धून वाजवी बासरीवाला

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
11 May 2019 - 11:01 pm

धून वाजवी बासरीवाला
------------------------------------------------------------------------------------------
धून वाजवी बासरीवाला
रास रंगला यमुनेच्या काठाला

पुनव प्रकाशी
सारे नाहले
दंग नर्तनी
सारे विसरले

भिडे टिपरी कोणाची कोणाला
धून वाजवी बासरीवाला

जळात लहर
अंगात बिजली
मी तू पणाची
भावना विझली

असीम शांतता मनाच्या तळाला
धून वाजवी बासरीवाला

आता राधा हरी
अन हरी राधा
गाठ जिवाशिवाची
हि भलतीच बाधा

स्वर्गीय नाद तो पोचे टिपेला
धून वाजवी बासरीवाला

बिपीन
Bip499@hotmail.com

कविता

प्रतिक्रिया

इरामयी's picture

12 May 2019 - 8:02 pm | इरामयी

पौर्णिमेच्या प्रकाशात रात्रीच्या वेळी अंगणात खेळण्यातली मजा आता जवळजवळ विस्मृतीत गेली आहे. या कवितेच्या निमित्ताने त्या गोष्टीची आठवण झाली. आमच्या
मामाच्या गावी आम्ही मुली लहानपणी कोकणात खांब-खांब-खांबोली , लंगडी, फुगडी , लपंडाव आदी खेळ खेळायचो.

कविता आवडली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

12 May 2019 - 11:52 pm | बिपीन सुरेश सांगळे

| इरामयी

खूप धन्यवाद
लेखनाशी कोण कसे रिलेट होते ते सांगू शकत नाही .
तुम्हाला बालपणीच्या अंगणातल्या खेळण्याची आठवण यामुळे आली , हे वाचून बरे वाटले
एक विनंती - बहावा हि कथा वाचली नसेल तर कृपया ती वाचावी