बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो
किंवा लक्ष नाही असं दाखवतो
नाहीच जमलं दुर्लक्ष करणं
तर मानेनेच नाही म्हणतो
आणि कधीकाळी दिलेल्या
दहा रूपड्याचं गणित मांडून
स्वतःचच समर्थन करतो...
पण खरं सांगायचं तर,
आत एक द्वंद्व चालू असतं
कारण मला पक्कं ठाऊक असतं की,
नकार,
अपमान,
एकटेपण,
तिरस्कार,
नाकारलेपण,
संघर्ष,
या शब्दांचे अर्थ
मला नाही कळणार कधीच....
ते कळतील
फक्त
गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या
आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या
....त्या हिजड्याला
प्रतिक्रिया
9 Mar 2019 - 9:34 pm | चांदणे संदीप
पोचली.
नकार, अपमान, एकटेपण, तिरस्कार, नाकारलेपण, संघर्ष यांची धग कवितेत उतरली आहे.
Sandy
11 Mar 2019 - 10:52 am | मनिष
सुरेख!
11 Mar 2019 - 1:18 pm | प्रमोद देर्देकर
याची एक शशक होवू शकेल.
11 Mar 2019 - 2:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
चाणाक्या...
11 Mar 2019 - 3:48 pm | खिलजि
छान कविता आहे , जरा हटके....
12 Mar 2019 - 12:02 pm | बाप्पू
लेखन आवडले.
तृतीयपंथी लोकांबद्दल नेहमीच सहानुभूती वाटते.
कसे सहन करत असतील ते लोक देव जाणे..
12 Mar 2019 - 6:52 pm | दुर्गविहारी
मागच्या आठवड्यात झी मराठी वरच्या "कानाला खडा" या टॉक शोमध्ये हिजड्याची मुलाखत होती. त्यामुळे आज हि कविता वाचल्यावर जास्तच भिडली. सुंदर.
12 Mar 2019 - 8:05 pm | मदनबाण
अप्रतिम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |
12 Mar 2019 - 8:37 pm | स्वधर्म
छानच.
13 Mar 2019 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली असे तरी कसे म्हणू?
पैजारबुवा,
4 Jun 2023 - 10:35 am | कुमार१
सुरेख!