Hawaii ट्रिप बद्दल माहिती हवी ahe

चामुंडराय's picture
चामुंडराय in भटकंती
10 Aug 2019 - 9:22 pm

नमस्कार,

नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे:
साधारण प्लॅन असा आहे - ईस्ट कोस्ट -> maui -> oahu -> पर्ल हर्रबर -> व्हॉल्कॅनो नॅशनल पार्क -> होनोलुलू (waikiki टुरिस्ट हॉटस्पॉट) -> इस्ट कोस्ट

१. ह्या साठी किती तासांचा प्लॅन करावा? मी ६ व्हॉल्कॅनो असा विचार करतोय
२. आम्ही तिघांचं जण (बायको आणि आमची ४ महिन्यांची मनीमौ) असणार आहोत, तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा
३. हॉटेल्स सांगावीत

अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन हुन कॅब ?! जाणकारांच्या प्रतिक्षेत.

चामुंडराय's picture

11 Aug 2019 - 3:57 am | चामुंडराय

कॅब पेक्षा बस बरी पडेल काय, म्हात्रे सर ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रथम हिमालयात जाऊन, तेथे पाण्यावर चालायच्या सिद्धीचा क्लास उत्तम गुणांनी पास केलात तर, पायी जाणे सर्वात सोयीचे आणि स्वस्त पडेल...

मंग वॉशिंग्टन राज्यातून जा किंवा वॉशिंग्टन डिसितून, कायबी फरक नाय पडत बगा. :)

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 12:20 pm | जॉनविक्क

टवाळ कार्टा's picture

12 Aug 2019 - 11:42 pm | टवाळ कार्टा

स्वतः न फिरता सल्ले दिले की असे होते....नव्वदच्या दोन चपटी आणि कांदा इतक्या भांडवलात लोकं चंद्रावर जाऊन येतात.....तुमका क्काय म्हायतचं नसा

टका सर,
चपटी, कांदा आणि चन्द्र काय घेऊन बसलात? आमच्या पुण्यात टकाटक टाकून सूक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आलेली मान्सं आहेत म्हटलं !!

टर्मीनेटर's picture

12 Aug 2019 - 1:05 am | टर्मीनेटर

hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन हुन कॅब ?! जाणकारांच्या प्रतिक्षेत.

Me Too :)

चामुंडराय's picture

12 Aug 2019 - 1:11 am | चामुंडराय

.

टर्मीनेटर's picture

12 Aug 2019 - 2:08 am | टर्मीनेटर

Yup :)

चौकस२१२'s picture

19 Aug 2019 - 9:01 am | चौकस२१२

प्रथम यावरील प्रतिक्रया वाचून वाटले कि काय हे! अगदी इसकाळ मधील मुक्तपीठ झालाय मिपा चा ...मूळ पोस्टिंग ची कुचेष्टा वैगरे
मग थोड्या वेळाने वाचले कि "वॉशिंग्टन ते हवाई" असे विचारून मूळ विचारणाऱ्याने मिपाची खरंच चेष्टा केली आहे कि काय? आणि म्हणून लोक तिरपागडी उत्तरे देता आहेत?
मग गुगल वर बघितल्यावर कळले कि कदाचित त्यांना "ओहाउ बेटावरील वॉशिंग्टन प्लेस
https://www.google.com/maps/search/washington+hawai/@21.3217004,-157.9179951,12.21z

नावाच्या ठिकाणापासून दौरा सुरु करायचाच कि काय ? तसे असेल तर प्रश्न काही चुकीचाच नाही
अहो पण तसा खुलासा करा ना मग? लोक माहिती असेल तर मदत करतील! तशि

जालिम लोशन's picture

11 Aug 2019 - 12:25 am | जालिम लोशन

एक जगभर आहे आणी एक प्रशांत महासागरात.

चामुंडराय's picture

11 Aug 2019 - 3:55 am | चामुंडराय

जालो सर,

मला शंका आली होतीच म्हणून आंग्ल भाषेत नाव लिहिले.
हि तर आपली Kicki lakki chiki lakk chiki chum "हवा हवाई"

ठाण्यास उतरणे सोयीचे पडेल. सहलीसाठी शुभेच्छा. वृत्तांत फोटो येउदेत.

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 7:55 am | जॉनविक्क

आणि धागा लेखकाला असेही सूचवयाचे आहे की ठाणे इनक्लूड करतच असाल तर आपलं नाशिकही जवळच आहे पावसात मस्त वातावरण असल्याने सप्तशृंगी , त्र्यंबकेश्वरही भेट देण्यास उत्तम ठिकाणे आहेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिवाय, सद्या नाशिकला महापूर आला असल्याने पोहायची चांगली प्रॅक्टिस करता येईल, जी प्रशांत महासागरातून तरून जायला उपयोगी ठरेल.

चामुंडराय's picture

11 Aug 2019 - 7:52 pm | चामुंडराय

म्हणजे त्यानुसार उत्तर द्यायला !!

कंजूस's picture

11 Aug 2019 - 12:19 pm | कंजूस

नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे:

- टुअरिजमची प्रदर्शन भरवणाऱ्या
TTF कंपनीचे तुमच्या शहरातल्या प्रदर्शनास जा. तिथे सर्व काम होईल.

कंकाका माफ करा हे TTF काही कळले नाही.
*TF माहितीय्ये परंतु TTF म्हणजे काय? जरा बैजवार सांगता का?

हे ट्रावेल शोज - प्रदर्शन लावतात. साधारण पणे सप्टेंबर आणि फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात प्रदर्शन असते.

TTF (भारतात अधिक बाहेर)आणि OTM(फक्त भारताबाहेर) या दोन कंपन्या पूर्वी एकत्र असत तेआता वेगळे झाले आहेत.
इथे बरेच टुअर ओपरेटर आणि हॉटेलवाले आपापले स्टॉल्स लावतात, माहितीपत्रके देतात, तुम्हाला हवी तशी ट्रिप आखून बुकिंग करून देतात.
--------
बाकी तुमचा लेख विनोदी लेखन असल्यास या माहितीचा उपयोग नाही. गल्ली चुकली.

तुषार काळभोर's picture

11 Aug 2019 - 4:11 pm | तुषार काळभोर

मांजर चालते का, हे एकदा क्याबवाल्याकडून कन्फर्म करून घ्या.
एकदा भाडे ठरवल्यावर मग परत 'आमच्या क्याब मध्ये मांजर चालणार नाही', 'पाळीव प्राण्याचे 26 डॉलर एक्स्ट्रा' असले नखरे करतील. त्यामुळं आधी बोलून घ्या.

ता.क. परतीच्या प्रवासाचे 50% एक्स्ट्रा असला काही नियम आहे का बघा. टोल कोण देणार ते बोलून घ्या. शक्यतो आरएमडी, विमल, मावा खाणारा ड्रायवर टाळा. एसी गाडीत घाण वास मारत्यात.

बरं झालं पैलवानभाऊ तुम्ही हा पॉईंट काढला.
तसा माझ्याकडे माउचा पिंजरा आहे परंतु आधीच विचारून घेतलेलं बरं, नन्तर कटकट नको, नाही का?

आणि हाफ रिटनचही विचारतो नाहीतर पुणेरी रिक्षावाल्यांसारखा प्रॉब्लेम याचा.
पण टोलचा काही प्रॉब्लेम नाही, एक दम मनसे देऊ.

माझ्या या महतीप्रद धाग्यावर काही जुन्या जाणत्या जेष्ठ मिपाकरांनी टवाळकीचा सूर लावला आहे असे खेदपूर्वक नमूद करतो.

आणि त्यामुळे मज जैसा नवं मिपा साहित्यिक हतोत्साहित होऊन मराठी सारस्वताचे जे अपरिमित नुस्कान होईल त्याची संपूर्ण जबाबदारी मिपाकरांवर असेल याची कृपया नोंद घ्यावी. _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2019 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेष्ठ मिपाकर असेच खवट असतात, तुम्ही दुर्लक्ष करा.

तुम्ही चालू द्या. बाकी, तुम्ही नेमकं कुठून कुठे चाललात हे समजलं की परत येईन धाग्यावर.
बाकी, आमच्या औरंगाबादला या, वेरुळ अजिंठा जाऊ. डोंगरमाथ्यांना हिरव्यागार शालूंनी वेढून घेतलं आहे.

अहाहा....

-दिलीप बिरुटे
(आपला हिरवागार)

कंजूस's picture

12 Aug 2019 - 5:57 am | कंजूस

तुमच्यासारखा नवं मिपा साहित्यिक हतोत्साहित होऊ नये आणि तुमची सहल चाफ्याच्या फुलांच्या माळा घालून ( तशा घालून समुद्र किनाऱ्यावर तिकडे फिरतात म्हणे ) आनंददायी होण्यासाठी ज्येष्ठ पर्यटक मिपाकरांनी तुम्हास सावध केले आहे.

धन्यवाद !

म्हणजे लीला सह सहलीला जाऊन लिला करण्याची मनीषा पूर्ण होणार तर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2019 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही, लीला आणि मनिषा या तिघांनाही सहलीसाठी शुभेच्छा ! (केवळ योग्य अश्या तुमच्या निवडक लीलांच्या) चित्रांसह सहलिचा वृत्तांत इथे जरूर टाका. ;) ;)

जरूर म्हात्रे सर, परंतु मिपा जाणकारांकडून सहली साठी आवश्यक त्या माहितीच्या प्रतीक्षेत.

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2019 - 6:04 pm | चौथा कोनाडा

हे वॉशिन्ग्टन कुठे आहे ?
Hawaii मध्येच ?

अहो वाशीम बुद्रुक म्हणजे वाशिंग्टन हो.
हवं तर पृथ्वीचा भूसपाट ( नक्षा ) काढून बघा.

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2019 - 6:08 pm | चौथा कोनाडा

वॉशिन्ग्टन डी सी ते Hawaii

https://www.tripadvisor.in/ShowTopic-g28932-i36-k7324566-Washington_DC_t...

पिवळा डांबिस's picture

13 Aug 2019 - 2:14 am | पिवळा डांबिस

छे, छे, हाटेलबिटेल काही नको.
तुम्ही ईष्ट्कोष्टातून कॅबने हवाई करून परत येणार ना? मग प्रत्येक ठिकाणाला १०-१५ मिनिटे पुरेत!
तो आणि जाण्यायेण्याचा कॅबचा टाईम धरून जर भल्या सक्काळी निघालांत ना तर तिन्हिसांजेपर्यंत परत याल की!!
आणि बरोबर दशम्या बांधून घेतल्यात तर दुपारच्या जेवणाचाही प्रश्न सुटला...
हार्दिक शुभेच्छा.
आणि परत आल्यावर इथे फोटू आणि वृत्तांत टाकायला विसरू नका.
:)

चौथा कोनाडा's picture

13 Aug 2019 - 9:28 am | चौथा कोनाडा

हा ...... हा ...... हा ......

पिडां काका त्यातल्या त्यात 'हवा हवाई' ला जवळचे ...
त्यामुळे त्यांची कमेंट म्हणजे ते आंग्ल भाषेत म्हणतात ना ते डीरेक्ट फ्रॉम अश्व मुख च की!

बादवे - लहानपणी नेहमी डांबीस, डांबरट अश्या पदव्यांनी आभूषित केल्या गेल्या मुळे या शब्दांच्या व्युत्पत्ती बद्दल खूप उत्सुकता होती.

पिवळा डांबिस's picture

15 Aug 2019 - 10:55 pm | पिवळा डांबिस

पिडां काका त्यातल्या त्यात 'हवा हवाई' ला जवळचे ...
त्यामुळे त्यांची कमेंट म्हणजे ते आंग्ल भाषेत म्हणतात ना ते डीरेक्ट फ्रॉम अश्व मुख च की!

खरं आहे. तिथे जाऊनही आलो आहे काही वेळा....
आमचं गोवाच की हो ते!!

लहानपणी नेहमी डांबीस, डांबरट अश्या पदव्यांनी आभूषित केल्या गेल्या मुळे या शब्दांच्या व्युत्पत्ती बद्दल खूप उत्सुकता होती.

मी ऐकलेली व्युत्पत्ती अशी: पूर्वी इंग्रजांच्या अंमलात देशी माणसाला शिव्या देतांना साहेबलोक 'डॅम बीस्ट' म्हणायचे. आपण त्याचा 'डांबीस' म्हणून स्वीकार केला! :)

ह्याच न्यायाने डॅम रॅट पासून डामरट बनला असेल काय?

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Aug 2019 - 1:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

असाच औच रॅट पासून "अचरट"
डॅम डॉल पासून "डामडौल"
आणि बॅड काउ पासून .....
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

16 Aug 2019 - 10:47 pm | तुषार काळभोर

आणि अच्रत बव्लत चा उगम?

आचरट, डामडौल या शब्दांची व्युत्पत्ती अशी आहे हे माहित नव्हते.
बॅड काऊ तर भारीच.

हे झाले आपण इंग्रजांकडून घेतलेले शब्द.
परंतु गोऱ्यांनी भारतीयांच्या नावापासून काही शब्द तयार केलेत त्याचे काय?
हार्दिक, सुखदीप, कुलदीप, दीक्षित इतिआदी ...

हो, आणि त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आर (R ) हा सायलेंट असतो =))

विंजिनेर's picture

14 Aug 2019 - 12:27 am | विंजिनेर

अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा

सोबत संपूर्ण अष्टविनायक सहल आणि शिंद्यांची छत्री करायला विसरू नका. अजून आठवडा-दिड आठवड्याने निघाला ट्रिपवर, तर लगे हात पुण्याचा गणेशोस्व पण करून घेता येईल. कॅब करणार आहात म्हंजे अडचण नाही.

तटी: पाऊसकाळ आहे. बाहेरचे पाणी प्यायचे टाळा.
तटी २: वर प्रतिसादात डांबीसकाकांनी घरच्या दशम्या द्यायचे कबूल केले आहे तरी, कॅब ड्रायवरला गाडी लास-एंजेलिस वरून घ्यायला सांगावी म्हंजे सोयीचे पडेल

अभ्या..'s picture

14 Aug 2019 - 12:49 am | अभ्या..

तटी: पाऊसकाळ आहे. बाहेरचे पाणी प्यायचे टाळा.

आता काय कॅबमधी सिन्टेक्स ठेवून टपावर बशीवताय काय सगळ्यांना? टपावर ठिवा म्हनलो असतो सिन्टेक्स पन ती पण भईरच झाली की.
नायतर लेलँड किंवा व्होल्वो ची मिळती का एखादी चोवीसचाकी मल्टीअ‍ॅक्शल कॅब बघा.
:)

चामुंडराय's picture

15 Aug 2019 - 7:53 am | चामुंडराय

अभय दादा, चोवीस चाकी कॅब घेतली तर तिची पुढची चाके एक बेटावर तर मागची चाके दुसऱ्या बेटावर अशी अवस्था व्हायची. त्या पेक्ष्या मी काय म्हणतो, पाने आणि स्कुरू डायवरचा टूल बॉक्स घेतोना बरोबर. जेव्हा गरज लागेल तेव्हा दोन हायड्रोजनचे आणि एक ऑक्सिजनचा ऍटम घेतो असेंम्बली करून, काय?

पिवळा डांबिस's picture

15 Aug 2019 - 11:00 pm | पिवळा डांबिस

वर प्रतिसादात डांबीसकाकांनी घरच्या दशम्या द्यायचे कबूल केले आहे तरी,

हे म्हणजे परस्पर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!!!
बाकी आमची लक्षुमी दशम्या करत नाय, कोंबडी-वडे चालत असतील तर गोष्ट वेगळी.
:)

जालिम लोशन's picture

14 Aug 2019 - 3:31 pm | जालिम लोशन

स्कायमेट चेक करा! एखादवेळेस तेंव्हा चक्रीवादळ असायचे.

ट्रेड मार्क's picture

18 Aug 2019 - 6:13 am | ट्रेड मार्क

धागा गंमत म्हणून काढलाय का खरंच माहिती हवी आहे.

वॉशिंग्टन म्हणजे वॉशिंग्टन डीसी नसून वॉशिंग्टन राज्य (सिएटल वालं) म्हणायचे असेल असं समजतो. तर तुम्हाला तिथून कॅब करून कुठपर्यंत जायचं आहे? हवाई पर्यंत?

आपल्याकडे गूगल मॅप्स नावाची एक सुविधा आहे ज्यामुळे तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जायचे हे बघू शकता. ही सुविधा वापरून जर बघितलं तर वॉशिंग्टन आणि हवाई मध्ये मोठ्ठा प्रशांत महासागर आहे आणि वॉशिंग्टनच्या किनाऱ्यापासून हवाई फक्त २७०० मैल दूर असल्याने ब्रिज बांधलेला नाहीये. तर तुम्ही कॅब घेऊन कसे आणि कुठपर्यंत जायचा विचार करत आहात?

बरं जो २७०० मैल समुद्र पार करून जाईल असा कॅब ड्रायवर आधीच ठरवून ठेवलेला आहे का? तो तुम्हाला सोडून परत येणार आहे का तिथेच थांबणार आहे? परत तुम्हाला हे पण बघायला लागेल की त्याची कॅब एका टॅंक फुल मध्ये किती मेल जाते आणि त्याप्रमाणात गॅसोलीन बरोबर घ्यावे लागेल कारण समुद्रात अजून तरी गॅस स्टेशन्स नाहीयेत असं मला वाटतं.

कॅबवालयावरोबर भाव आधीच ठरून घ्यावा अशी एक आगाऊ सूचना सुद्धा करून ठेवतो. शक्य झाल्यास प्याकेज डील घ्या, म्हणजे मध्ये कटकट नको. तिथे पोचल्यावर मग हॉटेलने ठेवलेली पोरं त्यांच्याच हॉटेल मध्ये रहा असा आग्रह करत मागे लागतील. लोकेशन वगैरे नीट बघून घ्या आणि घासाघीस (रूम रेट साठी) करायला विसरू नका. हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही केलेले साहस तिथल्या मालकाला ओरडून सांगा कदाचित तुम्हाला फुकट राहायला देईल. पुरावा म्हणून मधेच फोटो आणि व्हिडीओ घ्यायला विसरू नका. नीट जाहिरात केल्यास तुमचे नाव गिनिज बुकात सुद्धा येईल.

टीप: जर विमानाने जायचा विचार असेल तर त्याची डिल्स शोधू शकता. किंवा क्रूझने जायचा पण पर्याय आहे. कुठलाही पर्याय निवडला तरी प्याकेज डील घ्यावे अशी सूचना करतो ज्यात खाणे पिणे पण समाविष्ट असेल. नाहीतर अश्या ठिकाणी खाणे पिणे बरेच महाग असते आणि ठिकाणे शोधायला वेळही जाऊ शकतो.

क्रूझने जायचा विचार केला तर लॉस अँजेलिस पासूनही बऱ्याच क्रूझ जातात.

जॉनविक्क's picture

18 Aug 2019 - 11:24 pm | जॉनविक्क

काही कळेना झालंय

हे गंम्मत म्हणून लिहलेय की खरंच काही कळेना झालंय ?

धागा गंमत म्हणून काढलाय का खरंच माहिती हवी आहे. काही कळेना झालंय.

देवा, अशी शंका का बरे मनी (माऊ नव्हे) आली?

ट्रेड मार्क's picture

27 Aug 2019 - 7:14 am | ट्रेड मार्क

अहो पण नाताळनंतर जायचं म्हणताय तर तिकडे हवाईला बर्फ पडला असेल ना. कॅबला विंटर टायर्स आहे का ते बघून घ्या. आणि तुम्ही पण वेवस्थित जॅकेट्स स्नो बूट्स वगैरे घाला. लै थंडी असते बघा, त्यामुळे तयारीत जा.

आणि हो, तिथे पोचलात की कामेकोनाच्या गाडीवर श्रिम्प हादडायला विसरू नका.

गुजरात ट्रिपचे विडंबन आहे.

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2019 - 1:17 pm | चौथा कोनाडा

आईच्या गावात ! आसं हाय होय ?
लैच टायमपास झाला म्हनायचा, पर मज्जा आली !
ह्योच तो मूळ धागा:
https://www.misalpav.com/node/44971

आता MipaPremiYogesh या माणसाला रॉयल्टी द्यावी लागेल ना !

लेखकाचे नाव वाचले आणि टायटल मधील aahe शब्द वाचला आणि उलगडा झाला :)) =))

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2019 - 10:32 pm | चौथा कोनाडा

विडंबन आहे हे कळल्यावर मजेशीर वाटले.

एकदादोनदा हवाई ट्रिप केली आहे अशी शंका आहे. हे फक्त इतर कुणी (मिपाकर)गेलेत का याची चाचपणी असावी.

चौथा कोनाडा's picture

19 Aug 2019 - 4:27 pm | चौथा कोनाडा

तो पर्यन्त ही हवाहवाई बघा:

:-)

टवाळ कार्टा's picture

24 Aug 2019 - 1:32 am | टवाळ कार्टा

लेखकाला रस्ता सांगता सांगता डायरेक्ट ट्यांपूत बशीवला इब्लिस मिपाकरांनी =))

टकाभाव, वरचे प्रतिसाद वाचा म्हणजे कोणी कोणाला ट्याम्पूत बशीवला ते कळेल =))

या धाग्यावर वाचनमात्र, लिखानमात्र हजेरी लावून मला ह्या ट्रिप साठी यथाशक्ती मदत/मार्गदर्शन करणाऱ्या, बहुमूल्य सल्ला देणाऱ्या आणि भटकंती मध्ये रुची असणाऱ्या भटक्या परंतु मुळात साहित्यिक पिंड असणाऱ्या माझ्या प्रिय मिपाकर बंधू-भगिनींना "इब्लिस" म्हटल्या बद्दल मात्र तीव्र निषेढ.

बादवे - हा "तीव्र निषेध" पूर्वी शब्द बापुडे केवळ वारा असा शाब्दिक असायचा. आजकाल तो कृतीत देखील बघायला मिळतो हा एक चांगला बदल !

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2019 - 4:38 pm | टवाळ कार्टा

कहर आहे=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या क्याबला एखांदं शीड लावलं तर, शब्द बापुडे केवळ वारा, खारा वारा, मतलई वारा, व्यापारी वारा, इत्यादी वार्‍यांचा फायदा भेटून हवाईला जरा लवकर पोचता येईल, अशी मेट डिपार्मेंटची ताजी म्हायती हाय. बगा, उपेग व्हतो का ते. :)

अहो म्हात्रे सर, कसले खारे, व्यापारी आणि मतलई वारे घेऊन बसलात?

हे जग केवळ मतलबी वाऱ्या वर चालते हेच खरे!

माझ्या साध्या, माहितीची विचारणा करणाऱ्या धाग्यावरचे तिरकस प्रतिसाद बघता आपण एव्हढाच सुबोध घ्यायचा, काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2019 - 10:34 am | डॉ सुहास म्हात्रे

चामुंडराय सायेब,

तुमच्या कॅबने हवाईला जाण्याच्या नागमोडी विचारणेवर आम्ही मदत करावी या उद्येशाने उत्साहाने माहिती दिली आणि तुम्ही त्याला तिरकस प्रतिसाद म्हणता, त्यावरून तुम्ही (प्रशांत महासागराच्या) किती पाण्यात आहात, हे स्पष्ट होते आहे. यकदम् दुsssष्ट, दुsssष्ट ! ;-)

चौकस२१२'s picture

29 Aug 2019 - 11:42 am | चौकस२१२

चामुंडराय ....वॊशिंग्टन हुन कॅब करावी?
अहो पण कुठलं वॉशिंग्टन ? एवढा साधा प्रश्न विचारत होते लोक? काय चुकलं का?
हे नक्की काय चाललंय ?

चामुंडराय's picture

31 Aug 2019 - 8:10 am | चामुंडराय

अहो, किती प्रश्न विचाराल? भलतेच चौकस दिसताय तुम्ही :))

चौकस२१२'s picture

16 Sep 2019 - 3:14 pm | चौकस२१२

चामुंडरायतुम्ही स्वतः इब्लिस पण करताय.... आणि दुसऱ्यांवर कोट्या कसल्या करताय , मला वाटतंय कि मिपा आणि इसकाळ मधील मुक्तपीठ यात काही फार फरक नाही,

सॉरी टू डिसऍग्री

मुपि कधीही मिपा ची बरोबरी करू शकणार नाही.

ब्रह्मेंची ल्यूना किंवा पावसकर मॅडमची मांजर हे "निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे" अशा अजरामर काव्याशी कधीही बरोबरी करू शकणार नाहीत.

बादवे : इब्लिस चा अर्थ बघितला.
खोडकर, खोडसर, उनाड, उपद्‍व्यापी, गुंड, दुराचरणी, बदमाश.
आय टेन्ड टू बी ऑन द लेफ्ट हॅन्ड साईड, प्लिज नोट.

चौकस२१२'s picture

17 Sep 2019 - 4:55 am | चौकस२१२

चामुंडराय ... चेष्ठा जाऊदे तुम्हाला खरंच हवाई बद्दल माहिती हवी होती कि कोणीतरी म्हणल्याप्रमाणे तुम्ही गुजरात ट्रिप ची माहिती य वर एक "उपहासात्मक" म्हणून तुमचा खरडणं केलात?
मुपी चा उल्लेख केवळ अश्या कि तिथेही असली कुचेष्टा चालू असते, मूळ विषय बाजूलाच राहतो
असो तुम्हाला हे जे काही कोड्यात लिहिणे चालू ठेवयचे असेल तर ठेवा मला तरी तो फालतू वेळ वाटतो

मयुरा गुप्ते's picture

30 Aug 2019 - 2:53 am | मयुरा गुप्ते

चामुंडराय,
तुमच्या कडे AAA अथवा Costco ची मेंबर्शीप असेल तर तिथुन तुम्हाला चांगली माहिती मिळु शकेल.

तुम्ही लिहिलेली ठिकाणं वेगवेगळ्या बेटांवर आहेत.
Maui- छान आहे. Snorkeling करायचा प्लॅन असेल तर Maui ला करा. Dormant Volcanoes बघण्यासार्खे आहेत.
Oahu- खूपच गजबजलेलं शहर आहे.
Big Island- छान आहे, पण एव्हढी ठिकाणं धावपळीची होऊ शकतील.

असो.

प्रवासाला शुभेच्छा!

--मयुरा.

चामुंडराय's picture

31 Aug 2019 - 8:08 am | चामुंडराय

थॅन्क्यु व्हेरी मच मधुरा ताई

ह्या तिरकस, टवाळखोर आणि व्यक्त्रोक्तीपूर्ण प्रतिसादांच्या भाऊ गर्दीत केवळ तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण आणि मार्गदर्शनप्रद आहे. तुम्ही बहुधा हवाईची ट्रिप केली आहे असे दिसते आहे.

तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अधिक माहिती मिळवतो.
पुनःश्च धन्यवाद _/\_