मिळता नजरेस नजर

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
3 Aug 2019 - 11:32 am

मिळता नजरेस नजर
मिळता नजरेस नजर
श्वास थांबून गेला
मनात मन मोराचा
पिसारा फुलू लागला
*
कशी चुकवू नजर
जीव गोंधळून गेला
त्या हस~या छबीच
ध्यास काळजाने घेतला
*
पुजले प्रेम दैवताला
कौमार्य नैवेद्य वाहिला
विश्वासू सखा होता तो
जिव्हारी घाव देवुन गेला
*
उतरता धुंदी प्रेमाची
जगाचा व्यवहार कळला
तो पहिला घाव
बरेच शिकवून गेला

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

कितीही कोसळून देत त्या सरी

फाटून देत आकाश सारे

थैमान माजले तरी चालेल

पण मी लटपट झटपट त्वरेने येणार

आणि गुरुवर्य तुम्हाला प्रतिसाद देणार

गुरुदेव तुम्हीच आणि फक्त तुम्हीच आहात

या उभ्या धरतीचे आणि तत्सम आंजाचे कर्तेधर्ते

आम्ही पामर कोण ? फक्त आपले भक्त कॅम कार्यकर्ते

आपल्या नजरेने एवढं केलं

आमची नजर काय काय करते ते बघा ======

मिळता नजरेस नजर

मिळता नजरेस नजर

जीभ बाहेर आली

आणि.......

मनात कुत्रा भुंकू लागला

कसाबसा भू भू करत

मी मागे मागे गेलो

ती भेटली एका सांडाला

मग काय ..

शेपटी आत घालून माघारी फिरलो

खतरनाक! स्वतंत्र धागा काढायचा!

खिलजि's picture

5 Aug 2019 - 1:22 pm | खिलजि

११११

हा धागा सन्यास घेण्या अगोदरचा असावा बहुतेक
बाकी तो नैवेद्य वगैरे उल्लेखलाय त्यासोबत दुर्वा , पत्री, फुले कसली होती तेही लिहा.

"" कौमार्य नैवेद्य वाहिला "" हे कसे वाहतात गुरुदेव .. जरा प्रकाश टाकावा .. उत्तर वंगाळ असेल तर व्यनि करावा .. नाहीतर इथेच आंजावर नैवेद्य दाखवावा .. पण प्रकाश टाकावा .. प्रकाश टाकावा