श्रावण आला गं सखे
----------------------------
श्रावण आला गं सखे
माहेराची सय आली
हाती जरी किती कामं
त्या साऱ्याला लय आली
परसात एक आड
अंगणात किती झाडं
त्या झोक्यांची याद आली
प्रेमळ गं भाऊराया
वहिनी करिते माया
भेटायची इच्छा झाली
देवासमान गं पिता
देवासमान गं माता
पानं गळायला आली
आताच जायला हवं
त्यांना पहायला हवं
चिंता इथे भय घाली
------------------------
बिपीन
प्रतिक्रिया
4 Aug 2019 - 9:19 pm | पद्मावति
सहज साधी शब्दरचना. आवडली.
5 Aug 2019 - 12:03 am | जॉनविक्क
बस काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या... 1995 पूर्वीचा भारत.
6 Aug 2019 - 8:11 pm | खिलजि
हिच्या मामाच्या घरी अजूनही आहे , हे सारं. सध्या साताऱ्याला राहतात ते .. मस्त मज्जा येते .. जेव्हापण हि तिथे जायला निघते मी मुद्दाम सुट्टी घेऊन तिला सोडायचा बहाणा करतो आणि तिला परत आणेपर्यंत तिथेच तळ ठोकून बसतो .. सुंदर जागा आहे .. कण्हेर धरणाशेजारी .. अहाहा .. हि कविता वाचून आणितुझा प्रतिसाद वाचून त्या कैक आठवणी जाग्या झाल्या ..
अरे पाऊस असला तरी चालेल
आणि नसला तरी काही गम नाही
त्या बंदिस्त अंगणात झोपण्याची
तारे मोजण्याची नशाच काही और आहे
कधी बघितलाय मनसोक्त निखळताना तारा तुम्ही
कधी घेतलाय , कुठेही बाहेर ना जाता अंगावर गारेगार वारा तुम्ही
साताऱ्याला या .. सर्व काही फ्री फ्री फ्री
मोकळी जागा , बाहेर तो उंच वाढलेला औदुंबर
जणूकाही झुला झुलवण्यासाठीच त्याने जन्म घेतला आहे
घरातच असलेला आड आणि त्याला रांधण्यासाठी घुंगरू बांधलेला राहाट
आणि ती अंगणात झोपण्याची व्यवस्था , जणूकाही उभं मोकळं आकाश तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे
आणि ती सुंदर नयनरम्य पहाट, पक्ष्यांचं किलबिलाट
घराचे माननीय जावई म्हणून , तोंड धुण्याअगोदरच आलेला चहा .. अहाहा अहाहा
आई गं ,, नको त्या आठवणी ,, परत परत तिथे जावेसे वाटते
अरे इतकं सुंदर आहे सर्व तिथे , कि पंचतारांकित हॉटेलसुध्दा झक मारते
6 Aug 2019 - 10:11 pm | बिपीन सुरेश सांगळे
पद्मावति
जॉनविक्क
आभारी आहे मी खूप आपला
6 Aug 2019 - 10:13 pm | बिपीन सुरेश सांगळे
खिलजी
वावा ! किती सुंदर प्रतिसाद !
मुख्य म्ह्णजे तुमची प्रतिक्रिया हीच एक कविता आहे
6 Aug 2019 - 10:40 pm | राघव
छान. पु.ले.शु.
10 Aug 2019 - 3:16 pm | बिपीन सुरेश सांगळे
राघव ,
आभारी आहे .
10 Aug 2019 - 6:31 pm | यशोधरा
सुरेख. साधी, सहज, सुंदर.