आदिमाया ती आदिशक्ती
स्वयें चित्कला मायमुक्ती
ज्ञानराज सोपान मुक्तीचा
साधन ते अवघे निवृत्ती
मन मारुनी उन्मन करावे
ज्ञानराया शिकवली युक्ती
त्याग मायेचा मार्ग प्रभुचा
मिटविली चांग्याची भ्रांती
अहं नाम्याचा कच्चे मडके
गोरा म्हणे ती स्वयं भक्ती
क्लेश साहुनी क्षमा करावी
मुक्ती म्हणे मग मिळे शांती
नभात तेजें ज्योत उजळली
माय चित्कला मुक्त जाहली
विशाल
प्रतिक्रिया
21 Mar 2009 - 5:54 pm | नरेश_
पण चित्कलाचा अर्थ समजावून सांगा ना .
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
21 Mar 2009 - 5:59 pm | विशाल कुलकर्णी
चित्कला म्हणजे वीज !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
21 Mar 2009 - 6:33 pm | प्रमोद देव
प्रासादिक रचना.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
21 Mar 2009 - 7:13 pm | क्रान्ति
संतकाव्य वाचत आहे असा भास होतोय. अप्रतिम प्रासादिक रचना!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
22 Mar 2009 - 7:34 am | प्राजु
संतकाव्य वाचल्यासारखे वाटले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Mar 2009 - 4:46 pm | टारझन
गुलशन कुमारच्या टी-सेरिज मधे द्यावीशी वाटावी अशी कविता !!
22 Mar 2009 - 4:49 pm | विसोबा खेचर
गुलशन कुमारच्या टी-सेरिज मधे द्यावीशी वाटावी अशी कविता !!
गुलशन कुमारच्या टी सिरिजचा संदर्भ कळला नाही! विनाकारण खोचक प्रतिसाद दिला आहे असं वाटतं!
तात्या.
22 Mar 2009 - 5:05 pm | टारझन
कविता खरंच आवडली होती .. ती एखाद्या कॅसेट मधे प्रसिद्ध व्हावी असं वाटलं होतं ..
आपल्याला असं खोचकंच का वाटलं , ह्यावर काय बोलावं आता ? असो !! हल्ली आम्ही कुप्रसिद्ध आहोत .. चांगलं लिहीलं तरी हिण आणि हिडिस होत असावं .. ह्या पुढे लिहीताना अधिक विचार करावा लागेल ..
(कुप्रसिद्ध) डाकू टारासिंग
22 Mar 2009 - 10:12 pm | धमाल नावाचा बैल
गुलशन कुमारच्या टी-सेरिज मधे द्यावीशी वाटावी अशी कविता !!
मलाही कविता आवड्ली...पण टारझनची कॉमेंट ..अगायायाया =))
22 Mar 2009 - 8:53 am | विसोबा खेचर
संतकाव्य वाचत आहे असा भास होतोय. अप्रतिम प्रासादिक रचना!
सहमत आहे..
तात्या.
22 Mar 2009 - 2:25 pm | अविनाशकुलकर्णी
नभात तेजें ज्योत उजळली
माय चित्कला मुक्त जाहली
vaa surekh
22 Mar 2009 - 10:11 pm | शब्द बापुडे
कविता खूप उत्कृष्ट आहे. मुक्ताईवर लिहिली आहे का? मुक्ताई विजेबरोबर अदृश्य झाली अस वाचल होत. इथे खूप चांगल्या कविता वाचायला मिळतात.
*चिरविजयी*
22 Mar 2009 - 10:31 pm | शितल
चित्कला आवडली. :)