काही समस्या

Nitin Palkar's picture
Nitin Palkar in काथ्याकूट
9 Jul 2019 - 3:42 pm
गाभा: 

पुढील व्यथांवर प्रभावी, हुकमी उपाय कुणी सुचवू शकेल का....?

मुंबई शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी मांडलेला उच्छाद, त्यांना रस्त्यात दूध बिस्किटे घालणाऱ्या काही भूतदया संस्था, घरातल्या शिळ्या चपात्या त्यांना रस्त्यातच घालणारे दयावान श्वानप्रेमी.

जागोजागी कबुतरांना दाणे घालणारे पक्षीप्रेमी.

अनेक मंदिरांच्या बाजूला गायींना घेऊन बसणाऱ्या, त्यांच्याकरता चारा आणि कसलेसे लाडू विकणाऱ्या बाया. या गायींचे मलमूत्र परिसरात करत असलेली घाण.
या समस्यांचा सर्वांनाच त्रास होत असावा, यावर काय इलाज करता येईल?

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2019 - 4:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

अकु काकांचे धागे वाचा...
पैजारबुवा,

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 9:11 pm | जालिम लोशन

बाकीच्यांना हि समस्या नाही.

या समस्येला काही उपाय नाही.. आमच्या इथे हि सेम प्रॉब्लेम आहे.
कुत्री आणि त्यांची पिलावळ इतकी घाण करतात कि विचारू नका. आणि रात्री बेरात्री ते केकाटणे चालते ते तर अगदी असह्य..

खूपदा त्यांना गनिमी कावा करून विष घालून मारण्याचा विचार आला होता.. अगदी टोकाचा विचार आहे मान्य आहे पण त्रासच तेवढा होत होता. पण हे टोकाचे पाऊल उचलायचे कधी धाडस नाही झाले.. कारण जरी हि कुत्री मेली तरी नविन पिलावळ यायला 4-5 दिवस पण लागणार नाहीत.. आणि त्यानंतर प्राणीप्रेमी पोलीस कम्प्लेंट वगैरे नौटंकी करणार..

यावर उपाय फक्त एकच.. परिस्थिती शी जुळवून घेणे.. शक्य तितके इग्नोर करणे. हळू हळू सवय होऊन जाईल.. बेस्ट लक.

इरामयी's picture

9 Jul 2019 - 10:26 pm | इरामयी

१- त्या गाय घेऊन बसणाऱ्या स्त्रियांना दुसरा काही उपजिविकेचा पर्याय उपलब्ध करून द्या. त्यांना नवीन काही कसब शिकवा.

२. कुत्र्यांना रस्त्यावर रहावं लागू नये यासाठी त्यांना रहायला श्वानाश्रय केंद्र उघडा.

३. कबुतरांकडे सध्या तरी दुर्लक्ष करा.

इरामयी's picture

9 Jul 2019 - 10:27 pm | इरामयी

१- त्या गाय घेऊन बसणाऱ्या स्त्रियांना दुसरा काही उपजिविकेचा पर्याय उपलब्ध करून द्या. त्यांना नवीन काही कसब शिकवा.

२. कुत्र्यांना रस्त्यावर रहावं लागू नये यासाठी त्यांना रहायला श्वानाश्रय केंद्र उघडा.

३. कबुतरांकडे सध्या तरी दुर्लक्ष करा.

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 11:24 pm | गड्डा झब्बू

वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात नागरिकांचे वाढत चाललेले बेशिस्त वर्तन बघता या समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे.

धर्मराजमुटके's picture

10 Jul 2019 - 8:31 pm | धर्मराजमुटके

खरेतर बिस्किटे खाऊन कुत्रे हळुहळू मरतच असतात. कुत्र्यांचे शरीर मैदा खाण्यासाठी बनलेले नसते. कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालणारे खरे तर पुतना मावशीचे वंशज असतात. म्हणजे दाखवतात की दुध पाजतो पण मुळात पाजतात विष !

काही लोक त्यांच्या परीने मुक्या प्राण्यांची मदत करत असतात. बाकीच्या लोकांना तेसुद्धा पहावत नाही. याला काय म्हणावे?

नाखु's picture

10 Jul 2019 - 10:19 pm | नाखु

प्राणी रात्री अपरात्री दुचाकीवरून जात असताना हमखास अपघात घडवतात (झुंडीने अंगावर येऊन अगदी एक किमी पाठलाग करु शकतात)
आणि प्रसंगी जायबंदी व जिवानिशी होते.
आता ज्यांना भूतदया दाखवायचीच आहे तर थेट ही कुत्री घरी घेउन जावीत व त्यांची भावी पिढी सुद्धा सांभाळावी,

वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

बाप्पू's picture

11 Jul 2019 - 10:55 am | बाप्पू

नाखु अगदी 100% खरे बोललात.. मागे एकदा मी हाच विषय मांडला होता fb वर एका ग्रुप मध्ये.. तेव्हा त्या ग्रुप वरील so called प्राणी मित्र माझ्यावर अक्षरशः तुटून पडले..

मी भटक्या कुत्र्यामुळे होणारे उपद्रव जसे कि लहान मुले, वृद्ध यांच्यावर होणारे जीवघेणे हल्ले, रेबीज मुळे होणारे मृत्यू, रस्त्यावरील अपघात, घाण हे मुद्दे मांडले होते. या सर्वाला भटकी कुत्रे आणि त्यांना "भूतदया " या गोंडस नावाखाली सपोर्ट करणारे सर्व जबाबदार आहेत. त्यांच्या वाढत्या संख्येला आणि उपद्रवाला हे लोक जे त्यांना काहीबाहि खाऊ घालतात तेच कारणीभूत आहेत. अश्या लोकांनी सरळ ती सर्व कुत्री घरी घेऊन जावीत आणि हवे तेवढे प्रेम करावे.. पण रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी नको.

मी असा मुद्दा मांडला तर खूप लोक माझ्यावर अक्षरशः तुटून पडले.. मला काहींच्या काही उत्तरे मिळू लागली.. जसे कि -
रस्त्यावर माणसे सुद्धा मलमूत्र विसर्जन करून घाण करतात ते दिसत नाही का??
चोर दरोडेखोर यांच्या कडून केलेले हल्ले तुम्हाला दिसत नाहीत का??
रस्त्यावरील खड्यांमुळे होणारे अपघात दिसत नाहीत का??
या आणि अश्या अनेक मुद्द्यांच्या आधारे ते भटके कुत्रे आणि त्यांचा उपद्रव जस्टीफाय करत होते..
आणि या सर्वात मुली आणि स्त्रिया यांची संख्या लक्षणीय होती

शेवटी कुत्र्यांचा झुंड समोर आल्यावर एकटा माणूस जसा गुपचूप पळून जातो तसा त्या ग्रुप मधून मी चर्चा अर्धवट सोडून पळून गेलो..

उस दिन से - कुत्तो से dar नही लगता साहब... इन फेक प्राणिप्रेमीयों से dar लगता है ..

नाखु's picture

11 Jul 2019 - 11:19 am | नाखु

कुत्र्याने चावले,रोग पसरवले, हल्ला करुन लहान मुलाचा,वृद्धाचा जीव घेतला तरी प्राणिमात्र मित्रांना क्षम्य आणि योग्य वाटत असेल तर तोच न्याय गर्ददुल्ले, भिकारी,सडकछाप,गुंड मवाली, अतिरेकी, लिंगपिसाट यांना लावावा,त्यांचा समाजाला उपद्रव,प्रसंगी जीव जरी गेला असला तरी समाजाने त्यांना शिक्षा,कायदा अंमलबजावणी इत्यादी करु नये,या फेसबुकी दयावंतांच्या घरी आश्रय दिला जावा आणि त्यांचे बरोबर फक्त दोन वर्षे वास्तव्य करणा्याची परमसंधी दिली जावी.

जालीय व प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांची झुंड अनुभवलेला वाचकांची पत्रेवाला नाखु

प्राणी आणि पक्षी ही समस्या आहे .
देवळा समोर गाई असणे ह्याच प्रमाण खूप नगण्य आहे .
म्हणजे मुंबई सारख्या शहरात १०० सुधा नसतील .
आणि हजारो लोक आहेत ते रोड च्या बाजूला मलमुत्र सोडतात त्यानं घान होत नाही का?
भटकी कुत्री ह्यांना शहर नियोजन मध्येच सोय करावी .
पाळीव कुत्र्या विषयी लेखकाला आक्षेप नाही पण त्यांचे मालक त्यांना रस्त्यावर मल मुत्र करायला आणतात त्याचे काय
कबुतर किंवा बाकी कोणतेच पक्षी हे ह्या पृथ्वीचे तेव्हढेच मालक आहेत जेवढे मानव

प्राणी आणि पक्षी ही समस्या आहे .
देवळा समोर गाई असणे ह्याच प्रमाण खूप नगण्य आहे .
म्हणजे मुंबई सारख्या शहरात १०० सुधा नसतील .
आणि हजारो लोक आहेत ते रोड च्या बाजूला मलमुत्र सोडतात त्यानं घान होत नाही का?
भटकी कुत्री ह्यांना शहर नियोजन मध्येच सोय करावी .
पाळीव कुत्र्या विषयी लेखकाला आक्षेप नाही पण त्यांचे मालक त्यांना रस्त्यावर मल मुत्र करायला आणतात त्याचे काय
कबुतर किंवा बाकी कोणतेच पक्षी हे ह्या पृथ्वीचे तेव्हढेच मालक आहेत जेवढे मानव

सुबोध खरे's picture

11 Jul 2019 - 10:03 am | सुबोध खरे

कबुतर हे ह्या पृथ्वीचे तेव्हढेच मालक आहेत
हे मान्य आहे हो.
पण त्यांना भरमसाट "दाणे" खायला घालून त्यांची पैदास नको इतकी वाढवण्याबद्दल आक्षेप आहे.

कबुतरांचा उच्छाद यावरील वैद्यकीय संशोधन पर निबंध (मुंबईतील हरकिसन दास रुग्णालयातून )

Feral pigeons are of considerable epidemiological importance, being reservoirs and potential vectors of a large number of microorganisms and source of antigens of zoonotic concern, causing both infections and allergic diseases that can be lethal.

Pathogens can be transmitted to humans mainly via excreta, secretions, or dust from feathers spread into the environment. Thus a direct contact with pigeons can be unimportant. Pigeons breeding and roosting sites host an endless number of arthropods that may infest humans as bugs fleas, mites and ticks. The latter are of particular human concern, as the soft tick Argas reflexus.

It is seen that pigeon droppings cause mess on the surfaces and their content can eat into soft stone and cause long term damage to buildings. The nest droppings and feathers also block rainwater pipes causing damage by water clogging. Pigeon allergens may also play an important role in worsening asthma in certain urban environments which contain many pigeons.

Besides these droppings spoil the pavements as make it slippery and becomes difficult for elders to walk and thus droppings carry pathogenic organisms. In all feeding pigeons is considered as an unhygienic and anti-social practice. Feeding pigeons encourages them to gather in increasing number that adds to nuisance and annoyance. This also causes the pigeons to be dependent on human beings.

Feeding pigeon often ends up feeding more pigeons and hence the increase in the food grains needed for them, as a result at times there is excess left over causing the remaining food to go bad and it may attract more rats and mice thus causing the spread of disease to humans.

Further the government should take the necessary steps in controlling the influx of pigeons.

The ideal method to control asthma would be to control feeding these pigeons and hence limiting the supply of food grains to birds by natural means and thus reduce the breeding rate and discourage the influx of pigeon from different areas.

http://www.ijaai.in/article.asp?issn=0972-6691;year=2014;volume=28;issue...

The Indian Journal of Allergy, Asthma and Immunology is an official publication of Indian College of Allergy, Asthma and Applied Immunology

कबुतर हे जैन किंवा मारवाडी लोक पवित्र मानतात आणि ते एक पुण्य म्हणून त्यांना चांगल्या दर्जाचे खाद्य पुरवता त
मुंबई मध्य दादर,गिरगाव चौपाटी,मरीन ड्राईव्ह हेच कबुतर खाणे माहीत आहे तिथे त्यांना खाद्य दिले जाते .
अगदी रस्तोरस्ती नाहीत.
कबुतरांचा त्रास लिमिटेड आहे .
तसाच गाईचा त्रासच नाही(मुंबई चे घानीची तुलना केली तर,)
राहिले कुत्रे ह्यांचे प्रजनन थांबवू शकतो पण त्यांना ठार मारणे बिलकुल स्वीकारता येणार नाही

सुबोध खरे's picture

11 Jul 2019 - 8:22 pm | सुबोध खरे

हा उच्छाद केवळ मुंबई पुरता मर्यादित नाही.

जरा हे वाचून घ्या म्हणजे या प्रश्नाचे गांभीर्य कळेल

37 per cent children were found to be allergic to pigeon feathers and droppings.

https://www.hindustantimes.com/pune-news/pune-doc-s-research-paper-claim...

सुबोध खरे's picture

11 Jul 2019 - 8:22 pm | सुबोध खरे

हा उच्छाद केवळ मुंबई पुरता मर्यादित नाही.

जरा हे वाचून घ्या म्हणजे या प्रश्नाचे गांभीर्य कळेल

37 per cent children were found to be allergic to pigeon feathers and droppings.

https://www.hindustantimes.com/pune-news/pune-doc-s-research-paper-claim...

विजुभाऊ's picture

15 Jul 2019 - 4:17 pm | विजुभाऊ

जेथे जेथे जैन मंदीरे आहेत त्याच्या आसपास कबुतरखाने निर्मान झाले आहेत.
मंदीरे सोडा पण जेथे जेथे जैन लोक रहातात त्या सोसायट्यातही कबुतरखाने झालेत.

भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच त्रास देत नाहीत. तुम्ही जर पळून जायला लागलात तर ते नक्कीच तुमच्या पाठी लागतील. अन्यथा नाही. त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांच्याकडून सुद्धा प्रेमच मिळेल.

देवळाबाहेर बांधलेल्या गायी काहीच त्रास देत नाहीत. आणि कबुतरांच्या वाढत्या त्रासाला शहरी श्रीमंत लोकच जबाबदार आहेत.

भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच त्रास देत नाहीत. तुम्ही जर पळून जायला लागलात तर ते नक्कीच तुमच्या पाठी लागतील. अन्यथा नाही. त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांच्याकडून सुद्धा प्रेमच मिळेल.

अच्छा.. म्हणजे आता इथून पुढे. रस्त्यावरन गाडी चालवताना एखादे कुत्रे किंवा कुत्र्यांचा झुंड मागे लागला तर गाडी बाजूला घायची आणि त्यांना प्रेम करत बसायचे.. लाडाने कुरवाळत बसायचे म्हणजे ते आपणाला त्रास देणार नाहीत..

किती थोर विचार.. दंडवत घ्या. _^_

कितीतरी छोटी मुले ( अगदी 1-2 वर्षे वय ) आणि वृद्ध व्यक्तींना
भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः फाडून लचके तोडून जीवे मारलेत... तुमच्या मते ते सुद्धा बहुतेक या कुत्र्यांना पाहून पळून जात असतील त्यामुळेच कुत्र्यांनी हल्ला केला...

वाह वाह. धन्य तुमचे लॉजिक.. _^_

भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच त्रास देत नाहीत. तुम्ही जर पळून जायला लागलात तर ते नक्कीच तुमच्या पाठी लागतील. अन्यथा नाही. त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांच्याकडून सुद्धा प्रेमच मिळेल.

हे वाक्य उपरोधानं म्हटलंय असं समजतो. :-)

बादवे, भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर एक जालीम उपाय आहे तसा.. थाई/चायनीज किंवा तत्सम बॅचलर्स ना काही महिन्यांसाठी का होईना भाड्यानं अशा एरीयामधे रहायला जागा मिळावी.. तेवढ्या काळात त्या भागापुरता तरी हा हैदोस संपेल. ;-) हां.. पुढे या बॅचलर्स चा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं त्याबद्दल आधीच विचार करून ठेवावा म्हणजे झाले!

जॉनविक्क's picture

15 Jul 2019 - 9:14 pm | जॉनविक्क

मुद्दा रेटने चालू आहे.

सुबोध खरे's picture

11 Jul 2019 - 8:34 pm | सुबोध खरे
Nitin Palkar's picture

15 Jul 2019 - 2:11 pm | Nitin Palkar

सर्वच प्रतिसाद दात्यांचे आभार. या लेखनाची एवढी दखल घेतली जाईल असे वाटले नव्हते. आलेल्या प्रतिक्रियांपैकी अधिकतर उपहासात्मक आहेत, मिपावर ते अपेक्षितही असते.
सुबोध खरे यांचे अभ्यासपूर्ण आणि सप्रमाण प्रतिसाद वाचून बरे वाटले.
नाखू, बाप्पू आदी काहीजण समविचारी असल्याचे जाणवले.
एकंदरीत प्रतिसादांवरून गॅलिलिओचा किस्सा सहज आठवला (स्वतःची गॅलिलिओ बरोबर तुलना करण्याचा अजिबात मानस नाही हे प्रथमच नमूद करतो). सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सुमारे चारशे वर्षांपूर्वी सांगितले. व्हॅटिकन चर्चने हे सत्य तीनशे वर्षांनी मान्य केले. गॅलिलिओ वर मारलेला ‘पाखंडी’ हा शिक्का त्याहीनंतर शंभर वर्षांनी मागे घेतला.
......तसे कदाचित तीनचारशे वर्षांनी या समस्या आहेत हे सर्वसामान्य समाजाला जाणवेल...

ग्रह तारे ह्यांचे आयुष करोडो वर्षाचं आहे आणि शास्वत आहे .
प्राणी त्यात माणूस सुद्धा आला आज आहे तर उद्या नष्ट होईल .
पृथ्वी कोणत्याही क्षणी सजीव मुक्त होईल .
400 वर्षा नंतर कुत्रा पण नसेल आणि माणूस पण हे शक्य होवू शकत .
तुमचं मत तेव्हा कोण मान्य करणार

उपेक्षित's picture

15 Jul 2019 - 4:34 pm | उपेक्षित

एक डाव असच एक चुकार कुत्र्यामुळे कर्वेनगरापाशी गाडीवरून घाण पडलो होतो, साला काय पाळायची/ प्रेम उतू जाऊ द्याच असल ते आपल्या घरात कराव लोकांना ज्ञान अजाबात देऊ नये.
(हल्ली अशी कुत्र्यांची टोळकी दिसली कि मी ए कुत्र्या हे बाबुराव स्टाईल वरोडतो घाबरतात न भाऊ आपल्याला )

असो मजेचा भाग झाला पण मध्ये असेच एक भटके कुत्रे मित्राने फोन केला म्हणून आम्ही दोघे पार भूगाव ला रेस्कू मध्ये देऊन आलो होतो उपचारासाठी. ते वाचले नाही तेव्हा त्यांच्याकडून तसा फोन आला होता तेव्हा मला आणि मित्राला खूप वाईट वाटले होते (मित्राने खूप केले होते त्याच्यासाठी आम्ही आपले मम म्हणायला )

मराठी कथालेखक's picture

15 Jul 2019 - 5:34 pm | मराठी कथालेखक

भटक्या कुत्र्यांचा त्रास खरंच खूप असतो.
तुमच्या लेखावरुन वाटतंय की निदान तुमच्या सोसायटीत तरी भटकी कुत्री नाहीत.. यातच सध्या आनंद माना.. माझ्या काही मित्रांच्या सोसायटीत अशी भटकी कुत्री आणि त्याहून भयंकर श्वानप्रेमी आहेत , त्यांचा वैताग ऐकला आहे.
आणि या भटक्या कुत्र्यांच्या आणि स्वानप्रेमीच्यां बाजुने इतके कायदे आहेत की ते वाचूनच तुम्ही हतबल व्हाल.
तेव्हा उपाय काहीच नाही... पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होवून कायदे बदलले जातील तर ठीक.
तोपर्यंत जास्त कुत्री असलेले , कमी वर्दळीचे रस्ते चालण्याकरिता टाळा, दुचाकीवरुन जातानाही काळजी घ्या... जमल्यास हातार काठी वा छत्री ठेवा... रात्री -अपरात्री अशा रस्त्यांवरुन जावे लागलेच तर शक्यतो चारचाकी वाहनच वापरा.

Rajesh188's picture

15 Jul 2019 - 6:11 pm | Rajesh188

मी किती तरी वर्ष मुंबई मध्ये राहत मला कधीच ह्या भटक्या कुत्र्यांचा त्रास झाला नाहीं .
त्रास होतो तो पाळीव कुत्र्यांचा सर्वांच्या समोर त्या कुत्र्यांचा मालक रस्त्यावर कुत्र्याला संडास करायला लावतो पण तुम्ही काही बोलू शकत नाही कारण त्या कुत्र्याला मालक असती .
मला असा एक महाभाग भेटला होता त्याला जागेवर रोकल तर त्याच उत्तर होत माझे वडील सुप्रीम कोर्टात वकील आहेत ,
ते वकील आहेत म्हणून तू कुठेही कुत्र्याला घाण करायला लावशील अशी orgument झाली होती .
सारासार विचार केला तर मुंबई सारख्या शहराची लोकसंख्या 1 कोटी chya वर आहे .
भटकी कुत्री किती असतील 10000 त्यात त्रास देणारी किती असतील 2000 .
म्हणजे नगण्य.
हा विषय काही जास्त गंभीर नाही जेवढे इथे काही लोक दाखवत आहेत

सुबोध खरे's picture

15 Jul 2019 - 7:59 pm | सुबोध खरे

हा विषय काही जास्त गंभीर नाही जेवढे इथे काही लोक दाखवत आहेत

वस्तुस्थिती वेगळी आहे

An estimated 35 million stray dogs live in India and according to World Health Organisation (WHO) India faces about 18,000 to 20,000 cases of rabies every year

According to the WHO report about 36 pc of the world’s deaths from rabies happen in India itself.

In March 2016, civic authorities from Mumbai disclosed in the Supreme Court that dog bites in Mumbai have taken 434 lives in the time period 1994 to 2015. According to reports more than 1.3 million people were bitten by dogs in Mumbai during this period.

Why does India have such a greater number of stray dogs?
The biggest reason behind the problem is open garbage. Stray dogs rely on garbage while hunting for eatables.

https://mediaindia.eu/social-vibes/stray-dogs-a-major-problem-in-india/

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 9:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

An estimated 35 million stray dogs live in India and according to World Health Organisation (WHO) India faces about 18,000 to 20,000 cases of rabies every year.

+१००

यासंबंधात अजून एक सत्य सगळ्यांना माहीत होणे जरूर आहे, ते असे... भटक्या कुत्र्याने चावल्यावर (किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्याची लाळ किंवा इतर शारिरीक स्त्राव माणसाच्या रक्तात मिसळल्यावर) त्वरीत रेबिजविरोधक लस योग्य त्या प्रमाणात टोचून घेणे अत्यावश्यक असते. कारण अनोळखी/भटका कुत्रा रेबिजने दुषित आहे की नाही हे सांगणे शक्य असेलच असे नाही (बहुदा नाहीच) आणि उशीर केल्यास माणसात रेबिजचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता असते.

त्यामुळेच, "घरी पाळलेले व नियमित रेबिज लसीकरण केलेले" या दोन्ही गोष्टी १००% खात्रीने माहीत असलेले कुत्रे सोडले तर, सरसकटपणे इतर सर्व अनोळखी आणि/अथवा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर त्वरीत रेबिजचा इलाज सुरू करणे (rabies immune globulin आणि rabies vaccine) अत्यावश्यक आहे... त्यासाठी कोणत्याही तपासणीची गरज नाही.

कारण, रेबिज हा असाध्य रोग आहे... त्यावर कोणत्याही उपचारपद्धतीत, कोणताही औषध-उपचार, नाही... मरणाची मात्र १००% खात्री आहे.

झेन's picture

21 Jul 2019 - 4:31 pm | झेन

कुठलेही कुत्रे चावल्यानंतर आधी दोन कुत्रा प्रेमी शोधून त्यांना कडकडून चालावे मग डॉक्टरकडे जाऊन रेबीज चा ईलाज करून घ्यावा.

सुबोध खरे's picture

15 Jul 2019 - 8:02 pm | सुबोध खरे

2014 census: 90,000 stray dogs in Mumbai.

सुबोध खरे's picture

15 Jul 2019 - 8:08 pm | सुबोध खरे

Mumbai’s 41 leopards may be protecting locals from thousands of rabid stray dogs

95,000 dogs roam Mumbai.

75,000 bites are recorded annually in the city (although many more are likely unreported). More than 420 people in Mumbai have died from rabies as a result of stray dog bites over a 20-year period.

Moreover, by consuming between 800 and 2,000 dogs per year, we calculate that the leopard population saves the Municipal Corporation of Greater Mumbai about US$18,000 (12,33,369.00 Indian Rupee) in sterilisation costs

https://qz.com/india/1224409/mumbais-41-leopards-may-be-protecting-local...

बाप्पू's picture

15 Jul 2019 - 11:22 pm | बाप्पू

श्वानप्रेमी मोड ऑन

कुत्र्याने चावा घेतला कि त्यांचा राग मानण्याची गरज नाही.. गुमान रेबीज चे इंजेक्शन घ्यायचे.. पण कुत्र्याला दोष द्यायचा नाही बर का...!!! त्या कुत्र्याला मागच्या जन्मी एखादा माणूस चावला असेल त्याची वाईट आठवण अजुन त्याच्या डोक्यात असेल म्हणूनच त्याने तुमचा चावा घेतला असेल.. त्यामुळे शेवटी चूक माणसाचीच आहे..

आता त्याच्या वाईट आठवणी मिटवण्यासाठी आणि आपल्या चुकांचे प्रायश्चित म्हणून कमीत कमी 2 कुत्र्यांना रोज एक पार्ले जी आणि चितळे चे दूध ठेवावे.. त्यांची प्रणयराधना विनात्रास पार पडावी म्हणून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स पाळावा..

कुत्राप्रेमी मोड ऑफ

BTW हा प्रतिसाद लिहिताना देखील आमच्या इथे प्रणयाराधन सुरु आहे.. 2-3 दगड मारून त्यात खंड पडावा कि त्यांच्या प्रायव्हसीत व्यत्यय नको म्हणून माझ्या tv चा आवाज लहान करावा... ???

टीप - प्राणायाराधन म्हणजे काय ते इथे कळेल