(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-)
बाकी शिवकन्या तुमचे आभार!!)
सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर...
किती बाहेर??
टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे ....
ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात
डाएटच्या नादात
भरली होती तिला डब्यात....
करत राहते ती विचार की पाळेल का तो डाएट आजतरी...
घेत राहते ती वास त्याने दिवसभर खाल्लेल्या अबरचबर पदार्थांचे....
सामोश्यांचे... आणि वेळी अवेळी प्यायलेल्या कॉफीचे...
कोशिंबीर डब्यातून बाहेर येऊ शकत नाही..
त्याला सांगू शकत नाही की अरे मी आहे इथेच... बघ जरा...
मग ती शांतपणे बघत राहते...
कचऱ्याच्या डब्याकडे... जिथे आता कधीही रवानगी होईल तिची...
आणि बघतच राहते....
प्रतिक्रिया
27 Apr 2019 - 5:45 pm | श्वेता२४
छान
27 Apr 2019 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
दाराआडच्या मुलीची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ती खिडकीमागच्या बिल गेट्सला मागे टाकेल की काय असे वाटू लागले आहे ! ;)
27 Apr 2019 - 8:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा भारी. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
27 Apr 2019 - 9:02 pm | कंजूस
मी कोशिंबिर झालो तर - १२ गुण
27 Apr 2019 - 9:14 pm | लौंगी मिरची
हाहाहा .
27 Apr 2019 - 10:12 pm | चामुंडराय
मस्त ... :)
माझे डाएटचे प्रयोग आठवले आणि त्यामुळे हे अगदी पटले !!
आता विडंबन करण्यासाठी एक नवीन विषय
बंद बाटलीच्या बुचामागची शॅम्पेन
चला मिपाकर्स हो पाडा एक जिल्बी
27 Apr 2019 - 11:38 pm | नाखु
डायट न पाळणार्याला थेट फायट.
स्वगत हे कोशींबीरेने घरी सांगायला हवे,भिजलेला पापड विथ सलाड नक्की
28 Apr 2019 - 8:49 am | सोन्या बागलाणकर
फसलेल्या डाएटची मस्त कविता!
28 Apr 2019 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार
सांगायाची आहे माझ्या ढोलुल्या मुला
फसलेल्या डाएटची कहाणी तुला,
पैजारबुवा,
30 Apr 2019 - 4:34 pm | सस्नेह
भारीये की कोशिंबीर !
1 May 2019 - 4:26 pm | शब्दसखी
सर्वांचे आभार!!!!
@डॉ. म्हात्रे
खिडकीमागच्या बिल गेट्सची कविता येऊन जाऊ दे तुमच्याकडून... म्हणजे त्याची पण लोकप्रियता बरकरार राहील.. ;-)
@चामुंडराय
शॅम्पेन मिश्रित जिलेबीची वाट बघत आहे :-)
@डॉ. बिरुटे
प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद!