कविता: बिबट्याचे मनोगत

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
14 Aug 2019 - 11:08 am

सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज

सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही

हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा
जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा
वनक्षेत्र खालावले साखळी तुटली
आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली

शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल
शोधतो स्वतःला, जिथे उत्साह सापडेल
शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल
शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल

नोंद: बिबट्याचे जंगल सोडून अन्ना साठी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्याचे मनोगत आणि व्यथा मांडण्याचा कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.

Nisargकविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Aug 2019 - 11:17 am | यशोधरा

खरं आहे..

महासंग्राम's picture

14 Aug 2019 - 11:55 am | महासंग्राम

सॉरी, भिडली नाही थोडी अजून इंटेन्स असायला हवी असं वाटते,

अर्थात तुमच्या भावनांचा आदर आहे

bhagwatblog's picture

14 Aug 2019 - 12:25 pm | bhagwatblog

प्रतिसादा साठी धन्यवाद महासंग्राम, यशोधरा!!!
तुमच्या भावनांचा आदर आहे >> थंक्स
सॉरी, भिडली नाही थोडी अजून इंटेन्स असायला हवी असं वाटते >> प्रयत्न करतो

चौथा कोनाडा's picture

14 Aug 2019 - 1:29 pm | चौथा कोनाडा

बिबट्याचे मानव जसा विचार करतो तसे काव्यमय मनोगत आवडले.
( त्याचे मनोगत मानवी समस्यांसार्खे मांडल्या मुळे कवितेत त्या तीव्रतेचा प्रभावाला कमी पडते )
परिस्थिती भीषण आहे, बिबट्या, वाघ, सिंह इ. लोक सेलिब्रिटी झालेत,
बाकीच्या प्राण्यांचे काय ? पक्षी, किडे, जलचर याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही.

जालिम लोशन's picture

14 Aug 2019 - 3:22 pm | जालिम लोशन

good

मनोगत आवडले आपले .. खरंच छान आहे ..