मिलिंद भिड़े,भिलाई नगर
ज्या वाचकांना कुठल्या ही कारणा मुळे नियमित औषधोपचारा वर पैसे खर्च करावे लागतात त्यांच्या साठीच ही पोस्ट:
जीव वाचवायाच्या साठी प्रत्येक माणूस वाटेल ते करायला तयार असतो। इतर वेळेस पैश्यांवर पालथी मारून बसलेला अति चिक्कू माणूस ही मरण समोर दिसताच पाण्या सारखा पैसा ओततो, हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल ।
एखाद्या डॉक्टर ने लिहिलेली औषधे, दुकान विशेष मध्ये खरेदी करणारे बहुतांश आहेत, तर काही लोक तीच औषधे क्रेडिट वर, कैश डिस्काउंट सकट घ्यायच्या प्रयत्नात नेहमी असतात ।तर काही लोक मार्केट रिसर्च करून औषधे विकत घेतात।
ह्या मार्केट रिसर्चर्स च्या अनुभवाचा / ज्ञानाचा फायदा सगळ्यांनी घ्यावा । हे करायला इंटरनेट वर अनेक औषधि संकेतस्थल आहेत जसे 1 एम जी.कॉम, हेल्थकार्ट प्लस.कॉम, वगैरे । पण ह्या भाऊ गर्दित मला आवडलेले संकेत स्थल www.medguideindia.com हे आहे ।
स्वस्त ब्रांडेड आणि जेनरिक औषधानची येथे किम्मती आणि पैकिंग सह अन्य विस्तृत माहिती मिळते । होम पेज वर खालच्या बाजूला एक सर्च बॉक्स दिसतो, तेथे तुम्हाला डॉक्टर ने सजेस्ट केलेली औषधे एक एक करून पोस्ट करा आणि सर्च है विकल्प निवडा । ह्या नंतर दूसरी विंडो उघडेल जेथे डॉक्टर ने लिहिलेल्या औषधाची विस्तृत माहित दिसते ।ह्यात औषधाची निर्माता कंपनी, औषधाचे घटक, त्यांचे प्रमाण, आणि किम्मत दिसते । ह्याच्याच बाजूला समान घटक आणि मात्रा असलेली औषधे शोधायची लिंक असते ।ह्या वर क्लिक केले असता तिसरी विंडो उघड़ते, ह्या विंडो वर एक यादी दिसते । ही यादी वाचल्यास तुम्हाला कदाचित ज़बरदस्त धक्का ही बसू शकतो कारण इथे फार्मा कंपनीज सर्व सामान्य पेशंट ला कसे मामा बनविते हे स्पष्ट दिसते । समान घटकाचे जे औषध 256 रुपये ला 10 गोळ्या उपलब्ध आहे तेच औषध 25 रूपयाला 10 गोळ्या ही उपलब्ध आहेत ।
आमिर खान प्रस्तुति सत्यमेव जयते च्या एका एपिसोड मध्ये औषधानच्या किम्मतिची ही तफावत कशी सर्व सामान्य व्यक्ति साठी जीवघेणी बनते हे दाखविले होते ।
तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास पारखुन पहावी आणि उपयोगी वाटल्यास वापरावी ।
आपल्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील ।
वर्तनी आणि भाषेच्या चुका निदर्शनास आणल्यास सुधरविन्याचा प्रयत्न नक्की करेनच ।
धन्यवाद
प्रतिक्रिया
19 Jun 2019 - 9:58 am | सुबोध खरे
याच्याशी संलग्न अशा विषयावर मी लिहिलेला लेख
http://www.misalpav.com/node/39828
19 Jun 2019 - 10:05 am | कंजूस
औषधीय खरेदी नव्हे औषध खरेदीत.
-----
अमच्याकडे जिनेरिक औषधांची दुकाने धडाधड उघडत आहेत. मोबाईलची बंद पडत आहेत अमेझॉन, फ्लिपकार्टमुळे.
19 Jun 2019 - 6:45 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
19 Jun 2019 - 6:45 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
19 Jun 2019 - 6:46 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
19 Jun 2019 - 6:58 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
19 Jun 2019 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
ऑनलाईन जेनेरिक औषधे विकणार्यांमध्ये अनेक बनावट कंपन्या आहेत असे वारंवार निदर्शनाला येते व त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अजून पुरेशी विकसित झालेली नाही... तेव्हा अशी खरेदी पूर्ण खात्री करून घेऊनच करावी, असा एक वैधानिक इशारा आवश्यक आहे.
जेनेरिक औषधे सर्वसामान्य औषधांच्या दुकानांतही मिळतात. तेव्हा, खात्रीच्या (व परत जाऊन जाब विचारू शकतो अश्या घराजवळच्या) औषधांच्या दुकानांचा पर्याय, पडताळून पहावा व मगच निर्णय घ्यावा.
@ मिलिंद दि.भिड़े भिलाई : एक प्रेमळ सूचना. मराठीत पूर्णविराम "." असा लिहितात... हिन्दीप्रमाणे "।" असा लिहित नाही.
19 Jun 2019 - 7:01 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
ऑनलाइन औषधान्चे विकल्प ह्या संकेत स्थलावर शोधावे. खरेदी स्थानीय दुकानात करा वा दूसरी कड़े, निर्णय ग्राहकाचा.
धन्यवाद ।
19 Jun 2019 - 7:03 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
औषधाचे विकल्प ऑनलाइन ह्या संकेत स्थलावर शोधावे, आणि जेथुन इच्छा असेल तेथून विकत घ्यावे. धन्यवाद .
19 Jun 2019 - 8:51 pm | राजेंद्र मेहेंदळे
ऑफिसला जाताना दरवाजात उभे राहुन घाईघाईत धागा टाईप केला असावा असे वाटते आहे. र्ह्स्व दिर्घाच्या चुक, ईतर व्याकरण पुर्णपणे फाट्यावर मारले आहे. पण काहीतरी करुन निदान माहिती वाचकांपर्यंत पोचावी अशी ईच्छा दिसते आहे. त्यामुळे सहन केले. अन्यथा....
20 Jun 2019 - 2:53 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 2:58 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 2:58 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 3:49 pm | उपयोजक
ते छत्तीसगडमधे ४० वर्षे नोकरीच्या निमित्याने राहतायत.तिथे हिंदी जास्त.मराठी कमी.त्यामुळे ते हिंदी कळफलक वापरत असावेत. शिवाय इतकी वर्षे तिथे राहिल्याने त्यांच्या मराठीवर हिंदीचा प्रभाव आहे.
21 Jun 2019 - 12:43 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 11:14 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 11:15 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 11:16 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 11:34 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 11:34 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
20 Jun 2019 - 11:35 pm | मिलिंद दि.भिड़े भिलाई
21 Jun 2019 - 12:36 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई
21 Jun 2019 - 12:37 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई
21 Jun 2019 - 12:37 am | मिलिंद दि.भिड़े भिलाई