पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
8 Jul 2019 - 6:39 pm

पूर्वी आपण जिथे भेटायचो

तिथे आता एक टपरी झालीय

एक तपानंतर पुन्हा कप घेतला हाति

पण कटिंग इथली जर्रा बरी झालीय

वळणे घेत घेत तू तिथून , तर मी कुठून कुठून यायचो

कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोन्ड लपवायचो

मी घाबरून तुलाच म्हणायचो , हळहळू तुझि डेरिंग बरी झालीय

त्या झाडामागे बराच इतिहास घडला

तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा

पण नंतर तुटलो ते कायमचेच , जणू भेटलोच नव्हतो

आज इथे आलो तेव्हा " साठी " माझी पुरी झालीय

असेल तीही स्वतःच्या नातवंडांबरोबर खेळत

मीही आहे व्यग्र माझ्या जीवनात

तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती

ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

8 Jul 2019 - 6:53 pm | चाणक्य

कथेवरून प्रेरीत की काय ?

खिलजि's picture

8 Jul 2019 - 7:08 pm | खिलजि

अगदी बर्रोब्बर ओळखलंत .. जब्राट तुफ्फान आकलनशक्ती हाय राव तुमची .. आमचे गुरुदेव आमचे प्रेरणास्रोत ऱ्हायले आहेत आणि पुढेही राहतील ...

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 10:05 pm | जॉनविक्क

आकुंच्या कथेवरून हे काय पटलं नाही. ;)

तुषार काळभोर's picture

9 Jul 2019 - 8:24 am | तुषार काळभोर

त्या झाडामागे बराच इतिहास घडला

शेवट सूचक असावा.

मीही आहे व्यग्र माझ्या जीवनात

तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती

ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय

ऐवजी
मीही आहे चालीरीतीने माझ्या संसारात फक्त

तिच्या भाळी लावायला आणलेला कुंकु करंडा अजूनही तसाच उरलाय उरातल्या आठवणींसकट.

आग्रह नाही सुचवणी पण शेवट दोन तीनदा वाचा.

पुलेशु

नित वाचक वाचकांची पत्रेवाला नाखु

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 7:38 am | जालिम लोशन

:—)

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2019 - 12:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

लगे हाथ आता प्रियाभाभी आणि दुर्गाआत्यांवरही एखादे महाकाव्य लिहून टाका
तेवढेच मेंदुवरच्या पुरळाने होणार्‍या तळमळी कडे दुर्लक्ष होते.
पैजारबुवा,

खिलजि's picture

9 Jul 2019 - 1:32 pm | खिलजि

आता कुठे लिंक लागली .. तरी बोललो पै बु काका असे का बोलत आहेत ? गुरुदेवांची कृपा , अजून दुसरे काही नाही ..

पुनश्च धन्यवाद सर्व वाचक मंडळींना आणि मार्गदर्शकांना आणि हो गुरुवर्यांनासुद्धा

मारवा's picture

9 Jul 2019 - 8:37 pm | मारवा

गुढ प्रेरणांनी भरलेल्या काव्यपंक्ती उदा.

त्या झाडामागे बराच इतिहास घडला

या दोन ओळीच अनेक पदरी अर्थाच्या आहेत
काय बरे झाले असेल झाडामागे ?
अर्थात चावट मनांना जरी श्रुंगारच आठवला असेल तरीही मला खात्री आहे की कवी काहीतरी अजुन खोलवरचे सुचवत असावा
एका आशयघन हिन्दी चित्रपट गीताचा मी स्वतः केलेला मराठी अनुवाद मला इथे मांडायचा मोह आवरत नाही
सळसळ होती पानांची बागेत पिंपळाच्या
असे भेटलो आम्ही दोघे छायेत पिंपळाच्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या टपरीवरचीच च्या पिवूनच गुरुवर्यांची प्रतिभा खवळली आहे (आता ही प्रतिभा कोण असे विचारू नका. उत्तरदायीत्वास नकार लागू आहे !). आता तुमच्या टपरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड पडली तर आम्हाला सांगू नका. :)

खिलजि's picture

10 Jul 2019 - 2:44 pm | खिलजि

म्हात्रे सर आणि मारवा साहेब .. आपभी ना बडे वो हो .. इश्श ,, आम्ही नाही जा .. आता तुम्हाला एक मुखडा ऐकावाच लागणार ..

खिलजि's picture

10 Jul 2019 - 2:46 pm | खिलजि

चांदणे ओढून मी तुझ्यासाठी रात केली

तू मिश्किल हसून , दाबून ठेवल्या भावना अन प्रेमाची बरसात केली

तू लाजत लडिवाळपणे आलीस खरी

नजर रोखलीस जेव्हा इथे थेट ती काळजात गेली

सात पाऊले घेण्याआधी , कैकदा तू भेटली

मधुमीठीने आयुष्याला खरीखुरी सुरुवात झाली