खजुराचे पौष्टीक लाडू

श्रीया's picture
श्रीया in पाककृती
16 Mar 2009 - 2:05 pm

नमस्कार मिपाकर खव्वयांनो,
मी एक पाककृती लिहीण्याचा पहिलाच आणि लहानसा प्रयत्न करत आहे, तरी त्यात काही कमी जास्त झाल्यास समजावुन घ्याल अशी आशा करते.

साहित्यः
पाव किलो खजूर,
अर्धी वाटी दाण्याचे कुट,
५० ग्रॅम काजु,
५० ग्रॅम बदाम,
५० ग्रॅम पिस्ते,
चिमुटभर केशर,
पाव वाटी गुलकंद
२-३ वेलदोड्यांची पुड स्वाद आणि सुवासाकरिता.

कृती:
सर्वप्रथम खजुरातील बिया काढून घ्याव्या. कढईमध्ये तूप गरम करुन सोललेले खजूर परतून घ्या. आता हे खजूर वेगळे काढा. थोडेसे काजू व पिस्ते बारीक काप करुन बाजुला काढून पुन्हा थोडं तूप गरम करुन उरलेले काजू, बदाम, पिस्ते खरपूस भाजून परतून घ्या.
हे भाजलेले जिन्नस गार झाल्यावर त्यात दाण्याचे कुट, वेलदोडा पुड घालुन मिक्सरमधुन बारीक करून घ्यावे. ह्या मिश्रणात गुलकंद मिसळून तुपाचा हात लाऊन त्याचे लहान लहान लाडु वळावेत. हे लाडू काजू-पिस्त्यांच्या कापामध्ये घोळवा.

टिपः
सगळे जिन्नस भाजून घातल्यामुळे लाडु भरपूर दिवस टिकतात.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

16 Mar 2009 - 2:07 pm | विनायक प्रभू

चांगले आहे. चांगले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2009 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.

अवांतर :- गुर्जी तुम्ही तिकडे लांब राहता, सहमत सहमत खेळल्याबद्दल धम्मु मला हाणायचा.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

16 Mar 2009 - 2:16 pm | अवलिया

सहमत

--अवलिया

विजुभाऊ's picture

16 Mar 2009 - 9:20 pm | विजुभाऊ

धम्याने तब्येत सुधारण्याचे बरेच मनावर घेतलेले दिसते आहे

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

कुंदन's picture

16 Mar 2009 - 2:13 pm | कुंदन

म्हणजे आता लाडु खाउन धम्या धष्ट पुष्ट होणार तर .....

विनायक प्रभू's picture

16 Mar 2009 - 2:18 pm | विनायक प्रभू

धम्या कसलेही लाडु खाल्ले तरी जन्मभर आहे तसाच रहाणार.
काय कुंदन भाऊ कसे कळत नाही
अहो हे लाडु अंमळ पौष्टीक आहेत.

सुनील's picture

16 Mar 2009 - 2:23 pm | सुनील

वर्णन वाचून चांगले रुचकर (आणि पौष्टिक) असणार हे दिसतेच आहे पण फोटू असता तर बरे झाले असते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निखिल देशपांडे's picture

16 Mar 2009 - 2:29 pm | निखिल देशपांडे

पण फोटू असता तर बरे झाले असते.
असेच म्हणतो....

श्रीया's picture

16 Mar 2009 - 2:33 pm | श्रीया

ह्यावेळी लक्षात नाही आलं, पुढ्च्या वेळी ऩक्की फोटो टाकेन.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Mar 2009 - 2:27 pm | घाशीराम कोतवाल १.२

धम्याची मज्जा आहे बुवा सकस आणी पौष्टीक आहार घेउन
धमु बाळ आता धष्ट्पुष्ट होणार
आरनाल्ड शिवाजीनगर सारखा
कसा अहो हा असा बघा बघा

टिपः
सगळे जिन्नस भाजून घातल्यामुळे लाडु भरपूर दिवस टिकतात.

व्यवस्तीत आहार आणी व्यायाम केल्याने माणुस खुप वर्ष असा धष्ट्पुष्ट राहु शकतो

हलकेच घ्या

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 2:54 pm | भडकमकर मास्तर

हा क्यालिफोर्नियातला लाडू चांगला आहे
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

16 Mar 2009 - 2:31 pm | आनंदयात्री

क्या बात है !! छान पाककृती ..

स्वगतः आता फडताळी हळुच उचकुन पहावी लागतील :)

नीलकांत's picture

16 Mar 2009 - 6:25 pm | नीलकांत

>>आता फडताळी हळुच उचकुन पहावी लागतील.

नीलकांत

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 2:39 pm | भडकमकर मास्तर

मस्त पाककृती...
फोटोची वाट पाहत आहे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मृगनयनी's picture

16 Mar 2009 - 2:47 pm | मृगनयनी

मस्तच हो वहिनीसाहेब! :)
(धम्याची तब्बेत सुधारणार आता! ;) ;) ;) )

:) :) :)

अजून येऊ देत....

--
नयनी -आत्या.

;) ;) ;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

आनंदयात्री's picture

16 Mar 2009 - 3:04 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो. सहमत आहे.

-
आंद्या-मामा

:) :) :)

पिवळा डांबिस's picture

16 Mar 2009 - 11:49 pm | पिवळा डांबिस

शहमत आहे. अग्दी अशेच मनतो.
अगं धमी, आता तूच मनावल घे गं बाई!
अगं आता फाल दिवस नाही लाहिले आम्चे!
लवकल काय ते होऊन जाऊदे!!!:)
(ह. घ्या)

-पिडां-आजोबा
(कवळी काधून ठेवली आहे....)

श्रीमंत दामोदर पंत's picture

16 Mar 2009 - 3:13 pm | श्रीमंत दामोदर पंत

असंच म्हणतो वहिनी सरकार.....

दाम्या काका / मामा

( तुम्हाला जे योग्य वाटेल ते ;) )

सहज's picture

16 Mar 2009 - 2:50 pm | सहज

लाडू आवडले. फोटू काढायच्या आत धम्याने फस्त केले का सगळे लाडू?

महेश हतोळकर's picture

16 Mar 2009 - 2:58 pm | महेश हतोळकर

तरी म्हणलं शिकारकथा अर्धवट का राहिली!

जागु's picture

16 Mar 2009 - 3:10 pm | जागु

मी ह्या लाडुमध्ये सुक्या खोवर्‍याचा किस भाजुन घालते. खुप छान लागतात हे लाडू. लहान मुलांना ह्याचे काडी लाऊन लॉलीपॉपही करुन देता येतात.

श्रीया's picture

16 Mar 2009 - 3:45 pm | श्रीया

खोबर्‍याचा किसही घालतात हे नव्हतं ठाऊक. आता तोही घालुन लाडू करुन पाहीन.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2009 - 3:12 pm | बिपिन कार्यकर्ते

लाडू वगैरे म्हणलं की अंमळ भिती वाटते. म्हणून खव मधे गुपचूप खरडलं आहे.

बिपिन कार्यकर्ते

श्रीया's picture

16 Mar 2009 - 3:18 pm | श्रीया

काय म्हणताय दामोदर भावजी, कोणाशी सहमत आहात तुम्ही.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2009 - 5:05 pm | प्रकाश घाटपांडे

रेशिपी मदी अजुन यक घाला. उलिसाक डिंक(बाभळीचा) साजुक तुपात तळून घ्या. तो बी त्याच्यात घाला . 'कसर' भरुन निघतीया.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

रेवती's picture

16 Mar 2009 - 5:57 pm | रेवती

पाकृ नविनच आहे. पौष्टीक आहे त्यामुळे मुलासाठी करून पाहीन.
एक शंका: खजूर चिरून, सोलून घेताना चिकट होत नाही का?

रेवती

शितल's picture

16 Mar 2009 - 6:50 pm | शितल

धमे,
पौष्टीक पाककृती दिली आहेस, नक्की करून बघेन,लहान मुले ज्यांच्या घरी आहेत त्यांच्यासाठी तर अगदी उपयोगी आहे. :)
काही झाले तरी न चुकणारी रेसिपी आहे.. ;)
धन्यवाद वहिनी सरकार. :)

प्राजु's picture

16 Mar 2009 - 9:45 pm | प्राजु

होतीलच लगेच आमच्याकडे.
अगं.... तो धम्या झाला का गं जरातरी जाड?? कारण माझा लेकही धम्याच्याच पंक्तीत बसणारा आहे. धम्या जाड झाला तर लेकाला रोज २-२ घालेन खायला म्हणते. :)
बाय द वे फोटो टाक ना. वाट पहाते आहे. :)
रेसिपी मात्र उत्तम. आणि हो.. रेवतीताईंतर्फे मी तुझं "मिपा सुगरण" या गटात स्वागत करते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

17 Mar 2009 - 5:12 am | रेवती

काय ग हे?
तूही आहेस की सुगरण गटात!;)
(सुगरण म्हटलं की मला सुरणाचा कंद असल्यासारखं वाटतं.)

रेवती

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2009 - 2:56 pm | प्रभाकर पेठकर

प्राजु,

अगं.... तो धम्या झाला का गं जरातरी जाड??
बाय द वे फोटो टाक ना.

फोटो कोणाचा? धम्याचा? की लाडवांचा?

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

समिधा's picture

16 Mar 2009 - 11:32 pm | समिधा

लहान मुलांसाठी खुपच छान आहे.

धमाल मुलगा's picture

17 Mar 2009 - 10:36 am | धमाल मुलगा

आयला,
ह्या धाग्यावर तर मंडळीनी लाडवांच्या आधारानं माझ्याच रेवड्या उडवल्यात की :)

चालु द्या..चालु द्या!

बाकी मंडळी, तुमचं हे प्रेम पाहुन आम्ही भारावून गेलो आहोत. असेच मनापासून प्रेम करा आणि हसत खेळत रहा. :)

स्वानुभवः उपरोक्त खजूराचे लाडू खाल्ले असता, लाटण्याचे फटके फारसे जोरात लागत लागत नाहीत ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 10:56 am | घाशीराम कोतवाल १.२

धम्याचा स्वानुभ लय भारी राव
स्वानुभवः उपरोक्त खजूराचे लाडू खाल्ले असता, लाटण्याचे फटके फारसे जोरात लागत लागत नाहीत

=)) =)) =)) =))

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

छोटा डॉन's picture

17 Mar 2009 - 11:32 am | छोटा डॉन

>>बाकी मंडळी, तुमचं हे प्रेम पाहुन आम्ही भारावून गेलो आहोत. असेच मनापासून प्रेम करा आणि हसत खेळत रहा.
हा हा हा ...
म्हणुन आम्हाला धमालरावांच्या जिंदादीलीचे नेहमीच कौतुक व अभिमान वाटत आला आहे ...
पण मज्जा आणली लेकोहो ...

>>स्वानुभवः उपरोक्त खजूराचे लाडू खाल्ले असता, लाटण्याचे फटके फारसे जोरात लागत लागत नाहीत
बापरे ... डायरेक्ट पोल खोल ?
वहिनीसाहेब, वाचताय ना ?

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

ऋचा's picture

17 Mar 2009 - 11:19 am | ऋचा

अरे वा!!
आता धम्याच्या हाडात ताकद येण्णार.....

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आनंदयात्री's picture

17 Mar 2009 - 12:17 pm | आनंदयात्री

प्रकाटाआ

आंबोळी's picture

17 Mar 2009 - 12:15 pm | आंबोळी

बेष्ट...

लाडूच्या फोटो बरोबर कसे खावेत याचे ही कृती द्या... म्हणजे हे लाडू विशिष्ठ पद्धतीने टेबलावर पाय ठेउन खावेत... अंगाला चांगले लागतात ... वगैरे वगैरे.... जमल्यास तश्या पोझ मधील लाडू खातानाचा फोटू ही टाका....

प्रो.आंबोळी

विनायक प्रभू's picture

17 Mar 2009 - 12:18 pm | विनायक प्रभू

बायकोला सांगीतली ही रेसीपी.
कॉण गुरवार आसा? (कोण गर्भार आहे)
पहीला प्रश्न.
आता काय बोलणार बॉ?

स्वाती राजेश's picture

17 Mar 2009 - 5:24 pm | स्वाती राजेश

पाककृती दालनात स्वागत!!
सहज करता येणारी आणि पौष्टीक सुद्धा!
खूप दिवस टिकतात त्यांमुळे भरपुर करून ठेवत येतात..मुलाच्या डब्याला अतिशय छान पदार्थ आहे...

धम्याला जाड करायचे बरेच मनावर घेतलेस! बरा सापडला आता तावडीत बायकोच्या! इतके दिवस पळत होता, सोडू नको आता.:)

बाकी आणखी येऊ देत रेसिपी.

श्रीया's picture

17 Mar 2009 - 9:12 pm | श्रीया

सर्वांचे आभार. माझा हा पहिलाच प्रयत्न सर्वांनी सांभाळून घेतला ह्याबद्दल धन्यवाद.

रेवतीताई,
>>एक शंका: खजूर चिरून, सोलून घेताना चिकट होत नाही का?
जरा होतात, पण थोडं हाताला तुप लावायचं आणि मग चिरायचा किंवा सुरीला तुप लावुन मग कापले तरी चालतील, कारण आपण मिक्सर मधुन बारीक करणार आहोत ना :)

शितलताई,
>>धन्यवाद वहिनी सरकार.
वहिनी सरकार काय अगं? मी किती लहान आहे तुझ्यापेक्षा.

प्राजुताई,
सुगरणगटात मला सहभागी करुन घेतल्याबद्दल आभारी आहे. :)
>>धम्या जाड झाला तर लेकाला रोज २-२ घालेन खायला म्हणते.
मी आत्ताच केलेत लाडू. सध्या प्रयोग चालु आहेत. तूच रिझल्ट्स दे बाई.

स्वातीताई,
मी काय आणखी रेसिपी देणार? तुमच्या सगळ्यांकडूनच शिकत आहे सध्या. तुमच्यासारख्या अन्नपुर्णा व्हायला बराच वेळ आहे अजुन.
>>बरा सापडला आता तावडीत बायकोच्या! इतके दिवस पळत होता, सोडू नको आता
तू ओळखतेसच ना त्याला. माझ्या हातात सापडणारा आहे का तो?