अश्वत्थामा

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
16 Aug 2019 - 11:42 pm

।। अश्वत्थामा ।।

क्षितिजावर थबके रवि,
पोर्णिमेत रेंगाळे शशि,

एक न जाई ओटी,
दुजा रातीच्या कंठी,

एक तेजोमय गर्भ,
दुजा शांतीतच गर्क,

पूर्वेस वाजता शंख,
पृथ्वीस वाटते दुःख,

अवचित संध्याकाळी,
अवनीही होई हळवी,

कधी उजळें प्रकाशहाती,
कधी निथळें चांदणराती,

विधाताही निष्ठुर होई,
मग निर्णय कोण घेई?

भावनांचे दीप जळती,
आवेगांचे लोळ उठती,

मानवास न उमगे कोडे,
अश्रू का दाटती नयनी?

बघता सुवर्णजन्मा वा
पाहता तम पश्चिमा,

घेऊन फिरावा माथी,
ओला शाप कपाळी,

अश्वत्थामा सगळेच,
रोज संधीप्रकाशी ।

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर

कविता

प्रतिक्रिया

असो. ठीक ठाक काव्य.