पुन्हा तेच अगम्य कोडे
प्रेम कोडगे घेऊन फिरलो
कुठे कुठे शोधले तुला सखे ?
वैतागून हळूच पिवळा झालो
तू नाही भेटली तरीही
शोधली तुला अर्धांगिनीत
भेट अधुरीच राहिली आपुली ,
शोधून पुरता अर्धा झालो
अर्थ अनर्थ घेऊनि सारे
गहिवर आला स्वप्नाचा
माळ फुलांची सुकून गेली तरीही
सुवास दरवळे प्रेमाचा
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
प्रतिक्रिया
9 Jul 2019 - 9:08 pm | जालिम लोशन
हिंदीत सठिया गया म्हण आहे. म्हणजे साठी उलटलेला. पिकल्या पानाचा हिरवा देठ.
11 Jul 2019 - 6:39 am | नाखु
तुम्ही ज्यांचा उल्लेख केला आहे ते साठी उलटून बाराच्या भावात गेलेले आहेत.
त्यांच्याच एका धाग्यावर प्रतिसाद दिला आहे त्यांनी फक्त ७३ म्हणून!!
स्मरणशील वाचकांची पत्रेवाला नाखु
10 Jul 2019 - 3:01 pm | खिलजि
धन्यवाद साहेब ,, पण एक बदल ,, अजूनही कोवळा आहे हा : खिलजी आणि ...