असतो दगड तर कदाचित
जमले असते कोरडे राहणे
हिरव्या पावसात देखील
आतून रुजून न उमलणे
निळ्या नभात ढग व्हावे
अमृताने पूर्ण भरलेला
द्यावे आणिक निघून जावे
इतकेच ठाऊक असलेला
बासरीतून संगीत जन्मते
रसिक मनांना भिजविते
श्वास थांबता फुंकलेला
पोकळ रिक्त शांत उरते
फक्त असावे या जगती
नसो अभिलाषा जगताना
सहजस्फुर्त अस्तित्व असावे
भार नसावा श्वासांना
-अनुप
प्रतिक्रिया
17 Apr 2019 - 2:35 pm | अन्या बुद्धे
:)