होत नाही कपातला चहा गार आता

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
10 May 2019 - 11:29 am

ना लोचनी आसवांचा तुलाभार आता
नको उगा हासण्याचा तुला भार आता

शब्दांनी शब्द पोहोचवणे सुरू केले
उरला न अर्थ त्यांना तसा फार आता

गंजला खंजीर पाठीत कधीचाच सखे
ये पुन्हा नवा करायला तसा वार आता

करणे विचार तुझा आकाश सोडले
होत नाही कपातला चहा गार आता

आकाश....

कविता

प्रतिक्रिया

>>होत नाही कपातला चहा गार आता>>

नेमकं.

महासंग्राम's picture

11 May 2019 - 5:11 pm | महासंग्राम

हेच लग्न झाल्यावर असे दिसेल

५ वर्षांनी
सोसत नाही सिलेंडरचा भाव आता
म्हणून प्या गपगार चहा आता

२० वर्षांनी
तुला बोलणे मी कधीचे सोडले
भाजीत झाले मीठ फारआता

४० वर्षांच्या ऍनिव्हर्सरी ला
खूप आधी खुपसला तू खंजीर सखे
अजूनही झेलतो मी त्याचे वार आता

७० वर्षांनी
हल्ली मनात येत नाही विचार तुझा
माझी समरणशक्ती झाली गार आता

आपलेच आठवले
कृहघ्या

श्वेता२४'s picture

14 May 2019 - 11:25 am | श्वेता२४

खतरनाक व चपखल विडंबन :);)

जालिम लोशन's picture

11 May 2019 - 2:52 pm | जालिम लोशन

मस्त.