शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -३

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
10 Jun 2019 - 7:26 pm

शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे - २ हा धागा लेखात पुरेशा भाषा तज्ञांचे दाखले नमुद केल्या नंतर क्रमांक ३ चा लेख टाकण्याचा प्रसंग इतक्यात माझ्यावर येईल असे माझे मलाही वाटले नव्हते. माझी प्राथमिक अपेक्षा मी नमुद केलेल्या भाषातज्ञांच्या मतांबद्दल काही तरी चर्चा होईल अशी होती, पण तसे काही घडून काही एक लवचिक आणि सर्वसमावेशक वैचारीक दृष्टिकोन विकसित होण्या एवजी -मी मांडलेला एकही मुद्दा न खोडला जाता - प्रत्यक्षात आम्हीच कसे बरोबरचा हेका अधिकच वृद्धींगत झाल्याचे दिसले.

या शुद्धाशुद्धतेने पछाडलेल्या सोवळ्या भाषिक दादागिरीची आक्रमकताच एवढी असते की, - त्यांच्या स्वतःच्या कुटूंब आणि परिचयातल्याही लोकांना एवढी शुद्धता आणि सोवळे झेपणारे असणार नाही याचे त्यांना भान नसतेच - तरीही घरचा दारचा भाषिक शुद्धता न झेपणारा बहुसांख्यक असो वा भाषिक शुद्धतेच्या दाव्यांच्या मर्यादा व्यवस्थित ठाऊक असलेला तज्ञ असो प्रत्येक जण चक्क दबून असतो. या सोवळेपणाच्या दादागिरीबद्दल मिपाचे पहिले मालक असतील किंवा मी असेन प्रश्नचिन्हे उपस्थितकरून या दादागिरीस भिक न घालणारे आमच्यासारखे कुणि निपजले तरी एकटे पडतो.

मी खरेतर क्रमांक २ च्या लेखास आलेल्या प्रतिसादांना उत्तरेही दिली नाहीत कारण त्यांचा तार्कीक परामर्ष मागच्या माझ्या मांडणीतून घेऊन झाला होता त्यामुळे त्याचा पुर्नउल्लेखाचा मोह मी तेवढ्यापुरता तरी टाळला. पण दुसर्‍या एका धाग्यावरील म्हणजे घडलंय असं आज... एका प्रतिसादाने मला चक्क अचंबित केले.

किमान एक मिपाकर माझ्यावर टिका करतात की मी लिहिण्यास सुरू केले की थांबतच नाही, पण एकतर शुद्धाशुद्धतेने पछाडलेल्या सोवळ्या भाषिक दादागिरी करणार्‍या आक्रमकांची आणि आक्रमणांची संख्या कुठे आणि मी तात्या अशी अधून मधून कोट्यावधीतली एखादी मंडळी कुठे. तर काय सांगत होतो घडलंय असं आज... या धाग्यातील प्रतिसादातून झालेले शुद्धतेच्या आक्रमणाचे क्लासिक उदाहरण . घडलंय असं आज... स्फुटाचा थोडक्यात विषय साधनांची अनुपलब्धता असलेल्यांची साक्षर जगाशी जोडून घेण्याची सुप्त क्षमता . ज्यांचा संघर्षच मुळी साक्षरतेशी जोडून घेण्याच्या अती प्राथमिक पायरीवर आहे त्यांच्याकडून त्यांना माहितही नसलेल्या संस्कृत नामक कोणत्या भाषेचे अत्यंत अर्बिट्ररी प्रभाव असलेले तथाकथीत व्याकरण आणि शुद्धलेखन अपेक्षाही करणे शक्य नसावे. त्यांना साक्षरता संधी मिळून मिपासारखे व्यासपीठ उपलब्धच होऊ नये का? असा प्रश्न कुणाच्या मनात येण्याचे राहोच. आमचे एक प्रतिसादक मिपा मित्र घडलंय असं आज... च्या लेखक महोदयांच्या शुद्धलेखनावर एवढे भाळतात की त्यांना म्हणतात " अधूनमधून मिपावर लिहीत जा,नाहीतर इथे सध्या शुद्धलेखनाचा मुडदा पाडून मिळेल व छुप्या संपादकाची आपली आवड हेच कार्यक्रम जोमात सुरू आहेत" केवढा आक्रमक व्हिक्टीमहूड क्लेम आहे! म्हणजे लेखक संधी उपलब्ध नसलेल्या वंचितांची चर्चा करतोय त्या वंचितांनीही व्यक्त होण्या आधी शुद्धलेखन नामक भ्रामक जंजाळाची परिक्षा आधी पार पाडली पाहीजे नाहीतर ते शुद्धलेखनाचा मुडदा पाडल्याच्या घोर गुन्ह्याचे अपराधी असणार आहेत!

अजून एका मिपा धाग्यावर शुद्धलेखना बद्दलचे घोर अपराध करणार्‍यांच्या अभिव्यक्तीवर कशा कशा पद्धतीने अंकुश घालता येतील याची सोवळ्या आक्रमकांनी अधिकच आक्रमकतेने चर्चा चालवली आहे. मला शेवटी प्रश्न पडला की शेवटी एवढे तथाकथित शुद्धलेखनासाठीचे दुसर्‍यांच्या लहान सहान शुद्धलेखन त्रुटींचे सातत्यपुर्वक आणि आक्रमक छिद्रान्व्हेषण करण्याचे ऑब्सेशन मनुष्य प्रवृत्तीतून शेवटी येते कोठून . जगाच्या पाठीवर असे पछाडलेपण असलेली मराठी हि एकमेव भाषा आहे का ? आणि या सोवळ्यांच्या पछाडलेपणावर प्रश्नचिन्हे उपस्थित करणारे महाभाग केवळ तात्या आणि त्यांच्या नंतर मी एवढेच आहोत की काय ?? शेवटी मी गूगलचा आसरा घेऊन याचा छडा लावण्याचे ठरवले.

जरासे गुगलल्या नंतर Reddit, why the obsession with spelling and grammar? असा प्रश्न विचारणार्याने पुढे I've never seen a group of people so intent on policing this. To me, if someone spells a word incorrectly, I still understand the point coming across. Anyone here on Reddit who screws up spelling or grammar is ridiculed, just curious as to the reasoning behind this. किंवा क्वोरावर Why are some people so obsessed with proper spellings/right use of words/proper grammar? Can't we just take it easy and try to feel/understand what the writer wants to convey overall? अशी पृच्छा कोण्या माझ्या सारख्या समविचारी सद्गृहस्थानीं केली तर त्यालाही माझ्या प्रमाणेच त्याच्या धाग्यावरही प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर ना देताच शुद्धाशुद्धतेने पछाडलेल्या सोवळ्या भाषिक दादागिरी करणाऱ्या आक्रमकांनी जुनेच आक्रमक उपदेश पुढे चालू ठेवलेले दिसले.

म्हणून गुगल शोधातील इतर पानांची माहिती घेतली तर inquisitr.comवर मिशिगन विद्यापीठाचया रॉबिन क्वीन आणि ज्युली बोलांड यांच्या संशोधनाची माहिती मिळाली .

inquisitr.com वरील Chrissie Williams यांचा हा लेख म्हणतो 'study suggests what we’ve long suspected all along about the people who obsessively correct others’ grammar on social media platforms. The research found they aren’t as nice as the rest of us.'

रॉबिन क्वीन आणि ज्युली बोलांड या द्वयांच्या निष्कर्षानुसार सोशल मीडियावर बसून शुद्धलेखन चुका काढता बसणारी मंडळी सहसा व्यक्तिगत आयुष्यातील इंट्रोव्हर्ट मंडळी असतात. त्यांचे हे मत मला पूर्णतः:पटले नाही पण त्यांचा खालील निकष विचार करण्यास लावणारा आहे

“This ideology of standardness and correctness — seeing everything that is not standard as deviant — is constantly confronting [the] linguistic reality which is of a lot of [language] diversity, so I would imagine that personality traits would correlate with language attitudes. Impressionistically, I could imagine that a more fastidious personality type would be inclined to have a more judgmental view of deviance from perceived linguistic norms.”

हा प्रामाण्य आणि अचुकता वाद - जे त्यांचे प्रामाण्य स्विकारता नाही त्यात अट्टाहासाने विकृतताच बघणे - हे भाषिक वैविध्याच्या भाषिक वास्तवाशी सातत्याने विरोधाभासी असे आहे. या भाषिक दादागिरीच्या वृत्तीमागे व्यक्तिगत गुणधर्म कारणीभूत असण्याचा कयास आहे. सायकॉलॉजिकल केरेक्टरस्टिक आणि भाषिक अचूकता विषयक दृष्टिकोन सहसंबंधांच्या अभ्यासाचे हे क्षेत्र अद्याप तसे नवे आहे.

रॉबिन क्वीन आणि ज्युली बोलांड पुढे म्हणतात लेखक किंवा संपादक मंडळी शुद्धता छिद्रान्वेषण पछाडलेपणात पुढे असतील तर तसे नसून दैनिक आयुष्यात मित्रमंडळी नसलेली आत्ममग्न मंडळी शुद्धलेखन चुका काढण्यासाठी पछाडलेली असतात. अशाच स्वरूपाचा निष्कर्ष purplecar.net/ वरील Christine Cavalier काढताना दिसतात त्यांच्या मते सुरक्षित आणि नम्र स्वभावाच्या व्यक्ती हकनाक दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या शुद्धलेखन चुका काढत बसत नाहीत. त्यांच्या मते मतितार्थ समजणे शक्य असल्यास बहुतेक श्रोते चिल्लर चाल्लर चुका काढत ना बसता दुर्लक्ष करतात . पण दुर्दैवाने असे बहुतेक दुर्लक्ष करणारे श्रोते संवाद साधण्यापूर्वीच पछाडलेले अर्धहळकुंडं-व्याकरणाबाज आपण प्रकाशित करायचे बटन क्लिक करतो त्याहीपेक्षा अधिक वेगाने शुद्धलेखन चुका शोधण्यासाठी झडप घालतात . तुम्हाला या मंडळीत अहंगंड असण्याची शक्यता वाटत असेल तर ती बरोबर आहे. असह्य आढयताखोर स्वघोषित व्याकरण- सुभेदारीस आपण सामोरे जात असतो. Christine Cavalier च्या मते हि सुभेदार मंडळी असुरक्षित आणि रागात असतात त्यांना त्यांच्या सारख्याच्या साहचर्याची मोठी गरज असते . तुमच्या सार्वजनिक पणे चुका काढून ते इतर अर्धहळकुंडं -व्याकरण सुभेदारांना हाक पोहोचतंय असे पाहतात म्हणजे त्यांना सोबतीने द्वेष करणारी मैत्री घट्ट करता येते .

हि मंडळी अगदीच आत्ममग्न असतात असा निष्कर्ष चुकीच्य दिशेने ताणला जातोय असे मलाही वाटते पण या मंडळींच्या स्वभावात काही वेगळे असण्याची शक्यता असावी असे मला वाटते. माझ्या मते यातील बर्‍याच व्यक्तींना दिलेल्या विषयावरचे मत पटलेले नसते आणि आपल्या विचारांशी अथवा हितसंबंधांशी प्रतिस्पर्धी मतात चुका नाही काढता आली तर जसे बरेच लोक व्यक्तिगत टीकेवर उतरतात तसे त्यात वरपांगी सभ्यतेचा बुरखा पांघरून शुद्धलेखन चुका काढून आपल्या कंपूला सूचित केले जाते. मग सगळा कंपू मिळून या चालीस अद्याप न सरावलेल्या लेखकांचा फडशा पाडतो. यातील बहुतांशाना हे लक्षात येत नसते कि हाही एक व्यक्तिगत टिकेचाच प्रकार आहे ज्यात आपल्या व्याकरण विषयक कथित अधिक माहितीचा उपयोग समोरच्या लेखकास विषय बाह्य -तथाकथित शुद्धलेखन कारणाने डिस्क्रेडीट करण्यासाठी केला जातो.

दुसऱ्या बाजूस आपल्याला जमणारे परफेक्शन इतरांवर लादण्याचा मोठाच अट्टाहास करणारी हि मंडळी व्यक्तिगत जीवनात सूक्ष्म व्यवस्थापक म्हणजे मायक्रो मॅनेजर असावीत असा माझा व्यक्तिगत कयास आहे. सूक्ष्म व्यवस्थापक म्हणजे मायक्रो मॅनेजर परफेक्शनची अपेक्षा हि मंडळी त्यांच्या संपर्कांत आलेल्या प्रत्येकाकडून प्रत्येक पावलागणिक अतिसूक्ष्मतेने करता असतात .

नुसती परफेक्शनची अपेक्षा आणि सूक्ष्म व्यवस्थापक म्हणजे मायक्रो मॅनेजर कडून होणारी अचूकतेची अपेक्षा यातील फरक म्हणजे, १) दुसर्‍याच्या चुका दाखवण्याची आणीबाणीचा प्रसंग नसतानाही आणीबाणीची परिस्थिती असल्यागत संयमरहीत तातडी. २) चूक शोधून सार्वजनिक रित्या हिणवण्याचे मानसिक सुख वारंवार अनुभवण्याचा सातत्यपूर्वक प्रयत्न करणे. बेसिकली आपल्याला जमते त्या क्षेत्रात अहंगंडाने वागून स्वतः:तील इतर क्षेत्रातील न्यूनगंड झाकून नेण्याचा प्रयत्न यामागे असण्याची दाट शक्यता या मागे असावी असे मला वाटते. एकूण या लोकांच्याही वृत्ती बद्दल अधिक अभ्यासाची गरज असावी कारण लोकसंख्येच्या फार मोठ्या वर्गास हे अपराधित्वाची भावना देववतात आणि कमी लेखून त्यांना त्यांच्या लेजिटिमेंट समान संधी नाकारण्यासाठी हा सूक्ष्म छळाचा खेळ खेळाला जातो . ह्यात कितीजण जाणीवपूर्वक सहभागी असतात आणि कितीजण अजाणता जाणीवपूर्वक छळ करणार्याचे चुकून सहाय्यक बनतात हाही अभ्यासाचा विषय नक्कीच असावा.

The idea is that a perfectionist would have difficulty relating to others or accepting their grammar mistakes because, in their mind, their way is the only way. या त्यांचा मार्ग एकमेव मार्ग असल्याच्या सूक्ष्म व्यवस्थापकांच्या अहंगंडात्मक वागण्याशी रॉबिन क्वीन आणि ज्युली बोलांड यांचे हे निरीक्षण मात्र मिळते जुळते वाटते .

क्वोरा नावाच्या वेबसाईटवर What do you call a person who is always correcting your grammar?
व्याकरणाच्या चुका नेहमी काढणार्‍यांना काय म्हणावे असाही प्रश्न विचारल्याचे आणि language bully , Grammar Nazi , grammar police , अशी विशेषणे सुचवली जाताना ह्या मंडळींच्या काही व्यक्ती वैशिष्टयांची चर्चा होताना दिसते .

यातला एक होरा, आम्ही तुम्हाला मदत देण्यासाठी जन्माला आलोय अशा प्रकारची क्लासिक उत्तरे. याबद्द्दल क्वोरा लेखक झेच प्लुन्गा म्हणतात तसे most “grammar Nazis” don’t really want to help. They want to assert their own status, and reinforce their identity as an educated person. या व्याकरणी नाझिनां वस्तूत: मदत देण्यात रस नसतो त्यांना त्यांची उच्चभ्रू सुशिक्षिततेची ओळख बिंबवायची असते, पडद्या आडून आपला सामाजिक रुतबा जमवणे आणि वाढवणे या मागचा छुपा हेतू असतो. कारण प्रमाण भाषा आणि लेखन आत्मसात करणाऱ्याना समाज पुरस्कृत करेल आणि जे त्यास स्वीकारण्यास तयार होणार नाहीत त्यांना मागे टाकता येईल विषम संस्कृतीत आपली हिस्सेदारी वाढवता येईल याची त्यांना कल्पना असते.

प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय असतात तर यातील अनेक उपद्व्यापी आक्रमक मंडळीचे स्वतः:चे शालेय व्याकरण आणि शुद्धलेखन सुद्धा कच्चे असते त्यांना स्वतः:सही ते आठवत नसते . Much of schoolroom grammar is basically nonsense - a rag-bag of dogmas, some of which are based on Latin but irrelevant to English हीच स्थिती मराठी संस्कृत नात्याची नाही का मी माझ्या मागच्या धाग्यात मराठी भाषा तज्ञांचे दाखले सुद्धा दिले आहेत . माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ खाली एका केंब्रीज येथील भाषा विद्वानांचे युट्युब व्याख्यानही जोडतो आहे

Even when schoolroom grammar describes a phenomenon that really does exist in the language, it tends to describe it very simplistically. This means that people don’t have any real understanding of what’s going on, which leads to overgeneralisations and hypercorrections of the simplistic “rule”. शालेय व्याकरणात फारच सोपेकरण केलेले असते याचा अर्थ शालेय व्याकरणावर आधारित चुका काढणाऱ्या मंडळींना काय बरोबर आहे याचे सखोल ज्ञान असतेच असे नाही. त्यातून अति सामान्यीकरण आणि अति चुकीचेही छिद्रान्वेषण होत राहाते.

People misunderstand what grammar actually is. या लोकांची व्याकरणाच्या भूमिकेबद्दल गल्लत होता असते . It’s not a set of iron laws handed down through the ages. व्याकरणाचे नियम काही ईश्वराप्रमाणे आदी अंत बदल ना होणारे सनातन नव्हेत It’s a vast rule-based system that you learn and apply almost entirely unconsciously, भाषिक व्यवहारात व्याकरणाचा महापसारा जवळपास अचेतन स्वरूपात आकार घेत असतो and that is in constant flux in both space and time.आणि स्थळ काळाच्या ओघात तो सतत बदलत असतो Linguistics is a science that tries to describe it and account for its features. व्याकरण हे शास्त्र भाषेच्या या विकासाचे विश्लेषण मात्र असते

Much of English grammar is still not well understood by linguists, it’s debated and contested and the subject of intensive research भाषाशास्त्रज्ञानाही व्याकरणातील सर्व बाबींचे आकलन झालेले नसते त्याबद्दल व्याकरणशास्त्री भाषाततद्न्य सातत्याने चर्चा विवाद करत असतात This misunderstanding leads people to assume that any usage different from the standard, prestige grammar is an error, like a typo. If they stopped and thought about it, it would be obvious that this is not the case. ज्याची अंतिमताच निश्चित नाही त्यास अंतिम मानून स्व-घोषित सोवळे-धारी इतरांच्या शुद्धता तपासण्याच्या आणि त्यांची अवहेलना करण्याच्या मोहिमेवर निघालेले असतात.

This misunderstanding in turn leads people to treat grammar as a moral issue आणि या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले स्वघोषित भाषिक-दादा त्यांची शुद्धीकरण मोहीम नैतिक विषय असल्याचा आभास जनतेस घडवून समाजात शुद्धलेखनाची नैतिक दादागिरी जमल्यास सुभेदारी गाजवण्याच्या प्रयत्नात असतात . हे ते त्यांच्या स्वतः: विषयीचे गैरसमज अहंगंड घेऊन असे वावरत इतरांना हाणत फिरत असतात . आपण जे काही करतो आणि भाषा आणि व्याकरणाचा उद्देश्य संवाद साधू देण्याचा आहे अडथळा बनण्याचा नाही हे ना कळून घेता हि मंडळी स्वतः:च्या अज्ञानाला ज्ञान म्हणून मिरवून डिनायल विश्वात जगत असतात .

म्हणजे responses are over the top. People acting like they’re better than others all the while criticizing others - holier than thou हा मुख्य उद्देश्य

हि मंडळी आम्ही स्वभावत: वाईट नाही असे सांगण्याचा प्रयत्न करतात पण तुमच्या चुका निदर्शनास आणण्याच्या अनावश्यक घाईचा अरेरावी वागण्याबद्दल , मृदू स्वभावाची मंडळी म्हणत नसली तरी त्रास होत असतो . शिवाय नियमावलीतील असमान अटींमुळे जी करियर्स बरबाद होतात, देशासाठीच्या एकूण योगदानात ऑदरवाईज जी भर पडायची त्यात आडकाठी येते ती वेगळी. केवळ तथाकथित शुद्धलेखन या एका मुद्यावर त्या असोयीस्कर अतार्किक अटींना न स्वीकारू शकलेल्या ९८ टक्के जनतेच्या योगदानाचे सुयोग्य मूल्यमापनच दडपले जात राहाते. अशा या शुद्धाशुद्धतेने पछाडलेल्या सोवळ्या भाषिक-दादांच्या आक्रमक कडून ओलीस धरल्या गेलेल्या सामान्य जनतेने आणि खऱ्या भाषा तज्ञानी शुद्धाशुद्धीस किती आणि केव्हा पर्यंत भीड स्विकारायची याचा विचार केला पाहिजे .

डॉ. स्पिरोस अर्मोस्तीस केम्ब्रिज विद्यापीठातील भाषाविद यांचे ग्रामर नाझी या विषयावरील रोचक व्याख्यान

संदर्भ
https://www.reddit.com/r/AskReddit/comments/co79r/reddit_why_the_obsessi...

https://www.inquisitr.com/3146667/study-reveals-people-obsessed-with-cor...

https://www.quora.com/What-do-you-call-a-person-who-is-always-correcting...

https://slate.com/human-interest/2013/09/language-bullies-pedants-and-gr...

https://people.howstuffworks.com/is-it-rude-to-correct-peoples-grammar.htm

https://www.purplecar.net/2013/09/grammar-bullies/

https://www.noted.co.nz/archive/listener-nz-2013/grammar-pedant-or-langu...

वाङ्मय

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Jun 2019 - 7:30 pm | यशोधरा

तात्पर्य काय आहे?

जालिम लोशन's picture

10 Jun 2019 - 9:49 pm | जालिम लोशन

- १

नावातकायआहे's picture

10 Jun 2019 - 7:41 pm | नावातकायआहे

तात्पर्य आहे काय?

आता नाइलाज झालाय म्हणून बोलतो.
शुद्धलेखनाबद्दल इथे कोणालाच आग्रह धरावा वाटत नाही.

लेखन सुवाच्य असणे आणि लेखनामध्ये "कंटेंट' असणे या अमच्या माफक अपेक्षा आहेत. त्या लेखकांनी पुर्ण कराव्या.

उगीच साप समजुन भुइ धोपटली आणि माझ्यावर कोणी फणा काढलाच नाही म्हणून फुशारकी मारण्यात काय हशील?

कदाचीत आपल्या वाक्य/शब्दाचा योग्य संदर्भ अधोरेखीत व्हायला अथवा तांत्रिकदृष्ट्या अचूक ठरण्यासाठीही असे लिखाण होत असावे परंतु वाचायला फार कंटाळवाणे वाटते.

टवाळ कार्टा's picture

11 Jun 2019 - 4:25 am | टवाळ कार्टा

चुक आणि चूक असा फरक करू शकणे हे मराठी भाषेचे वैभव आहे
झेपत नसेल तर मराठी नका वापरू पण मराठीची लक्तरे नका करू

भंकस बाबा's picture

11 Jun 2019 - 8:42 am | भंकस बाबा

पण इंग्लिशमधे मराठी लिहिणे हा देखिल डोक्याला तापाचा प्रकार आहे.
वरील धागा वाचून हे काही भूमितीतील क्लिष्ट समीकरण आहे असे वाटत राहिले. त्यामुळे प्रतिसाद देणे टाळले. एका अशुद्ध व अगम्य लिहिणाऱ्या धागालेखकाच्या ( डुआयडी असावा ???) समर्थनार्थ सगळ्या मिपाकराना वेठीवर धरणे किती योग्य आहे? मी माझ्या काही वाचनप्रिय मित्रांना मिपा सुचवतो. त्यांनी सदर (सादर) प्रकार वाचल्यावर माझे वाभाडे काढले

गब्रिएल's picture

11 Jun 2019 - 4:51 pm | गब्रिएल

याटिकानी लिवन्याबद्दल लईच चुकचूक केली आनी लेखक खवाळला तर मंडळ आज्याबात जबाब्दार न्हाई.

गब्रिएल's picture

11 Jun 2019 - 12:56 pm | गब्रिएल

ही लेकमाल्ल बगून आमाला "अशुद्दलेकनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे - येक (१) ते आकरा (११)" आशी लेक्माला पाडावी आसा लईच वाटुन र्‍हायला बगा. =)) =)) =))

भंकस बाबा's picture

11 Jun 2019 - 12:58 pm | भंकस बाबा

तुम्ही सादर लेख सगलां वाचला?

ट्रम्प's picture

11 Jun 2019 - 4:35 pm | ट्रम्प

" किमान एक मिपाकर माझ्यावर टिका करतात की मी लिहिण्यास सुरू केले की थांबतच नाही "
अस म्हणनारा कोण हो तो ?
तुम्ही बिंधास्तपणे सांगा .
जो पर्यंत तुम्ही सांगत नाही तो पर्यंत मी तुमचा लेख संपूर्ण वाचनार नाही .

रविकिरण फडके's picture

15 Jun 2019 - 12:56 pm | रविकिरण फडके

माहितगार म्हणतात ते अगदी बरोबरच आहे.

"ती बोलली तू गाणं बोलणार का,
तर मी बोललो नाय,
तर ती बोलली कशाला,
तर मी बोललो मी गावाला जाणाराय"
ह्या (मी प्रत्यक्ष ऐकलेलया) संवादातूनही अर्थबोध होतोच आहे. मग कशाला हवी ती विचारणे, गाणे, सांगणे, म्हणणे, उदगारणे, इ. अनावश्यक शब्दांची अडगळ? फक्त 'बोलणे' पुरेसे आहे की. अगदी ऑरवेलचे १९८४! आम्ही वाचक उदार आहोत. 'दैन्या वस्था' असे लिहिले असले तरी आम्ही समजून घेतो, त्याला खरे तर 'दैन्यावस्था' म्हणायचे आहे. अर्थ एकच, दारिद्रय; पैशाचे काय, भाषेचे काय, विचारांचे काय. आणि शिवाय, कित्ती सोपं ना? नाहीतर ते 'दैन्य' + 'अवस्था' ह्या दोन शब्दांचा संधी म्हणजे 'दैन्यावस्था' असलं व्याकरण! म्हणजे आमच्या बिचाऱ्या मुलांना फेल करायची, त्यांच्यातल्या टॅलेंटला मारून टाकायची संधीच आयती! (हा 'संधी' शब्द दोन ठिकाणी दोन अर्थाने वापरायचा, लक्षात ठेवायचा, म्हणजे मुलांच्या मनावर केवढा ताण! काहीतरी केलं पाहिजे!) किंवा, 'त्यांनी कॅन्सरलाही मात दिली होती' असे वाक्य मटा (क्रमांक एकचे मराठी दैनिक) छापते, तर आम्हाला समजते, की बुवा ते जे कोणी आहेत त्यांनी कॅन्सरला फाईट दिली आणि ते त्यात जिंकले.

"When you debase language, you debase thought, and the interaction with each other" असे लिहिणारा जॉर्ज ऑरवेल मरुनही ६०-७० वर्षे होऊन गेली. त्याचे कौतुक सांगू नका आम्हाला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2019 - 5:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता, या प्रतिसादाचा खरा मराठी अर्थ कोणाला कळला नाही आणि त्यांनी त्यावर प्रदीर्घ लेखन (प्रतिसाद/लेख) केले, तर आम्हाला सांगू नका ! ;) =))

आनन्दा's picture

18 Jun 2019 - 12:34 am | आनन्दा

तुमी कोन हो
सांगणारे
टीकोजी राव

आमाला असल्या कौतुकाची
गरज नाय
आमचे आमी स्वयं स्फुर्त आहोत
बघून घ्यायला

आयला या शुद्धलेखनाच्या
किती प्रयत्न केला
तरी अशुद्ध लिहिताच येई
नाय ब्वा!

महेश जोगलेकर's picture

18 Jun 2019 - 4:47 am | महेश जोगलेकर

...मी हे वाचलं आणि जरा घाबरलोच खरं तर मी हि "चांगल्या" भाषेचा भोक्ता आहे + वैचारिक लेख आवडतात पण हा लेख फार लांबलेला वाटला जरा आवरत घेता आला असता तर बरं झालं असतं, आणि दुसरं असे/ असं कि मिपा हे सर्वसामान्य लेखक / वाचकांसाठी आहे तर मग एवढी क्लिष्टता का?
आणि एवढे इंग्रजी का हो? "भावना पोचल्याशी मतलब" हे कारण काही पटत नाही ,, जिथे मराठी शब्द आहेत तिथे इंग्रजी कशाला घुसडवायचे ?
एकीकडे क्लिष्ट मराठी हि वापरता आणि एकीकडे सर्रास इंग्रजी चा वापर
डिनायल विश्वात = नकारघंटा / नकाराच्या दुनियेत वावरत असतात
परफेक्शनची अपेक्षा = अचूकतेची अपेक्षा
असो मी काही कोणी "स्वघोषित भाषिक-दादा" नाही साधी अपेक्षा अशी कि उगाचच आपल्याच मातृभाषेचाच नाहक बळी देऊ नये
"रांगेत उभा राहिलो आणि कंटाळा आला" असे बोलता येत असताना आपण लोक का उगाचच " लाईन मध्ये उभे राहिलो बोअर झालो " असे म्हणतो?
जाऊदे थोडे विषयांतर झालं , क्षमा