शरद पवारांची महामुलाखत

माईसाहेब कुरसूंदीकर's picture
माईसाहेब कुरसूंदीकर in काथ्याकूट
25 Feb 2018 - 12:44 am
गाभा: 

हल्लीच राज ठाकरे ह्यांनी शरद पवारांची २/२.५ तासाची प्रदीर्घ मुलाखत घेतली. पुण्याच्या बी.एम.सी.सी. जेथे पवारांनी शिक्षण घेतले तेथे ही मुलाखत झाली. मिडियातर्फे ही 'महामुलाखत' म्हणून जाहिरात करण्यात येत होती. प्रश्न गोपनीय आहेत असे रा़ज ठाकरे म्हणाले.पवारांना राजकारणाचा राज्य्,राष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ अनुभव असल्याने काहीतरी वेगळे ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. विशेष करून तो प्रसिद्ध खंजीर, नंतर पुलोद सरकार कोसळणे(म्हणजे इंदिरा गांधींनी वचपा काढला असे तेव्हा बोलले जायचे.),नंतर 'राख फासून हिमालयात जाईन पण कोंग्रेस्मध्ये जाणार नाही' अशी गर्जना,नंतर १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश,१९८८ साली मुख्यमंत्री....९९ साली नविन चूल मांडणे.. पण पदरी निराशा आली.
राज ठाकरे ह्यांनी विचारलेले प्रश्न- एखाद दुसरा अप्वाद सोडला तर मिळमिळीत होते असे ह्यांचे मत. बराच वेळ मोदींवर टिका करण्यात गेला. परदेशी पाहुण्यांना मोदी अहमदबादलाच का नेतात? ह्या प्रश्नाने राज ठाकरे ह्यांना ग्रासले होते. राज ठाकरे निदान मुद्द्याला धरून पवारांच्या राजकारणावर बोलतील ही अपेक्षा फोल ठरली. उलट मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालू करण्यामागे काहीतरी षडयंत्र आहे असा त्यांना सारखा संशय. पवारांनी त्यास दुजोरा देऊन श्रोत्यांना धक्का दिला. शेतकर्यांच्या एवढ्या आत्महत्या का होतात? ह्यावर पवार काहीतरी समजेल असे बोलतील असे वाटले होते. पण 'मी कर्जमाफी केली.. शेतकर्यांच्या
आत्महत्या अमेरिकेत व ईतरत्रही होतात..' हे त्यावर त्यांचे उत्तर.
दांडगा व्यासंग्,अफाट वाचन.. सामाजिक प्रश्नांची जाण.. ही पवारांची ईमेज. पण ह्या मुलाखतीत निराशा पदरी पडली. कदाचित जास्त बोललो तर
रा़ज ठाकरे व श्रोत्यांना काहीच कळणार नाही असे त्यांना वाटले असावे.!!
आरक्षण आर्थिक निकषांवर हवे असेही ते म्हणाले..ही स्वागतार्ह बाब वाटेल. पण आर्थिक निकषांवर आरक्षण देणे हे घटनाबाह्य होऊ शकते(https://www.quora.com/Why-cant-we-give-reservation-on-financial-basis ) हे तर सर्वांना माहित आहे. असो..
मुलाखत येथे आहे- https://www.youtube.com/watch?v=pHVAQNuETrk
मुलाखत ही रा़ज ठाकरे ह्यांचे राजकीय करियर रिलॉन्च करण्यासाठी होती.. असे ह्यांचे मत.

अनुभव,

प्रतिक्रिया

चित्रेचा तारा's picture

25 Feb 2018 - 4:27 am | चित्रेचा तारा

अनिल गोटेंचं प्रतिक्रिया पत्र सुध्दा वाचा. - अनिल गोटे यांचं खुलं पत्र...

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-mla-...

ती मुलाखत पाहिली. करमणूक .
लोकांनी दोघांना ओळखलं आहे.

अहो माई, तुमच्या ह्यांनी पक्ष बदलला की काय?

अर्धवटराव's picture

26 Feb 2018 - 12:53 am | अर्धवटराव

फारच निराश केलं राज आणि साहेबांनी.

एकुलता एक डॉन's picture

26 Feb 2018 - 1:58 am | एकुलता एक डॉन

अहो मग काय त्यांनी शिव्या द्याल पाहिजे होत्या? आठवले ह्यांच्या मुलाखती करमणूक करतात त्यांना बोलवायला पाहिजे होते

एकच वादा ओन्ली दादा's picture

26 Feb 2018 - 10:20 am | एकच वादा ओन्ली दादा

हायला, माई तुम्ही पण धागा काढला का?
खंजिरातून बाहेर पडा. किती दिवस तेच उगाळत बसणार.
आमच्या काकांनी लावलंय सगळ्यांना कामाला. हि चर्चा पूर्ण करायला २०-२५ वर्ष घालवतील. पण हातात कायय कुसाळ घावणार नायय.
कायय नाही नुसता चर्चा करायची. हातून काय होणार नायय या सरकार कडून .नुसती थापे बाजी करायची. अर्रर्रर्र पण त्याला काहीतरी लिमिट असतं.
ते धनगर आरक्षण देणार होता तो सुपीक डोक्याचा भजेंद्र. लंका त्याला सांगतुय तवा आरक्षण देणं थोडे अवघड हाय. पण ते त्यावेळेस त्या भोळ्या महादेवाला बरोबर घेऊन लयच अंड्यावर आली होती. निवडून द्या बघा लगेच आरक्षण मिळवून देतो.
कायय झालं. त्या महादेवला त्याच्या समाजचि लोकं फिरकून पण देईनात त्याच्या झिल्यात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Feb 2018 - 2:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोबर आहे रे दादा पण जाहिरातच अशी केली होती ना.. राज ठाकरेंच्या 'रोखठोक' प्रश्नांना 'मुत्सद्दी' शरद पवार देणार उत्तरे. ह्या मुलाखतीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार.. वगैरे दोघांचेही राजकारण संभ्रमात टा़कणारे आहे असे ह्यांचे मत. पवारानी शिवसेनेला कम्युनल म्हणायचे व ठाकरे घराण्याची माझे उत्तम संबंध असेही म्हणायचे. राज ठाकरेनी वाजपेयींचे/गुजरात्मध्ये जावून मोदींचे कौतुक करायचे व बुलेट ट्रेनमागे गुजराती लोकांचे षडयंत्र आहे असे म्हणायचे.

एकच वादा ओन्ली दादा's picture

26 Feb 2018 - 3:26 pm | एकच वादा ओन्ली दादा

अगं माझे माये हे तुला माहित असून कशाला धागा काढायच्या फंदात पडलीस. काय मिळणार आहे यातून?
एवढ्या वेळात तुझ्या *त्यांना* बदामाचा शिरा खाऊ घातला अस्तास.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Feb 2018 - 3:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे बाबा, शरद पवारांचे राजकारण मूल्याधिष्टीत असते असे म्हंटले जायचे. त्यात नव्या दमाचे रा़ज ठाकरे मुलाखतकार. मुलाखत समजून घेण्यात आम्हालाच काही प्रॉब्लेम तर नाही ना.. म्हणून धागा काढला.

एकच वादा ओन्ली दादा's picture

26 Feb 2018 - 4:01 pm | एकच वादा ओन्ली दादा

अगं माई कशाला माझी एवढी फिरकी घेतेस. तुला मुलाखत समजली नाही ????
अन तू कोणाकडन समजून घेणार होती इथं? चेष्टा कर्ती कि काय दादाची.

रानरेडा's picture

27 Feb 2018 - 6:49 am | रानरेडा

मूल्याधिष्टीत म्हणजे ? पैशाशी सम्बन्धित ? विकले गेलेले ? तुम्हाला काय म्हणायचे आहे ?

एकच वादा ओन्ली दादा's picture

1 Mar 2018 - 4:06 pm | एकच वादा ओन्ली दादा

नावाप्रमाणे बुद्धी चालवू नका.
तुम्ही चिचुक देऊन खरेदी करता कि कायय??
ज्यातलं आपल्याला कळत नाही तिथं माणसानं (रेड्याने) डोकं चालवू नये. असला कारभार खपून घेतला जाणार नाही सांगतु.

करणार काय तुम्ही ?? धमकी देताय का ??

मराठी कथालेखक's picture

26 Feb 2018 - 4:48 pm | मराठी कथालेखक

शरद पवार नास्तिक आहेत असे ऐकून आहे , तसंच त्यांनी त्यांचं नास्तिक असणं लपवलं नाही (अगदी सार्वजनिक जीवनात वावरताना सुद्धा मंदिरात कधी जात नाहीत)
हे खरं आहे का ? तसं असेल तर या एका गोष्टी करिता मी त्यांचा चाहता बनेन :)

श्रीगुरुजी's picture

26 Feb 2018 - 5:09 pm | श्रीगुरुजी

RRLC

पवारांची नास्तिकता त्यांच्या पुरोगामित्वासारखीच बेगडी आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूरला शासकीय महापूजा केली होती आणि डोक्यावर फरटोपी व खांद्यावर शाल असा जामानिमा करून ते इफ्तार पार्ट्यांमध्येही जातात.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2018 - 10:49 pm | प्रकाश घाटपांडे

वैयक्तिक मते व राजकिय सोय भिन्न असतात कि!

manguu@mail.com's picture

27 Feb 2018 - 12:10 am | manguu@mail.com

ती मुख्यमंत्री पदाची परंपरा असेल.

ते नास्तिक आहेत म्हणूनच त्यांच्यापासून पंप्र अथवा राष्ट्रपतीपद हुकत राहीले... बरोब्बर शिक्षा झाली! ;)

आदिजोशी's picture

26 Feb 2018 - 5:53 pm | आदिजोशी

राज आणि काकांमधला संवाद हा दोन डुआयडींनी एकमेकांशी बोलण्यासारखा होता

पैसा's picture

26 Feb 2018 - 10:41 pm | पैसा

=)) =))

विकास's picture

27 Feb 2018 - 6:03 am | विकास

अगदी! =))

ह्यांनी ह्यांच्याशी केलेला संवाद!

नाखु's picture

4 May 2019 - 10:54 pm | नाखु

अदि"मूळ" इथेच आहे,आधी मुलाखतीची मिरची दिली आणी मग थेट पिंजऱ्यात बंदिस्त करून,परवलीचे शब्द शिकवले.

manguu@mail.com's picture

27 Feb 2018 - 7:39 am | manguu@mail.com

दोन्ही बोक्यांच्याकडून लोणी पळवून मांजर परदेशात गायब झाल्यानंतर त्या बोक्यानी केलेला संवाद.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2018 - 10:23 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मांजर ललित्/नीरव मोदी की विजय मल्ल्या रे मंगू ?

नाखु's picture

27 Feb 2018 - 10:35 am | नाखु

उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभाः शान्तिपाठकाः l
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपं अहो ध्वनिः ll

उंटाच्या घरच्या लग्नात गाढवांनी शांतीपाठ म्हटला. आणी दोघेही एकमेकांची प्रशंसा करू लागले, "वा ! काय रूप आहे, वा ! काय आवाज आहे......

मुलाखतीचं सार इतकेच आहे

एकाने स्वत:अपेक्षा वाढवून अपेक्षाभंग केला तर दुसरे सतत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा फक्त जप करीत (आचरण केले नाही) पराकोटीचा जाती द्वेष निर्माण करण्यासाठी च राजकारण करीत राहीले

नित वाचक नाखु

manguu@mail.com's picture

27 Feb 2018 - 3:28 pm | manguu@mail.com

मांजर म्हणजे विजयी मोदी

मा० पवारसाहेबांना २३ मे'साठी आगावू शुभेच्छा.

नाखु's picture

5 May 2019 - 7:49 am | नाखु

शब्द सुरुवातीला न ठेवल्याबद्दल तीव्र निषेध.

चौथा कोनाडा's picture

24 May 2019 - 1:47 pm | चौथा कोनाडा

१) एक:
घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचं मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय : शरद पवार
सातारा : ईव्हीएमचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएमची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटण दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचं मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

२) दोन:
लोकसभा निवडणूक २०१९ निकाला नंतर या जाणत्या राजाचं इव्हीईमबद्द्लचं मत कळलेलं नाहीय !

काय करायचं या जाणत्या राजाचं ?

समीरसूर's picture

24 May 2019 - 2:26 pm | समीरसूर

आता त्यांची कारकीर्द संपलीये; त्यामुळे दुर्लक्ष करा...जाणता राजा!!! जोक आहे हा. :-):-):-)

चौथा कोनाडा's picture

24 May 2019 - 5:43 pm | चौथा कोनाडा

हा ... हा.... बरोबर, अणि कारकिर्द संपताना सुद्धा कसल्या लोणकढी मारताहेत !
अरे जरा, खरं वाटेल अशी तरी मारायची, ट्रोलिंगचे हिरो झाले. त्यांच्या मिम्स नी किती करमणूक झाली !
टप्प्याटप्प्यानं स्वःतबद्दलची विश्वासार्हता कशी कमी करायची हे यांच्या कडूनच शिकायचं !

"माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटण दाबायला सांगितलं."
ईव्हीएम मशिन अशी कुणाला पण वाटप करते की काय इलेक्शन कमिशन? थोडक्यात असे काही तरी झाले असावे. - काही गुजरातचे आणि हैदरबादचे लोक इलेक्शन कमिशन ऑफ इन्डियाच्या ऑफिस मधे गेले आणि म्हणाले आम्हाला इव्हिएम मशिन टेस्ट करायचेय, ते पण आमच्या घरी नेऊन. इलेक्शन कमिशनने तत्त्काळ मशिन हातात सोपवले आणि ते लोक तडक पवार साहेबांकडे ते मशिन टेस्टिंगला घेऊन आले. :-)

जनतेला काय च्यु... समजतात काय हे लोक?

चौथा कोनाडा's picture

24 May 2019 - 5:38 pm | चौथा कोनाडा

:-)

जनतेला काय च्यु... हेच म्हणतो .... आता लोकांनीच त्यांना च्यु... स्~ओ सॉरी .. इतिहास मध्ये जमा करून टाकलंय.
कोणे एके काळी किंचित फ्यान हो तो.

भंकस बाबा's picture

24 May 2019 - 5:43 pm | भंकस बाबा

चला एक वेळ मानले की आमच्या बोबड्या काकाकडे हैदराबाद व गुजरातकडची मंडळी ईवीएम घेऊन गेली होती, पण त्यात घड्याळ कुठून आले. काही माहिती आहे का हैदराबाद व गुजरातला राष्ट्रवादीची कोणती शाखा आहे?
एक मात्र काका खरं बोलले, ते ऐसे की राज ठाकरेनी मारे सभा घेऊन मोदींना मत देऊ नका म्हणून सांगितले पण मत कोणाला द्यायचे हे नाही सांगितले. हायला, तुम्ही पण व्हिडिओ बघण्यापुरतीच राजला मोजले क़ाय?

नाखु's picture

24 May 2019 - 10:55 pm | नाखु

त्यांचं काम गर्दी जमवायचं होते,मत मिळवून द्यायचं नव्हतं.

सुस्पष्ट आणि थेट भेट वाचकांची पत्रेवाला नाखु

चौथा कोनाडा's picture

25 May 2019 - 10:29 pm | चौथा कोनाडा

+१

चौथा कोनाडा's picture

25 May 2019 - 10:38 pm | चौथा कोनाडा

भंकस बाबा,
हैदराबाद व गुजरातकडची मंडळीचे ईव्हीएम ह्यो तर मोट्टा ज्योक होता !
लै हसले सगळे याला ! फुडं चकार शब्द नै त्या विषयी.

अरे, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री देखील होतात ना, नव्हती तुमची जबाबदारी योग्य त्या यंत्रणेला हे कळवायचं आणि गैरप्रकार शोधून काढायचा.
जाता जाता सोडली एक फुसकुली. उगाच लोकांनी "तेल लावलेला पैलवान" ही पदवी दिली नाही !