कला

क्रांती's picture
क्रांती in लेखमाला
6 Sep 2019 - 6:05 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
padding-left:10px;
margin-left: 33%;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;

}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:510px;
margin: auto;
}

कला

इथे ताल चुकलेला
तिथे सूर दुभंगला
सुखासुखी जमते का
सम साधण्याची कला?

शब्द भिडता शब्दाला
अर्थ बापडा खंगला
कवितेला स्वच्छ, स्पष्ट
अंत दिसला आपला

रंग बेरंग झालेला
विद्ध अशक्त कुंचला
फलकाची मूक खंत
'म्हणू नका चित्र मला!'

माती बोले पाषाणाला
'धातू वेठीस धरला
मूळ रूपाचा विध्वंस
अशी कशी शिल्पकला?'

जन्म चुकांचा काफिला
अंधपणात चालला
कौशल्य ना कारागिरी
तरी सार्थकी लागला?

जीव आला, जीव गेला
श्वास घेतला, सोडला
फक्त भाराभर चिंध्या
हाच ऐवज उरला

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

क्रांती, शब्द तुला वश आहेत गं!
सुरेख लिहितेस!

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2019 - 10:59 am | प्रकाश घाटपांडे

आवडली कविता.

पद्मावति's picture

6 Sep 2019 - 2:04 pm | पद्मावति

सुंदर..वाह!

श्वेता२४'s picture

7 Sep 2019 - 2:27 pm | श्वेता२४

आवडली कविता

जव्हेरगंज's picture

7 Sep 2019 - 3:59 pm | जव्हेरगंज

.

जालिम लोशन's picture

8 Sep 2019 - 11:37 pm | जालिम लोशन

सुरेख

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Sep 2019 - 8:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जीव आला, जीव गेला
श्वास घेतला, सोडला
फक्त भाराभर चिंध्या
हाच ऐवज उरला

हे जे काही लिहिलय ना... दंडवत क्रांती तै

क्रांती तै?? खूप खूप दिवसांनी.. कुठे गायबली होतीस गं?

माती बोले पाषाणाला
'धातू वेठीस धरला
मूळ रूपाचा विध्वंस
अशी कशी शिल्पकला?'

खतरनाक! _/\_

चित्रगुप्त's picture

13 Sep 2019 - 7:04 pm | चित्रगुप्त

आधुनिक, आधुनिकोत्तर वगैरे वगैरे कलांचा नेमका मर्मभेद.
आर्ट्स्कुलात शिकत असतानाच्या काळात अतिशय फडतुस लोकांनी केलेली ॠषितुल्य कलावंतांची केलेली हेटाळणी आठवून आजही मन विद्ध होत असते.
.

बर्‍याच काळाने तुमची कविता वाचावयास मिळाली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui