ती टीका म्हणजे " हा बरोबर आहे पण मग हे हिंदूइतर धर्मावर आधारित उपाय योजनांवर पण हे चालते मग त्याबद्दल का नाही लिहिले?
अशी टीका जर कोणी केली तर ती रास्त ठरते असे मला वाटते
मान्य आहे कि आपण कदाचित वयसायिक पत्रकार नाही त्यामुळे हे बंधन आपल्यावर नाही आणि आपल्याला कदाचित युनानी वैगरे औषधी वर काय होते याची माहिती नसावी
पण विचार करूयात कि हा ल्लेख जर मिपा पेक्षा मोठा वाचक वर्ग असलेल्या एखाद्या ब्लॉग किंवा व्यावसायिक वर्तमान पत्रात/ मासिकात कोणी "पत्रकाराने" लिहिला तर?
तर मग मात्र यात "युनानी" आणि चिनी धर्म/ समाज/ परंपरेचा पण गोषवारा घेणे हि त्या "पत्रकाराची" वयवसायिक जबाबदारी ठरते.. नाहीतर कोण्ही म्हणाले कि "बघा हिंदूंनाच बडवतात सारखे" तर ती टीका यौग्याचा ठरेल
बरेच पत्रकार लेखाला असे शीर्षक देतात कि " समाजातील वाईट चालीरीती" आणि लेखात भर असतो तो एकाच धर्मातील चालीरीतींनवर आणि वरती असे भास्वततात कि "हि समतोल पत्रकारिता आहे " ( हि टीका आपल्यावर नाही )

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 9:25 am | अत्रुप्त आत्मा

@ना पटणारे असे नाहीच फक्त एक टीका होऊ शकते ती का होईल ते मात्र समजवून घ्या
ती टीका म्हणजे " हा बरोबर आहे पण मग हे हिंदूइतर धर्मावर आधारित उपाय योजनांवर पण हे चालते मग त्याबद्दल का नाही लिहिले?
अशी टीका जर कोणी केली तर ती रास्त ठरते असे मला वाटते. :--- अगदी बरोबर. पण माझा अनुभव असा आहे की अशी मी केलेली टीका मी दाखवून दिली तरी ही लोकं (त्यांनीच घातलेल्या किंवा आकसाने लादलेल्या कंडिशन्स नुसार) नन्तर स्वतःच्या मतात,वागण्यात बदल करत नाहीत. हे फक्त मुद्दा उडवून लावण्यासाठी वापरायचं हत्यार आहे.
कामात फोटोग्राफर,व्हिडीओ शूटिंग,केटरर, स्टेज डेकोरेटर अश्या मंडळीतील ही हिंदू-इतर मंडळी येतात. त्यांनाही मी त्यांच्या प्रथा कुप्रथांबद्दल प्रश्न विचारतो , बोलतो.. ते ही सकारात्मक,नकारात्मक प्रतिसाद देतात. तसच फेसबुकावर कुठे कुठे केलेलं असच लेखनही असतं. त्या लेखनाचे व सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या मंडळींचे दाखले दिले तर धर्मप्रेमीपैकी अगदी थोडी मंडळी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बदलतात. पण यांच्यातल्या कांगावेखोर लोकांचा जो गट,तट आहे,जो अश्या विरोधात प्रामुख्याने सहभागी असतो तो मात्र भ्याडपणानी पळून जातो,नाहीतर क्रूरपणे हल्ला करतो हाच माझा अनुभव आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा

@बरेच पत्रकार लेखाला असे शीर्षक देतात कि " समाजातील वाईट चालीरीती" आणि लेखात भर असतो तो एकाच धर्मातील चालीरीतींनवर आणि वरती असे भास्वततात कि "हि समतोल पत्रकारिता आहे " ( हि टीका आपल्यावर नाही ) :- हे 100% खरं आहे. आम्ही या मंडळींना फेक्युलर,फुरोगामी म्हणतो. ही पक्षपाती मंडळी धर्मअंधप्रेमी लोकांची जुळी भावंडे आहेत. ह्यांनी धर्म फक्त नावाला सोडलेला असतो. व कथित पुरोगामी गटात शिरकाव केलेला असतो. पण मूळचा सनातनी धार्मिकपणा,लबाडी,पक्षपाती वृत्ती तशीच कायम असते.

यावर चर्चा आणि संशोधन होणे गरजेचे आहे.

संगणकनंद's picture

18 Apr 2020 - 10:50 am | संगणकनंद

सत्यनारायण पूजा, वास्तूशांत, विवाहातील रुढी परंपरा आणि मृत्यूपश्चात कर्मकांडे याबाबतीत जनमानसात जी धारणा किंवा तर्कसंगती असते तीच यावेळी स्वच्छतेच्या बाबतीत पुढे येत आहे. मात्र मनातील स्वतःविषयीची तथाकथित सुधारक ही भुमिका बाजूला ठेवली आणि लोकांच्या काही अतिरंजित दाव्यांकडे दुर्लक्ष केले तर आपल्याकडे स्वच्छतेचं महत्व आधीपासूनच होतं हे लक्षात येईल. सोवळ्याचा मूळ हेतू आरोग्यविषयक स्वच्छता हाच असावा. (मला hygiene ला मराठी शब्द सुचत नाही) नंतर पुढे कधीतरी त्याचे अतिकठोर कर्मकांडात रुपांतर झाले असावे.

एक उदाहरण देतो. आमच्या लहानपणी शौचास जाऊन आलो की आम्ही बाहेरच हात पाय स्वच्छ धूवून आलो की नाही हे आमची आजी कटाक्षाने पाहत असे. तिला असं का हे विचारलं की ती म्हणायची शौचास जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ न धूता तसेच घरात वावरल्यास घरात कली शिरतो. तिचे हे उत्तर अर्थातच हास्यास्पद होते मात्र शौचास जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ न धूणे आरोग्याच्या दृष्टिने किती अत्यावश्यक आहे हे आपल्याला माहीतीच आहे. तीच गोष्ट नमस्काराची, आपले त्यामागील स्पष्टीकरण काहीही असले तरी दुसर्‍या व्यक्तीला अभिवादन करताना त्या व्यक्तिच्या शरीराशी थेट संपर्क होत नाही. पर्यायाने स्पर्शाने होणारा जंतू संसर्ग टळतो ही वस्तूस्थिती आहे. किंबहूना ती कोरोनाच्या साथीमुळे अधोरेखीत झाली आहे आणि जगाने स्विकारली आहे.

सत्यनारायण पूजा, वास्तूशांत, विवाहातील रुढी परंपरा आणि मृत्यूपश्चात कर्मकांडे वगैरे गोष्टी करुन त्याची प्रसारमाध्यमाध्यंमध्ये जाहीरात करणार्‍या व्यक्तीने सोवळे या बाबतीत टीकेची झोड उठवणे हास्यास्पद आहे. असे का बरे असेल? नो मनी देन नो हनी?

संगणकनंद's picture

18 Apr 2020 - 11:15 am | संगणकनंद

(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!)

अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न ??? तुम्ही स्वतःला काय समजता हो? हे तीन शब्द तुमच्यातील टोकाच्या अहंकाराचे प्रतिक आहे. सुधारक असणारी व्यक्ती कधीही लोकांप्रती अशा अपशब्दांचा वापर करणार नाही. तुमच्यासारख्या ढोंगी सुधारकांमुळे खरे सुधारक बदनाम होतात.

जेव्हा तुमचे यजमान तुमच्याकडून एखादी पूजा किंवा विधी करुन घेतात तेव्हा "आपण देवाचे काही करतोय" ही त्यांची प्रामाणिक भावना असते. तेव्हा सारे विधी किंवा पूजा प्रथेप्रमाणे व्हावेत आणि ते करण्यार्‍या पूरोहीताचीही तीच भुमिका असावी अशी त्यांची अपेक्षा असली तर त्यांचे काय चुकले? त्यांचा "अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न" अशा शब्दांत पूरोहिताने अपमान करणे कितपत योग्य आहे?

विधी/पुजा सर्व करायच्या, फक्त त्यात थोडेसे फेरफार करुन त्याला सुधारणा असे गोंडस नाव द्यायचे आणि समाजात सुधारणावादी म्हणून मिरवायचे ही दांभिकता आहे. ज्याक्षणी सुधारणा म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने तुम्हाला कळेल त्याक्षणी तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा

तुम्ही धूळफेक करत रहा. मी वाचत राहीन. पुढील धुळफेकीस शुभेच्छा! :)
चालू द्या... :)
असो. :)

संगणकनंद's picture

18 Apr 2020 - 12:05 pm | संगणकनंद

"अत्मकुंथन" च्या ऐवजी वापरलेला धूळफेक हा शब्द आवडला. धूळफेक म्हणा हवं तर. पण मी माझे मुद्दे मांडले, मिपा वाचक ते वाचतील. आणि तुमच्या या प्रतिसादाने तुमच्याकडे उत्तर नाही हे ही मिपा वाचकांच्या लक्षात येईल. मुद्दे कोणते आणि धूळफेक कोणती हे लक्षात येण्याईतके मिपा वाचक सुज्ञ आहेत.

असो, तुम्ही काही प्रतिवाद केला असता तर पुढे काही लिहीता आले असते. तुम्ही धूळफेक म्हणून चर्चेपासून पळ काढत आहात म्हटल्यावर विषय संपला.

माहितगार's picture

18 Apr 2020 - 12:06 pm | माहितगार

ज्याक्षणी सुधारणा म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने तुम्हाला कळेल त्याक्षणी तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.

असहमत, सुयोग्य चर्चा करुन हिंदू चाली रितींमध्ये सुधारणा केली जाऊ शकत नाही हि सुद्धा एक अंधश्रद्धाच नाही काय? अगदी ऋग्वेदात्च हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांती स्वभावाची चिन्हे मिळतात ती नंतरही मिळतात. माणूस ब्राह्मण अथवा हिंदू असो अथवा नसो काळानुसार बदलणे मानवी स्वभावाला नेहमीच जड जाणारे असते म्हणून माणूस आणि समुह काल परत्वे बदलू शकत नाहीत आणि त्यांची सद्य संस्कृती बदल करत बसण्यापेक्षा पूर्ण मोडीत काढा म्हणणे माणूस प्राणि असांस्कृतिक आहे म्हणण्यासारखे असत्य नाही किंवा कसे?

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संलग्न पौरोहित्य असेल किंवा आपले मिपाकर अत्रुप्त आत्मा असतील हि मंडळी सांस्कृतिक उत्क्रांतीत जुन्यातले चांगले ठेऊन त्याज्य टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करतात.

एकतर सर्वच अंधश्रद्धा पूर्ण करा किंवा सगळ्याच श्रद्धांना अंधश्रद्ध ठरवून काहीच नको दोन्ही टोके आहेत. डोळस श्रद्धा मानवी संस्कृतिस साहायक होऊ शकतात आणि अत्रुप्त आत्मा सारख्या सुधारकांचा आपला स्वतःचा एक रोल असतो आणि असावा.

संगणकनंद's picture

18 Apr 2020 - 12:36 pm | संगणकनंद

प्रतिसादातील अगदी थोडा भाग वगळता बाकी प्रतिसादाशी सहमत.

चाली-रिती, रुढी -परंपरा खूप जुन्या असतात, संस्कृतीचा भाग असतात. कालौघात त्यांना कर्मठपणा चिकटतो. आणि बुद्धिवंताना त्यातील फोलपणा जाणवतो. मात्र अशा रुढी-परंपरांचे समूळ उच्चाटन न करता त्यात सुधारणा करणे केव्हाही श्रेयस्कर यात दुमत नाही. यामुळे समाजमन दुखावत नाही आणि कर्मकांडातील कर्मठपणा एक तर नाहीसा होईल किंवा कमी तरी होईल. आणि जर जीवनात कुठल्याच चाली-रिती पाळायचे नाही असे ठरवले, सण सोहळे साजरे करायचे नाही असे ठरवले तर जीवनच रुक्ष होऊन जाईल.

आक्षेप असतो तो सोयिस्कर असेल तेव्हा मौन पाळणार्‍या आणि सोयिस्कर असेल तेव्हा टीका करणार्‍या तथाकथित सुधारकांच्या भुमिकेला.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2020 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा

@स्वगृह मिसळपाव
Search form
शोधा
साहित्य प्रकार
नवे लेखन
नवे प्रतिसाद
मिपा पुस्तकं
घोषणा
मदत पान
मिपा विशेषांक
दिवाळी अंक २०१९
श्रीगणेश लेखमाला २०१९
स्वच्छतेचं सोवळं की सोवळ्यातील स्वच्छता!? प्रतिसाद द्या
प्रतिसाद द्या
त्याचू वैलपान's picture
प्रतिसादातील अगदी थोडा भाग
18 Apr 2020 - 1:06 pm | त्याचू वैलपान
प्रतिसादातील अगदी थोडा भाग वगळता बाकी प्रतिसादाशी सहमत.

चाली-रिती, रुढी -परंपरा खूप जुन्या असतात, संस्कृतीचा भाग असतात. कालौघात त्यांना कर्मठपणा चिकटतो. आणि बुद्धिवंताना त्यातील फोलपणा जाणवतो. मात्र अशा रुढी-परंपरांचे समूळ उच्चाटन न करता त्यात सुधारणा करणे केव्हाही श्रेयस्कर यात दुमत नाही. यामुळे समाजमन दुखावत नाही आणि कर्मकांडातील कर्मठपणा एक तर नाहीसा होईल किंवा कमी तरी होईल. आणि जर जीवनात कुठल्याच चाली-रिती पाळायचे नाही असे ठरवले, सण सोहळे साजरे करायचे नाही असे ठरवले तर जीवनच रुक्ष होऊन जाईल.:--- हेच सर्व मी करतो, हे दिसत असूनही जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा कुटील डाव साधण्यासाठी मला फोल दाखवून तुम्हाला काहीही हाती लागणार नाही,हेच माहितगार यांच्या प्रतिसादावरून स्पष्ट झालंय.
बाकी पळ काढणं इत्यादी निरर्थक आत्मकुंथन किंवा स्वमतांध दांभिकता(शब्द बरोबर-आला ना?) एन्जॉएबल आहे! चालू द्या! लउल्लूल्लूल्लू =))

संगणकनंद's picture

20 Apr 2020 - 10:35 pm | संगणकनंद

हेच सर्व मी करतो
तुम्ही काय करता याची कबुली तुम्हीच तुमच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये दिलीत, जी पोस्ट तुम्ही डिलीट केलीत. सांगा बरे, ती तथाकथित सुधारणावादी पोस्ट का डिलीट केलीत?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2020 - 1:46 am | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्त एन्जॉय होतंय. चालू द्या,निरर्थक आत्मकुंथन।

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2020 - 1:51 am | अत्रुप्त आत्मा

डु आय डी काढून ट्रोलिंग करायची वेळ आली हे पाहून अगदी कसं कसं झालं! =))

गामा पैलवान's picture

18 Apr 2020 - 2:54 pm | गामा पैलवान

अतृप्त आत्मा,

तुम्ही विचारलंय की :

जर धर्मातल्या सगळ्या सोवळ्या ओवळ्या कथित साधनशुचितेचा हेतू फक्त स्वच्छता हाच होता तर पूजेला बसताना मग स्वच्छ धुतलेले कपडे हे तेव्हढ्याच स्वच्छ (नेसायाच्या) सोवळ्यापेक्षा कमी दर्जाचे किंवा कट्टर सनातनी मतांनुसार अयोग्य कसे होतात?

प्रश्न रोचक आहे. माझ्या मते केवळ स्वच्छता हा हेतू नाही. सैनिकाने वा अग्निशामक जवानाने गणवेश घातल्याने तो जास्त पराक्रम गाजवतो का? मग गणवेशावर इतके पैसे का खर्च करायचे? अशा प्रकारची ऐहिक कारणमीमांसा असावी.

अध्यात्मिक कारणमीमांसा सध्यातरी सांगत नाही.

आ.न.,
-गा.पै.

कंजूस's picture

18 Apr 2020 - 3:37 pm | कंजूस

शुचिता - hygiene ला मराठी शब्द

शा वि कु's picture

20 Apr 2020 - 6:45 pm | शा वि कु

मुळात रितीरिवाज करण्यासाठी कोणत्याही वैज्ञानिक रॅशनलायझेषनची काय गरज आहे ? इतर कोणाला इजा होत नसेल तर तार्किक दृष्ट्या कितीही निरुपयोगी वाटणारा विधी आपण निव्वळ आनंदासाठी का ना करावा ?
उदा- तुम्हाला द्रोण आणि पत्र्यावळ्यांमध्ये जेवायला आवडतं तर जेवूनच टाका !

लेख वाचताना अगदी अगदी झालं. एक गोष्ट खूप वर्षपूर्वी ऐकली होती.

एका नवीन लग्न झालेल्या मुलीचा नवरा तिला म्हणतो कि माझी आई एक प्रकारचं धिरडं खूप छान बनवते. ती मुलगी ते शिकून घ्यायला सासू कडे जाते. सासू तिला धिरडं घालून दाखवते आणि तव्यावर टाकल्यावर ती त्याच्या कडेचा एक तुकडा कापते. सून तिला विचारते कि तुकडा का कापला, सासू म्हणते, माझ्या सासूने हे धिरडं मला शिकवलं, तिने मला सांगितलं तुकडा काप म्हणून मी तुकडा कापते. सुनेला ते पटत नाही. तिची आजेसासू अजून हयात असते, ती आणि सासू  तिच्याकडे जाते, आणि विचारतात कि का बाई तुकडा कापायचीस. आजेसासू म्हणते आग माझ्या तव्याला एक भोक होत तिथे धिरडं करपायचं आणि तेल पण वाया जायचं म्हणून मी ते कापायची. सासू ने आजेसासू ला कधीच प्रश्न न विचारल्याने (किंवा कधीच स्वतः विचार न केल्याने)ती एक गरज नसलेली रूढी आयुष्यभर पाळत अली. सुनेने फक्त प्रश्न विचारल्याने ती त्या अनावश्यक रुढितून मोकळी झाली. 

माझ्या माहितीत खालच्या गोष्टी फार उलट सुलट आहेत :
१. रिकाम्या पानात भात वाढायचा नाही, कारण दहाव्याला तसा वाढतात. आता जर वाढला भात रिकाम्या पानात तर बऱ्याच घरात फार मोठा गहजब उडतो. जस काय भात वाढला म्हणून कोणाचातरी दहावा घालायला लागणार आहे. 
२.तीच गोष्ट तांदुळाच्या खिरीची, माझ्या ओळखीत ३-४ घरामध्ये तांदुळाची खीर आवडत असूनही करत नाहीत (बाहेर जाऊन फिरनी खातात बर का ) 
३. बाळांतीणील शेक शेगडी करायला पाहिजे म्हणून माझ्या एक मैत्रिणीला तिच्या सासूने भर मे  महिन्यात , मुंबईत शेक घ्यायला लावलं, ज्यामुळे तिला घामोळं होऊन प्रचंड त्रास झाला. कदाचित हे जेव्हा करायला सुरवात केली असेल तेव्हा भरपूर जंगल असल्यामुळे हवा थंड असेल, त्यामुळे हे बाळंतिणीला बर वाटाव म्हणून करत असतील. 
४. बाळाला सतत डायपर घातला तर त्याचं चालणं बिघडेल, पायात बिघाड येईल. आपल्याकडे पायाला मजबूती यावी म्हणून वाळे घालतात. - या लोकांना "मग भारतीय धावपटू (किंवा खेळाडू ) प्रत्येक खेळात पुढे का नाहीत", जगभरात लोक डायपर वापरतात, आणि वाले घालत नाहीत, तरी व्यवस्थित चालतात. यावर उत्तर नसत. आपले पूर्वज हुशार, त्यांना सगळं माहिती होतं, आम्ही कधी असले प्रश्न विचारले नाहीत अशा प्रकारची उत्तरं येतात. 

माझा अनुभव असा आहे कि आपण ज्याला प्रश्न विचारतोय त्याला उत्तर माहित नसेल किंवा स्वतः कधी प्रश्न विचारलाच नसेल तर "शास्त्र असतं ते " वाल उत्तर येत. काही लोकांना आपल्या ठराविक कोशात राहायला खूप आवडतं. तो कोष मोडण्याची कल्पना पण करवत नाही. आणि दुसरा कोणी तो मोडायचा प्रयत्न करत असेल तर ते फारसं आवडत नाही. ते त्यांच्या दृष्टीने बरोबरही आहे म्हणा. जर विचार करणारा माणूस बरोबर आहे हे मान्य केलं तर, आपण इतकी वर्ष विचार केला नाही हे हि मान्य करावं लागतं आणि ते फार गैरसोयीचे असू शकत. 

माझ्या बघण्यात अजून एकपण माणूस नाही जो आपल्या रूढी - परंपरा आजच्या काळात १००% उपयोगी आहेत हे पटल्यामुळे त्या पाळतोय. तो एखादी रूढी का पळतोय ह्याच संपुर्ण तार्किक उत्तर त्याच्याकडे आहे आणि तर्कावर विचार करणाऱ्या कुठल्याही माणसाला तो ते पटवू शकेल. 

चौकस२१२'s picture

21 Apr 2020 - 4:28 am | चौकस२१२

अगदी समर्पक उदाहरणं दिली आहेत ...

चौकस२१२'s picture

21 Apr 2020 - 5:17 am | चौकस२१२

नाण्याची दुसरी बाजू = काही पटलेल्या रूढी आणि सवयी कि ज्या केवळ प्रतीकात्मक असतात त्या ना पाळल्याने काही आकाश कोसळत नाही परंतु पाळल्या तरीही काही आकाश कोसळत नाही किंवा काही त्या त्या काळानुसार पडलेल्या असतात .. पुढे कदाचित कालबाहय झालेल्या असतात .

१) साधारण पणे एखाद्याचा सत्कार करताना जेव्हा शाल पांघरली जाते तेव्हा सत्कार करणारी व्यक्ती हि जिचा सत्कार केला जातोय त्या व्यक्तीच्या पुढे उभे राहून डावीकडून उजवीकडे जणू हार घातल्या सरकारी ती शाल त्या व्यक्तीचं खांद्यांवर पांघरते
- उलट प्रथा: मर्तिक झाल्यावर व्यक्तीचे सांत्वन करण्यासाठी जे काही विधी कर्मे केली जातात तेव्हा अशीच शाल पण त्या व्यक्तीचं मागे उभे राहून त्याला पांघरली जाते... जणू काही हे दाखवण्यासाठी कि आम्ही / समाज तुमचं पाठीशी आहोत ( दुःखावर पांघरून घालणे असे काहीसे असावे )
२) एका कुटुंबात प्रथा पहिली.. ज्यात पाश्चिमात्य आणि पौरात्य परंपरांचं मिश्रण होता.. वाढदिवसाला पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे केक आणलं जातो पण त्यावर मेणबत्या "विझवण्यापेक्षा " मेणबत्ती किंवा दिवा प्रज्वलित केला जातो .. तर्क असा काहीस कि हिंदू परंपरेत दिवे / ऊर्जा जातं करावी घालावू नये ... आवडली मला हि प्रथा
काही फारश्या ना पटलेल्या प्रथा
३) मर्तिका नंतर च्या दिवसांच्या जेवणात पहिले कि आमसुलांची चटणी केली होती.. छान लागत होती.. पण असे कळले कि हि फक्त अशावेळीस करतात इतर वेळी नाही... का कोण जाणे. इतर वेळी हि ती कार्याला काय हरकत आहे ? चविष्ट लागतेच कि

ना पाळल्याने काही आकाश कोसळत नाही परंतु पाळल्या तरीही काही आकाश कोसळत  - 
हे आकाश कोसळणं - न -कोसळणं प्रत्येक माणसावर अवलंबून असतं. अजून एका नात्यात घरातले लोक सांगतात कि आम्ही जास्त देव-धर्माचं स्तोम माजवत नाही. जेवढं जमेल तेवढं करतो. त्यांच्या घरातली प्रथा म्हणजे दिवाळीचा फराळ (किंवा कुठलाही खास पदार्थ) करताना देवाचं नाव घ्यायचं आणि मगच पदार्थ करायला सुरवात करायची. आता काय साधीच तर प्रथा आहे, कुठे जास्त काय करायचंय. पण त्यांच्या घरात नवीन आलेली सून विसरली, आणि नेमका पदार्थ बिघडला. आता ह्यांचे पदार्थ कधी देवाचं नाव घेऊन सुद्धा बिघडले नसतील का, पण घरात प्रत्येकाने बोलून दाखवलं कि देवाचं नाव नाही घेतलं ना :P . एरवी शिक्षित आहेत, काय वाईटहि नाहीयेत माणसं एरवी, पण आपल्या प्रथेला कुठलाही तर्काधार नाही हे कळत नसेल का. पण पाळली न गेल्यावर मनात चुकचुकलं. आणि ह्या गोष्टी थांबवल्या नाहीत तर वाढत जातात. आणि घरात ते न मानणाऱ्या माणसाला त्रास होतो आणि प्रथा पाळली गेली नाही कि मानणाऱ्या माणसाला त्रास होतो :). 

माझ्या मते केवळ स्वच्छता हा हेतू नाही. सैनिकाने वा अग्निशामक जवानाने गणवेश घातल्याने तो जास्त पराक्रम गाजवतो का? मग गणवेशावर इतके पैसे का खर्च करायचे? अशा प्रकारची ऐहिक कारणमीमांसा असावी. 

मलातरी कारण विशेष पटलं नाही  - कुठलाही गणवेश हा त्या समूहाचा आपण भाग आहोत हा मानसिक परिणाम करत. एकदा गणवेश घातला कि तुम्ही घरी कोणीही असा इथे तुम्ही सगळे सारखे आहात आणि तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या गणवेशावर तारे लावायला मिळतील हा मानसिक परिणाम करत. अग्निशमन दलाचा गणवेश दिसला कि आसपासच्या लोकांनाही कळतं कि जवळपास लागलेली आग विझवायला हे लोक आले आहेत, तो मानसिक आधार साधे कपडे घालून मिळेल असं वाटत नाही. टीम वर्क, टीम स्पिरिट वाढवायला गणवेश मदत करतो. 

चौकस२१२'s picture

21 Apr 2020 - 7:24 am | चौकस२१२

आणि घरात ते न मानणाऱ्या माणसाला त्रास होतो आणि प्रथा पाळली गेली नाही कि मानणाऱ्या माणसाला त्रास होतो :).

मग अश्या वेळी करायचं काय? वीणाजी?
वरील उदाहरणात जर सुनेने तिला माहित नसताना केले असेल तर त्याचे लगेच खापर "देवाला नमस्कार ना केल्याने झाले" असे फोडणे हे अन्यायकारकच आहे
आणि पुढल्यावेळेल्स दोन्ही बाजूनी तडजोड कार्याला हवी.. पण एकूण जीवनात माणसाचं प्रयत्नाचा अपमान श्रद्धाळू लोकांनी करू नये असे वाटते .

मी अशी उद्धरण पहिली आहेत कि जीव तोडून एखादा नोकरी मिळणे/ उद्योग निर्माण करणे याची धडपड करीत असतो... आणि त्यावेळीस ते प्रयत्न हेच महत्वाचे असते ...बाकी गोष्टी गौण असतात .. पण अश्या वेळी काही मित्र/ नातेवाईक अशी काही विधान करताना ना... "अरे त्याने या या गुरूंकडे जायला पाहिजे होते.. किंवा बघ सुरवात करताना नामस्मरण नाही केले .. वैगरे" हे बोलून तो माणूस किती दुखावला जात असेल त्याची या लोकांना कल्पना तरी असते का..?
हा मान्य आहे कि खडतर प्रयत्न करिताना मनुष्याला मनशांती साठी काही मानधारण, चिंतन/ योग करून फायदा होऊ शकतो किंवा एखाद्या जाणत्या अनुभवी माणसाशी नुसत्या गप्पा मारून फायदा होऊ शकतो .. पण याचे रूपांतर जेव्हा काही लोक बघ "श्रद्धा नाही म्हणून यश नाही" असे करतात ना तेव्हा तो मला तरी हलकटपणाच वाटतो...(येथे मी अनिस सारखात्यांशी १०० % सहमत आहे मनुष्य आणि त्याचे प्रामाणिक प्रयन्त "इतुकेच खरे ")