लग्न - एक पांढरा हत्ती

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
31 Jan 2019 - 10:52 am
गाभा: 

पांढरा हत्ती पाळणे/पोसणे हा मराठीतला एक वाक्प्रचार आहे.
याचा शब्दशः अर्थ घेतला तर पांढरा हत्ती ( हा अल्बिनो असल्यामुळे पांढरा असतो ) त्याचा वापर युद्ध, खेळ किंवा भारवाहन या कशासाठीच वापर करता येत नाही.
केवळ दिखाव्यासाठी बाळगता येतो. आणि हत्ती पाळला आहे असा बडेजाव करता येतो. मात्र त्याला खाणेपिणे सामान्य हत्तीएवढेच लागते.
दिखाव्या शिवाय काहीच उपयोग नाही .
म्हणजे फायदा अल्प ( बडेजाव करता येतो हा फायदा मानला तर ) आणि तोटे अनेक असणे म्हणजे पांढरा हत्ती पाळणे.
सहज म्हनून ही अ‍ॅनॉलॉजी इतर काही गोष्टीना लावली. ( उदा चार चाकी गाडी घेणे इत्यादी.)
सर्वात गोंधळात टाकणारी गोष्ट आढळली ती म्हणजे " लग्न"
लग्न करणे हा पांढरा हत्ती पाळण्या सारखे आहे का? हे दोघानाही ( स्त्री आणि पुरूष ) समान पणे लागू आहे.
लग्न करणे हा स्त्री साठी गृहसौख्य आणि सामाजीक/ आर्थीक सुरक्षा हा डबल फायदा आहे . बडबड ऐकून घेणारा हक्काचा श्रोता मिळणे , हा फायदा आहे. मात्र त्या सोबतच नको असलेले नातेवाईक , जन्मभर नवरा नामक तर्‍हेवाईक प्राण्याची बडदास्त सांभाळणे , स्वतःच्या आवडीनिवडीला, छंदाना कायमची तीलांजली देणे , सासूसासरे वगैरे असून अडचण नसून खोळंबाप्रकार सांभाळणे हे तोटे होतात.
पुरुषांसाठी लग्न हा गृहसौख्य , जेवणासाठी, घरातला पसारा आवरणारी हक्काची दासी , आई वडीलाना चार्जेस न आकारता सांभाळणारी नर्स वगैरे फायदे आहेत.
तोट्याच्या बाजूला मुले होणे,त्यांचा सांभाळ करणे , जबाबदारी या गोंडस नावाखाली स्वतःच्या आवडीना कोपर्‍यात ढकलाव्या लागणे , पगाराचा हिषेब द्यावा लागणे , सतत टोमणे ,चिडचीड ऐकून घ्यावी लागणे , इत्यादी गोष्टी आहेत.

हा ताळा करत असताना " लग्न करणे " हा पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे की कसे या प्रश्नाने डोके खाल्ले.
तुमची मते काय आहेत?
( आपली संस्क्रुती , स्त्री / पुरुष फरक यापेक्षाही लग्न करण्याचे फायदे तोटे यावर निरोगी चर्चा अपेक्षीत आहे. )
लग्न करणे ही गोष्ट पांढरा हत्ती पाळण्यासारखे आहे काय?

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

31 Jan 2019 - 11:24 am | उगा काहितरीच

बापरे ! कसलं स्फोटक पोटंशियल आहे या धाग्यात . १००-२००-३००-कितीही !

विजुभाऊ's picture

31 Jan 2019 - 11:27 am | विजुभाऊ

म्हणूनच मिपावर लिहीलंय.
मिपाकर सूज्ञ , सुजाण आणि समंजस आहेत तेवढे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Jan 2019 - 11:43 am | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय. घरी वादविवाद झाले की हे ही असेच काहीसे पुर्वी डायरीत लिहायचे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2019 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विविध विषयांवर आपल्या त्यांची मतं काय आहेत, ते अनेकदा वाचलं आहे.
तुमची त्यांच्या बद्दलची काय मतं आहेत ते वाचायला नक्की आवडेल.

बघा खासगीपणा जपून काही करता आलं तर..

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 12:29 pm | सुबोध खरे

लैंगिक समाधानाची किंमत काय आणि किती करणार?

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या प्रणयाच्या नैसर्गिक उर्मी (instincts) आहेत. त्यावर विजय मिळवणे फार थोड्याना जमते.

चिनार's picture

31 Jan 2019 - 2:21 pm | चिनार

हुश्श !! सगळ्यांनाच असं वाटतंय ना..
भाऊंच्या लेखात "त्याचा" उल्लेखच नव्हता. मी म्हटलं फक्त आपलेच विचार असे आहेत का ?
स्वत:ला वासनांध, कामपिपासू, वगैरे लेबलं लावले मी लगेच

युयुत्सु's picture

31 Jan 2019 - 2:25 pm | युयुत्सु

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या प्रणयाच्या नैसर्गिक उर्मी (instincts) आहेत. त्यावर विजय मिळवणे फार थोड्याना जमते.

एक शंका : आहार, निद्रा, भय आणि मैथुन या विजय मिळविण्याच्या गोष्टी आहेत का?

विजुभाऊ's picture

31 Jan 2019 - 2:31 pm | विजुभाऊ

तेच विचारायचं आहे.
नैसर्गीक ऊर्मी वर विजय कशासाठी मिळवायचा? मात्र त्या नैसर्गीक मर्यादेतच रहाव्यात. त्यंच्या आधीन जाऊ नये. हे बरोबर.

युयुत्सु's picture

31 Jan 2019 - 3:41 pm | युयुत्सु

सर्वेषामानन्दानामुपस्थमेव निधानं । (जननेन्द्रीये सर्व आनंदाचे मुळ आहेत), हे याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवादातले वाक्य लोकांना ठाऊक नसते.

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 6:54 pm | सुबोध खरे

लग्न करताना मैथुन(सेक्स) हि भावना बहुतांशी अतिशय प्रबळ असते आणि यामुळेच लोक बेडी, पांढरा हत्ती इ संबोधले तरी बहुसंख्य लोक लग्न करतातच.
एकदा एखादी गोष्ट मिळू लागली कि त्याची किंमत राहत नाही.( (अच्छे दिन कधीच येत नाहीत हेंच याचे कारण आहे)
त्यामुळे नियमितपणे मिळणाऱ्या लैंगिक सुखाची किंमत न ठेवता लोक लग्नात अध्यहृत असणाऱ्या गोष्टींचा बाऊ करू लागतात म्हणून हा "पांढरा हत्ती'सारखा धागा निघतो.
कालानुरुप "अतिपरिचयात अवज्ञा" या स्थिती मुळे नवरा बायको एकमेकांना गृहीत धरू लागतात(taken for granted) यामुळे काही समस्या येऊ लागतात. जर हे गृहीत धरणे टाळता आले तर परस्पर संबंध उत्तम राहतात आणि आयुष्यभराची साथ सुखाची वाटू लागते.
लग्न हि तीन पायाची शर्यत असते. जर दोघांमध्ये ताळमेळ उत्तम असेल तर यात पळण्याचा आनंद घेता येतो अन्यथा एकाची फरफट आणि दुसऱ्यावर ओझे हि स्थिती होते.
" या नैसर्गिक आकर्षणावर गंजाचा मुलामा चढतो आणि या लैंगिक सुखाची किंमत कमी झाल्यासारखी वाटते.

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 7:01 pm | सुबोध खरे

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या विजय मिळविण्याच्या गोष्टी आहेत का?
नक्कीच.
अति आहारामुळे आज जगात स्थूलपणाची समस्या अक्राळविक्राळ आकार धारण करू लागली आहे.

कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाशी रत होणे हि गोष्ट नैसर्गिक उर्मी असली तरी असे झाल्यावर अनाचार माजू लागतो (farmyard morals). गेल्या ७० वर्षात कुटुंब नियोजनाची साधने उपलब्ध झाल्याने हि बंधने सैल झाली आहेत हि अवस्तुस्थिती असली तरी अनाथालयात वाढणारी मुलांची संख्या हि काय दर्शवते.

भीती वर विजय मिळवणे ज्यांना शक्य होत नाही ते कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करू शकत नाहीत मग त्यात उत्तुंग यश देणारा व्यवसाय असो गृह कर्ज असो कि शेअर बाजारात व्यापार करणे किंवा सीमेवर लढणारा सैनिक असो.

निद्रेबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही.

बाप्पू's picture

31 Jan 2019 - 12:44 pm | बाप्पू

विजुभाऊ.. तुमचे लग्न झालेय का??

सेक्स ही मानवाची नैसर्गिक ऊर्मी आहे आणि ती ऊर्मी तरुण वयात अतिशय तीव्र आस्ते .
आणि मानवाची भावनिक स्वास्थ सुधा सेक्स वरच अवलंबून आस्ते.पण ती नैसर्गिक ऊर्मी मज्जा करायला निसर्गाने दिली नाही तर मानव वंश चालू रहावा म्हणून दिली आहे .
मानव हा अतिशय स्वार्थी प्राणी आहे सेक्स मध्ये मज्जा नसती तर फक्त मुल होण्यासाठी माणसांनी कधीच सेक्स केला नसता आणि मानव जात कधीच नष्ट झाली असती .
बाकी प्राण्या सारखं मानवी मुल लगेच स्वतःचा जीव वाचवू शकत नाही आणि अन्न सुधा मिळवू शकत नाही त्या साठी त्याला कोण्ही तरी संरक्षण द्या व लागत म्हणून कुटुंब ही पद्धती निर्माण झाली आहे आणि ही नष्ट झाली तर शे वर्षात मानवी जात सुधा नष्ट होईल

खिलजि's picture

31 Jan 2019 - 2:51 pm | खिलजि

जबर्रदस्त लिवलंय .. मी पाळलेला पांढरा हत्ती मला आवडत चाललाय .. कारण माहित नाही , पण शक्यतो मी स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतोय .. माझ्या बाबांना ते बिलकुल आवडत नाही , मी तिच्या सांगण्याने सुधारलेलं , पण मला मात्र स्वतःला तिला अर्पण केल्यासारखं वाटत ..
तिने आतापर्यंत माझ्याकडून कधीही हिशेब घेतला नाही , फक्त मी निर्व्यसनी राहावे हीच माफक अपेक्षा ठेवते .. तिच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत पण तिने त्यांना निव्वळ माझ्यासाठी तिलांजली दिलेली आहे ..आजही जेवण मला विचारून सावरून माझ्या आवडीनिवडीचेच बनवते आणि गरमागरम वाढते .. माझ्या सहकार्यांना हेवा वाटतो त्याचा .. खासकरून आईच्यावेळी तिने चालवलेलं घर आणि डबेडुबे इस्पितळातसुद्धा आणि वरळीला देण्यासाठी , हा माझ्यासाठी मोठा आधार होता..

@ राजेश

" सेक्स ही मानवाची नैसर्गिक ऊर्मी आहे आणि ती ऊर्मी तरुण वयात अतिशय तीव्र आस्ते ."

हे काही पटलं नाही बघा .. मी तर म्हणतो जसं जसं वय वाढत जाते , उर्मी / गर्मी वाढत जाते..

काही वर्षांपूर्वी पिवळा हत्ती मिळायचा, त्याला जवळ केले की पांढरा हत्ती दिसायचा नाही असे म्हणतात, जाणकारांनी / अनुभवी लोकांनी कृपया खुलासा करावा
पैजारबुवा,

आनन्दा's picture

31 Jan 2019 - 5:07 pm | आनन्दा

केलात सुरू हैदोस इथे पण?
जरा म्हणून सभ्यता नाही.

पैंबू काका ,, गुदगुल्या होऊन ऱ्हायल्यात... कधी एकदाचे अनुभव वाचतोय असं झालंय ..

पिवळा हत्ती??? हे काय प्रकरण आहे,??

शाम भागवत's picture

2 Feb 2019 - 8:31 pm | शाम भागवत

हनिड्यू
किॅवा
पनामा

विजुभाऊ's picture

31 Jan 2019 - 5:28 pm | विजुभाऊ

असो.
काही बाबी जरा दुर्लक्षुया.
लग्न करणे म्हणजे साहचर्याच्या आनंदाबरोबर जबाबदार्‍या आणि दुसर्‍या माणसाला जसा आहे तसा सहन करणे + त्याच्या आवडीनुसार आपल्यात बदल घडवणे या गोष्टी कराव्या लागतात.
आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. काही जणांच्या बाबतीत स्वप्ने विसरावी लागतात
या सगळ्याचा जमाखर्च मांडला तर लग्न हा पांढरा हत्ती आहे की कसे यावर चर्चा करुयात.
बायको / नवरा हे सुरवातीला एकमेकांच्या कलाने घेतात. नंतर एकमेकांचे मालक बनायचा प्रयत्न सुरू करतात. त्यातील त्रास / गंमती या बद्दल बोलूया

ज्ञानव's picture

31 Jan 2019 - 5:57 pm | ज्ञानव

जीवांचा सुखनैव प्रवास आहे. शरीर सुखासाठी लग्न करणाऱ्यासाठी नंतर कदाचित तो पांढरा हत्ती होऊ शकतो कारण जे हवे ते मिळाले कि ध्येय पूर्ती झाल्यावर जी मानसिक अवस्था होते तसे काहीसे होऊन पुरुषासाठी जर लग्न पांढरा हत्ती झाला तर त्याचे प्रतिबिंब म्हणून त्या स्त्रीला पण लग्न हे पांढरा हत्ती होऊ शकते. शेवटी तुम्ही एकमेकांशी कसे वागता त्यावर सगळेच अवलंबून आहे. एकमेकांमध्ये जे उत्तम आहे त्याचा गौरव करून जे वाईट आहे ते दुर्लक्षून हा प्रवास उत्तम रीतीने पार पाडता येऊ शकतो. असे अनुभवांती वाटते.

बाकी, कधी कधी कळपातल्या इतर हत्ती(णी) मस्त वाटतात त्यावर काही उपाय असेल तर सांगा.

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 7:04 pm | सुबोध खरे

(जननेन्द्रीये सर्व आनंदाचे मुळ आहेत)

अत्यंत एकांगी वाक्य आहे.

फार तर एका आनंदाचे मूळ आहे म्हणता येईल.

तृतीय पंथी लोकांना/ जननेंद्रिये निकामी झालेल्या/ जन्मतःच नसणाऱ्या लोकांना आनंद मिळतच नाही का?

तृतीय पंथी लोक हे कायम दुखी असतात.

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 7:18 pm | सुबोध खरे

का पंचेंद्रिये पण वाया गेलेली असतात का त्यांची?

कि केवळ जननेंद्रिय नाही म्हणून आयुष्य फुकट गेलं?

उत्तम अन्न, उत्तम दृश्य, उत्तम संगीत, नाटक, सिनेमा याचा आनंद नाहीच का घेता येत त्यांना.

दुसऱ्याच्या बालकाबरोबर खेळण्याचा आनंद त्यांना मिळत नाही का?

अगदीच भंपक प्रतिसाद

मराठी कथालेखक's picture

31 Jan 2019 - 7:44 pm | मराठी कथालेखक

आपला प्रतिसाद योग्य आहे.
पण त्याचे कारण लग्न न होणे वा अपत्य जन्मास न घालता येणे इतके मर्यादित नसावे. तर समाजातून वाट्याला येणारी घृणा हे ही कारण असावे.
चांगले अन्न, संगीत , आहार , विहार ई मिळवता आले तरी 'आपण कुणाला तरी हवे आहोत' ह्या जाणिवेचा अभाव असताना आंतरिक समाधान कठीण आहे. (अशक्य नसला तरी). ही जाणीव ज्याच्या आयुष्यात आहे असा तृतीयपंथी समाधानी असू शकतो.

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 8:30 pm | सुबोध खरे

आपण कुणाला तरी हवे आहोत' ह्या जाणिवेचा अभाव असताना आंतरिक समाधान कठीण आहे.

अत्यंत योग्य प्रतिसाद.

हीच मनस्थिती अनाथालयातील बालके घेऊन आयुष्य काढताना दिसतात.

आपण येथे कुणालाही नको आहोत हि भावना फार दुःखद आहे.

कार्यालयातुन निवृत्त होताना बहुसंख्य माणसांची अशीच भावना असते.

मराठी कथालेखक's picture

31 Jan 2019 - 7:38 pm | मराठी कथालेखक

मला वाटते शरीरसुखापेक्षाही हे बंधनाचे चक्र आहे.
शरीरसूख मिळवण्याचे इतर मार्ग सहज उपलब्ध असूनही कित्येक जण लग्न करतात. अगदी सेलिब्रेटिसुद्धा या बंधनात अडकतात. इतक्यातच दीपिका पडूकोण, अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोप्राचे लग्न झाले. त्यांनी केवळ शरीरसुखाकरिता लग्न केले असे मानणे कठीण आहे. तर ते असो.
आई-वडीलांना मुलांची काळजी असते. आई-वडीलांचे बंधन (फक्त धाक या अर्थाने नाही, तर प्रेमाचे पाशही म्हणू शकतो) असताना मुलांचे आयुष्य स्थिर रहाते. पण वयोपरत्वे आई-वडीलांची क्षमता क्षीण होत जाणार, पुढे ते निधन पावतील. मग बंधन नसलेल्या मुलांच्या आयुष्यातली स्थिरता निघून जाईल. वहावत जाण्याची शक्यता वाढेल .. यात विरक्ती येणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, गुन्हेगारी वा तत्सम गोष्टींकडे ओढले जाणे हे आले.. थोडक्यात काय तर कुणाच्याही बंधनात /प्रेमपाशात नसलेली व्यक्ती स्वतःवर अढळपणे प्रेम करु शकेल हे कठीण. आपण कुणाला तरी हवे आहोत ही भावना जीवन जगण्याची (किंवा नीट जगण्याची / चौकटीत राहण्याची) प्रेरणा असते. अशी प्रेरणा नसेल तर भरकटलेल्या पतंगाप्रमाणे अवस्था होवू शकते. आपल्या अपत्याच्या जीवनात असे काही होवू नये म्हणून आई-बाप त्याला/तिला दुसर्‍या आणि अधिक काळ टिकणार्‍या बंधनात अडकवण्याकरिता म्हणजेच त्याचे लग्न करुन देण्याकरिता प्रयत्नशील असतात. लग्न झाल्यावरही आई-बापाचे बंधन नाहीसे झाल्यावर (म्हणजे आई-बाप मेल्यावर) आणि लैंगिक उर्मी कमी झाल्याने जोडीदाराचे (कृत्रिम वा जोडलेले ?) बंधन काहीसे क्षीण होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर पुन्हा एकदा माणूस (स्त्री/पुरुष दोन्ही अर्थानी) भरकटण्याची शक्यता असते हे होवू नये म्हणून जोडीदाराचे बंध नवीन आणि घट्ट , आईवडीलांचे बंधही शाबूत असतानाच आणखी नवीन बंधने निर्माण करण्याचा आई-वडीलांचा आग्रह असतो.. ती म्हणजे अपत्ये. त्यामुळेच कधी आई-वडील , जोडीदार दुरावल्यावरही अनेकदा माणूस अपत्यांकरिता जगतो आणि भरकटणे टाळतो.
थोडक्यात असे म्हणेन की माणसाला भरकटण्यापासून (विरक्ती, आत्महत्त्या) परावृत्त करत चौकटीत जगायला लावणार्‍या व्यवस्थेतील लग्न हा एक मोठा हिस्सा आहे. "मी का जगतो आहे ?" या प्रश्नापासून माणसाची सोडवणूक करत जगण्याची प्रेरणा तेवत ठेवणार्‍या या संस्थेला पांढरा हत्ती म्हणता येईल का ? निदान बहूसंख्य व्यक्तींबद्दल तर नाहीच नाही.. या बंधनाशिवायही जगण्याची प्रेरणा टिकवून ठेवणारे अनेक लोक नक्कीच आहेत .. पण इतर अनेकांना ते शक्य नाही.

उगा काहितरीच's picture

31 Jan 2019 - 9:22 pm | उगा काहितरीच

बहुतांशी पटला प्रतिसाद.

शेवटी समाजाने ठरविलेले जे नियम , चौकट वगैरे आहे ते खोलात जाऊन विचार केला तर समाजासाठीच फायद्याचे आहे.
विवाहसंस्थेला महत्त्व देणाऱ्या समाजाला कुठेतरी माहित असते की विवाहसंस्था टिकली तरच समाजाचे अस्तित्व आहे.

वास्तव प्रतिसाद भंपकच असतात.

लग्न म्हणजे फक्त पती आणि पत्नी मध्ये जुळणारे नवीन नाते हा उथळ विचार आहे .लग्न हा kutumbh व्यवस्थेचा पाया आहे .
लग्ना मुळे दोन कुटुंब ऐकत्र येवून गोड नात्यात बांधली जातात
लग्न जिथे स्त्री चा पूर्ण आदर आणि होणाऱ्या मुलाची पूर्ण जबाबदारी घेतली जाते
लग्ना मुळे निर्माण होणाऱ्या kutumbh मध्ये लहान मुल आणि म्हातारी माणसं सुरक्षित जीवन जगतात .
लग्न ह्या मुळे होणारी पवित्र स्त्री आणि पुरुष ह्या मध्ये सेक्सविरहित पण आदरयुक्त नाती तयार झाली ती नाती किती ही मोठी शिक्षा देवून तयार नसती झाली
बघा कोणती नाती ज्यात स्त्री आणि पुरुष aikmeka कडे सेक्स विरहित नजरेने बघतो
आई आणि मुलगा
Bhavu आणि बहीण
दिर आणि भावजय
पुतण्या आणि काकू
आशि खूप सारी नाती त्या पवित्र लग्न ही रीत आणि त्याच्या मुळे आलेल्या कुटुंब पद्धतींनी निर्माण झाली जिथे वयस्कर सुधा सुरक्षित आयुष जगतात .
सर्व धातू घन आसतात पण पारा हा धातू द्रव स्वरूपात असतो तसा इथे सुधा अपवाद आसू शकतात

विजुभाऊ's picture

1 Feb 2019 - 1:30 pm | विजुभाऊ

हे सगळे समजून घेत असताना
१चस्वतःची स्वतंत्र विचार / कृती करण्याची क्षमता/उर्मी दडपून ठेवावी लागते.
२निर्णय स्वातंत्र्य संपते.
३ लाईफ पार्टनर समजून घेणारा असला तर ठीक , बुद्दू / माठ असला तर आयुष्यभर सहन करावा लागतो.
४ जोडीदाराची धार्मीक सामाजीक मते झक मारून पटवून घ्यावी लागतात/ अंगीकारावी लागतात.
५ कलाकाराना समजून घेणारा जोडीदार नसेल तर त्यांच्यासाठी ते जिवंतपणीचे मरण असते.
६ जोडीदाराला केवळ भोग्य वस्तु समजणारे राक्षस नशीबात आले तर ते ही तहहयात मरण ठरते
७ आपण कुणाला तरी हवे आहोत ही भावना लग्न न करतादी प्राप्त करता येते. आनो नको आहोत ही भावना लग्न करूनही पदरी येते.

एखाद्याची कलात्मकता , हुशारी लग्नामुळे मारली जाते.
लग्नापूर्वी खूप काही करणार्‍या मुली लग्ना नंतर केवळ घरकाम , नातेवाईक यात अडकून बसलेल्या पाहिला आहेत.
उत्तम गाणे येणारी एक मुलगी आईवडीलांनी ज्या घरात लग्न लावून दिले तिथे कोणालाच गाणे आवडत नाही म्हणून गाणे सोडावे लागलेले पाहिले आहे.
बायको स्वतःपेक्षा वरचढ होऊ नये म्हणून तीला शिक्षण नाकारणारा , तीचे कोणी कौतूक केले तर बायकोला चारचौघात लाथानी बडवणारा राक्षस पाहिला आहे.
हे माहीत असूनही केवळ समाजासाठी मुलीला त्या राक्षसा सोबत रहायला लावणारे मुलीचे आईवडील पाहिले आहेत.
नवर्‍याला सदैव कुजकट टोमणे मारणारी, त्याच्यावर सतत खेकसून बोलणारी बायको पाहिली आहे. नवर्‍याला मुलाकरवी चारचौघात कानाखाली मारणारी बाई पाहीली आहे
या देणग्या लग्न संस्थेच्याच.

खिलजि's picture

1 Feb 2019 - 3:22 pm | खिलजि

" कलाकाराना समजून घेणारा जोडीदार नसेल तर त्यांच्यासाठी ते जिवंतपणीचे मरण असते."

लाखात एक वाक्य बोललात बघा .. खरंय हे .. माझ्याइथे पण यावरूनच वाद होतात .. त्याच काय आहे , आपल्याला शौक एकदम भारीभारी . जस कि आचरट अन इचित्र कविता बनवणे , बाजा वाजवणे आणि आपली लपून छपून केलेली व्यसने इ इ

विजुभाऊ's picture

1 Feb 2019 - 4:11 pm | विजुभाऊ

खिलजी काका.
कलाकाराची घुसमट कशी होते ते पाहिलय.

खिलजि's picture

1 Feb 2019 - 6:29 pm | खिलजि

खरे आहे

लग्नाचे आणि त्यामुळे टिकणाऱ्या पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेचे गोडवे गाणाऱ्यांसाठी

www.theguardian.com/lifeandstyle/2010/dec/19/china-mosuo-tribe-matriarchy

आणि लैंगिक सुखासाठी लग्न वगैरे समजुतीत असणाऱ्यांनी माबोवरचे कोणाशीतरी बोलायचे आहे धागे वाचावेत ;)

तुम्ही जे share Kele आहे ती आदिवासी जमात आहे .खूप वर्षा पूर्वी माणूस जसा जंगलात प्राण्या सारखं राहायचं तसेच ते राहतात .
कुटुंब व्यवस्था ही मानवाची स्वतःच्या बुध्दीचा वापर करून सर्वांना सुरक्षित वाटावे आस वातावरण निर्माण केले आहे
आणि त्यामुळे सुरक्षित वातावरणात मुल आणि मुली शिकल्या आणि चंद्रावर janya aivdhi प्रगती पण केली
पण तो चीन चा समाज ज्याची बातमी आहे ती अजून सेक्स chya base var जगतो आहे आणि बिलकुल प्रगत नाही

एमी's picture

1 Feb 2019 - 10:09 pm | एमी

बरं.
आता हेदेखील वाचा. चंद्रावर जाणारी मुलं आणि त्यांच्या आईची गोष्ट आहे.
https://www.maayboli.com/node/49290

अर्धवटराव's picture

1 Feb 2019 - 8:33 pm | अर्धवटराव

शाळा-कॉलेज नामक शिक्षण व्यवस्था, सरकार नामक लोक-व्यवहार सांभाळणारी व्यवस्था, तारीख पे तारीख देणारी न्याय व्यवस्था, शरीरस्वास्थ्यासाठी सुख विकायला लावणारी आरोग्य नियमन व्यवस्था, दैनंदीन गरजा उगीचच कॉम्प्लीकेट करणारी रोजगार व्यवस्था, भावनाधारीत स्वाभावीक जीवन उध्वस्त करणारी मेंदुस्थीत लॉजीक व्यवस्था, चांगलं चार पायावर शरीराचा भार सोसायचं सोडुन उगाचच द्विपाद शरीररचनेत कन्वर्ट झालेली इव्हॉल्युशन व्यवस्था.... असा सगळा कळप सभोताली असताना एक लग्न नामक सफेद हाथी आणखी जमा झाला तर असं काय बिघडलं... तलाव फार मोठा आहे.. सर्वांना यथेच्च डुंबायला मिळेल.

लग्नसंस्था हि लोकशाही सारखीच परिपूर्ण नाही.

परंतु दोन्हीला दुसरा सशक्त आणि चांगला पर्याय जगात अजून तरी उपलब्ध झालेला नाही.

आजच माझ्या फ्रान्स मध्ये राहात असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजर ने टीम ला सांगितलं कि ती प्रेग्नन्ट आहे. तेव्हा तिच्या बरोबर बोलता बोलता विषय निघाला आणि कळलं कि फ्रान्स मध्ये जवळपास ६० - ७० % लोक लग्न करताच नाहीत. जर पुढे जाऊन नाही पटलं तर वेगळे होतात पण दोघेही मुलांची काळजी मिळून घेतात.
एकूणच तीच असं म्हणणं होत कि, ते (ती आणि तिचा मित्र आणि एकूणच तिच्या ओळखीचे लोक ) कधीच आपल्या पार्टनर ला गृहीत धरत नाहीत, आपण कसेही वागलो, राहिलो तरी आपला पार्टनर आपल्याबरोबर राहील हे ते गृहीत धरत नाहीत. त्यामुळे दोघांनाही आयुष्यभर एकमेकांबरोबर नीट वागणं अत्यावश्यक आहे. एकमेकांबरोबर नीट बोलणं, आर्थिक आणि इतर जाबदाऱ्या उचलणं, अगदी स्वतःला आकर्षक ठेवणं हे सुद्धा.

त्या उलट भारतात जर ३० -४० नंतर दोघांचीही पोट सुटलेली नसतील, दोघेही बेढब दिसत नसतील असे खरंच लाखात एखाद जोडपं सापडेल (हल्ली प्रमाण नक्की वाढलाय बरे दिसण्याचं). बायका समाजाच्या धाकाने जरा तरी कदाचित नवऱ्याला मानाने वागवतील, पण एकूणच एकमेकांना नीट वागवतात, किंवा एकमेकांबरोबर खुश आहेत असं वाटत नाही. एकमेकांचं करणं हे मायेने आणि मनापासून किती आणि इलाज नाही म्हणून किती हे शोधणं मुश्किल आहे. बरीच जोडपी "पदरी पडलं पवित्र झालं" अशा प्रकारे राहतात असं वाटत. त्याच्यात एकमेकांबद्दल कुठलाही आकर्षण असेल असं वाटत नाही. अर्थात अपवाद असतील, पण ते अपवादच वाटतात. तरी जे आटा ६० ते ७० किंवा त्यापुढचे आहेत त्यांच्या बायका बऱ्याच मनापासून एकूणच सगळ्यांचं करतात असं वाटतं. पण हे प्रमाण नक्कीच कमी होताय.

एकूणच मला तरी लग्नसंस्था आपल्या एकूणच आयुष्यात कुठलाही धोका ना पत्करायचा मानसिकतेला अनुरूप आहे असं वाटत. एकूणच आपण असेम्ब्ली लाईन सिस्टिम मध्ये आहोत. जन्माला या , शाळेत जा, १० वि, बारावी, नोकरी, घर, लग्न, मुलं (यात घर लग्न मुलं ह्यांचा क्रम फक्त बदलू शकतो), नंतर आहे त्याच प्रकारच्या कॅरियर मध्ये स्वतःच्या कुवतीनुसार वर खाली जाणं, मुलाचं, जमेल तेवढ नातवंडांच सगळं नीट करणं, आणि मरून जाण. स्वतःच्या आवडीनिवडीच काही केलं तर ते १०वि च्या आतच. नंतर आई वडील आणि एकूणच समाज तुम्हाला या चक्रात ढकल्याशिवाय राहत नाही :P .

> तरी जे आटा ६० ते ७० किंवा त्यापुढचे आहेत त्यांच्या बायका बऱ्याच मनापासून एकूणच सगळ्यांचं करतात असं वाटतं. पण हे प्रमाण नक्कीच कमी होताय. >
त्या काळातल्या किती स्त्रिया आर्थिक स्वतंत्र होत्या? लग्न, मुलं, सासुसासरे, त्या घरातल्या रूढी पाळणे याखेरीज पोटापाण्याचा इतर काय पर्याय उपलब्ध होता त्यांना?

त्या काळातल्या (आणि आताच्यादेखील) किती मुलींना स्वतःचे विचार आहेत? आणि ते इंप्लिमेंट करायची आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक धमक आहे?

आधीतर स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्याचे मार्ग उपलब्ध करून द्यायचे नाहीत, बालपणापासून हातात भातुकली देऊन चुलमूलचे संस्कार करत रहायचे आणि मग तुझ्या आणि मुलांच्या आणि वृद्धांच्या संरक्षणासाठीच हि सिस्टम निर्माण केली आहे हे सांगायचं. हे बरंय...

वरती मी दोन लिंक दिल्या आहेत. मातृसत्ताक आणि पितृसत्ताक समाजातली स्त्रिया आणि बालकांची स्थिती यात किती फरक पडतो ते कळेल त्या लिंक वाचल्या तर. आदिवासीम्हणून हिनवले जाते तिथल्या स्त्रिया छाती न झाकता फिरल्या तरी तिथल्या पुरुषांना काही वाटत नाही, कारण त्यांना कन्सेंट म्हणजे काय हे कळत असतं. आणि चंद्रावर जाणारी मुलं निर्माण करणाऱ्या पुरुषांना खोल गळ्याचा ब्लाउज घातलेली बाई दिसली तरी प्राणायाम करवा लागतोय (eyeroll)

एनिवे
तर जसेजसे स्त्रीशिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यची व्याप्ती वाढत जाईल तसतसे खरोखरच हुशार असणाऱ्या स्त्रिया लग्न करणार नाहीत, फक्त मुल जन्माला घालायचे आणि एकत्र वाढवायचा करार करतील.

सुबोध खरे's picture

2 Feb 2019 - 9:20 am | सुबोध खरे

स्वप्नाळू आशावाद

यावर एकच उपाय आहे. शिकलेल्या बायकांनी स्रीसत्ताक आणणे

लग्नाची वेळ आली की बायका आपल्यापेक्षा जास्त पगाराचा नवरा बघतात , त्यामुळे नवर्याची नोकरी हीच priority राहाते,

त्याऐवजी स्त्रियांनी आईबापांच्या घरात राहून नोकर्या continue कराव्यात , घर सांभाळणारे नवरे घरजावई करून न्यावेत , त्यांची नावेही बदलून घ्यावीत

म्हणजे असे झाले असते तर माझे नाव गजानन माधुरी दीक्षित असे ठेवायचे.

दीपक११७७'s picture

2 Feb 2019 - 11:19 am | दीपक११७७

पण मग मंगळसूत्र कोणी परिधान कारायचे?

विजुभाऊ's picture

4 Feb 2019 - 9:35 am | विजुभाऊ

ते एकवेळ ठीक आहे.
पण तसे झाले असते तर सुनीतीबाईंचे माहेरचे आडनाव ठाकुर असल्यामुळे पु ल देशपांडेना " भाइ ठाकूर" म्हणावे लागले असते.
जोक अपार्ट
पण एकमेकंना समजून न घेता दोघेही दुसर्‍यावर स्वतःची मते लादत असतो.
त्यामुळे काही कालावधी नंतर दोहेही एकमेकाना "ओझे " अडचण" असेच वाटायला लागतात

हत्तीच्या ( पांढऱ्या ) गळ्यात घंटा कोणीतरी बांधलीच पाहिजे.
----
काही वर्षांनी सर्व घंटा बांधलेल्या असतील. घंटानाद ऐकून विचार येईल की नक्की कुणाच्या घरातून होतोय? आपल्या तर नाही ?

लग्न झाले की बंधन येतात हे खरं आहे आणि नाकारू पण शकत नाही .
लग्न झालं की जबाबदारी पण येते .वागण्यावर मर्यादा पण येतात तुम्हाला स्वतः बरोबर जोडीदाराच्या पण आवडी निवडी सांभाळ ने गरजेचं आसात .ऐकदुसऱ्या प्रती आदर ठेवावा लागतो .
घरातील वयस्कर लोकांची जबाबदारी आणि मुलांची जबाबदारी
ही पण दोघांनी मिळून घ्यावी लागते .
पालक जे आता शरीराची थकलेलं आसतात त्यांनी आपल्याला उभे करण्यासाठी त्यांच्या जवानी मध्ये पैसा आपल्यावर खर्च केलेला असतो .आपली हट्ट पुरविले आसतात शिक्षणा साठी ऐपत नसेल तरी कर्ज काढून लाखो रुपये आपल्या वर खर्च केलेलं आसतात तेव्हा आपण dr , इंजिनिअर,आणि काही बनलेले असतो .
त्यात आपली मेहनत हुशारी आस्ते पण पैसा आणि श्रम त्यांचे आसतात ते त्यांनी केले नसते तर आपण कितीही हुशार (अगदी न्यूटन चा बाप असतो तरी) dr , इंजिनिअर etc banloch नसतो .
आता स्त्री आणि पुरुष हे ऐकाच मानव जातीचे आहेत
दोघांचे अधिकार ऐकाच पातळीवर हवेत .
दोघांना सुधा निर्णय स्वतंत्र हवे
आणि सामाजिक व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था ह्या दोन्ही व्यवस्थेचे ते दोघे ही घटक सुधा आहेत .
त्या मुळे स्त्रिया वर अन्याय होवून त्यांची प्रगती थांबू नये ही अगदी योग्य मागणी आहे आणि आता ती नाकारणे योग्य नाही असेच पुरुषांना सुधा वाटतं आणि हयात विरोध होण्याचा प्रश्नाचं नाही .
पण त्या अडून कोण्ही समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था ह्या ला सुरुंग लावत आसेल तर ते कदापि मान्य करण्या सारखं नाही ही व्यवस्था नष्ट करने खूप सोप आहे पण दुष्परिणाम दिसू लागल्यावर परत ती स्थापित करणे शक्य होणार नाही .आणि फक्त दुष्परिणाम च होतील आस माज स्पष्ट मत आहे .
व्यक्ती स्वतंत्र हा शब्द हल्ली सारखं ऐकायला मिळतो .त्या शब्दाचा अर्थ सोयीस्कर रित्या लावला जातो .
जे आर्थिक दृष्ट्या चांगल्या level आहेत तिथे घरातील काम नोकर ठेवून केली जातात .स्त्रिया त्या घरात काम करत नाहीत आणि पुरुष पण करत नाहीत पण ते मुलांची आणि आई वडिलांची जबाबदारी पण टाळत नाही आई वडील मध्ये आई ही ऐक स्त्री पण आस्ते वयस्कर लोकात फक्त पुरुष नसतात .इथे हे बात स्त्री पुरुषाच्या पलीकडे गेलेलं आसात आणि हेच व्यक्ती स्वतंत्र च स्तोंभ मजवणाऱ्या लोकांना दिसत नाही .
आता तर फक्त मुल होण्यासाठी पुरुष हवा आस करार करायचा आशि मत व्यक्त होत आहेत .
लग्न बंधनात न आडकता फक्त काही दिवसासाठी aiktra राहून नंतर जोडीदार बदलायचा परत करार परत जोडीदार बदलायचा .
कशा साठी बंधन नको म्हणून अासे आयुष्यात चार पाच जोडीदार बदले तर मुलांची भावनिक गरजा आर्थिक गरज कोणत्या नंबरची आई आणि कोणत्या नंबर cha वडील पूर्ण करेल .त्यांना मानसिक आधार नाही मिळाला तर मुल गुन्हेगारी विश्र्वा कडे का वळणार नाहीत ,( मुले ह्या मध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही आले )
पैसा कमविणे म्हणजे career karne he equation बरोबर आहे?
तस पण आता रोबोट च युग चालू झालं आहे आता माणसाची गरजच लागणार नाही गाडी चालवण्या पासून सेक्स पर्यंत सर्व रोबोट करतील स्त्री ला आणि पुरुषाला रोबोट सर्व सुख देईल पण मानवी प्रेम देवू शकणार नाही .

=)) फारच विनोदी आहात तुम्ही!

सुबोध खरे's picture

4 Feb 2019 - 9:41 am | सुबोध खरे

लग्न झाले की बंधन येतात

अधिकार ये जब से साजन का हर धड़कन पर माना मैंने

मैं जबसे उनके साथ बँधी, ये भेद तभी जाना मैंने

कितना सुख है बंधन में

रजनीगंधा फूल तुम्हारे...

मराठी_माणूस's picture

4 Feb 2019 - 11:45 am | मराठी_माणूस

ह्या विषया संबंधीत एक लेख

https://economictimes.indiatimes.com/wealth/plan/want-to-live-independen...

चांगला आहे तो लेख. मी वरती एका प्रतिसादात लिहले आहे
"जसेजसे स्त्रीशिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यची व्याप्ती वाढत जाईल तसतसे खरोखरच हुशार असणाऱ्या स्त्रिया लग्न करणार नाहीत, फक्त मुल जन्माला घालायचे आणि एकत्र वाढवायचा करार करतील." हे कमी प्रमाणात का होईना पण होताना दिसत आहे. आणि ते प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे.

सुबोध खरे's picture

7 Feb 2019 - 11:29 am | सुबोध खरे

फक्त मुल जन्माला घालायचे आणि एकत्र वाढवायचा करार करतील." हे कमी प्रमाणात का होईना पण होताना दिसत आहे.

फारच तुरळक प्रमाणात आणि ते सुद्धा हुच्चभ्रू लोकात आहे (बऱ्याचदा फॅशन म्हणून)

लग्न न करण्याचे प्रमाण म्हणालात तर मान्य पण लग्न ना करता मुलं जन्माला घालणं? फारच कमी

लग्न न करता मुल होवून देणे
लग्नच न करणे ही आधुनिक (समज आहे तसा ) विचार सरणी फक्त नोकरी करणारे उच्विद्याविभूषित मध्यम वर्ग फक्त समाविष्ट आहे ते ना गरीब आहेत ना श्रीमंत .
ना सुशिक्षित आहेत ना अशिशिक्षित आशाच समाजात आहेत .
अति श्रीमंत आणि गरीब परंपरा पाळून राहतात

विजुभाऊ's picture

7 Feb 2019 - 10:45 am | विजुभाऊ

सद्बुद्धी देणार्‍या त्या दिवसाचे स्वागतच होईल

मनाचा राजा's picture

17 Feb 2019 - 2:34 pm | मनाचा राजा

मस्त लिहिलेय.......

असे दिसून येते की येथील बहुतेक प्रतीक्रीया समाजातील पांढर पेशा नोकर वर्गा च्या/स्थिर उत्पन्न्ं गटा तील आहेत.
लग्न या विषयातील आर्थिक बाजू विचारात घेता तो स्त्री व पुरुष दोघांनाही पांढरा हत्ती,(पक्षी: अनावश्यक,खर्चिक,केवळदेखाव्यासाठी केलेली व नन्तर न परवडणारी तडजोड)असावी असे कायम स्वरूपी कोणालाही वाटतनाही.
व्यापार,शेती,उद्योग करणार्या व्यक्तींमधे लग्न ही स्त्री/पुरुष एवढ्या पुरती मर्यादीत बाब नसते.दोन कुटुंबातल्या संपत्ती चे वाटप,एकमेकांचे व्यापारी हित संबंध,जमीनीचे वाद सोडव न्याची तरतूद इत्यादी अनेक पैलू असतात.
त्याचा विचार करता वरील असंख्य प्रतिक्रियान्मधील मुद्दे हे गैर लागू ठरू शकतात.शे ती ,व्यापार आणी उद्द्योग क्षेत्र्रतील व्यक्तींच्या बाबतीत लग्न हा पांढरा हत्ती आहे का .नाही हे त्या त्या जोडीच्या मधेस्त्री चे शिक्षणआणी पुरुषाची कमाईया वर अवलम्बून असते असे माझे मत आहे.मिपा वरील जाणत्या नी अधीक प्रकाश टाकावा.