मी राजमुद्रा (नवीन सदस्या)

राजमुद्रा's picture
राजमुद्रा in जनातलं, मनातलं
14 Feb 2008 - 3:01 pm

मिसळप्रेमीना राजमुद्राचा नमस्कार,

बर्‍याच दिवसापासून विचार करत होते, मिसळपाव वर लिहूया.
आज म्हटल दिवस चान्गला आहे, आजच सुरुवात करुया.

अपेक्षा ठेवते, सर्व मिसळप्रेमी मला कट्ट्यात सामावून घेतील
माझ्याबद्दल सान्गायच म्हणजे मी चित्रकार आहे- व्यवसायाने आणि मनानेही
बाकी सर्व माहिती सामन्य माणसाप्रमाणेच.

व्हेलेन्टाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
आज मि. पा. वर लिहून जवळच्या नातेवाईकाला खूप वर्षानी पत्र लिहिल्यासारखे वाटले.

आपल्या सर्वाच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

आपली
राजमुद्रा

हे ठिकाण

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

14 Feb 2008 - 3:13 pm | स्वाती राजेश

मिसळ पाव वर आपले स्वागत आहे.
सोबत आपण काढलेले एखादे चित्र टाकले असते तर आणखी बहार आली असती.
असो तुमच्या चित्रांची वाट पाहात आहोत. आशा आहे लवकरच पाहावयास मिळतील.:)

धमाल मुलगा's picture

14 Feb 2008 - 3:14 pm | धमाल मुलगा

राजमुद्राताई,
मिपावर आपले सहर्ष स्वागत!

आपण चित्रकार आहात, म्हणजे आम्हाला आता नवी नवी छान चित्र॑ देखील बघायला मिळणार म्हणा की :)

******************

तात्या, मिपावर सिध्दहस्त लेखक, कवि, सुगरणी / सुगरणे (?) आहेतच, फोटुवाल॑ पण आहेत..आता चित्रकारही आले हो!!!

मिसळधर्म एकदम ज॑गी फार्मात आला ह॑ !

-आपला
ध मा ल.

विसोबा खेचर's picture

14 Feb 2008 - 3:55 pm | विसोबा खेचर

धमाल मुला,

मिसळधर्म एकदम ज॑गी फार्मात आला ह॑ !

याचे सर्व श्रेय हे समस्त रसिक आणि जिन्दादिल मिपाकरांचेच आहे!

शिवाय भाईकाकांची पुण्याई!, ती ही मिपाच्या मागे आहे असेच मी मानतो!

भाईकाका एकदा स्वप्नात येऊन म्हणाले होते, "तात्या, मिसळपाव डॉट कॉम सुरू कर, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे!" :)

असो, मिपावर असाच लोभ असू दे रे धमाल मुला!

आपला,
धमाल तात्या.

धमाल मुलगा's picture

15 Feb 2008 - 11:18 am | धमाल मुलगा

हे मात्र बेष्ट हा॑..भाईकाकांची पुण्याई! कोण माईचा लाल यीईल मग आडवा?

भाईकाका एकदा स्वप्नात येऊन म्हणाले होते, "तात्या, मिसळपाव डॉट कॉम सुरू कर, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे!" :) वा तात्याबा वा! नशिबवान बुवा तुम्ही. भाईकाका काय, बाबुजी काय..

असो, मिपावर असाच लोभ असू दे रे धमाल मुला! आता जोड्यान॑ हाणा आम्हाला.
उगाच का दिवसभर पडिक असतो मिपावर? तात्या घरच्या माणसाला हे सा॑गाव॑ लागत नाही हो!

आपला,
धमाल तात्या.
लय आवडल॑ :)

आपला
-ध मा ल.

छोटा डॉन's picture

15 Feb 2008 - 6:16 pm | छोटा डॉन

"भाईकाका एकदा स्वप्नात येऊन म्हणाले होते, "तात्या, मिसळपाव डॉट कॉम सुरू कर, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे!" :)"
आपका खूद का बात हुवा ना "भाईकाकां से", फिर बात खतम .....
अभी मिसळपाव फॉर्म मे आनाईच मंगता .....

बाकी कोई तकलीफ हुई तो हम सब "डॉन" लोक किस कामके ????
कुछ भी हुवा तो "हम मिपा. हे पंटर लोग" सब संभाल लेंगे .....

मिपा का वफादार .... छोटा डॉन & ऊसकी पूरी "C" कंपनी .........

अवांतर : आमची कोठेही शाखा नाही .............

इनोबा म्हणे's picture

14 Feb 2008 - 3:18 pm | इनोबा म्हणे

नमस्कार...! राजमुद्रा
मिपा परिवारात आपले स्वागत आहे!
मी ही एक चित्रकार आहे(हौशी बरं का!) पण आपण एक व्यावसाईक चित्रकार असल्याने आपली फारच मदत होईल असे वाटते.

असो तुमच्या चित्रांची वाट पाहात आहोत. आशा आहे लवकरच पाहावयास मिळतील.:)
हेच म्हणतो

(रेषांत रमणारा) -इनोबा

मनीष पाठक's picture

14 Feb 2008 - 3:24 pm | मनीष पाठक

जसे तात्या गाण समोरच्याला उलगडवुन दाखवतात व त्यातले बारकावे अगदी सोप्या भाषेत सांगतात तसेच तुम्हीही चित्रे कशी वाचवी याबद्दल माहीती दिली तर फार बरे वाटेल.

(चित्र अन गाण्यातला) मनीष पाठक

राजमुद्रा's picture

14 Feb 2008 - 3:24 pm | राजमुद्रा

स्वाती आणि धमाल , :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आता तुमच्या प्रतिसादाच्या जोरावर मी नक्की मि. पा. काहीतरी पाठवू शकेल.

हो अगदी नक्की,
मी जरूर चित्र पाठवेन.

राजमुद्रा :)

विसोबा खेचर's picture

14 Feb 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर

मिसळप्रेमीना राजमुद्राचा नमस्कार,

नमस्कार...

बर्‍याच दिवसापासून विचार करत होते, मिसळपाव वर लिहूया.
आज म्हटल दिवस चान्गला आहे, आजच सुरुवात करुया.

चला, बरं झालं! :)

अपेक्षा ठेवते, सर्व मिसळप्रेमी मला कट्ट्यात सामावून घेतील

अवश्य, मिपा आपलंच आहे..

माझ्याबद्दल सान्गायच म्हणजे मी चित्रकार आहे- व्यवसायाने आणि मनानेही

अरे वा! छानच.. मनानेही चित्रकार आहात हे महत्वाचे! चित्र हे आधी नेहमी मनाच्या कॅनव्हासवर उमटावं, म्हणजेच ते कागदावरही छान उतरतं असं मीच एकदा कुठेतरी पूर्वी म्हटलेलं आहे! :)

बाय द वे राजमुद्राताई, आपल्या कुंचल्यातून उतरलेली काही चित्र इथे सर्व मिसळपावप्रेमींकरताही अगदी अवश्य द्या, अशी विनंती!

व्हेलेन्टाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्यालाही शुभेच्छा..

आज मि. पा. वर लिहून जवळच्या नातेवाईकाला खूप वर्षानी पत्र लिहिल्यासारखे वाटले.

क्या बात है...!

तात्या.

राजमुद्रा's picture

14 Feb 2008 - 4:00 pm | राजमुद्रा

मनीष,

चित्र फार बोलकी असतात, आणि ती वाचायला चित्रकारच असण्याची गरज मूळीच नसते.
माझ्या मते, प्रत्येकाची द्रुष्टी वेगवेगळी असते. त्यातून आपल्याला जो अर्थ मनाला (बुद्धीला नाही) पटतो तो घ्यायचा, त्यालाच चित्र वाचन म्हणतात.
बाकी गाणे समजायला जसा रियाज लागतो, तसाच इथेही लागतो. हा रियाज लागतो तो चित्रकाराचा द्रुष्टीकोन समजून घ्यायला. चित्र समजयला नाही.

चित्रातल्या प्रत्येक घटकाची भाषा वेगवेगळी असते, ते घटक म्हणजे- रन्ग, रेषा, आकार, लय, पोत्,रचना इ........
उदा. लाल रन्ग प्रेमाचे प्रतिक मानला जातो. पिवळा आनन्दाचे, हिरवा क्रान्तीचे, पान्ढरा पवित्र्याचे, निळा अथान्गतेचे........
पण पिवळा रन्ग कुणाला तेजस्वितेचेही प्रतिक वाटू शकतो. तसेच हिरवा सम्पन्नतेचे वाटू शकतो.........
म्हनूनच प्रत्येकाची द्रुष्टी वेगवेगळी असते. त्यातून आपल्याला जो अर्थ मनाला (बुद्धीला नाही) पटतो तो घ्यायचा

बाकी विसोबा खेचर,
तुम्ही केलेल्या माझ्या लेखनाच्या शल्यचिकित्सेवरून(चिरफाडीवरून) आपण मला मि. पा. वर सहभागी करून घेतले आहे, याची पावती मिळाली.

राजमुद्रा

आनंदयात्री's picture

14 Feb 2008 - 4:03 pm | आनंदयात्री

बाकी विसोबा खेचर,
तुम्ही केलेल्या माझ्या लेखनाच्या शल्यचिकित्सेवरून(चिरफाडीवरून) आपण मला मि. पा. वर सहभागी करून घेतले आहे, याची पावती मिळाली.

जबरीच ...

विसोबा खेचर's picture

14 Feb 2008 - 4:13 pm | विसोबा खेचर

बाकी विसोबा खेचर,
तुम्ही केलेल्या माझ्या लेखनाच्या शल्यचिकित्सेवरून(चिरफाडीवरून) आपण मला मि. पा. वर सहभागी करून घेतले आहे, याची पावती मिळाली.

धन्यवाद.. :)

आपला,
डॉ तात्या अभ्यंकर.

मनीष पाठक's picture

14 Feb 2008 - 5:40 pm | मनीष पाठक

बाकी गाणे समजायला जसा रियाज लागतो, तसाच इथेही लागतो. हा रियाज लागतो तो चित्रकाराचा द्रुष्टीकोन समजून घ्यायला. चित्र समजयला नाही.

माझही हेच म्हणन आहे की तो दृष्टीकोन तुम्ही तुमचे प्रत्येक चित्र येथे टाकताना विस्तृत पणे नमुद करावा ही विनंती, म्हणजे चित्रकाराला (तुम्हाला) त्याचित्रातुन काय सांगायचेय ते समजेल. बाकी चित्रातुन प्रत्येकजण काहीतरी अर्थ घेतोच पण तो त्या चित्रकाराला अपेक्षित असेलच असे नाही म्हणुन तो इथे नमुद करावा ही विनंती.

पुढील लेखनाची (सचित्र) वाट पाहत आहे.

(चित्रांचा शास्त्रीय अर्थ न कळालेला) मनीष पाठक.

राजमुद्रा's picture

14 Feb 2008 - 4:02 pm | राजमुद्रा

इनोबा,
मी आपल्याला नक्की मदत करेन. :)

राजमुद्रा

राजमुद्रा's picture

14 Feb 2008 - 5:48 pm | राजमुद्रा

मनिष,

जसा कामातून वेळ मिळेल, मी नक्की माझे लेखन (चित्रासहीत) प्रसिद्ध करेन.

राजमुद्रा

चतुरंग's picture

14 Feb 2008 - 8:12 pm | चतुरंग

आपलं स्वागत.
माझाही जीव चित्रात रमणारा. आपली चित्रे पहायला आणि 'वाचायला' आवडतील!

चतुरंग

केशवराव's picture

14 Feb 2008 - 10:41 pm | केशवराव

राजमूद्रा हिस,
तुझे मिपावर स्वागत.
चित्रमय लेखाची उत्सुकतेने वाट पहात आहे.

-------- केशवराव.

प्राजु's picture

15 Feb 2008 - 2:36 am | प्राजु

वा वा.. हे छान.

ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार...

राजमुद्रा चित्रकार है... लवकरच लाव इथे तुझी चित्रे.. वाट पहाते आहे.

- प्राजु

तळेकर's picture

15 Feb 2008 - 2:08 pm | तळेकर

तात्या.
चित्र कसे चिटकवणार ?
या बद्दल माहिती द्यावी.
मग देताय ना माहिती.?

विसोबा खेचर's picture

15 Feb 2008 - 3:57 pm | विसोबा खेचर

संपादनाच्या ज्या लहान लहान खिडक्या आहेत त्यातल्या सूर्यास्ताच्या खिडकीवर टिचकी मारा. एक छोटी खिडकी उघडेल. त्यातल्या Image URL मध्ये आपल्याला द्यायच्या असलेल्या चित्राचा दुवा द्या आणि ओके म्हणा की झालं!

आपला,
(मार्गदर्शक) तात्या.

मनस्वी's picture

15 Feb 2008 - 5:57 pm | मनस्वी

स्वाऽऽगत क रू या

स्वाऽऽगत क रू या

स्वाऽऽगत क रू या

न वी न सदस्याचेऽऽ

(स्वागतोत्सुक) मनस्वी

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 10:52 pm | सुधीर कांदळकर

चित्रकारताई. आता मिपा वर आणखी रंग भरेल.

अनेक शुभेच्छा.

आ. वि चित्र
सुधीर