=======
कुत्र्यांसाठी कपडे आले.
फार काय,
बो, टाय, टीशर्ट घालुन
बड्डे पार्टीसाठी श्वान सजले.
कुत्र्यांसाठी न्हावी आले,
तसेच ॲण्ड्रोईड गेम्स आले.
फार काय;
"जुजबी" प्रियराधनासाठी
पेट्स-पार्क्स आले.
कुत्री कोडी सोडवु लागली
बेरजा वजाबाक्या करू लागली
मालकाला खूश करण्यासाठी
I love you सुद्धा म्हणुन लागली.
फार काय,
सुंदर मालकीणीशी संभोगाचा
आनंद पण लुटु लागली!
एव्हढे सगळे होऊनही
खांब आल्यावर तंगडी
वर होणे थांबले नाही.
फार काय,
कुत्र्याचा माणुस
इतक्यात काही होणे नाही!
- युयुत्सु
प्रतिक्रिया
12 Jun 2019 - 10:05 am | जॉनविक्क
पण माणसाचा कुत्रा मात्र इतक्यात नक्कीच होत असावा.
12 Jun 2019 - 3:50 pm | टवाळ कार्टा
ते जगविख्यात सुभाषित महित नाही का?
all men are dogs =))