देवाघरची फुले

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
17 Mar 2009 - 8:08 pm
गाभा: 

लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हंटले जाते आणी ते खरे आहे. निरागस लहान बालके घरात असतात तेव्हा जग विसरुन त्यांच्यात रमण्यात जो आनंद असतो त्याची उपमा दुसर्‍या कशालाही देता येणार नाही. जेव्हा ती आपल्या बोबड्या वाणीने कुतुहल भरलेले प्रश्न विचारतात तेव्हा किती सुंदर वाटतात आणी त्यांच्याशी त्याच वाणीत बोलायला किती छान वाटतं, सगळी दु:ख कशी दुर पळुन जातात. झोपेत जेव्हा खुद्कन हसतात तेव्हा अगदी गोड वाटतात, म्हणे सटवाई आणी जोखाई त्याना हसवितात असे ऐकले आहे. आईवडिलाचे तर उगाचच डोळे भरुन येतात कधी कधी आपल्या पिलांना पाहुन. एक वेगळेच विश्व एक वेगळीच किमया त्या परमेश्वराची.

आजकाल परिस्थिती थोडी विचित्र दिसते आहे. आजकालची लहान मुले अवेळीच मोठी होऊ लागली आहेत आणी निरागस्पणा कुठेतरी थोडासा हरवल्यासारखा वाटतो आहे (सर्व लहान मुलांच्या बाबतीत नाही. उगाच आरडाओरडा नको.) आणी लहान मुलांमधे बंडखोरीची आणी हिंसक भावना बळावल्यासारखी वाटते आहे. आजकालची काही लहान मुले ईतकी हट्टी बनली आहेत की मार देऊन सुद्धा हट्ट सोडत नाहीत. काही मुले ईतकी हिंसक असतात की मनासारखे झाले नाही तर हातात असेल ती वस्तु फेकुन मारायला कमी करत नाहीत, यात बर्‍याच आजी आजोबांचे डोळे जखमी झाले आहेत.
आता मी काही माझे अनुभव सांगतो.

*आमच्या घरी काही पाहुणे आले, त्यांच्याबरोबर एक लहान मुलगाही होता. आल्याबरोबर त्याने घरभर धुमाकुळ घालायला सुरुवात केली, वस्तु पाडल्या, एक फ्लॉवरपॉटसुद्धा फोडला. त्याचे आईवडिल काहीतरी करतील अशी अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही. "अहो तो ना ऐकतच नाही" अशी प्रतिक्रिया आली. ते दोन तास असह्य होते.

*दवाखान्यात एक लहान मुलगा आणी त्याची आजी बसले होते. तो लहान मुलगा रडत होता बिस्किट हवे होते म्हणुन आणी दवाखान्यात बिस्किट कुठुन आणणार असे म्हणुन त्याची आजी त्याला समजावत होती. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या मुलीने तिचे कानातले काढुन त्याला खेळण्यासाठी म्हणुन पुढे केले तर त्या (८ वर्षाच्या) मुलाने "मी काय बायल्या आहे का?" असे विचारुन त्या मुलीची बोबडी वळविली.

*ओळखीतल्या एका कुटुंबात के ५वी ६वी तली मुलगी असेल. ती तिच्या मैत्रिणिंना घरी बोलवते आणी तिच्या आईला अक्षर:श मोलकरीण म्हणुन सांगते आणी वागवते. आमच्याकडे खुप पैसा आहे. आम्ही सुट्ट्यांमधे फॉरेन ला पिकनिकला जातो असे सांगते. खुप खोटे बोलते, महागड्या वस्तु खरेदी करण्यास भाग पाडते. आईवडील रागावले तर "मला मारुन टाका असे म्हणते" एक ना अनेक विचित्र गोष्टी.

असे अनेक आणी सर्व खरे अनुभव आहेत, कितीतरी मुले आईला साडी वापरु नको असे सांगतात. पॅरेंट मीटींग साठी कार मधेच या नाहीतर येऊ नका असे म्हणतात. घरातुन पैसे चोरतात. काय म्हणावे या सर्वाला.

ह्यामधली बरिचशी मुले एकतर मार देऊन किवा सायकियाट्रिस्ट चा सल्ला घेऊन बर्‍यापैकी ताळ्यावर आणता येतात पण ही मुले आईवडिलाच्या नाकी नऊ आणतात हे खरे, पण आता महत्त्वाचा मुद्दा असा की ह्या सर्वांचे कारण काय? खर जबाबदार कोण? पालक, समाज की काळ? आणी हे सर्व कसे कमी करता येईल?

गर्भसंस्कार, एकत्र कुटुंबपद्धती आणी यासारख्या अजुन काही गोष्टी मिळुन या बाळगोपाळाना योग्य दिशा दाखवु शकतील का?

आपला,
मराठमोळा.

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

17 Mar 2009 - 8:47 pm | लिखाळ

हा हा .. खरे आहे.. काही मुले एकदम भलतेच काही बोलून जातात :)

वरील पैकी काही मुलांच्या पालकांनाच समज द्यावी असे वाटले. पालक इतरांबद्दल जे बोलतात ते मुले ऐकतात आणि आपली मते बनवतात.
-- लिखाळ.

नितिन थत्ते's picture

17 Mar 2009 - 9:04 pm | नितिन थत्ते

प्रभू सरांना बोलवा
खराटा
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

18 Mar 2009 - 8:57 am | विनायक प्रभू

मी ह्या विषयात अनभिज्ञ आहे बॉ?

रेवती's picture

17 Mar 2009 - 9:13 pm | रेवती

मुलांनी असं वागण्यासाठी घरातील, समाजातील परिस्थिती कारणीभूत असते तसेच त्या व्यक्तीचा (मुलाला/मुलीला व्यक्ती म्हणतीये)असा म्हणून काही स्वभाव असतोच.
आपल्याला वाटतं त्यापेक्षा मुलांना बरच काही कळत असतं असं लक्षात येतं. आई वडील लहान असतानाचे सगळेच (कधीकधी कुठलेच) संदर्भ लागू होत नाहीत.
आपल्याशी सहमत आहे.
मला असं वाटतं की आपल्या वागण्यावर आईबाबांचं लक्ष आहे हे त्या मुलाला/मुलीला चांगलच लक्षात रहायला हवं.
आमच्या मुलाला पळापळी, दंगा करताना भारी मजा येते, त्यासाठी त्याला थोडावेळ परवानगीही आहे. खेळातल्या लुटुपुटीच्या मारामारीलाही अगदीच ना नाही.
पण त्यानं काही महिन्यांपूर्वी लोकांच्या घरी फारच मारामारी केल्यावर लगेच शिक्षा म्हणून त्याला सांगितलं की आता आपण घरी जायचं आणि आम्ही घरी आलो.
त्यावेळच्या त्याच्या रडण्याकडे सरळ दुर्लक्ष केलं. धपाटे धातले नाहीत.
लग्गेच बाकीचे आईवडील त्याची बाजू घेण्यासाठी पुढं आले (लहानच आहे तो , चालायचच्....इ.). त्यांनाही स्पष्ट सांगितलं की त्याची बाजू घेऊ नका म्हणून.
आता त्याला चांगलच समजलय की आपण प्रमाणाबाहेर दंगा केला की लगेच सगळी मजा सोडून घरी जायला लागतं. हळूहळू गाडी रूळावर येइलच.
(कालपरवा लोकांकडे तसा बरा वागला तो.;))

रेवती

प्राजु's picture

17 Mar 2009 - 9:34 pm | प्राजु

काही अंशी आई-वडील तर काही अंशी तो ज्या मित्रमैत्रीणींमध्ये खेळतो त्यांच्यातलं वातावरण कारणीभूत असतं.
श्रीमंत्-गरीब..अजूनतरी लेकाला यातलं काही कळत नाहीये.
परवा बीजे'ज् मध्ये गेलो होतो तेव्हा एका लिमोझाईन कार साठी भरपूर हट्ट केला त्याने. पण पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याला सांगितलं की, तुझे +१० पॉईंट्स झाले की ती लिमोझाईन घेणार तुला. ही पॉईंट सिस्टीम म्हणजे काही चूकीचं केलं -३ आणि चांगलं वागला की +१ अशी आहे. त्यामुळे सध्यातरी लिमोझाईनचं भूत डोक्यावर असल्यामुळे घरात शांतता आहे. ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठमोळा's picture

17 Mar 2009 - 9:35 pm | मराठमोळा

लग्गेच बाकीचे आईवडील त्याची बाजू घेण्यासाठी पुढं आले
हेच, अगदी हेच चुकते काही पालकांचे.. माझ्या एका मित्राच्या मुलाला शाळेत मारामारी मधे डोक्याला जखम झाली. शाळेतुन ऑफिस्मधे फोन आला, माझ्या मित्राने फोनवरच "मार खाउन का आलास? मारुन यायच होतस." असे त्याला खडसावले.. काय बोलणार..
शाळेत सुद्धा लहान मुलाना शिस्त लावायचा प्रयत्न शिक्षकानी केला तर त्यांना सुद्धा दम देणारे महाभाग पालक मी बघितलेत.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 11:23 pm | भाग्यश्री

याबाबतीत मला अनुभव नसल्याने माझ्या आईचे मत सांगते.. तिच्या मते थोडाफार धाक,शिस्त ही असलीच पाहीजे.. पहील्याच चुकीला जेव्हा पालक ओरडतात किंवा ती चूक 'चूक' आहे हे जाणीव करून देतात तेव्हा शक्यतो मुलं तसं परत वागायला जात नाहीत.. पण जाऊदे लहान आहे, काय कळतंय, असंच करणार वगैरेंनी लाडावून ठेवलं जात नाहीए ना हे पाहीले पाहीजे..
पण हे खरंय.. आजकाल बरीच मुलं मॅनेज करण्याच्या पलिकडे असतात.. मुळात शहाण्यासारखे वागायचे, काही सांगितले तर ऐकायचे, हट्टीपणा करायचा नाही हे मुलांच्या अंगवळणी पडले पाहीजे..
थोडाफार दंगा चालतोच! :)

[माझी मजा.. मी तशी लहानपणी तरी फार गुणी बाळ होते.. फक्त काही मोजके प्रसंग सोडले तर..
एकदा मला आठवतंय, मी शेजार्‍यांकडे जाऊन जोरात म्हटले होते.. तुमच्याकडे हापुस आहे??? कित्ती छान , आमच्याकडे आणतच नाहीत !! :| ( घरामधे पेट्या, करंड्या असताना.. )
तसेच अजुन लहानपणची गोष्ट ऐकून आहे मी.. आमच्या आजीच्या का अजोबांच्या गावातले बडे आणि अतिशय खडुस प्रस्थ घरी आले होते, मी वर्षं - दिड वर्षांची असेन.. त्यांनी प्रेमाने येयेये म्हणून हात पुढे केल्यावर मी त्यांना खणखणीत कानाखाली वाजवली होती..ते परत घरी आले नाहीत.. :( अर्थात तेव्हा आईबाबांनी काय सांगितले हे ही माहीत नाही, पण मी परत तसे नाही केले.. :) ]

भडकमकर मास्तर's picture

17 Mar 2009 - 11:53 pm | भडकमकर मास्तर

त्यांनी प्रेमाने येयेये म्हणून हात पुढे केल्यावर मी त्यांना खणखणीत कानाखाली वाजवली होती

@) :S ~X(
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

18 Mar 2009 - 3:40 am | शितल

>>त्यांनी प्रेमाने येयेये म्हणून हात पुढे केल्यावर मी त्यांना खणखणीत कानाखाली वाजवली होती
=))

चतुरंग's picture

18 Mar 2009 - 12:02 am | चतुरंग

खणखणीत कानाखाली वाजवली होती....

अरे बापरे, इतक्या लहानपणापासून तू माणसं खरी कशी आहेत हे ओळखतेस म्हणजे कमालच झाली! :D
(नंतर काही दिवस त्यांची नातवंडं जवळ आली तरी त्यांनाही जवळ घेत नसतील! ;) )

चतुरंग

भाग्यश्री's picture

18 Mar 2009 - 12:16 am | भाग्यश्री

शक्यता आहे ! :)

मृदुला's picture

18 Mar 2009 - 4:29 am | मृदुला

गर्भसंस्कार, एकत्र कुटुंबपद्धती आणी यासारख्या अजुन काही गोष्टी मिळुन या बाळगोपाळाना योग्य दिशा दाखवु शकतील का?

नाही.

पालकांचे प्रशिक्षण घडवल्यास काही शक्य आहे.

मुक्ता २०'s picture

18 Mar 2009 - 7:11 am | मुक्ता २०

पहील्याच चुकीला जेव्हा पालक ओरडतात किंवा ती चूक 'चूक' आहे हे जाणीव करून देतात तेव्हा शक्यतो मुलं तसं परत वागायला जात नाहीत..
_______________________________________________________

एकदम पटलं!! घरात कुणाचा तरी धाक हवाच..!!

मी ३-४ वर्शाची असेन, घरी पाहुणे आले होते, खेळायला कुणीच न्हवतं, म्हणुन सरळ रात्रीचे ९.३० ला बाजुच्या मैत्रिणीकडे गेले. इकडे घरी सगळी शोधा-शोध. काका म्हणाले, मैत्रिणीकडे जाउन पाहुया. आई आली, अगदी प्रेमानी हाक मारली, मी छान उड्या मारत बाहेर आले, आईने जे ओढत आणलं घरी आणि एक कानफटात मारली आणि म्हणाली, "ह्या पुढे न सांगता कुठे गेलिस तर तंगड्या तोडिन."

आज इतकी वर्श झाली पण त्यानंतर कधिहि न संगता कुठेहि गेले नही!

भाग्यश्री's picture

18 Mar 2009 - 8:23 am | भाग्यश्री

असाच किस्सा माझ्याबाबतीतही झाला होता.. चॉकलेटची चांदी बेफिकीरपणे खिडकीतून टाकल्यावर दादाचा अस्सा फटका बसला, की तो आवाज माझ्या अजुनही कानात घुमतो.. तेव्हापासून बाहेरही कचरा टाकण्यासाठी मी पिशवी घेऊन हिंडते कुठेही..

अर्थात हे हल्लीच्या मुलांना चालेल की नाही कल्पना नाही.. अमेरिकेमधे तर फटके, आणि धाक अवघडच आहे!

मराठमोळा's picture

18 Mar 2009 - 9:44 am | मराठमोळा

ह्या सर्व झाल्या तुमच्या आमच्या काळातल्या गोष्टी..
आजकाल च्या मुलांच्या बाबतीत हे खरे आहे का? एकदा मार देऊन किवा दम देऊन ही आजकाल ची मुलं ऐकतात का?

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

मुक्ता २०'s picture

18 Mar 2009 - 10:45 am | मुक्ता २०

एकदा मार देऊन किवा दम देऊन ही आजकाल ची मुलं ऐकतात का?

_______________________________________________________
हो. ऐकतात.

उदा.: माझा भाचा, ५ वर्शांचा. सकाळी अंघोळ झाली कि देवाला नमस्कार करुन घरच्या मोठ्यांना नमस्कार करतो. संध्याकाळी शुभंकरोती पण म्हणतो. (भाचा आहे म्हणुन कौतुक असं नाही, पण तो "आजकालच्या" मुलां मध्ये येतो म्हणुन.) त्याला कोणीही कधीही धाक दाखवुन तसं करायला सांगितलं नाही. पण घरी आई-बाबा, आजोबा सगळ्यांना तसच करतांना पाहतो, म्हणुन तशीच सवय त्यालाही लागली. उत्सुक्ता म्हणुन एकदा म्हणाला, "बाबा, तुम्ही देवाशी रोज काय बोलता?" तेव्हा दादानी त्याला, शुभंकरोती शिकवलं. :)

लहान मुलं मोठ्यांना पाहुनच वागतात आणि आई-वडिल जे संस्कार लावतील मुलं तसच करणार. :)

मराठमोळा's picture

18 Mar 2009 - 11:53 am | मराठमोळा

आजकाल ची सर्व मुले तशी आहेत असे मी म्हंटलेच नाही.. शांत आणी समजुतदार मुले आहेत्च..अशा मुलांचे कौतुकच आहे. हीच मुले देशाचा आणी कुटुंबाचा आदर्श ठरतील हे नक्की..
परंतु काही मुलांमधे जी बंडखोरीची आणी हिंसक भावना बळावत आहे आणी त्याचे वाढलेले प्रमाण आपण बघत आहोत त्यबद्दल ही चर्चा..

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

सँडी's picture

19 Mar 2009 - 7:29 am | सँडी

पण घरी आई-बाबा, आजोबा सगळ्यांना तसच करतांना पाहतो, म्हणुन तशीच सवय त्यालाही लागली.
लहान मुलं मोठ्यांना पाहुनच वागतात आणि आई-वडिल जे संस्कार लावतील मुलं तसच करणार.

हे अगदी १०००% खरे! जे सभोवती दिसतं, जाणवतं, तेच मुलं follow करताना दिसतात.

जागु's picture

18 Mar 2009 - 10:56 am | जागु

हल्ली जे टि.व्ही वर कार्टुन दाखविले जातात ते सुद्ध खुप हिंसक असतात. त्याचाही परीणाम त्यांच्या मनावर होतो. मुलांचे बैठे गेम, मैदानी गेम कडे लक्ष वळवले पाहीजे.

मराठमोळा's picture

18 Mar 2009 - 11:49 am | मराठमोळा

जागुशी सहमत..

हल्ली जे टि.व्ही वर कार्टुन दाखविले जातात ते सुद्ध खुप हिंसक असतात. त्याचाही परीणाम त्यांच्या मनावर होतो. मुलांचे बैठे गेम, मैदानी गेम कडे लक्ष वळवले पाहीजे.

व्हिडिओ गेम, सुद्धा बराच प्रभाव पाडतात लहान मुलावर..

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

लंबूटांग's picture

18 Mar 2009 - 9:56 pm | लंबूटांग

टी. व्ही. वरील मालिका, चित्रपट सुद्धा.

आणि आजकाल न्यूज चॅनेल्ससुद्धा.

तसेच विडीओ आणि कंप्युटर गेम्स.

डिस्क्लेमरः ह्यात कुठेही अमेरिकेतील चांगले आणि भारतामधील वाईट असे दाखवण्याचा हेतू नाही. अमेरिकेतील सगळेच पालक चांगले आणि भारतातील सगळे वाईट असे काहीही मला सांगायचे नाही . केवळ एक चांगले उदाहरण म्हणून लिहीले आहे.

दुर्दैवाने भारतामधे चित्रपटांना आणि मालिकांना वयाप्रमाणे रेटिंग देत नाहीत (असल्यास मला माहित नाही). आमच्या ओळखीच्या एका कुटुंबाने त्यांच्या ५ वर्षाच्या मुलाबरोबर गजिनी चित्रपट पाहिला होता.

मी लहान असताना 'कयामत से कयामत तक' चित्रपट पाहून आल्यावर त्यातील शेवटचा सीन (ज्यात आमिर खान स्वतःच्या पोटात चाकू खुपसून घेतो) बघून शाळेत मस्ती करताना लाकडाची पट्टी घेऊन काहीतरी तसलेच काहीतरी केले होते. भरपूर ओरडा खाल्याचे फक्त आठवते. पण त्यानंतर मात्र आई बाबांनी मला समज येईपर्यंत चित्रपट बघणे अगदीच बंद केले होते. जोपर्यंत पूर्णपणे माहिती नाही की चित्रपट कसा आहे.

माझ्या मावशीकडे दर वीकांताला blockbuster (एक दुकान जेथे भाड्याने DVD मिळतात) मधून चित्रपट आणून बघतात. प्रत्येक वेळी मुलांच्या वयाचा विचार करून जास्तीत जास्त PG-13 rating असलेला चित्रपट आणतात (कारण धाकटा मुलगा वय वर्षे १३). जर दुसरा चित्रपट बघायचा असेल तर शक्यतो मुले घरी नसतील तेव्हा बघतात अथवा त्यांना सांगतात की हा चित्रपट फक्त मोठ्यांसाठी आहे. आणि मुलेही ऐकतात.

एकदाच चुकून त्यांनी हिंदी चित्रपट आणला होता आणि अर्ध्या तासातच बंद करावा लागला.

घरी टी.व्ही वर देखील मुलांचा विचार करूनच मालिका बघितल्या जातात. अथवा मुले त्यांच्या खोलीत/ अभ्यासाच्या खोलीत असतानाच आई वडील ती मालिका बघतात. परंतु आता मला ही मालिका बघायची आहे तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत जा असे कधीही मुलांना सांगितले जात नाही.

कोणताही गेम आणताना त्यावरील रेटिंग बघूनच आणला जातो. ज्यात खूप हिंसकपणा अथवा बेदरकार गाडी चालवणे असेल तर तो गेम आणत नाहीत.

भारतामधे घरात इतक्या खोल्या नसतात हे मान्य आहे पण बहुतांश पालकांनाच त्या रटाळ मालिका/ चित्रपट बघितल्या शिवाय आणि मग मुले सुद्धा नकळत अडकत जातात.

भाग्यश्री's picture

18 Mar 2009 - 10:49 pm | भाग्यश्री

रेटींग असते, आणि मुलं ते मानतात चक्क!
माझ्या भाच्याला असाच कुठलातरी ढुशुम-ढुशुमवाला पिक्चर बघायचा होता, पण तो ८ च वर्षाचा..
मी म्हटलं तू लहान आहेस अजुन.. थोडा मोठा झालास की बघुया आपण.. तर चक्क हसून हो म्हटला! मी त्याच्याकडून हट्टीपणा एक्स्पेक्ट करत होते.. पण झालं उलटंच! :)

फ्रॅक्चर बंड्या's picture

18 Mar 2009 - 2:43 pm | फ्रॅक्चर बंड्या

माझ्या सोसायटी मधला एक मुलगा (इयत्ता नववी) ओर्कुट वर आहे .
तिथे सगळी खोटी माहिती उदा: वय - १८
का ते विचारले तर म्हणतो : मुली friend request approve करत नाहीत म्हणुन :)
वय काय आणि हा करतोय काय ?

लंबूटांग's picture

18 Mar 2009 - 10:08 pm | लंबूटांग

सोसायटीमधील ८ वी मधील मुलगा ऑर्कुट वर आहे. सर्व माहिती खोटी. शाळेतील प्रोजेक्टचे कारण देऊन सायबर कॅफेमधे जाऊन तेथेही खोटे नाव सांगून (आजकाल सायबर कॅफे मधे तुमचे नाव वगैरे लिहावे लागते म्हणे) वाट्टेल त्या साईट बघून आला आहे. ह्याला दुसरे कारण म्हणजे आई वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे घरी हा एकटाच असतो. आई वडील पैसे देतच असतात, त्यांच्या गैरहजेरी बद्दल compensate करायला, त्याचा हिशेब मागितला जात नाही. ६ वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच 'सर्व' प्रकारचे चित्रपट देखील बघून झाले होते. एकदा गुटखा खाताना पाहिले म्हणून आईला सांगितले तर 'काय रे ?' असे हसत हसत माऊलीने विचारले बस्स इतकेच.

फ्रॅक्चर बंड्या's picture

18 Mar 2009 - 2:49 pm | फ्रॅक्चर बंड्या

समोरच्या सदनिकेतली एक दहावीतली मुलगी ..
माझ्या रूममेटला ( final year BE ) प्रपोझ करते म्हण़जे काय ?
कोण शिकवते ह्याना असल्या गोष्टी .. TV च .
अभ्यास सोडुन नको त्या गोष्टी करत असतात ..

विनायक पाचलग's picture

18 Mar 2009 - 10:13 pm | विनायक पाचलग

सध्या मी याच वयात आहे
माझ्या नजरेला आलेले काही अनुभव येथे सांगत आहे
१. नववी दहावीच्या काळात फ्क्त प्रपोजच नाही तर त्याही पुढच्या स्टेजला जाणार्‍या अनेक मुली व मुले मी स्वतः पाहीलेली आहेत
कॉलेजच्या वयात हे ठीक आहे पण ई .८ वीपासुन अशा प्रकरणाना सुरवात होते.
२.या वयात नएक मुले व्यसनाधीन आहेत्,आमच्या शाळेतील एक मुलगा ९ वीत असताना चेन स्मोकींग करत होता.
३.काही शाळात याला प्रोत्साहन दीले जातात कोल्हापुरातीलच एका शाळेत दहावीचा सेंड ऑफ पार्टी कल्चरने होतो म्हणजेच एका लॉनवर मुले आणि मुली यांची ३ ४ तास डान्स पार्टी चालु असते व देखरेखीला कोणीही नसते .असे प्रसंग मुलाना बिघडवतात असे मला वातते दैवयोगाने आम्ही अशा कोणत्याही प्रकारात अडकलेलो नाही
बाकी कालच कोल्हापुरात सर्व नेत चालकांची बैठक घेण्यात आली त्यात मुलाना नेतवर बसु देवु नये असा आदेश पोलीसप्रमुखानी काढला हे सगळे काय दर्शवते
(ह्यावर अवांतर नको मीदेखील मजा करतोच की पण प्रमाणात ह्या गोश्टी खरच विचार करण्याजोग्या आहेत असे मला वातते)

When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2009 - 3:34 am | पिवळा डांबिस

घरात आईवडील आणि शाळेत शिक्षक जसे वागतात त्याचं लहान मुलं अनुकरण करतात. घरात जर मोठी माणसं प्रेमळपणे, मोकळेपणाने, सौजन्याने वागताना लहान मुलं पहात असतील तर ती त्याचंही अनुकरण करतात.
कुणितरी वर म्हटल्याप्रमाणे लहान मुलांनाही स्वतःचा एक स्वभाव असतो, एक विचारशक्ती असते. आपल्याला वाटतं त्यापेक्षा त्यांना खूप जास्त कळत असतं. घरात जर नवराबायकोत धुसफूस (अगदी भांडणे व्हायची गरज नाही तर नुस्त्या कॉमेंटस सुद्धा चालतात!), सासूसुनेतील तणाव, आजोबांची अतिकडक शिस्त या सर्वांतून मुल आपलं आचरण बनवत असतात.....
मुलांना दम देऊन किंवा मारून मुलं सुधारत नाहीत. एकतर ती कोडगी बनतात किंवा त्याच गोष्टी आपल्या नजरेच्या आड करण्याची संधी शोधत बसतात....
मुलांनी जसे वागावे असे पालकांना वाटत असेल तर पालकांनीही त्याप्रमाणे वर्तणूक ठेवली पाहिजे. मुलांना होमवर्क करायला सांगून आपण इतर काही (उदा. टिव्ही बघत बसणे!) याला काही अर्थ नाही. जर सर्टन मालिका मुलांनी बघू नयेत असे वाटत असेल तर मुले झोपेपर्यंत त्या पालकांनीही पाहता कामा नयेत (मालिका रेकॉर्ड करून नंतर उशीरा पाहता येतात). विशेषतः घरातल्या आजी-आजोबांसाठी हे सजेशन!!
मुलांना एखादी गोष्ट कर/ करू नकोस असे फक्त न बजावता ती का कर/ करू नकोस हे समजावून सांगितले (हां, हे कदाचित एकदा, दोनदा, दहादा समाजावून सांगावे लागेल!!:) तर मुलं ऐकतात असा माझा अनुभव आहे. त्यांना तुमच्या अनुभवातही सहभागी व्हायचं असतं तेंव्हा त्यांना योग्य असे अनुभव निवडणं हे पालकांच्या हातात असतं....
आणखी एक म्हणजे मुलांना आपले पालक आपल्या सदैव पाठीशी आहेत ही सुरक्षिततेची भावना वाटणं हे फार महत्वाचं असतं. वरती दुसर्‍यांच्या घरात एका मुलाने खूप दंगामस्ती केल्याचे उदाहरण दिले आहे. मूल आहे ते थोडीफार दंगामस्ती करणार. तेंव्हा लोकांच्या घरी जातांना "बाबारे, मला क्ष वर्षांची मुले आहेत, आणलं तर चालेल का?" या प्रश्नाचे उत्तर जर होकारार्थी आले तरच त्या लोकांकडे जावे. जाण्याआधी त्यांना त्यांच्या मौल्यवान वस्तू (काचेच्या वगैरे!!) उचलून मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावयास सांगावे. त्यातूनही जर मुलाने काही नुकसान केलं तर आपण स्वतः त्या स्नेह्यांची जरूर क्षमा मागावी पण त्या स्नेह्यांना बरे वाटावे म्हणून आपल्या मुलाला दम/ मार देऊ नये. त्यापायी स्नेह तुटला तरी बेहत्तर!! मूल मागे लागला नव्हतं आपल्या की मला तिथे घेऊन चला म्हणून, हो की नाही!:)
सर्वात शेवटचे म्हणजे मुलांना कधीही "मी सांगतोय/ सांगतेय म्हणून तुला हे केलं पाहिजे" असा दम देऊन गोष्टी करायला भाग पाडू नये. त्यातून पालकांना आपण पावरफुल असल्याचं तात्कालिक फीलिंग येत असेल पण मुलं मात्र (मनातल्या मनात) त्याचा धिक्कार करत असतात. ओव्हर द लाँग टर्म, दॅट इज मोअर डेंजरस!!!:)

प्राजु's picture

19 Mar 2009 - 7:49 am | प्राजु

अतिशय सुरेख आहे प्रतिसाद. अगदी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.
तुम्हाला व्य. नि. करेनच.
काही शंका विचारयचा आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्ता २०'s picture

19 Mar 2009 - 8:42 am | मुक्ता २०

मुलांना एखादी गोष्ट कर/ करू नकोस असे फक्त न बजावता ती का कर/ करू नकोस हे समजावून सांगितले (हां, हे कदाचित एकदा, दोनदा, दहादा समाजावून सांगावे लागेल!! तर मुलं ऐकतात असा माझा अनुभव आहे.
_______________________________________________________

काका,
तुमचे विचार अगदी १००% पटले. तुमचा प्रतिसाद फार आवडला. :)

अवांतरः तुमचा प्रतिसाद वाचुन एकदा मनात विचार आला कि तुमचे आणि माझ्या आजोबांचे (ते हयात नाहीत) विचार अगदी सारखे आहेत.

स्वाती२'s picture

19 Mar 2009 - 5:35 pm | स्वाती२

>>मुलांनी जसे वागावे असे पालकांना वाटत असेल तर पालकांनीही त्याप्रमाणे वर्तणूक ठेवली पाहिजे.
काका, तुमचे म्हणणे १००% पटले. तुमचा प्रतिसाद सर्व पालकांसाठी खूप मार्गदर्शक आहे.

माझा मुलाला प्रिस्कुलला शिक्षिका म्हणून एक आजी होती. ती मुलांना चांगले वागल्याबद्दल तिकिट द्यायची. उ.दा. Johny was caught helping Tom/ saying please /sharing his story book वगैरे. आठवड्याच्या शेवटी helpful,caring,polite, hardworking असे लिहीलेले star वाटायची. मुलं स्टार आणि तिकिट मिळवायच्या धडपडीत कधी गुणी बाळं व्हायची त्यांना कळायचही नाही. इतर वर्गात time out chair असायची तर हिच्या वर्गात छान सजवलेली thinking chair. मुल वाईट वागले की रवानगी खुर्चीत ५ मिनिटे विचार करायला, आपण कसे वागलो याचा. हळू हळू मुलं आपणहून चूक कबूल करु लागत. मिस कॅरोल ने मला आणि माझ्या मुलाला खुप काही शिकवलं.

सँडी's picture

20 Mar 2009 - 12:06 pm | सँडी

बच्चों/बच्चीओं के स्वभाव पर उनके आस-पास के माहौल का काफी प्रभाव पड़ता है| इति. आमचा रंगा पानवाला