देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।।

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
30 Nov 2019 - 4:38 pm

तुळजाभवानीचे दागिने कर्मचा-यांकडून लंपास
लोकसत्ता 30 नोव्हेबर 2019

देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
म्हणून लंपास केली
मंदिराची तिजोरी ।।

तुम्ही करत बसा
कोर्ट आणि कचेरी ।।
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।

सोने, चांदी, भांडीपात्र,
काही शिल्लक नाहीमात्र।।
तुम्ही बसा तपासत,
नोंदी आणि हजेरी ।।

देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।

तीर्थी धोंडा पाणी
म्हणाले तुकोबा
जत्रा मे फत्रा बिठाया
तिरथ बनाया पानी
वाणी ती कबीरी

देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।

मंदिरांच्या तिजोरीत
सोने चांदी सडती ।।
इथे गोरगरीब
अन्नाविना रडती ।।
करा देव-तिजोरीची
निलामी साजरी।।

देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।

तुम्ही करत बसा
कोर्ट आणि कचेरी ।।
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।

कविता

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

30 Nov 2019 - 10:24 pm | जॉनविक्क

काय म्हणावे लोकांच्या भित्रेपणाला.
तिथे धीट चोर देवाचे दागिने चोरतात,
इथे पापभिरु भोळसट प्रतिक्रिया द्यायला पण घाबरतात
(काहि दिलेल्या प्रतिक्रिया काढून टाकतात,न जाणो काही झालं तर)
हा हा हा कीव आली बौद्धिक दारीद्राची.

धदा ह्या भितीवरच चालतो.

देव मानंना, मंदिराचे पुजारी ।।
लंपास ती केली, अख्खी तिजोरी ।।
श्रद्धाळूच्या माथी मग, कोर्टाचीच वारी ।।

सोनं अन चांदी, वस्त्रें भरजरी ।।
काल्पनिक ती सारी, देवासम या ।।
उल्लेखी शिल्लक, फक्त नोंदी हजेरी ।।

तीर्थी, धोंडापाणी, म्हणे तुकोबा ।।
डोकोनियातु पाही स्वअतरंगी।।
अनुमोदनासी वाणी ती कबीरी ।।

आपुलीची अक्कल आपणेच निलामी ।।
आपणच भरीतो पुजाऱ्याची तिजोरी, पिढ्यावारी ।।
देव मानण्याची पुजाऱ्या काय ती जरुरी ?

मुक्ती

अ‍ॅड. अनंत खेळकर

जन्मभर किती
पाळले सोवळे
कशाला कावळे
पिंडासाठी

जरी नाही कधी
जीव तू लावला
तरी तो कावळा
शिवलाच

शिवता कावळा
मोक्षप्राप्ती झाली
कीव तुझी आली
मुक्या जीवा

mrcoolguynice's picture

2 Dec 2019 - 5:48 pm | mrcoolguynice

देव मानीत नाहीत
मंदिराचे पुजारी ।।

हे जास्ती सयुक्तिक झालं असतं.

बाजीगर's picture

4 Dec 2019 - 6:38 pm | बाजीगर

पुजारीच लिहिले होते आधी.
सगळी यमकं त्यासाठीच जुळवलीत.
पण नंतर बदल केला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2019 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
म्हणून लंपास केली
मंदिराची तिजोरी ।।

आवडली रचना.

मी पहिल्यापासून म्हणतो, देव वगैरे या सर्व भ्रामक कल्पना आहेत, लोक ऐकत नाही. नादी नका लागू रे....!

-दिलीप बिरुटे

जॉनविक्क's picture

5 Dec 2019 - 6:06 pm | जॉनविक्क

ते पण ऐकायचं का ?

बाजीगर's picture

8 Dec 2019 - 5:03 am | बाजीगर

देव दानवा
नरे निर्मीले.

यात मला काहीही शंका नाही.

चांगले वागणे,इतरांना यथाशक्ती मदत करणे,इतरांना न फसवणे,
या गोष्टी आम्ही सहज करतो.
त्यासाठी देव दानव च्या बागूलबूआ ची गरज नाही.

धन्यवाद डाॅ.साहेब

बाजीगर's picture

8 Dec 2019 - 4:57 am | बाजीगर

आवडली तुमची कविता.

अहो तुमचीच कविता, एखाद दुसरा शब्द फिरवुन नकलवून लिहीलीये.
तुमचीच मूळ कविता आशयघन असल्याने, तिची माझ्याकुन झालेली नकल, सुंदर भासतीये.
क्रेडिट टू यु.