अवलिया साहेबांच्या गंभीर कवितेमुळे काही सुचेनासे झाले मग हा गंभीर्पणा दुर करण्यासाठीच हे विडंबन
अवलिया साहेब. ह.घ्या.
कधी नवख्या सभासादासारखा
कधी मत्त टिकाकारासारखा
कधी अनाहुत विडंबनकारासारखा
कधी वाट पहायला लावण्यार्या प्रतिसादासारखा
कधी रडवेला तर कधी हसरा
कसाही असलास तरी पण
आज मी तुझ्या काव्याचे विडंबन करीत आहे
दे मला अजुन अशी काव्य दे
हे दयानिधी कवी, लेखका....
करशील ना माझ्यासाठी येवढेतरी ??
*
हळुवार हलकेच जावुन
हॉटेलमधे खाऊन झाल्यावर
वेटरच्या कानात गुज सांगा
पैसे नाही माझ्या खिशात
मार खाण्याआधी अजुन एक
मिसळ खाऊ द्या मला
मला खायचय अजुन
हॉटेलात मी प्लेट धूत राहीन अनंत काळपर्यत
हे मॅनेजर, वेटरांनो...
कराल ना माझ्यासाठी येवढेतरी
*
पोळपाटावरिल कणकेचा गोळ्याचा
नवा नकाशा लाटण्यासाठी
असेल ती खजिलच मनातुन
या जन्मी भुकेले झालेले माझे पोट
कदाचित येईल भरुन समोरच्या होटेलात
हवा आहे मला म्हणुनच
पुनर्जन्म बल्लवाचार्यांच्या रुपात
हे दयाळु परमेश्वरा...
करशील ना माझ्यासाठी येवढेतरी
आपला मराठमोळा
प्रतिक्रिया
24 Mar 2009 - 6:53 pm | अवलिया
=))
अवलिया साहेब. ह.घ्या.
गरज नाही रे याची.... निवांत येवु दे अजुन असेच.
--अवलिया
24 Mar 2009 - 6:56 pm | परिकथेतील राजकुमार
तुमचे हे विडंबन आम्ही सग'ळ्यांपर्यंत पोहोचवु असा आम्ही तुम्हास शब्द देतो.
ते सध्या वाचनमात्र असल्याने त्यांची प्रतिक्रीया आम्हीच टंकु.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
24 Mar 2009 - 6:56 pm | राघव
मस्त.. लय भारी रे! चालू देत :)
राघव
24 Mar 2009 - 6:59 pm | विनायक प्रभू
आशी रे मराठ्मोळ्या.
24 Mar 2009 - 7:00 pm | अवलिया
अरे लिंक का नाही दिलीस माझ्या कवितेची.... तेवढीच वाचने वाढतात बाबा !!
--अवलिया
24 Mar 2009 - 7:10 pm | मराठमोळा
लिंक कशी द्यायची अजुन माहीत नाही. प्रयत्न करतो..
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
24 Mar 2009 - 7:23 pm | सूहास (not verified)
सुहास..
(द गुड)
25 Mar 2009 - 10:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विडंबन आवडलं.
(त्यातून पेताड विडंबन नसल्यामुळे फारच आवडलं.)
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
25 Mar 2009 - 11:23 am | सहज
विडंबन आवडले. अशीच फटकेबाजी चालू ठेवा. :-)