Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मराठमोळा on Tue, 03/17/2009 - 20:08
  • Log in or register to post comments
  • 15433 views

प्रतिक्रिया

Submitted by लिखाळ on Tue, 03/17/2009 - 20:47

Permalink

हा हा .. खरे

हा हा .. खरे आहे.. काही मुले एकदम भलतेच काही बोलून जातात :) वरील पैकी काही मुलांच्या पालकांनाच समज द्यावी असे वाटले. पालक इतरांबद्दल जे बोलतात ते मुले ऐकतात आणि आपली मते बनवतात. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 03/17/2009 - 21:04

Permalink

प्रभू

प्रभू सरांना बोलवा खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 03/18/2009 - 08:57

In reply to प्रभू by नितिन थत्ते

Permalink

मी

मी ह्या विषयात अनभिज्ञ आहे बॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 03/17/2009 - 21:13

Permalink

मुलांनी

मुलांनी असं वागण्यासाठी घरातील, समाजातील परिस्थिती कारणीभूत असते तसेच त्या व्यक्तीचा (मुलाला/मुलीला व्यक्ती म्हणतीये)असा म्हणून काही स्वभाव असतोच. आपल्याला वाटतं त्यापेक्षा मुलांना बरच काही कळत असतं असं लक्षात येतं. आई वडील लहान असतानाचे सगळेच (कधीकधी कुठलेच) संदर्भ लागू होत नाहीत. आपल्याशी सहमत आहे. मला असं वाटतं की आपल्या वागण्यावर आईबाबांचं लक्ष आहे हे त्या मुलाला/मुलीला चांगलच लक्षात रहायला हवं. आमच्या मुलाला पळापळी, दंगा करताना भारी मजा येते, त्यासाठी त्याला थोडावेळ परवानगीही आहे. खेळातल्या लुटुपुटीच्या मारामारीलाही अगदीच ना नाही. पण त्यानं काही महिन्यांपूर्वी लोकांच्या घरी फारच मारामारी केल्यावर लगेच शिक्षा म्हणून त्याला सांगितलं की आता आपण घरी जायचं आणि आम्ही घरी आलो. त्यावेळच्या त्याच्या रडण्याकडे सरळ दुर्लक्ष केलं. धपाटे धातले नाहीत. लग्गेच बाकीचे आईवडील त्याची बाजू घेण्यासाठी पुढं आले (लहानच आहे तो , चालायचच्....इ.). त्यांनाही स्पष्ट सांगितलं की त्याची बाजू घेऊ नका म्हणून. आता त्याला चांगलच समजलय की आपण प्रमाणाबाहेर दंगा केला की लगेच सगळी मजा सोडून घरी जायला लागतं. हळूहळू गाडी रूळावर येइलच. (कालपरवा लोकांकडे तसा बरा वागला तो.;)) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 03/17/2009 - 21:34

Permalink

खरंय रेवती..

काही अंशी आई-वडील तर काही अंशी तो ज्या मित्रमैत्रीणींमध्ये खेळतो त्यांच्यातलं वातावरण कारणीभूत असतं. श्रीमंत्-गरीब..अजूनतरी लेकाला यातलं काही कळत नाहीये. परवा बीजे'ज् मध्ये गेलो होतो तेव्हा एका लिमोझाईन कार साठी भरपूर हट्ट केला त्याने. पण पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याला सांगितलं की, तुझे +१० पॉईंट्स झाले की ती लिमोझाईन घेणार तुला. ही पॉईंट सिस्टीम म्हणजे काही चूकीचं केलं -३ आणि चांगलं वागला की +१ अशी आहे. त्यामुळे सध्यातरी लिमोझाईनचं भूत डोक्यावर असल्यामुळे घरात शांतता आहे. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Tue, 03/17/2009 - 21:35

Permalink

लग्गेच

लग्गेच बाकीचे आईवडील त्याची बाजू घेण्यासाठी पुढं आले हेच, अगदी हेच चुकते काही पालकांचे.. माझ्या एका मित्राच्या मुलाला शाळेत मारामारी मधे डोक्याला जखम झाली. शाळेतुन ऑफिस्मधे फोन आला, माझ्या मित्राने फोनवरच "मार खाउन का आलास? मारुन यायच होतस." असे त्याला खडसावले.. काय बोलणार.. शाळेत सुद्धा लहान मुलाना शिस्त लावायचा प्रयत्न शिक्षकानी केला तर त्यांना सुद्धा दम देणारे महाभाग पालक मी बघितलेत. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Tue, 03/17/2009 - 23:23

Permalink

याबाबतीत

याबाबतीत मला अनुभव नसल्याने माझ्या आईचे मत सांगते.. तिच्या मते थोडाफार धाक,शिस्त ही असलीच पाहीजे.. पहील्याच चुकीला जेव्हा पालक ओरडतात किंवा ती चूक 'चूक' आहे हे जाणीव करून देतात तेव्हा शक्यतो मुलं तसं परत वागायला जात नाहीत.. पण जाऊदे लहान आहे, काय कळतंय, असंच करणार वगैरेंनी लाडावून ठेवलं जात नाहीए ना हे पाहीले पाहीजे.. पण हे खरंय.. आजकाल बरीच मुलं मॅनेज करण्याच्या पलिकडे असतात.. मुळात शहाण्यासारखे वागायचे, काही सांगितले तर ऐकायचे, हट्टीपणा करायचा नाही हे मुलांच्या अंगवळणी पडले पाहीजे.. थोडाफार दंगा चालतोच! :) [माझी मजा.. मी तशी लहानपणी तरी फार गुणी बाळ होते.. फक्त काही मोजके प्रसंग सोडले तर.. एकदा मला आठवतंय, मी शेजार्‍यांकडे जाऊन जोरात म्हटले होते.. तुमच्याकडे हापुस आहे??? कित्ती छान , आमच्याकडे आणतच नाहीत !! :| ( घरामधे पेट्या, करंड्या असताना.. ) तसेच अजुन लहानपणची गोष्ट ऐकून आहे मी.. आमच्या आजीच्या का अजोबांच्या गावातले बडे आणि अतिशय खडुस प्रस्थ घरी आले होते, मी वर्षं - दिड वर्षांची असेन.. त्यांनी प्रेमाने येयेये म्हणून हात पुढे केल्यावर मी त्यांना खणखणीत कानाखाली वाजवली होती..ते परत घरी आले नाहीत.. :( अर्थात तेव्हा आईबाबांनी काय सांगितले हे ही माहीत नाही, पण मी परत तसे नाही केले.. :) ]
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 03/17/2009 - 23:53

In reply to याबाबतीत by भाग्यश्री

Permalink

त्यांनी

त्यांनी प्रेमाने येयेये म्हणून हात पुढे केल्यावर मी त्यांना खणखणीत कानाखाली वाजवली होती @) :S ~X( ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 03/18/2009 - 03:40

In reply to त्यांनी by भडकमकर मास्तर

Permalink

>>त्यांनी

>>त्यांनी प्रेमाने येयेये म्हणून हात पुढे केल्यावर मी त्यांना खणखणीत कानाखाली वाजवली होती =))
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 03/18/2009 - 00:02

In reply to याबाबतीत by भाग्यश्री

Permalink

हा हा हा!

खणखणीत कानाखाली वाजवली होती.... अरे बापरे, इतक्या लहानपणापासून तू माणसं खरी कशी आहेत हे ओळखतेस म्हणजे कमालच झाली! :D (नंतर काही दिवस त्यांची नातवंडं जवळ आली तरी त्यांनाही जवळ घेत नसतील! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 03/18/2009 - 00:16

In reply to हा हा हा! by चतुरंग

Permalink

शक्यता आहे

शक्यता आहे ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on Wed, 03/18/2009 - 04:29

Permalink

नाही

गर्भसंस्कार, एकत्र कुटुंबपद्धती आणी यासारख्या अजुन काही गोष्टी मिळुन या बाळगोपाळाना योग्य दिशा दाखवु शकतील का?
नाही. पालकांचे प्रशिक्षण घडवल्यास काही शक्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ता २० on Wed, 03/18/2009 - 07:11

Permalink

पहील्याच

पहील्याच चुकीला जेव्हा पालक ओरडतात किंवा ती चूक 'चूक' आहे हे जाणीव करून देतात तेव्हा शक्यतो मुलं तसं परत वागायला जात नाहीत.. _______________________________________________________ एकदम पटलं!! घरात कुणाचा तरी धाक हवाच..!! मी ३-४ वर्शाची असेन, घरी पाहुणे आले होते, खेळायला कुणीच न्हवतं, म्हणुन सरळ रात्रीचे ९.३० ला बाजुच्या मैत्रिणीकडे गेले. इकडे घरी सगळी शोधा-शोध. काका म्हणाले, मैत्रिणीकडे जाउन पाहुया. आई आली, अगदी प्रेमानी हाक मारली, मी छान उड्या मारत बाहेर आले, आईने जे ओढत आणलं घरी आणि एक कानफटात मारली आणि म्हणाली, "ह्या पुढे न सांगता कुठे गेलिस तर तंगड्या तोडिन." आज इतकी वर्श झाली पण त्यानंतर कधिहि न संगता कुठेहि गेले नही!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 03/18/2009 - 08:23

In reply to पहील्याच by मुक्ता २०

Permalink

असाच

असाच किस्सा माझ्याबाबतीतही झाला होता.. चॉकलेटची चांदी बेफिकीरपणे खिडकीतून टाकल्यावर दादाचा अस्सा फटका बसला, की तो आवाज माझ्या अजुनही कानात घुमतो.. तेव्हापासून बाहेरही कचरा टाकण्यासाठी मी पिशवी घेऊन हिंडते कुठेही.. अर्थात हे हल्लीच्या मुलांना चालेल की नाही कल्पना नाही.. अमेरिकेमधे तर फटके, आणि धाक अवघडच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Wed, 03/18/2009 - 09:44

In reply to असाच by भाग्यश्री

Permalink

अहो

ह्या सर्व झाल्या तुमच्या आमच्या काळातल्या गोष्टी.. आजकाल च्या मुलांच्या बाबतीत हे खरे आहे का? एकदा मार देऊन किवा दम देऊन ही आजकाल ची मुलं ऐकतात का? आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ता २० on Wed, 03/18/2009 - 10:45

In reply to अहो by मराठमोळा

Permalink

ह्म्म्म..

एकदा मार देऊन किवा दम देऊन ही आजकाल ची मुलं ऐकतात का? _______________________________________________________ हो. ऐकतात. उदा.: माझा भाचा, ५ वर्शांचा. सकाळी अंघोळ झाली कि देवाला नमस्कार करुन घरच्या मोठ्यांना नमस्कार करतो. संध्याकाळी शुभंकरोती पण म्हणतो. (भाचा आहे म्हणुन कौतुक असं नाही, पण तो "आजकालच्या" मुलां मध्ये येतो म्हणुन.) त्याला कोणीही कधीही धाक दाखवुन तसं करायला सांगितलं नाही. पण घरी आई-बाबा, आजोबा सगळ्यांना तसच करतांना पाहतो, म्हणुन तशीच सवय त्यालाही लागली. उत्सुक्ता म्हणुन एकदा म्हणाला, "बाबा, तुम्ही देवाशी रोज काय बोलता?" तेव्हा दादानी त्याला, शुभंकरोती शिकवलं. :) लहान मुलं मोठ्यांना पाहुनच वागतात आणि आई-वडिल जे संस्कार लावतील मुलं तसच करणार. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Wed, 03/18/2009 - 11:53

In reply to ह्म्म्म.. by मुक्ता २०

Permalink

मुक्ता ताई

आजकाल ची सर्व मुले तशी आहेत असे मी म्हंटलेच नाही.. शांत आणी समजुतदार मुले आहेत्च..अशा मुलांचे कौतुकच आहे. हीच मुले देशाचा आणी कुटुंबाचा आदर्श ठरतील हे नक्की.. परंतु काही मुलांमधे जी बंडखोरीची आणी हिंसक भावना बळावत आहे आणी त्याचे वाढलेले प्रमाण आपण बघत आहोत त्यबद्दल ही चर्चा.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on गुरुवार, 03/19/2009 - 07:29

In reply to ह्म्म्म.. by मुक्ता २०

Permalink

पण घरी

पण घरी आई-बाबा, आजोबा सगळ्यांना तसच करतांना पाहतो, म्हणुन तशीच सवय त्यालाही लागली. लहान मुलं मोठ्यांना पाहुनच वागतात आणि आई-वडिल जे संस्कार लावतील मुलं तसच करणार. हे अगदी १०००% खरे! जे सभोवती दिसतं, जाणवतं, तेच मुलं follow करताना दिसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 03/18/2009 - 10:56

Permalink

कार्टुन

हल्ली जे टि.व्ही वर कार्टुन दाखविले जातात ते सुद्ध खुप हिंसक असतात. त्याचाही परीणाम त्यांच्या मनावर होतो. मुलांचे बैठे गेम, मैदानी गेम कडे लक्ष वळवले पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Wed, 03/18/2009 - 11:49

In reply to कार्टुन by जागु

Permalink

सहमत

जागुशी सहमत.. हल्ली जे टि.व्ही वर कार्टुन दाखविले जातात ते सुद्ध खुप हिंसक असतात. त्याचाही परीणाम त्यांच्या मनावर होतो. मुलांचे बैठे गेम, मैदानी गेम कडे लक्ष वळवले पाहीजे. व्हिडिओ गेम, सुद्धा बराच प्रभाव पाडतात लहान मुलावर.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Wed, 03/18/2009 - 21:56

In reply to कार्टुन by जागु

Permalink

सहमत

टी. व्ही. वरील मालिका, चित्रपट सुद्धा. आणि आजकाल न्यूज चॅनेल्ससुद्धा. तसेच विडीओ आणि कंप्युटर गेम्स. डिस्क्लेमरः ह्यात कुठेही अमेरिकेतील चांगले आणि भारतामधील वाईट असे दाखवण्याचा हेतू नाही. अमेरिकेतील सगळेच पालक चांगले आणि भारतातील सगळे वाईट असे काहीही मला सांगायचे नाही . केवळ एक चांगले उदाहरण म्हणून लिहीले आहे. दुर्दैवाने भारतामधे चित्रपटांना आणि मालिकांना वयाप्रमाणे रेटिंग देत नाहीत (असल्यास मला माहित नाही). आमच्या ओळखीच्या एका कुटुंबाने त्यांच्या ५ वर्षाच्या मुलाबरोबर गजिनी चित्रपट पाहिला होता. मी लहान असताना 'कयामत से कयामत तक' चित्रपट पाहून आल्यावर त्यातील शेवटचा सीन (ज्यात आमिर खान स्वतःच्या पोटात चाकू खुपसून घेतो) बघून शाळेत मस्ती करताना लाकडाची पट्टी घेऊन काहीतरी तसलेच काहीतरी केले होते. भरपूर ओरडा खाल्याचे फक्त आठवते. पण त्यानंतर मात्र आई बाबांनी मला समज येईपर्यंत चित्रपट बघणे अगदीच बंद केले होते. जोपर्यंत पूर्णपणे माहिती नाही की चित्रपट कसा आहे. माझ्या मावशीकडे दर वीकांताला blockbuster (एक दुकान जेथे भाड्याने DVD मिळतात) मधून चित्रपट आणून बघतात. प्रत्येक वेळी मुलांच्या वयाचा विचार करून जास्तीत जास्त PG-13 rating असलेला चित्रपट आणतात (कारण धाकटा मुलगा वय वर्षे १३). जर दुसरा चित्रपट बघायचा असेल तर शक्यतो मुले घरी नसतील तेव्हा बघतात अथवा त्यांना सांगतात की हा चित्रपट फक्त मोठ्यांसाठी आहे. आणि मुलेही ऐकतात. एकदाच चुकून त्यांनी हिंदी चित्रपट आणला होता आणि अर्ध्या तासातच बंद करावा लागला. घरी टी.व्ही वर देखील मुलांचा विचार करूनच मालिका बघितल्या जातात. अथवा मुले त्यांच्या खोलीत/ अभ्यासाच्या खोलीत असतानाच आई वडील ती मालिका बघतात. परंतु आता मला ही मालिका बघायची आहे तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत जा असे कधीही मुलांना सांगितले जात नाही. कोणताही गेम आणताना त्यावरील रेटिंग बघूनच आणला जातो. ज्यात खूप हिंसकपणा अथवा बेदरकार गाडी चालवणे असेल तर तो गेम आणत नाहीत. भारतामधे घरात इतक्या खोल्या नसतात हे मान्य आहे पण बहुतांश पालकांनाच त्या रटाळ मालिका/ चित्रपट बघितल्या शिवाय आणि मग मुले सुद्धा नकळत अडकत जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Wed, 03/18/2009 - 22:49

In reply to सहमत by लंबूटांग

Permalink

रेटींग

रेटींग असते, आणि मुलं ते मानतात चक्क! माझ्या भाच्याला असाच कुठलातरी ढुशुम-ढुशुमवाला पिक्चर बघायचा होता, पण तो ८ च वर्षाचा.. मी म्हटलं तू लहान आहेस अजुन.. थोडा मोठा झालास की बघुया आपण.. तर चक्क हसून हो म्हटला! मी त्याच्याकडून हट्टीपणा एक्स्पेक्ट करत होते.. पण झालं उलटंच! :)
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Wed, 03/18/2009 - 14:43

Permalink

माझ्या सोसायटी मधला एक मुलगा

माझ्या सोसायटी मधला एक मुलगा (इयत्ता नववी) ओर्कुट वर आहे . तिथे सगळी खोटी माहिती उदा: वय - १८ का ते विचारले तर म्हणतो : मुली friend request approve करत नाहीत म्हणुन :) वय काय आणि हा करतोय काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Wed, 03/18/2009 - 22:08

In reply to माझ्या सोसायटी मधला एक मुलगा by फ्रॅक्चर बंड्या

Permalink

माझ्याही.

सोसायटीमधील ८ वी मधील मुलगा ऑर्कुट वर आहे. सर्व माहिती खोटी. शाळेतील प्रोजेक्टचे कारण देऊन सायबर कॅफेमधे जाऊन तेथेही खोटे नाव सांगून (आजकाल सायबर कॅफे मधे तुमचे नाव वगैरे लिहावे लागते म्हणे) वाट्टेल त्या साईट बघून आला आहे. ह्याला दुसरे कारण म्हणजे आई वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे घरी हा एकटाच असतो. आई वडील पैसे देतच असतात, त्यांच्या गैरहजेरी बद्दल compensate करायला, त्याचा हिशेब मागितला जात नाही. ६ वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच 'सर्व' प्रकारचे चित्रपट देखील बघून झाले होते. एकदा गुटखा खाताना पाहिले म्हणून आईला सांगितले तर 'काय रे ?' असे हसत हसत माऊलीने विचारले बस्स इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Wed, 03/18/2009 - 14:49

Permalink

अजुन एक

समोरच्या सदनिकेतली एक दहावीतली मुलगी .. माझ्या रूममेटला ( final year BE ) प्रपोझ करते म्हण़जे काय ? कोण शिकवते ह्याना असल्या गोष्टी .. TV च . अभ्यास सोडुन नको त्या गोष्टी करत असतात ..
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Wed, 03/18/2009 - 22:13

In reply to अजुन एक by फ्रॅक्चर बंड्या

Permalink

अनुभव

सध्या मी याच वयात आहे माझ्या नजरेला आलेले काही अनुभव येथे सांगत आहे १. नववी दहावीच्या काळात फ्क्त प्रपोजच नाही तर त्याही पुढच्या स्टेजला जाणार्‍या अनेक मुली व मुले मी स्वतः पाहीलेली आहेत कॉलेजच्या वयात हे ठीक आहे पण ई .८ वीपासुन अशा प्रकरणाना सुरवात होते. २.या वयात नएक मुले व्यसनाधीन आहेत्,आमच्या शाळेतील एक मुलगा ९ वीत असताना चेन स्मोकींग करत होता. ३.काही शाळात याला प्रोत्साहन दीले जातात कोल्हापुरातीलच एका शाळेत दहावीचा सेंड ऑफ पार्टी कल्चरने होतो म्हणजेच एका लॉनवर मुले आणि मुली यांची ३ ४ तास डान्स पार्टी चालु असते व देखरेखीला कोणीही नसते .असे प्रसंग मुलाना बिघडवतात असे मला वातते दैवयोगाने आम्ही अशा कोणत्याही प्रकारात अडकलेलो नाही बाकी कालच कोल्हापुरात सर्व नेत चालकांची बैठक घेण्यात आली त्यात मुलाना नेतवर बसु देवु नये असा आदेश पोलीसप्रमुखानी काढला हे सगळे काय दर्शवते (ह्यावर अवांतर नको मीदेखील मजा करतोच की पण प्रमाणात ह्या गोश्टी खरच विचार करण्याजोग्या आहेत असे मला वातते) When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 03/19/2009 - 03:34

Permalink

माझं मत!

घरात आईवडील आणि शाळेत शिक्षक जसे वागतात त्याचं लहान मुलं अनुकरण करतात. घरात जर मोठी माणसं प्रेमळपणे, मोकळेपणाने, सौजन्याने वागताना लहान मुलं पहात असतील तर ती त्याचंही अनुकरण करतात. कुणितरी वर म्हटल्याप्रमाणे लहान मुलांनाही स्वतःचा एक स्वभाव असतो, एक विचारशक्ती असते. आपल्याला वाटतं त्यापेक्षा त्यांना खूप जास्त कळत असतं. घरात जर नवराबायकोत धुसफूस (अगदी भांडणे व्हायची गरज नाही तर नुस्त्या कॉमेंटस सुद्धा चालतात!), सासूसुनेतील तणाव, आजोबांची अतिकडक शिस्त या सर्वांतून मुल आपलं आचरण बनवत असतात..... मुलांना दम देऊन किंवा मारून मुलं सुधारत नाहीत. एकतर ती कोडगी बनतात किंवा त्याच गोष्टी आपल्या नजरेच्या आड करण्याची संधी शोधत बसतात.... मुलांनी जसे वागावे असे पालकांना वाटत असेल तर पालकांनीही त्याप्रमाणे वर्तणूक ठेवली पाहिजे. मुलांना होमवर्क करायला सांगून आपण इतर काही (उदा. टिव्ही बघत बसणे!) याला काही अर्थ नाही. जर सर्टन मालिका मुलांनी बघू नयेत असे वाटत असेल तर मुले झोपेपर्यंत त्या पालकांनीही पाहता कामा नयेत (मालिका रेकॉर्ड करून नंतर उशीरा पाहता येतात). विशेषतः घरातल्या आजी-आजोबांसाठी हे सजेशन!! मुलांना एखादी गोष्ट कर/ करू नकोस असे फक्त न बजावता ती का कर/ करू नकोस हे समजावून सांगितले (हां, हे कदाचित एकदा, दोनदा, दहादा समाजावून सांगावे लागेल!!:) तर मुलं ऐकतात असा माझा अनुभव आहे. त्यांना तुमच्या अनुभवातही सहभागी व्हायचं असतं तेंव्हा त्यांना योग्य असे अनुभव निवडणं हे पालकांच्या हातात असतं.... आणखी एक म्हणजे मुलांना आपले पालक आपल्या सदैव पाठीशी आहेत ही सुरक्षिततेची भावना वाटणं हे फार महत्वाचं असतं. वरती दुसर्‍यांच्या घरात एका मुलाने खूप दंगामस्ती केल्याचे उदाहरण दिले आहे. मूल आहे ते थोडीफार दंगामस्ती करणार. तेंव्हा लोकांच्या घरी जातांना "बाबारे, मला क्ष वर्षांची मुले आहेत, आणलं तर चालेल का?" या प्रश्नाचे उत्तर जर होकारार्थी आले तरच त्या लोकांकडे जावे. जाण्याआधी त्यांना त्यांच्या मौल्यवान वस्तू (काचेच्या वगैरे!!) उचलून मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावयास सांगावे. त्यातूनही जर मुलाने काही नुकसान केलं तर आपण स्वतः त्या स्नेह्यांची जरूर क्षमा मागावी पण त्या स्नेह्यांना बरे वाटावे म्हणून आपल्या मुलाला दम/ मार देऊ नये. त्यापायी स्नेह तुटला तरी बेहत्तर!! मूल मागे लागला नव्हतं आपल्या की मला तिथे घेऊन चला म्हणून, हो की नाही!:) सर्वात शेवटचे म्हणजे मुलांना कधीही "मी सांगतोय/ सांगतेय म्हणून तुला हे केलं पाहिजे" असा दम देऊन गोष्टी करायला भाग पाडू नये. त्यातून पालकांना आपण पावरफुल असल्याचं तात्कालिक फीलिंग येत असेल पण मुलं मात्र (मनातल्या मनात) त्याचा धिक्कार करत असतात. ओव्हर द लाँग टर्म, दॅट इज मोअर डेंजरस!!!:)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 03/19/2009 - 07:49

In reply to माझं मत! by पिवळा डांबिस

Permalink

काका,

अतिशय सुरेख आहे प्रतिसाद. अगदी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तुम्हाला व्य. नि. करेनच. काही शंका विचारयचा आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्ता २० on गुरुवार, 03/19/2009 - 08:42

In reply to माझं मत! by पिवळा डांबिस

Permalink

छान प्रतिसाद!

मुलांना एखादी गोष्ट कर/ करू नकोस असे फक्त न बजावता ती का कर/ करू नकोस हे समजावून सांगितले (हां, हे कदाचित एकदा, दोनदा, दहादा समाजावून सांगावे लागेल!! तर मुलं ऐकतात असा माझा अनुभव आहे. _______________________________________________________ काका, तुमचे विचार अगदी १००% पटले. तुमचा प्रतिसाद फार आवडला. :) अवांतरः तुमचा प्रतिसाद वाचुन एकदा मनात विचार आला कि तुमचे आणि माझ्या आजोबांचे (ते हयात नाहीत) विचार अगदी सारखे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on गुरुवार, 03/19/2009 - 17:35

Permalink

>>मुलांनी

>>मुलांनी जसे वागावे असे पालकांना वाटत असेल तर पालकांनीही त्याप्रमाणे वर्तणूक ठेवली पाहिजे. काका, तुमचे म्हणणे १००% पटले. तुमचा प्रतिसाद सर्व पालकांसाठी खूप मार्गदर्शक आहे. माझा मुलाला प्रिस्कुलला शिक्षिका म्हणून एक आजी होती. ती मुलांना चांगले वागल्याबद्दल तिकिट द्यायची. उ.दा. Johny was caught helping Tom/ saying please /sharing his story book वगैरे. आठवड्याच्या शेवटी helpful,caring,polite, hardworking असे लिहीलेले star वाटायची. मुलं स्टार आणि तिकिट मिळवायच्या धडपडीत कधी गुणी बाळं व्हायची त्यांना कळायचही नाही. इतर वर्गात time out chair असायची तर हिच्या वर्गात छान सजवलेली thinking chair. मुल वाईट वागले की रवानगी खुर्चीत ५ मिनिटे विचार करायला, आपण कसे वागलो याचा. हळू हळू मुलं आपणहून चूक कबूल करु लागत. मिस कॅरोल ने मला आणि माझ्या मुलाला खुप काही शिकवलं.
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Fri, 03/20/2009 - 12:06

Permalink

बच्चों/बच्

बच्चों/बच्चीओं के स्वभाव पर उनके आस-पास के माहौल का काफी प्रभाव पड़ता है| इति. आमचा रंगा पानवाला
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com