फिटेल का हे ऋण माझे

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
31 Dec 2019 - 5:16 pm

फिटेल का हे ऋण माझे

विवंचना आत दाटली

याच काळजीने मीच माझी

वर जागा शोधली

रोप मीच लावले

बघून स्वप्न उद्याचे

काय ठावं , याच जागी

इथेच सुळी चढायचे

रोज रोज तोच सूर्य

तीच आग ओकतो

रोज रोज मीच का पण ?

तेच तेच भोगतो

मीच जर का अन्नदाता

रिक्त का रे चूल माझी ?

घेतला नांगर हाती

हीच का रे भूल माझी ?

ऐकतो सरकारनामे

अभय कर्जांना दिले

फासली पाने पुन्हा ती

भाव तैसेच राहिले

=====================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

जीवनमानबळीराजाला श्रद्धांजलीषंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेध

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

31 Dec 2019 - 6:52 pm | दुर्गविहारी

जळजळीत वास्तव ! :-(

गणेशा's picture

31 Dec 2019 - 8:27 pm | गणेशा

मीच जर का अन्नदाता
रिक्त का रे चूल माझी ?
घेतला नांगर हाती
हीच का रे भूल माझी ?

भारी

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jan 2020 - 9:07 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली असे म्हणवत नाही. भावना पोचल्या इतकेच म्हणू शकतो.

शेतकर्‍यांच्या प्रश्णांवर सगळे पोटतिडकीने बोलतात पण त्यांच्या समस्यांचे मूळापासून निराकारण करण्यात कोणालाही रस नसतो. (अगदी स्वतः शेतकर्‍याला सुध्दा) आणि याच कारणाने इतकी वर्षे होउन सुध्दा शेतकर्‍यांचे प्रश्ण सुटत नाहीत. उलट भावनिक आणि सहानुभूती देण्याच्या / मिळवण्याच्या नादात प्रकरण जास्त गुंतागूंतीचे होत चालले आहे.

पैजारबुवा,

फुटूवाला's picture

1 Jan 2020 - 1:24 pm | फुटूवाला

भावनिक आणि सहानुभूती देण्याच्या / मिळवण्याच्या नादात प्रकरण जास्त गुंतागूंतीचे होत चालले आहे.

पाषाणभेद's picture

1 Jan 2020 - 7:48 pm | पाषाणभेद

छान आहे कविता. आवडली.

स्वोर्डफिश's picture

2 Jan 2020 - 12:53 am | स्वोर्डफिश

मदनबाण's picture

4 Jan 2020 - 6:30 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyar

खिलजि's picture

6 Jan 2020 - 6:38 pm | खिलजि

धन्यवाद सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे .. पैंबुकाकांशी पूर्णतः सहमत है .. पण या शीघ्र ओळी ( त्या राबणाऱ्या आणि परिस्थितीला कंटाळून वर गेलेल्या बळीराजांना मानवंदना ) डकवल्याशिवाय पर्याय नव्हता .....