बहावा

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
12 May 2019 - 10:26 pm

बहावा
--------------------------------------------------------------------------------------

घोस लगडले सोनसळी
मन खुलते या तरुतळी
वसंताची बहार ही
झाली टपोर मनकळी

की पांघरला
पिवळा शेला
की सोनसाज
याला केला

रूप देखणे याचे
वरती सोन झळाळी

तो करतो कसा
नजरबंदी
सोनपिवळी
गारुड धुंदी

सय कवळ्या प्रेमाची
देई शहाणा कवळी
-----------------------------------------

बिपीन

कविता

प्रतिक्रिया

इरामयी's picture

13 May 2019 - 11:48 am | इरामयी

कविता छान आहे. कोण म्हणतं उन्हाळा सुंदर नसतो? उन्हाळ्याचं masculine देखणेपण कवितेत छान प्रकटलं आहे. वसंत-ग्रीष्मात आसमंत सुंदर करून टाकणारी ही झाडं उन्हाळयाचं सौन्दर्य खुलवतात.

का ते माहीत नाही. रानावनात घुमते बाई शीळ या कवितेची आठवण झाली. ती कविता आंतरजालावर कुठे असेल आणि कोणाला ते माहीत असेल तर कृपया दुवा शेअर करा. माझ्याकडून दुवा मिळेल.

रच्याकने.. कवळी या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, त्यामुळे तो शब्दप्रयोग जरासा खटकला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2019 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

रानावनात घुमते बाई शीळ या कवितेची आठवण झाली. ती कविता आंतरजालावर कुठे असेल आणि कोणाला ते माहीत असेल तर कृपया दुवा शेअर करा. माझ्याकडून दुवा मिळेल.

हा घ्या दुवा. कविता आणि अजून बरीच माहिती आहे इथे...

https://jaganyachajugar.wordpress.com/2012/09/12/33/

इरामयी's picture

14 May 2019 - 6:36 am | इरामयी

धन्यवाद, डॉ सुहास.

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 May 2019 - 7:43 pm | बिपीन सुरेश सांगळे

| इरामयी

पुन्हा एकदा आभारी आहे
कवळी शब्दाचा प्रॉब्लेम मला माहित होता
पण तालात बसण्या साठी मी तो तसा घेतला

आणखी एकदा विनंती
बहावा हि कथा वाचावी

इरामयी's picture

18 May 2019 - 11:23 am | इरामयी

कृपया कथेचा दुवा द्यावा.

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 May 2019 - 11:19 am | बिपीन सुरेश सांगळे

इरामयी .

https://www.misalpav.com/node/44535

आभारी आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 May 2019 - 11:21 am | बिपीन सुरेश सांगळे

इरामयी .

https://www.misalpav.com/node/44349
कृपया आधीचे इग्नोअर करा

आभारी आहे