तू"
रेशमी सुगंधात माझ्या होऊनि सुगंध दरवळतोस तू
कुरळ्या बटावर माझ्या होऊनि वारा ऊनाडतोस तू
*
टपो~या डोळ्यात माझ्या,होऊनि काजळ राहतोस तू
गो~या भाळावरी माझ्या होऊन बिंदि विराजतोस तू
*
लाल अधरावरी माझ्या ,होऊनि गीत गुणगुणतोस तू
गळ्यात माझ्या होऊनी मोतियाची माळ सजवतोस तू
*
रंगी बेरंगी चुड्यात माझ्या होऊनि सप्तरंग उतरतोस तू
पायातील पैजणात माझ्या होऊन घुंघरु निनादतोस तू
*
गो~या तनुवर माझ्या होऊनी घननिळ बरसतोस तू
रोम रोमात माझ्या होऊनी निशीगंध बहरतोस तू
*
हळव्या ह्या मनांत माझ्या होऊनी बेधुंद लहरतोस तू
ह्रुदयातिल स्पंदनात माझ्या होऊनी सप्तसुर झंकारतोस तू
आवि्ना
प्रतिक्रिया
1 Jul 2019 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार
इथे बटावर हा शब्द इंग्रजी का मराठी अर्थाने घ्यायचा?
पैजारबुवा,
1 Jul 2019 - 2:53 pm | टवाळ कार्टा
मग "कोवळ्या बटावर" असे लिहावे लागेल =))
1 Jul 2019 - 2:57 pm | जॉनविक्क
3 Jul 2019 - 4:19 pm | खिलजि
अक्कू काका
मी आणि माझी रंगबिरंगी कविता
ती आणि तिच्या बटांचा गुंता
मी तिला बघतो अन
बटांची कविता लिहितो
तीच्या बटा अश्याच झुलत असतात वाऱ्यावर
आणि माझ्या कविता असतात प्रतिसादांच्या माऱ्यावर