' भाज्यांचं संमेलन '
एकदा भाज्यांच संमेलन भरवलं प्रत्येकाचे महत्त्व सांगायचे ठरवल
हिरवेगार घोसावळ आले पुढे म्हणाले भजी करुन खा बरे.कांदा आला हसत हसत माझ्या शिवाय तुम्हाला नाही करमत.मी जोडीला आलो बटाटा दोघांचा मिळुन बनवा चटकदार बटाटेवडा. काटेरी वांग्याचा रंगच न्यारा ताजी ताजी घेऊन भरीत भाजी करा.मी गोल लाल गरगरीत भोपळा शेजारी उभा आहे दुध्या भोपळा आणि खरं सांगु का ? आठवड्यातुन एकदा तरी भाजी खाऊन हदयविकार टाळा.आवडीची भाजी फ्लाॅवर, ढोबळी गवार भेंडी असते कोवळी काकडीची तर ऐटच वेगळी कोशिंबिरी ने लज्जत वाढली मुळा बिटाची चव चांगली कच्ची खाण्याने ताकद आली
गाजराचा करा गोड हलवा गाजर खाऊन डोळ्यांचे विकार टाळा दिसतो कसा मी हिरवागार पालक खाऊन तर बघा सुदृढ होईल बालक कोल्हापूरी मिरचीचा झटका फार भोजनाच्या वेळी आठवत रहाल.
प्रतिक्रिया
7 Nov 2019 - 2:41 pm | पाषाणभेद
' भाज्यांचं संमेलन '
एकदा भाज्यांच संमेलन भरवलं
प्रत्येकाचे महत्त्व सांगायचे ठरवल.
हिरवेगार घोसावळ आले पुढे
म्हणाले भजी करुन खा बरे.
कांदा आला हसत हसत
माझ्या शिवाय तुम्हाला नाही करमत.
मी जोडीला आलो बटाटा
दोघांचा मिळुन बनवा चटकदार बटाटेवडा.
काटेरी वांग्याचा रंगच न्यारा
ताजी ताजी घेऊन भरीत भाजी करा.
मी गोल लाल गरगरीत भोपळा
शेजारी उभा आहे दुध्या भोपळा.
आणि खरं सांगु का ?
आठवड्यातुन एकदा तरी भाजी खाऊन हदयविकार टाळा.
आवडीची भाजी फ्लाॅवर, ढोबळी
गवार भेंडी असते कोवळी.
काकडीची तर ऐटच वेगळी
कोशिंबिरी ने लज्जत वाढली.
मुळा बिटाची चव चांगली
कच्ची खाण्याने ताकद आली.
गाजराचा करा गोड हलवा
गाजर खाऊन डोळ्यांचे विकार टाळा.
दिसतो कसा मी हिरवागार पालक
खाऊन तर बघा सुदृढ होईल बालक.
कोल्हापूरी मिरचीचा झटका फार
भोजनाच्या वेळी आठवत रहाल.
मस्त आहे. सरकारी रुग्णालयला पाठवा. :-)
(पाणी गाळा, नारू टाळा)