हमसे तो छूटी महफ़िलें…

Primary tabs

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
26 Feb 2019 - 2:32 pm

Lonely Journey

काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्‍या मैफिलीत
हुरळून आपण सामिल होतो.
संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण
चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो.

मैफिलीतल्या अनवट कविता,
एखादी नेमकी दाद,
तिथली व्यासंगी चर्चा,
आणि मनसोक्त गप्पा.
अशा हव्याहव्याशा वातावरणात
आपणच नकोसे आहोत,
हे अवचितच झालेले दंशभान….

शरीरात एखादे विष पसरत जावे
तसा पसरत जाणारा तुटकपणा.
आपल्याच हाताने तोडून सर्व पाश
खुलाशाचाही न करता अट्टहास,
पुन्हा एकदा मौन प्रवास.
एकट्याचा….
कधीही न परतण्यासाठी.

~ मनिष

कविता

प्रतिक्रिया

फोटो/इमेज आंतरजालावरुन घेतला आहे, खूप ठिकाणी वापरल्यामुळे नेमके श्रेय कुणाला द्यायचे ते कळत नाही, पण हा फोटो माझा नाही हे नमूद करतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Feb 2019 - 3:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

ऐसा मायुस नही होनेकारे बाबा..
फटाकसे एक डू आयडी बनानेका और मैफिलमे वापस घूस जानेका,
दो देनेका दो लेनेका हिसाब बराबर
हाय काय अन नाय काय
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2019 - 3:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ मनीषसेठ...

आपणच नकोसे आहोत,
हे अवचितच झालेले दंशभान….

असं काही नसतं. सगळेच सर्वांना हवे असतात.
लिखते रहो. :)

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

26 Feb 2019 - 3:28 pm | यशोधरा

आवडली.

@पैजारबुआ आणि @बिरुटेसर - हे लिहायचं राहिलंच, ही कविता सोशल-मिडिया किंवा संकेतस्थळाविषयी नाही. :)

झेन's picture

26 Feb 2019 - 8:20 pm | झेन

हम हस दीए हम चूप रहे
मंजूर था चर्चा तेरा...

छान आहे

... मंज़ूर था पर्दा तेरा। :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2019 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कविता !

राघव's picture

26 Feb 2019 - 11:07 pm | राघव

आवडले. फोटोही चपखल!

बाकी मित्रांची मैफल हरवणं म्हणजे काय ते सांगायला हवं काय.. त्रास त्रास म्हणतात तो हाच.. असो.

अवांतरः
राजकारणाच्या भाऊगर्दीत असं काही वाचून जरा गार वाटतं. :-)

बाकी मित्रांची मैफल हरवणं म्हणजे काय ते सांगायला हवं काय.. त्रास त्रास म्हणतात तो हाच.. असो.

नेमके!

विजुभाऊ's picture

4 Mar 2019 - 5:06 pm | विजुभाऊ

ओ भाव
असा का करुन राह्यलाय.
या जरा कट्टे करुया झकास.
एकदम झ्ह्याक हुईल तब्येत तुमची

दुर्गविहारी's picture

12 Mar 2019 - 6:54 pm | दुर्गविहारी

बर्याच दिवसांनी कविता विभागात चक्कर टाकली आणि सुंदर कविता वाचायला मिळाल्या. खुपच छान! पु.ले. शु.

मदनबाण's picture

12 Mar 2019 - 8:07 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |