हे देवी वटसावित्री
मी पण पूजेन तुला
लपून छपून फेरे घेईन
उद्या पौर्णिमेच्या रात्री
माझे सर्व काळे धंदे
अव्याहतपणे चालू देत सदैव
कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या
नाहीतर होतील माझे वांदे
मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी
फार कठीण गं , झेलणं तिला
ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष
पण दुर्दैवाने वटवटसावित्री
वटवट करूनच मारते
माझ्या नावाने फेरे
नेहेमी मागते देवाकडे
मिळू देत याचे सर्व धागेदोरे
इतकी वर्षे लोटली
कळला नाही तुझा महिमा
आज तुला मी शरण जातो बघ
थांबव माझी दैना
सूत घेऊनि, दिवा लावेन
रोवेन मी पण एक फांदी
पानसुपारीची व्यवस्था व्हावी
जेणे होईल माझी चांदी
हे वर्ष जर गेले निर्विकार
वाहेन पुढच्या वर्षी हार
गुप्त राहू देत हरेक धंदे
जरा दाखव तू चमत्कार
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
प्रतिक्रिया
16 Jun 2019 - 3:08 am | चामुंडराय
अगदी समयोचित क्विता
हॅप्पी कॉन्ट्रॅक्ट रिन्युवल डे मिपाकर्रस्
16 Jun 2019 - 10:25 am | नाखु
जो दोर्यात गुंतला तो फेर्यात अडकला आणि तंतूने बांधल्या रेशीममिठीसाठी.
आज बापदिवस आणि बापाच्या बॉसचा सण एकाच दिवशी.
आडबाजूच्या वठवृक्ष सोबतीचा नाखु
16 Jun 2019 - 6:14 pm | दुर्गविहारी
छान ! ;-)
बाकी एक फॉरवर्ड टाकतो.
सर्व मैत्रिणींना, भागिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
सात जन्म घरात तुमचीच 'वट' राहो .
17 Jun 2019 - 12:04 pm | खिलजि
अत्रुप्तम प्रतिसादम चौर्यम
आवडम म्हणूनम चौर्यम
सर्वेषाम धन्यवादम
सर्वेषाम धन्यवादम