मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आकाशवाणी ऑनलाइन

मंदार कात्रे · · काथ्याकूट
९० वर्षाहून अधिक काळ सेवेत असलेली आणि भारतात सर्वदूर पसरलेली व सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची गंगोत्री असलेली जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा असलेली तुमची आमची आवडती आकाशवाणी आता कात टाकतेय . प्रमुख शहरातील आकाशवाणी केन्द्रे सात-आठ वर्षापासूनच ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होती परन्तु आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश यत्र तत्र सर्वत्र असणारी आकाशवाणीची प्रादेशिक केन्द्रेही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होत आहेत . यात महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई अ , ब , विविधभारती , एफ एम रेन्बो , एफ एम गोल्ड , न्यूज सर्व्हिस यासह रत्नागिरी ,कोल्झापूर , पुणे , सांगली , सोलापूर , नागपूर ,गोवा व इतर अनेक प्रादेशिक केन्द्रे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत . जगभरात कुठेही प्रसारभारती अ‍ॅप अथवा वेबसाईटच्या माध्यमातून ही सेवा ऐकता येइल ... http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=165 https://play.google.com/store/apps/details?id=com.ionicframework.air152951 https://apps.apple.com/in/app/all-india-radio-live/id1289849764 https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

वाचन 16302 प्रतिक्रिया 0