आमची प्रेरणा पुलस्ती यांची सुंदर रचना शहारा
किती पाळणे हलून गेले
अता थांबबा... थकून गेले
रंगामध्ये आले मी अन-
कुठे अचानक उठून गेले?
घरात डोकावले; दचकले
कुणी कडे मी चुकून गेले!
अजून खाटेवरी पसारा
कुणी इथे बागडून गेले
जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू मग जमून गेले...
काल मला ती काय म्हणाली?
"काम तुझ्यावीन घडून गेले"
सदर्याला का गंध निराळा
कोण पाखरू बसून गेले?
पती जरासा सुंभ निघाला
लग्ना दिवशी पळून गेले!
श्वासांची येरझार "केश्या"-
खरे काय ते कळून गेले?
प्रतिक्रिया
27 Mar 2009 - 12:55 am | प्राजु
=)) =)) =)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Mar 2009 - 12:52 pm | क्रान्ति
धन्य केशवा, कमाल केली
मस्त विडंबन जमून गेले!
=))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
27 Mar 2009 - 2:31 pm | नितिन थत्ते
सुंदर विडंबन. केशवसुमारांचे अभिनंदन.
अवांतरः विडंबनाचा विषय दारू नसल्याने विडंबन अजूनच आवडले.
अतिअवांतरः दारूचे वावडे नाही पण बहुतांश विडंबने त्याभोवतीच घोटाळतात त्यामुळे अंमळ कंटाळा आला होता.
खराटा
(रंग माझा वेगळा)
27 Mar 2009 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार
।हॅ हॅ हॅ हॅ
ह ह पु वा !
=)) =))
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
27 Mar 2009 - 6:48 pm | लिखाळ
वा वा वा ... धन्य आहात.
प्रत्येक शेर मजेदार :)
-- लिखाळ.
27 Mar 2009 - 7:29 pm | चतुरंग
गुढी लईच उभारलीयेत!! :)
__||__
(शिष्य)चतुरंग
28 Mar 2009 - 10:56 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
28 Mar 2009 - 11:14 am | मदनबाण
हा.हा.हा... सॉलिड्ड्ड्ड... :)
मदनबाण.....
जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...