मदत हवी आहे म्हैसूर उटी ट्रिप

अनिकेत वैद्य's picture
अनिकेत वैद्य in भटकंती
25 Oct 2019 - 5:50 pm

म्हैसूर उटीला ह्या दिवाळीत जाण्याचा प्लॅन नक्की आहे. आम्ही दोघे + ८ वर्षाचा मुलगा सोबत आहे.
स्वतःचे वाहन नेणार नाही.
रविवार, २७ ऑक्टोबर पुणे ते म्हैसूर प्रवास
सोमवार २८ ऑक्टोबर आणि मंगळवार २९ ऑक्टोबर म्हैसूर दर्शन
बुधवार ३० ऑक्टोबर म्हैसूर ते उटी बस ने
३०, ३१, १ नोव्हेंबर उटी दर्शन
२ नोव्हेंबर उटी ते मेत्तूपलयम टॉय ट्रेन ने प्रवास तेथून कोईम्बतूर मार्गे ३ नोव्हेंबर ला सकाळी बंगलोर ला परत

म्हैसूर ला आवर्जून बघण्यासारखे राजवाडा, प्राणी संग्रहालय ह्या खेरीज काय आहे?
उटीला पाहण्यासाठी १३ पॉईंट्स/जागांची ची एक लिस्ट मिळाली आहे.

फार प्रसिद्ध नसलेल्या पण आवर्जून पहावी अशी काही ठिकाणे असल्यास सांगा.

खादाडीच्या न चुकवाव्या अश्या जागा कोणत्या?

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 10:12 am | चौकटराजा

खरे तर आता दिव्याचे झोत असलेले कारंजी हे नवल राहिलेले नाही . तरीही वृंदावन बाग ही पहायला हरकत नाही. म्हैसूर पासून जवळ ४० किमी वर सोमनाथपूर आहे तेथील मंदीर अजिबात चुकवू नये.

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 10:18 am | चौकटराजा

चामुंडी हिल वर एक मोठा नंदी पाहायला मिळेल . तिथून म्हैसूर शहर विहंगम दृश्य दिसते !

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:07 am | अनिकेत वैद्य

चामुंडी हिल ला जाऊन आलो. मोठा नंदी, चामुंडी देवीचे मंदिर पहिले.
येताना व्ह्यू पॉईंट ला थांबून म्हैसूर शहर पहिले.
व्ह्यू पॉईंटचा टेलिस्कोपिक पॉईंट बंद आहे. शेजारच्या अगदी लहान जागेतून म्हैसूर शहर पहिले. गर्दी खूप होती, सगळे सेल्फीवीर, जास्त माहिती मिळू शकली नाही. म्हैसूर शहरातल्या जागा ओळखता आल्या नाहीत.

अनिकेत वैद्य's picture

30 Oct 2019 - 11:06 am | अनिकेत वैद्य

धन्यवाद.
सोमनाथपुर ला जाऊन आलो.
मंदिर अप्रतिम आहे. तेथे चांगला गाईडही मिळाला त्याने खूप सुंदर माहिती सांगितली.

चौकटराजा's picture

2 Nov 2019 - 6:55 pm | चौकटराजा

सोमनाथपूरचे देऊळ पाहिलेत हे वाचून आनंद झाला . आता हलेबिडु , पट्टडकल, आयहोळ, बदामी ,बेलूर अशी " बकेट लिस्ट " वाढवा बरे ! कर्नाटक माझे लाडके पर्यटन राज्य !

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:03 am | अनिकेत वैद्य

पट्टदकलू /पट्टडक्कल, आयहोळ, बदामी हे एका ट्रिप मध्ये आणि हंपी एका वेगळ्या ट्रिप मध्ये पाहून झाले आहे.
हळेबिडू, बेल्लूर हि दोन ठिकाणे बकेट लिस्ट मध्ये आहेत.

कंजूस's picture

26 Oct 2019 - 11:59 am | कंजूस

१) म्हैसूर ते उटी बस ने
यासाठी दोन मार्ग आहेत. छोट्या स्वराज माझदा तेवीस सिटर बसेस या मसिनागुडी मार्गे चढ्या घाटाने अडीच तासात जातात.
याच मार्गावर मुदुमलाई/बांदीपुर अभयारण्यातून जाताना प्राणी सकाळी /संध्याकाळी फुकट जवळून पाहता येतात हा बोनस.

इतर सर्व मोठ्या सरकारी /खासगी बसीस दूरच्या मार्गाने सहा तास घेतात.

२) राजवाड्याचे बाहेरूनचे लाइटिंग संध्याकाळी साडेसात ते आठ शनिरविवारी असतेच. दिवाळीत असेलच. त्याचवेळी वृंदावन गार्डनला गेलेलो असल्यास हुकते.
३)वृंदावनचे कारंजे हे एक टुअरवाल्यानी वाढवलेले पकाव मार्केटिंग आहे.
४) खरं चंदन कुठेच मिळत नाही. ( पारशी अग्यारीशिवाय. ) घेण्याच्या खटपटीत राहू नका.
५)मैसुर उटी 'करण्याची' जागा नाही, रेंगाळायची आहे. एकदोन जागा राहिल्या तरी चालेल उगाच धावपळ करण्यात अर्थ नाही.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 12:12 pm | यशोधरा

वृंदावनचे कारंजे हे एक टुअरवाल्यानी वाढवलेले पकाव मार्केटिंग आहे.

अगदी.

अनिकेत वैद्य's picture

30 Oct 2019 - 11:13 am | अनिकेत वैद्य

१. म्हैसूर ते उटी KSRTC सरकारी बसने जात आहे. बस मोठी असल्याने लांबच्या मार्गाने जाईल. बस नेईल तसं जायचं.
२. काल दिवाळीनिमित्त सांध्याकाळी ७ ते ८ लायटिंग पाहीले. डोळ्याचे पाने फिटावे असा अनुभव.
३. वृंदावन गार्डनला गेलो नाही.
४. अनेक ठिकाणी अस्सल चंदन नावाने लाकडाचे तुकडे विकताना बघून मजा वाटली. अर्थातच घेतले नाहीत.
५. काल संध्याकाळी म्हैसूर शहरात पायी जवळपास ४ ते ५ तास फिरलो. शहर (माणसे, गल्ल्या, दुकाने) पाहता आली.

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:20 am | अनिकेत वैद्य

<< यासाठी दोन मार्ग आहेत. छोट्या स्वराज माझदा तेवीस सिटर बसेस या मसिनागुडी मार्गे चढ्या घाटाने अडीच तासात जातात.
याच मार्गावर मुदुमलाई/बांदीपुर अभयारण्यातून जाताना प्राणी सकाळी /संध्याकाळी फुकट जवळून पाहता येतात हा बोनस.

इतर सर्व मोठ्या सरकारी /खासगी बसीस दूरच्या मार्गाने सहा तास घेतात.>>

म्हैसूर ते उटी हा प्रवास सरकारी बस ने केला. हि बस दूरच्या मार्गाने (गुडलूर मार्गे) गेली. सकाळी १० वाजता म्हैसूर मधून निघून दुपारी साधारण ३ वाजता उटीला पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी पायकारा, मधुमलाई जंगल अशी ट्रिप कार बुक करून फिरलो तेंव्हा परत येताना मसिनागुडी मार्गे चढ्या घाटातून आलो. ह्या घाटात ३६ अत्यंत अवघड वळणे (हेअरपिन टर्न्स) आहेत. प्रत्येक वळणावर त्याचा क्रमांक लिहिला आहे (उदा. वळण १/३६, २/३६). ह्या घाटातून केवळ अनुभवी चालकच गाडी चालवू शकतात असे आमच्या चालकाने सांगितले.

चौकटराजा's picture

4 Nov 2019 - 4:07 pm | चौकटराजा

गुंडालपेट गुडाळूर करत उटीला जाणे हा अनुभव हिरवा गार असा आहे. आता तर कहरच असेल . पण सध्या ढगाळ वातावरणाने दोडाबेट्टा निराशाजनक असेल .एरवी तेथून पाच शहरे दिसतात !

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:26 am | अनिकेत वैद्य

<< याच मार्गावर मुदुमलाई/बांदीपुर अभयारण्यातून जाताना प्राणी सकाळी /संध्याकाळी फुकट जवळून पाहता येतात हा बोनस. >>

हरणांचे अनेक कळप, मोर, माकडे, हत्ती, अनेक पक्षी प्रवासात दिसले.

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:26 am | अनिकेत वैद्य

<< याच मार्गावर मुदुमलाई/बांदीपुर अभयारण्यातून जाताना प्राणी सकाळी /संध्याकाळी फुकट जवळून पाहता येतात हा बोनस. >>

हरणांचे अनेक कळप, मोर, माकडे, हत्ती, अनेक पक्षी प्रवासात दिसले.

चौथा कोनाडा's picture

27 Oct 2019 - 6:07 pm | चौथा कोनाडा

म्हैसूर राजवाड्याची विद्युत रोषणाई पाहणे हा अतिशय सुंदर अनुभव होता, सायंकाळचे ते अविस्मरणीय दोनतीन तास कायम लक्षात राहतील !

म्हैसूर जवळील तलकाडूला देखील आम्ही भेट दिली त्याचा अनुभव:

तलकाडू : एक प्रवास

मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी!

म्हैसूर मधली ती प्रसन्न सकाळ अवतरली. बाकीचे सगळे आवरे पर्यंत म्हटलं,जरा लॉजच्या बाहेर जाऊन चौकशी करून यावी. रस्त्यावर येऊन एका स्वच्छ छानशा हॉटेल मध्ये . . . . .

http://www.misalpav.com/node/29188

Read the article on computer as it contains nice photos also which will give more pleasure !

Happy Reading !

अनिकेत वैद्य's picture

30 Oct 2019 - 11:15 am | अनिकेत वैद्य

म्हैसूर राजवाड्याची विद्युत रोषणाई पाहिली.
सोमनाथपुर आणि तकलाडू अशी दोन्ही ठिकाणे पाहिली.

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2019 - 7:13 am | चौथा कोनाडा

वाह, खुपच भारी !
दोन्हींचे फोटो, वृत्तांत वाचायला आवडेल !

संपूर्ण तलकाडू प्रवास वाचला . मस्त लिहिले आहे.
मागे epic चॅनेल वर या बद्दल पाहिले होते . वाचून छान वाटले .

चौथा कोनाडा's picture

5 Nov 2019 - 8:05 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, गणेशा !
प्रतिसाद वाचून मस्त वाट्लं ! धन्यु _/\_

वैद्यबुवा, इतक्या तत्परतेने फीडब्याक दिल्यामुळे सांगणाऱ्यांचा उत्साह वाढतो.
बरं वाटलं. तुमची सहल आनंदाची होवो.

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:08 am | अनिकेत वैद्य

धन्यवाद
सहल सुफळ संपूर्ण पार पडली.
काल (रविवारी) पुण्यात परत आलो.

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2019 - 9:36 pm | चौथा कोनाडा

अनिकेत वैद्य यांना मानायला पाहिजे, ऑन-गो अपडेट दिले सहलीचे !
_/\_ अनिकेत वैद्य _/\_

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:12 am | अनिकेत वैद्य

धन्यवाद
म्हैसूर उटी प्रवासात मोबाईलवरून काही प्रतिक्रियांना उत्तरे दिली.
बाकी प्रतिक्रियांना आज उत्तरे देत आहे.

म्हैसूरमध्ये खादाडीसाठी आवर्जून जायला हवे असे एक ठिकाण म्हणजे विनायक मायलारी. इथे अप्रतिम डोसे मिळतात. किम्बहुना इथे फक्त हाच पदार्थ मिळतो. दुसरे काही नाही. कायम गर्दी असते. मन्गळवारी बन्द असते.
तुप्पड डोसा हा अजुन एक वेगळा पदार्थ - महेश टिफ्फनीज मधे मिळेल. हे एक फार छोटे हाटेल आहे.
फाईन डायनिन्गसाठी - गुफा तसेच द ओल्ड हाऊस.

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 10:10 am | अनिकेत वैद्य

धन्यवाद
तुमचा प्रतिसाद आत्ता पहिला. दुर्दैवाने ह्यापैकी एकाही ठिकाणी जाऊ शकलो नाही.
आपण सुचवलेल्या जागा नोंद करून ठेवत आहे. पुढच्या वेळी नक्की जाईन.

२ नोव्हेंबर उटी ते मेत्तूपलयम टॉय ट्रेन ने प्रवास

या गाडीचं तिकिट आरक्षण करता आलं का, प्रवासाबद्दल सांगा।

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 11:40 am | अनिकेत वैद्य

उटी ते मेट्टूपलयम टॉय ट्रेन चे तिकीट आरक्षित केले होते.
चक्रीवादळाची सूचना मिळाल्याने २ नोव्हेंबर पर्यंत सर्व गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे हा प्रवास करू शकलो नाही.

हॅाटेल बुकिंग अगोदर का तिथे गेल्यावर?
मुलाला कोणती जागा आवडली?

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 11:46 am | अनिकेत वैद्य

म्हैसूर मध्ये हॉटेल जिंजरला राहिलो. आधीच आरक्षण केले होते. हॉटेल बऱ्यापैकी मध्यवस्तीत आहे. म्हैसूर प्राणी संग्रहालय, राजवाडा ह्या वास्तू साधारण १ किमी अंतरावर आहेत, चालत जाऊ शकतो. चालतच फिरलो.
उटीला KSTDC चे हॉटेल मयूर सुदर्शनला राहिलो. आगाऊ आरक्षण केले होते. हे हॉटेल साधारण ४० एकर परिसरात पसरलेले आहे. आवारात सुंदर बाग आहे.
मुलाला म्हैसूरचे प्राणी संग्रहालय, मधुमलाई अभयारण्यात दिसणारे प्राणी खूप आवडले.

ओके। कोइमत्तुर मार्गे ट्रेनने नाही आलात.

अनिकेत वैद्य's picture

4 Nov 2019 - 11:49 am | अनिकेत वैद्य

परतीचा प्रवास हा उटी ते मेट्टूपलयम टॉय ट्रेन, मेट्टूपलयम ते कोईम्बतूर पॅसेंजर, कोईम्बतूर ते बंगलोर कन्याकुमारी-बंगलोर एक्सप्रेस असा ठरवला होता.
चक्रीवादळाच्या सूचनेमुळे टॉय ट्रेन रद्द झाली. त्यामुळे उटी ते कोईम्बतूर कॅब करून आलो आणि तिथून रेल्वे ने बंगलोर.

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Nov 2019 - 1:11 pm | भटकंती अनलिमिटेड

ट्रिपच्या आधी एक मेसेज केला असतास तर सगळी टूर बनवून दिली असती. इथे आज पाहिलं हे.