तुझे ते लाजणे गालात
आठविता गं रात्र सरे
शब्द ओलावणे ओठात
स्मरण्यां दिवस ना पुरे
तु नसशी कवेत आता
बघ अशांत मन झुरे
बांध वेदनांचा तुटेना
शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे
मन विसरु पाही तुला
मज सुन्न एकांत सावरे
पुन्हा डोकावणे स्वप्नात
जखमांचे ते भान ना उरे
अन थांबलेले डोळ्यात
आसवांचे वाहते झरे
लटके ओशाळणे तुझे
बाकी ते रुसणेच खरे
विशाल
प्रतिक्रिया
23 Mar 2009 - 2:41 pm | जागु
विशाल छान आहे कविता.
23 Mar 2009 - 6:31 pm | शितल
कविता छान केली आहे. :)
23 Mar 2009 - 7:14 pm | क्रान्ति
"हा रुसवा सोड सखी"ची आठवण झाली. मस्त कविता आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}