चित्त

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
30 Mar 2019 - 1:34 pm

अवयव घेती
सुख दुःख भोग
जाणिवेचे जग
चित्ता माजी

चित्त पाही सारे
चित्त चव घेई
चित्ता गंध येई
कवटीत

इंद्रिये देतात
संवेद संकेत
त्यांची काय मात
चित्ता विना?

चित्त हे सक्षम
घडे संवेदन
स्वतःतून जाण
सुख दुःख

चित्ता माजी घडे
दुःख आणि सौख्य
निवड स्वातंत्र्य
आपणासी

कळले वळले
ज्यास हे, सतत
आनंदाचा स्रोत
अंतरात

-अनुप

कविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Mar 2019 - 3:42 pm | यशोधरा

सुरेख जमली आहे कविता.

अन्या बुद्धे's picture

30 Mar 2019 - 3:53 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

मदनबाण's picture

31 Mar 2019 - 10:13 am | मदनबाण

चित्त हे चपळ
वायु पेक्षाही वेगवान
यासी करावे अचल
बसोनिया ध्यानाते !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |