वळीव

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
9 Jun 2019 - 11:38 pm

समजतो वळवाला पावसाळा,
शहराला गावाचे दुःख ठाव नाही

तहानवावर

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

9 Jun 2019 - 11:53 pm | अभ्या..

हळूहळू पाऊस वाढेल तशा ओळी वाढत जाणारेत का मंबा?
सुरुवात सुखद आहे फक्त ती नियमात बसवून थोड्या एमएमने वाढवा.

महासंग्राम's picture

10 Jun 2019 - 9:03 am | महासंग्राम

शेठ, जमलं तर करेन हि
पण दोनोळीच्या पेक्षा जास्त सुचत नाही आणि ते वृत्त, गण, मात्रा, मिटर त्याच्यापासून तर कित्येक मैल दूर आहे.

खिलजि's picture

10 Jun 2019 - 11:15 am | खिलजि

समजतो वळवाला पावसाळा,

शहराला गावाचे दुःख ठाव नाही

भेगाळलेल्या जमिनी पिंजून शोधतो जीवनकहाणी

सिमेंटच्या जंगलाला मागमूस नाही

स्थलांतरीत पशुपक्षी , झाडेही ती वाळलेली

कर्मयोद्धा जुंपतो लढतो

बाया शोधती मैलदूर पाणी

वळीव येतो घेऊनि सांगावा

लढत राहा असाच तू

दुर्लक्ष करुनि शहरी कांगावा

विजयी भवतु, विजयी भवतु

सिद्धेश्वर विलास पाटणकर

महासंग्राम's picture

10 Jun 2019 - 11:20 am | महासंग्राम

भारीच कि हो

खिलजि's picture

10 Jun 2019 - 11:24 am | खिलजि

धन्यवाद आणि माफी असावी तुमच्या कवितेच्या पुढे हि वाढवण्यात आली त्याबद्दल .. मी असं करणार नव्हतो पण या ओळी फारच सुंदर आणि मनापासून लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे राहवले नाही ..

जॉनविक्क's picture

10 Jun 2019 - 12:16 pm | जॉनविक्क

साधारण दशशब्द कविता नामक एक नवीन साहित्य प्रकार जन्माला घालायचे पोटंशिएल या धाग्यात निश्चितच आहे.