Mseb

kunal lade's picture
kunal lade in काथ्याकूट
3 Sep 2019 - 10:40 am
गाभा: 

Mseb चा कारभार कसा असतो आणि विजदाराबाबत आपले काय मत आहे. जसे की कमर्सिअल मीटर साठी वापर असो वा नसो 400 रु. कंपंलसरी आहेत हे योग्य आहे का? आणि अजून काही माहिती मिळाली तर उत्तमच.

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

3 Sep 2019 - 10:53 am | महासंग्राम

MSEDCL चा कारभार सरकारी पद्धतीप्रमाणे चालतो.

kunal lade's picture

3 Sep 2019 - 11:12 am | kunal lade

त्यात काय बदल व्हावा अस तुम्हाला वाटते किंवा चार्जेस जास्त होतात असे नाही का वाटत तुम्हाला.

महासंग्राम's picture

3 Sep 2019 - 11:47 am | महासंग्राम

सरकारची काम करण्याची पद्धत असते ती बदलावी वाटत असेल तर एकतर सरकार बदला नाही तर स्वतःला, सरकार बदलण्यासाठी भरमसाठ शक्ती हवी तशी शक्ती असायला अस्मादिक हिटलर नाही. तो राळेगण चा बाबा थकला, अरविंदा फिरवला, तिथे सामान्यांची काय गत.

महासंग्राम

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 12:03 pm | तमराज किल्विष

कोणतंही सरकारी खाते, महामंडळ, कंपनी घ्या. सर्वात अगोदर प्राधान्य मंत्री, अधिकारी व कर्मचारी यांच्या हितालाच दिलं जातं. जनता दुय्यम स्थानावर असते. भारतातील असं म्हणायचं आहे मला. मी सुद्धा एक सरकारी नोकरी केली होती.

Rajesh188's picture

3 Sep 2019 - 1:17 pm | Rajesh188

विजेची निर्मिती खर्च आणि वितरण व्यवस्थेवर होणारा खर्च विचारात घेतला तर वीज महाग आहे असे म्हणता येणार नाही .
समाजातील दुर्बल घटकान बिलात सूट दिली जाते .
महिन्याला 100 युनिट पर्यंत वीज वापरला युनिट चा दर सुद्धा कमी आहे .
कोणत्या ही वस्तूचा योग्य दर असलाच पाहिजे ती वस्तू स्वस्त जरी दिली तर नुकसान होते .
मग दिवे चालू ठेवणे,पंखे विनाकारण चालू ठेवणे असा वीजेचा अपवय केला जातो.

तेच पाण्या विषयी पाणी स्वस्त असेल तर नळ बंद न करणे असले विचित्र प्रकार सर्रास बघायला मिळतील .
बाकी प्रशासकीय कारभार सरकारी विभागाचा अत्यंत निराशाजनक आहे सरकारी धिम्म नोकरशाही सुधारण्याचे नावाचं घेत नाही त्याला सुद्धा काहीच न काम करता सुद्धा महिन्याला मिळणार भरमसाठ पगार हेच कारण आहे .
सरकारी नोकरांना सुद्धा कामाचे मूल्य मापन करूनच पगार दिला पाहिजे

kunal lade's picture

3 Sep 2019 - 2:05 pm | kunal lade

बाकी प्रशासकीय कारभार सरकारी विभागाचा अत्यंत निराशाजनक आहे सरकारी धिम्म नोकरशाही सुधारण्याचे नावाचं घेत नाही त्याला सुद्धा काहीच न काम करता सुद्धा महिन्याला मिळणार भरमसाठ पगार हेच कारण आहे .

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Sep 2019 - 3:17 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला प्रॉब्लम काय वाटतो.बिल जास्त आलय की वायरमन चा पगार जास्त वाटतोय ..

400रु भाडं जर जास्त वाटते वापर होवो अगर न होवो....

महासंग्राम's picture

4 Sep 2019 - 10:20 am | महासंग्राम

व्यवसाय करू नका मग ४०० रुपये जास्त वाटत असतील तर

तुमचा नक्की प्रॉब्लेम के आहे ?
एक तर तुम्ही माझ्या प्रशनाचे उत्तर देऊ शकत नाही आहात
आणि आता उगाच उडवा उडवि ची उत्तर देताय..
नसेल न माणसाला होत तर उगाच तोंड वर करून चर्चेत उतरायचं नाहीच.

महासंग्राम's picture

5 Sep 2019 - 11:35 am | महासंग्राम

तुमच्या दोनोळी धाग्यला ना काहीच संदर्भ नाहीये जमलं आणि येत असेल तर ससंदर्भ आकडेवारीसहिट माहिती पोस्ट करा.
दोनोळी धाग्यांना असेच होणार

kunal lade's picture

6 Sep 2019 - 1:59 pm | kunal lade

आपण २४ तासात कधीही बदन दाबले कि वीज वापर सुरु होतो , आपल्याला गरज असो व नसो ही यंत्रणा चालू ठेवावी लागते त्या साठी हा स्थिर आकार घेतला जातो

माकडतोंड्या's picture

3 Sep 2019 - 6:52 pm | माकडतोंड्या

मेणबत्त्या वापरा.

kunal lade's picture

4 Sep 2019 - 7:33 am | kunal lade

छान...

सुबोध खरे's picture

3 Sep 2019 - 7:58 pm | सुबोध खरे

कमीत कमी बिल हे १०० रुपये आहे म्हणजे आपले घर बंद असेल तर.
https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getEnergyBillCalculator

यावर आपण वापरात असलेल्या विजेसाठी जेवढे आपण जास्त वापरणार तेवढे बिल जास्त येते.

महावितरणचा कारभार सरकारी आहे यात शंका नाही परंतु आपण बहुतेक वेळेस आपलीच बाजू पाहून एकांगी मत मांडत असतो.

एकदा महा वितरणच्या तक्रार विभागात मुद्दाम ५-६ तास बसून काय तर्हेच्या आणि कशा तक्रारी येतात ते प्रत्यक्ष पहा आणि मग आपण यावर बोलू.

सध्या गणेशोत्सव चालू आहे यापैकी किती गणपती मंडळे अधिकृत वीज जोडणी घेऊन आपली बिले भरतात आणि इतर किती लोकांनीं महावितरणच्या लोकांची गचांडी धरून जवळच्या मीटर वरून जाड्या तारा टाकून २४ तास x ११ दिवस ( गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी) फुकट वीज मिळवली आहे तेही पाहून घ्या.

एक विनंती आहे. आपल्या जवळच्या गल्ली /पाड्याच्या /रस्त्याच्या राजाच्या मंडपाच्या मागे जाऊन वीज कुठून जोडली आहे ते एकदा पाहून या. या विजेची बिल कोण भरणार आहे?

सरकारजवळ मुळातच काही नसते ते संताजीच्या खिशातूनच पैसे काढून धनाजीला देत असते.

यानंतर कोण कोणत्या विभागात किती किती वीज गळती (चोरी) आहे तेही पाहून घ्या

जाता जाता-- महाराष्ट्रात वीज चोरी २० हजार कोटी रुपये इतकी आहे.म्हणजेच ११ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात दरडोई १८०० रुपये वर्षाला वीजचोरीचा भार आहे. हा भार भरण्यासाठी सरकार पैसे कुठून आणणार?

The state of Maharashtra – which includes Mumbai – alone loses $2.8 billion per year, more than all but eight countries in the world. Nationally, total transmission and distribution losses approach 23% and in some states, losses exceed 50%.”

https://businesseconomics.in/power-theft-hits-india%E2%80%99s-gdp-hard

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 8:57 pm | तमराज किल्विष

संपादित

कृपया व्यक्तिगत शेरेबाजी टाळावी. वारंवार व्यक्तिगत शेरेबाजी दिसून आल्यास कारवाई होऊ शकते.

-व्यवस्थापक

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 5:03 pm | तमराज किल्विष

ऐतिहासिक शुरांची नावं फुटकळ गोष्टीसाठी वापरल्यानं राहवलं नाही. धन्यवाद.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Sep 2019 - 10:14 am | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही सहकार खात्यात काम केलेले न .

तमराज किल्विष's picture

5 Sep 2019 - 11:01 am | तमराज किल्विष

काही दिवस सहकार खात्यात तर नंतर सरकारी नोकरीत होतो.

श्री गावसेना प्रमुख's picture

6 Sep 2019 - 10:26 am | श्री गावसेना प्रमुख

कोणतंही सरकारी खाते, महामंडळ, कंपनी घ्या. सर्वात अगोदर प्राधान्य मंत्री, अधिकारी व कर्मचारी यांच्या हितालाच दिलं जातं. जनता दुय्यम स्थानावर असते. भारतातील असं म्हणायचं आहे मला. मी सुद्धा एक सरकारी नोकरी केली होती. मग तुम्ही कुणाला प्राधान्य दिले..जनतेला कि खिशाला?

तमराज किल्विष's picture

6 Sep 2019 - 12:58 pm | तमराज किल्विष

मी जनतेला प्राधान्य दिलं.
खिसा न मागता महागाई भत्ता, इंक्रीमेंट, वेतन आयोग यामुळे फुगतच राहिला. चार हजार पगार पंचवीस वर्षांत साठ हजार रुपये झाला. आताच सेवानिवृत्ती घेतली आहे. तेहतीस हजार पेन्शन मिळत आहे.

ऋतुराज चित्रे's picture

4 Sep 2019 - 12:46 am | ऋतुराज चित्रे

काहीही. कमीतकमी बिल १०० रू. हे घरघुती साठी आहे, व्यावसायिक ४०० रू. आहे. आणि ह्याचा विजगळतीशी काडीचा संबंध नाही. वीज गळती रोखण्याचे काम मंडळाचे आहे,लोकांचे नाही.

सुबोध खरे's picture

4 Sep 2019 - 10:22 am | सुबोध खरे

वीज गळती (electricity losses) यात चोरी (theft) हा एक फार मोठा भाग आहे.

बाकी T & D (tranmission & distribution losses) हा तांत्रिक भाग आहे. जितके आधुनिक तंत्रज्ञान आपण वापराल तितके हे नुकसान आपण कमी करू शकाल परंतु त्यासाठी लागणारे भांडवल उपलब्ध असणे /करून देणे यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि खिशात पैसे लागतात.
बाकी चोरी हि महावितरणची जबाबदारी आहे म्हणून आपण हात झटकून टाकू शकत नाही.

कारण भिवंडी मध्ये टोरंट या कंपनीला वीजवितरणाचे कंत्राट दिले आणि त्यानि तेथे असलेली वीज चोरी मोठ्या प्रमाणावर थांबवून बिल वसुली मोठ्या प्रमाणात करून तेथे वीजवितरणाची एक उत्तम प्रणाली विकसित करून दाखवली ते वाचून घ्या.

चोरी करणाऱ्यांचे कनेक्शन किंवा वीज मीटर तोडायला गेल्यास अगोदरच बातमी कशी मिळते, महावितरणच्या माणसांना मारहाण होते तेंव्हाच पोलीस अगोदर सूचना देऊनही नेमके गायब कसे असतात. सगळं गाव महावितरणच्या माणसांना धमक्या कसे कसे देतात अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी पाहून घ्या आणि मग हि महावितरणची जबाबदारी आहे असे म्हणा एवढीच विनंती आहे.

सुबोध खरे's picture

4 Sep 2019 - 10:46 am | सुबोध खरे

When Torrent took over in 2007, Bhiwandi paid for barely 40% of the electricity it consumed. Three quarters of consumers were not accurately metered and transformers failed frequently.

This changed dramatically in just four years: 99% were metered and losses shrank to less than 20%. Torrent’s success lay in extensive security of the network and vigilance that curtailed theft. Investment in infrastructure ensured quality of supply.

https://www.livemint.com/Industry/13p1RuZqfqxbqYzu9a0M9I/Punchups-kidnap...

ऋतुराज चित्रे's picture

4 Sep 2019 - 2:02 pm | ऋतुराज चित्रे

टोरंटला जे जमू शकते ते महावितरणला का जमू शकत नाही? ह्यात प्रामाणिक वीजग्राहकला शिक्षा कशासाठी?

सरकारजवळ मुळातच काही नसते ते

घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकाकडून सरकार वीज बीलाच्या अनुक्रमे १४ % आणि २१ % कर वसूल करते,त्यातून महावितरणला नुकसान भरपाई द्यावी.

वीज चोरी आणि पाणी चोरी ही संगनमताने होते राजकारणी व्होटिंग बँक तयार करण्यासाठी सामील असतात आणि वितरण चे अधिकारी एकतर दबावाला बळी पडतात किंवा लालच मुळे ते सहभागी असतात .
ह्या जगात अशक्य असे काही नाही वीज चोरी बंद करणे काही कठीण नाही .
पण वरील समस्या आहेत

सुबोध खरे's picture

4 Sep 2019 - 7:14 pm | सुबोध खरे

टोरंटला जे जमू शकते ते महावितरणला का जमू शकत नाही?

जर "झुंडशाही आणि राजकीय वरदहस्त" यांमुळे ४० % च वीज बिलं वसुली होत असेल तर त्यावरील २१ % कर हा फक्त ८.४ % होतो. मग या ८.४ टक्के कर परताव्यात महावितरणचे काम कसे चालेल?

राजकीय इच्छा शक्ती आणि सवंग लोकप्रियता यात ताळमेळ कसा घालणार?

त्यातून दिल्लीत २०० युनिट पर्यंत वीज फुकट देण्याची सवंग लोकप्रिय घोषणा केल्यावर भारतभर सर्वाना असे वाटायला लागले आहे कि वीज फुकट निर्माण होते आहे आणि आपल्याला वीज फुकटच मिळाली पाहिजे.

स्वस्त ते मस्त आणि फुकट ते पौष्टिक हि विचारसरणी ७० वर्षे पोसली गेली आहे.

श्रीरंग_जोशी's picture

3 Sep 2019 - 9:25 pm | श्रीरंग_जोशी

मराविमचे त्रिभाजन होऊन अनेक वर्षे झालीत. वीज ग्राहकांचा संबंध महावितरणबरोबर येतो.

मराविमच्या त्रिभाजनाद्वारे जन्मलेल्या इतर दोन कंपन्या म्हणजे महानिर्मिती व महापारेषण.

Rajesh188's picture

4 Sep 2019 - 1:19 am | Rajesh188

वीज गळती आणि वीज चोरी ही संगनमताने च होते त्याला राजकारणी आणि वीज कंपन्यांचे अधिकारी,कर्मचारी जबाबदार आहे सामान्य ग्राहक त्याला जबाबदार नाहीत .
मुंबई पुण्या सारख्या शहरात झोपडपट्ट्या ना बिना मीटर वीज आणि पाणी पुरवठा कोण पुरवते हेच नालायक राजकारणी मतांसाठी आणि कर्मचारी पैश्यान साठी .
त्याची किंमत प्रामाणिक बिल भरणाऱ्या लोकांनी का भरायची .

kunal lade's picture

4 Sep 2019 - 7:37 am | kunal lade

हो ना...
आणि विनावापर 400रु द्यायचे म्हणजे किती महाग ...

सुबोध खरे's picture

4 Sep 2019 - 10:03 am | सुबोध खरे

याचे मूळ आपल्या डोक्यावर लादलेली समाजवादी/ साम्यवादी विचारसरणी आहे.

एखादा माणूस धंदा करतो म्हणजे तो चोरच आहे आणि एखादा माणूस श्रीमंत झाला म्हणजे त्याने गरिबांना लुबाडले आणि त्यासारख्या घामारक्ताचा पैसा ओरबाडला हि विचारसरणी आपल्याकडे काही दशके रुजून बसलेली आहे.

शिवाय लोकशाही मध्ये एका माणसाला एक मत म्हणून रहिवाशांना विजेचे भाव स्वस्तात आणि उद्योगाला वीज प्रचंड महाग (क्रॉस सबसिडी मुळे) हि स्थिती आलॆली आहे.

मराठी_माणूस's picture

4 Sep 2019 - 6:46 pm | मराठी_माणूस

अशा प्रवृत्तीला काय करणार ?

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/malabar-hill-resident-b...

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 9:33 am | तमराज किल्विष

अरे विजचोरीवर काय बोलून रायले. देशाच्या तिजोरीला एवढ्या जळवा डसल्या आहेत की बस. जरा दरडोई कर्जाच्या वाट्याचा विचार करून पहा.

आता जे विजेचे दर आहेत ते स्वस्त आणि योग्यच आहेत .
फक्त प्रशासकीय कारभार सुधारणे गरजेचे आहे .
बिल वसुली ,तक्रारीत जलद निवारण,वीज चोरीला अटकाव.
नवीन कनेक्शन कमीतकमी वेळात देणे .
असे बदल होणे खूप गरजेचं आहे .
सरकारी हस्तक्षेप कमीतकमी झाला पाहिजे .
सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी फुकट वीज देणे असले प्रकार बंद झाले पाहिजेत त्या साठी सरकारनी स्वतः साठीच कायदा

ऋतुराज चित्रे's picture

6 Sep 2019 - 3:33 pm | ऋतुराज चित्रे

महावितरणचे वीज बिल आणि थकबाकीचे आकडे विश्वासार्ह नसतात. चुकीची अवाच्या सव्वा वीज बिले हे नित्याचेच झाले आहे.तक्रार केल्यास सुधारित बिल तयार करून चूक मान्यही करतात. अशी कित्येक चुकीची ज्यादा बिले लोक मुकाट्याने भरत असतात. ज्या विभागात वीजचोरी होत असेल त्या विभागातील संबंधीत अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद असावी, प्रामाणिक वीज ग्राहकांकडून ज्यादाची वसुली करू नये.

१.५ शहाणा's picture

7 Sep 2019 - 3:47 pm | १.५ शहाणा

अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्ष आकडे टाकून वीज वापरली जाते , शेतीत तर बीज देयक असते हेच माहित नसावे . वीज गळती चा काही भाग हा पुरवठा कंपनीच्या कर्मचार्यांच्या वेतनातून घेतला पाहिजे, प्रत्येक वीज देयकावर त्या महिन्यात उर्जा विनमय केंद्रात असणारा विजेचा मूळ दर दिला पाहिजे, म्हणजे लक्षात येईल की वीज वाहन खर्च, वीज गळती , इंधन अधिभार, व क्रॉस सबसिडी व वितरण कंपनीचा प्रशासन खर्च धरून आपल्याला किती दराने, वीज मिळते

Rajesh188's picture

7 Sep 2019 - 4:03 pm | Rajesh188

राजकीय दबाव हा फॅक्टर सुधा लक्षात घेतला पाहिजे .

तमराज किल्विष's picture

7 Sep 2019 - 5:54 pm | तमराज किल्विष

माझ्या शेतातील पंपाचं वीजबिल मी नेहमीच वेळेत आणि पूर्ण भरत होतो. पण भाजप सरकार आल्यापासून वीजबिल मिळालेलंच नाही. धड माफही नाही आणि वसुली पण नाही. एकदमच बोकांडी बिल टाकतील.

तमराज किल्विष साहेब आपल्या शेवटच्या आलेल्या वीजबिलाची स्कॅन कॉपी जरा येथे टाका..(आपला कंझ्यूमर नंबर व कंझ्यूमर टाईप स्पष्ट दिसतील असे बघा) जरा आॉनलाइनवर प्रयत्न करून बघूया आपल्या समस्येच काही समाधान निघतय का?

इथे येऊन टंकून काय होणार आहे? जरा सुजाण नागरिक म्हणून स्वतः चौकशी करावी, ऑनलाईन 1 मिनट च्या आत माहीती मिळेल. मदत हवी असल्यास खासगीत संदेश पाठव मला. उगाच उठसूठ सरकारच्या नावाने गरळ ओकून काय फायदा? आपणास ऑनलाईन फुकाचा गप्पा मारता येतात पण बाकी काही जमत नाही असा समज आम्ही करून घेऊ का?

फुटूवाला's picture

9 Sep 2019 - 6:09 am | फुटूवाला

पण भाजप सरकार आल्यापासून वीजबिल मिळालेलंच नाही.

लाभार्थी की ओ तुमी तर.... :))

तमराज किल्विष's picture

7 Sep 2019 - 7:24 pm | तमराज किल्विष

माझी ओळख उघड करायची नाही त्यामुळे मी टाकू शकणार नाही. क्षमा करा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Sep 2019 - 7:33 am | अनिरुद्ध.वैद्य

ऑनलाइन बघू शकता, महाडिस्कोम च्या साईट वर.

Rajesh188's picture

8 Sep 2019 - 12:27 pm | Rajesh188

ऑनलाईन वीज बिल भरताना ग्राहक क्रमांक टाकला की सर्व माहिती येते .
तुमचं किती बिल बाकी आहे .कोणत्या महिन्याचे बाकी आहे सर्व माहिती क्षणात मिळते

Prepaid पद्धत वीज बिलासाठी वापरता येईल का ह्या विषयी सरकार गंभीर पने विचार करत आहे .
तांत्रिक बाजूंचा अभ्यास केला जात आहे .
तयारी जोरात चालू आहे काही वर्षा नंतर वीज बिल ,पाणी बिलाचे आगाऊ पैसे भरावे लागतील .
पैसे संपले की पुरवठा बंद .
त्या मुळे १००% बिल वसुली होईल अशी सरकारची धारणा आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2019 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा का त्यांनी आपल्या घरावर मिटर ठोकलं की मेलो आपण बस.
सरकारने रेशनकार्डासारख्या सवलती देऊन सौरउर्जेवर फोकस करावा.

कायच्या काय बीलं टाकतात, भरा म्हणतात अगोदर. मग हिशेब करुन बोलू.
पुढच्या बीलात अ‍ॅडजेष्ट करु. कंटाळा आलाय या बीजबील आणि त्या लोकांचा.

-दिलीप बिरुटे