बोलली नाहीस कधी
न सांगताच पण काही
मज उमजली होती सखे
तगमग अलवार तूझी
मिटल्यास पापण्या तू
पण रुद्ध डोळ्यांमधली
मज जाणवली होती
आतुरता व्याकुळ तूझी
मिटलेल्या ओष्ठकळ्या
कबुलणार नाहीस तू
सखे ओळखली होती
मुग्ध हळवी प्रीत तूझी
वृंदावन डोळ्यांमधले
तू गं राधा कृष्णमयी
गोकुळात विरघली होती
मुक नि:शब्द वेदना तूझी
विषप्याला अमृत झाला
श्यामखुळी तू वेडी मीरा
कृष्णात मिसळली होती
स्निग्ध शांत चेतना तूझी
मज कळली नाही कशी
खुण आपल्या नात्याची
सखे मीच हरवली होती
धुंद ओढाळ मुरली माझी
विशाल
प्रतिक्रिया
24 Mar 2009 - 6:11 pm | अवलिया
+१
आवडली.
--अवलिया
24 Mar 2009 - 7:25 pm | क्रान्ति
सुन्दर कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
25 Mar 2009 - 7:13 am | मनीषा
--सुंदर कविता ...!
25 Mar 2009 - 10:26 am | दिपक
सुंदर आहे ! :)