आज पहाटे जरा लवकरच उठलो व जवळच असलेल्या मित्राच्या मामांच्या फार्म हाऊस वर आलो, व थोडे जॉगिंग होईल व ताजे हवा पाणी मिळेल हा उद्देश, तर तेथे रुम वर कॅमेरा ठेवलेला दिसला व सुर्य देव उगवायच्या तयारीत होते तेव्हा आकाशामध्ये मेघांनी वेग वेगळे डिझाइन्स तयार केले होते त्यांचे खेचलेले फोटो !
कॅमेरामधील ओ कि ठो कळत नाही फक्त बटन दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.. जे आहे ते गोड मानून घ्या... वाईट / चुका काढणारे प्रतिसाद देऊ नका ;)
************
************
************
************
************
************
************
प्रतिक्रिया
24 Mar 2009 - 8:42 am | भाग्यश्री
छान आहेत फोटोज.. सुर्य पिटुकला मस्त दिसतोय!
हेच ते मानलेले मामा वाटतं! :)
24 Mar 2009 - 8:49 am | दशानन
>>सुर्य पिटुकला मस्त दिसतोय
=))
त्याच्या कानावर गेले ना कि त्याला पिटुकला म्हणताय तो भडकेल ;) तसा तो आता भडकलेला आहेच मार्च संपत आला... उन्हाळा चालू झाला :(
24 Mar 2009 - 8:48 am | सहज
>तर तेथे रुम वर कॅमेरा ठेवलेला दिसला
हं काय राजे, तुमच्या त्या एलीयन दोस्ताने पांढरे ढग कापूस पिंजावा तसा पिसला व तुमच्यासाठी कॅमेरा ठेवला का? ;-)
कृपया वाईट / चुका काढणारा प्रतिसाद आहे असे समजु नका ;-)
24 Mar 2009 - 8:53 am | दशानन
फक्त ४५-५० मिनिटामध्ये मला ही मेघांची कलाकृती पहावयास मिळाली.. खुप नवल वाटलं की काही मिनिटामध्ये हा निळा आकाशी फळा एकदम बदलतो कसा.. ! कुठला तरी चित्रकार फटाफट कला तयार करतो व पुन्हा पेपर बदलून नवीन कला !
*
फार्म हाऊस वर नेहमी पार्टी होत असते त्यामुळे कॅमेरा तयार ठेवलेलाच असतो ;)
24 Mar 2009 - 9:02 am | सँडी
सुर्यबिंब जबरीच!
अवांतरः अजुन काय काय होतं फार्महाऊस वर?
24 Mar 2009 - 4:14 pm | आपला अभिजित
अवांतरः अजुन काय काय होतं फार्महाऊस वर?
राजे दिवसा गेले होते तिथे. रात्री नव्हे! >:)
24 Mar 2009 - 9:10 am | अवलिया
युएफओ कुठे आहे?
मला म्हणे युएफओचे फटु टाकणार आहे... णिसेद :)
--अवलिया
24 Mar 2009 - 10:42 am | परिकथेतील राजकुमार
भिंत आणी थोबाडाचे फोटु कुठे आहेत ?
हे पण फोटु बरे आहेत. आजकाल सुर्योदय चित्रातच बघायला मिळतो.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
24 Mar 2009 - 9:32 am | पाषाणभेद
फोटू लंबर १,२,३ दिसना जनू ?
हा हा आताशी दिसू लागल्याती. जरा येळ लागुन र्हायलाय त्यास्नी.
आन मला वाटू र्हायलय की फोटू लंबर ४,५ आन ६ यांचे लंबर चुकलेत जनू.
- पाषाणभेद
24 Mar 2009 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त फोटो आले आहेत. बाय द वे, कॅमेरा कोणता वापरला, किती मेगापिक्सलचा कॅमेर्याने असे सुंदर फोटो येतात.
फोटो शटरचा स्पीड काय होता,प्लॅश,फोकस लेन्थ काय होती, अशी काही माहिती आहे का आपल्याकडे ;)
नाही म्हणजे, असाच फोटो काढायचा असेल तर तशी अरेंजमेंट करायला ! :)
-दिलीप बिरुटे
24 Mar 2009 - 9:40 am | दशानन
बरोबर सर,
एकदम महत्वाच्या प्रश्नाला हात घातलात तुम्ही !
मी रुम वर गेलो तेथे कॅमेरा पडला हुता, स्वासप्रो कंपनीचा, नशीबानं तो चार्ज केला हुता, चालू करण्याचे बटन दाबले चालू झाला, समोर ढग दिसले डोळ्यासमोर कॅमेरा पकडा व फोटो काढा बटन दाबले, काही तरी कुट कुट झालं ... हीच प्रोसेस सर्व फोटोसाठी वापरली ;)
शक्यतो, मेगाफिक्सेल ह्याचं SDHC compatible आहे, कॅमेराच्या दर्शनी भागावर एक भोक आहे त्यामध्ये लहानशी काच आहे त्यानुसार ह्याचा फोकस ३-४ एमएम असावा, प्लॅश आहे पण सुर्याला दाखवून का अवलक्षण करावे म्हणून वापरला नाही, शटर स्पीड... माझ्या दुकानाचं शटर मी जरा जोरात ओढलं की धाड करुन खाली येतं... पंधरा फुटाचे शटर.. सळीने ओढले तर बघा दहा-बारा सेंकदात शटर खाली येतं पुर्ण...
24 Mar 2009 - 10:33 am | घाशीराम कोतवाल १.२
शटर स्पीड... माझ्या दुकानाचं शटर मी जरा जोरात ओढलं की धाड करुन खाली येतं... पंधरा फुटाचे शटर.. सळीने ओढले तर बघा दहा-बारा सेंकदात शटर खाली येतं पुर्ण...
=)) =)) =))
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
24 Mar 2009 - 10:47 am | दिपक
छान !
पाचवा फोटो जास्त आवडला. :)
पहिले तीन फोटु पोपडं उडालेल्या भिंतीचे आहेत का राजे? शेवटच्या फोटोत अंगठाचा ठसा आडवा आलाय. ह.घ्या. ;)
24 Mar 2009 - 3:58 pm | ब्रिटिश टिंग्या
फोटोज्!
25 Mar 2009 - 6:40 pm | क्रान्ति
सूर्याचे फोटो खासच आहेत.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}