घनतमात पसरला ऐसा
कभिन्न काळा देही
आ वासून गगना पाही ...
डोहकाळीमा
डोहकाळिमा
श्रांत क्लांत पांथस्थाला
दो घोट जलाचे देई
आयुष्य मागुनि घेई .....
डोहकाळीमा
डोहकाळिमा
किती प्रश्न चिरंतन साचे
घेऊन उरावर जगणे
निरखत हा तगमगणे...
डोहकाळीमा
डोहकाळीमा
पैलतीर ना माहित
कुठून कैसा दिसतो
फुटता होडी गिळतो ....
डोहकाळीमा
डोहकाळीमा
चिरंतन काजळ काळे
सत्य भयाण कि भास
हा वेटाळी सर्वांस .....
डोहकाळीमा
डोहकाळीमा
©सागरलहरी
प्रतिक्रिया
25 Jun 2019 - 2:07 pm | श्वेता२४
कविता आवडली.
28 Jun 2019 - 1:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात!! खोल आहे.