आकाशवाणी ऑनलाइन

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
14 Aug 2019 - 11:48 pm
गाभा: 

९० वर्षाहून अधिक काळ सेवेत असलेली आणि भारतात सर्वदूर पसरलेली व सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची गंगोत्री असलेली जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा असलेली तुमची आमची आवडती आकाशवाणी आता कात टाकतेय . प्रमुख शहरातील आकाशवाणी केन्द्रे सात-आठ वर्षापासूनच ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होती परन्तु आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश यत्र तत्र सर्वत्र असणारी आकाशवाणीची प्रादेशिक केन्द्रेही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होत आहेत .

यात महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई अ , ब , विविधभारती , एफ एम रेन्बो , एफ एम गोल्ड , न्यूज सर्व्हिस यासह रत्नागिरी ,कोल्झापूर , पुणे , सांगली , सोलापूर , नागपूर ,गोवा व इतर अनेक प्रादेशिक केन्द्रे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत . जगभरात कुठेही प्रसारभारती अ‍ॅप अथवा वेबसाईटच्या माध्यमातून ही सेवा ऐकता येइल ...

http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=165
https://play.google.com/store/apps/details?id=com.ionicframework.air152951
https://apps.apple.com/in/app/all-india-radio-live/id1289849764
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

15 Aug 2019 - 12:04 am | जालिम लोशन

ऊपयोगी पडेल.

कुमार१'s picture

15 Aug 2019 - 9:03 am | कुमार१

चांगली माहिती.
सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिन शुभेच्छा !

मनो's picture

15 Aug 2019 - 9:56 am | मनो

जगभरातील केंद्रे
https://radio.garden

प्रकाश घाटपांडे's picture

15 Aug 2019 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे

आकाशवाणी पुणे केंद्र अ‍ॅपवर लागत नाही. मराठी वर मुंबई केंद्राचा समावेश दिसतो. प्रसार भारतीच्या साईटवर मात्र पुणे लागते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2019 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती ! यामुळे जगात कोठेही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतील, ही फार सोयीची गोष्ट आहे.

प्रसारभारती साइटवर पुणे ,नागपूर, रत्नागिरी वगैरे लागत आहेत ती एफेम/एएम आहेत?
मुंबई अ,ब एएम लागतं का?

प्रमोद देर्देकर's picture

15 Aug 2019 - 2:19 pm | प्रमोद देर्देकर

लाख लाख धन्यवाद मंदार भावू.
रेडिओ garden तर जबरी आहे .
तुम्ही दिलेल्या पहिली लिंक पण चांगली आहे. फक्त रत्नागिरी रेडिओ लागतं नाहीये.

तुषार काळभोर's picture

15 Aug 2019 - 2:25 pm | तुषार काळभोर

App भारी आहे!

खालील आपली केंद्रे appवर आहेत-
विविध भारती
AIR मराठी
AIR पुणे
FM GOLD मुंबई
FM RAINBOW मुंबई
आकाशवाणी संवादीता मुंबई
Air सांगली
Air नागपूर
Air म्हदेइ, पणजी
Air सोलापूर
Air कोल्हापूर
Air औरंगाबाद
Air रत्नागिरी

प्रकाश घाटपांडे's picture

16 Aug 2019 - 4:03 pm | प्रकाश घाटपांडे

AIR पुणे कुठल्या अ‍ॅपवर आहे?

तुषार काळभोर's picture

16 Aug 2019 - 10:45 pm | तुषार काळभोर

१. लेखात उल्लेख केलेल्या all india radio app मध्ये

आणि

२. प्रसारभारतीच्या app मध्ये.
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

प्रकाश घाटपांडे's picture

17 Aug 2019 - 12:03 pm | प्रकाश घाटपांडे

मला दोन्ही ऎप मधे एआयआर पुणे मिळाले नाही. एआयाआर मराठी आहे. मला मराठी पुणे केंद्र ए एम हवे होते.

तुषार काळभोर's picture

17 Aug 2019 - 12:05 pm | तुषार काळभोर

मी दोन्ही app वापरून कन्फर्म केलंय.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Aug 2019 - 12:15 pm | प्रकाश घाटपांडे

माझ्याकडे हे अ‍ॅप होते. अ‍ॅन्ड्रॉईड वर मी अनइन्स्टॉल करुन परत इन्स्टॉल केले तरी फक्त ए आय आर मराठी असेच दिसते. त्यात मराठी हे मुंबई केंद्र असावे.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2019 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे

मिळाले पुणे स्टेशन ए एम

प्रसारभारती साईटवरील एआईआर पुणे, आणि एआईआर म्हादेई पणजी म्हणजेच जुन्या मिडिअम वेव रेडिओवर लागणारी पुणे आणि पणजी केंद्रे आहेत हे दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम लावून ऐकले.
रेडिओवर खरखर येते पण साईटवर स्पष्ट. फक्त फरक एवढाच की साईट अथवा ऎप दीड मिनीट मागे राहते.

जुने रेडिओ ( ट्रानझिस्टर) आहेत त्यावर एएम,एफएम दोन्ही लागतं.

Rajesh188's picture

16 Aug 2019 - 5:10 pm | Rajesh188

माझ्या कडे खूप पूर्वी नोकिया चा e 11 असा कोणता तरी मोबाईल होता (मॉडेल नक्की आठवत नाही ) त्यात सर्व जगातील रेडिओ स्टेशन ऐंकण्याची सुविधा होती ऑनलाईन .
जगातील च नाही तर देशातील प्रत्येक राज्यातील रेडिओ स्टेशन सुद्धा लागायची

जॉनविक्क's picture

16 Aug 2019 - 6:47 pm | जॉनविक्क

मराठी कथालेखक's picture

16 Aug 2019 - 7:29 pm | मराठी कथालेखक

अरे वा... छान.. धन्यवाद

जुइ's picture

18 Aug 2019 - 12:36 am | जुइ

अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद!

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

18 Aug 2019 - 12:41 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

उपयुक्त माहिती !

रविकिरण फडके's picture

18 Aug 2019 - 10:33 pm | रविकिरण फडके

ही एकदम भारी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप आभार! आत्ता मी त्यातील उर्दू सर्व्हिस ऐकतोय. मस्त!

Rajesh188's picture

18 Aug 2019 - 10:48 pm | Rajesh188

इंटरनेट रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओ काय फरक आहे .
इंटरनेट रेडिओ खूप वर्षा पासून चालू आहे

जॉनविक्क's picture

18 Aug 2019 - 11:34 pm | जॉनविक्क

इंटरनेट रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओ काय फरक आहे .

साधा रेडिओ (IOT एनेबल नसेल तर त्या)वर इंटरनेट रेडिओ ऐकता येत नाही. पण इंटरनेट रेडिओवर साधा रेडिओ ऐकता येणे अशक्य नाही.

जॉनविक्क's picture

18 Aug 2019 - 11:31 pm | जॉनविक्क

जिथे रेडिओ ऐकले जातात तिथे रेडिओ आहेत. जिथे नेट आहे तिथे याचा आजच्या काळात काय उपयोग ?

अर्थात कोणी ना कोणी ऐकत असेलच म्हणा

स्थानिक लोक आपापल्या राज्याचे कार्यक्रम स्वस्तात रेडिओ किंवा मोबाईलवर नेट न वापरता ऐकू शकतात.
परगावच्या लोकांना आपला माहेरचा रेडिओ इंटरनेट रेडिओतून ऐकायला मिळतो. आणि आता नेट स्वस्तच झाले आहे.

तुषार काळभोर's picture

19 Aug 2019 - 6:21 pm | तुषार काळभोर

गोव्याच्या केंद्राचे कार्यक्रम ऐकले.

मस्त गोड गोड कोकणी गाणी. कानाला एकदम गुदगुल्या केल्यासारखं वाटलं!!

बातम्या सगळीकडे एकावेळी लागतात. ते सोडलं तर air मराठी, पुणे, रत्नागिरी, नागपूर यांच्यावर वेगवेगळे कार्यक्रम असतात.

१.५ शहाणा's picture

22 Aug 2019 - 8:22 am | १.५ शहाणा

खाजगी एफ एम वाहिन्या उपलब्ध आहेत का ? आमच्या ग्रामीण भागात रेडिओ वर कोणतेही एफ एम केंद्र लागत नाही .

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

3 Nov 2019 - 5:20 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद!