त्यागाने धजलेले, भक्तीत चूर,
देह हे सजलेले ।
धुळीने नटलेले, समर्पणां आतुर
पाय हे वळलेले ।
नामाने माखलेले, वारीचे काहूर
हृदयीं ह्या उठलेले ।
मातीने रंगलेले, भजनांचे सूर
नभीं या दंगलेले ।
माऊलीने भारलेले, भक्तांचे ऊर
कीर्तनीं या न्हालेले ।
पंथ भिजलेले, भक्तीने महामुर,
जीव हे चिंबओले ।
ध्यास ल्यालेले, जरी क्षणभंगुर
आयुष्य विठुरायांत मुरलेले ।
- अभिजीत
प्रतिक्रिया
1 Aug 2019 - 10:28 pm | जॉनविक्क
1 Aug 2019 - 10:32 pm | मायमराठी
धन्यवाद
2 Aug 2019 - 2:38 pm | श्वेता२४
वारी आवडली
3 Aug 2019 - 10:35 pm | मायमराठी
धन्यवाद. महामुर म्हणजे प्रचंड, पुष्कळ, पावसाकरता वापरलं जाणारं विशेषण.
2 Aug 2019 - 4:32 pm | जगप्रवासी
सुरेख
4 Aug 2019 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वारी थेट उतरली.
-दिलीप बिरुटे