मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खजुराचे पौष्टीक लाडू

श्रीया · · पाककृती
नमस्कार मिपाकर खव्वयांनो, मी एक पाककृती लिहीण्याचा पहिलाच आणि लहानसा प्रयत्न करत आहे, तरी त्यात काही कमी जास्त झाल्यास समजावुन घ्याल अशी आशा करते. साहित्यः पाव किलो खजूर, अर्धी वाटी दाण्याचे कुट, ५० ग्रॅम काजु, ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम पिस्ते, चिमुटभर केशर, पाव वाटी गुलकंद २-३ वेलदोड्यांची पुड स्वाद आणि सुवासाकरिता. कृती: सर्वप्रथम खजुरातील बिया काढून घ्याव्या. कढईमध्ये तूप गरम करुन सोललेले खजूर परतून घ्या. आता हे खजूर वेगळे काढा. थोडेसे काजू व पिस्ते बारीक काप करुन बाजुला काढून पुन्हा थोडं तूप गरम करुन उरलेले काजू, बदाम, पिस्ते खरपूस भाजून परतून घ्या. हे भाजलेले जिन्नस गार झाल्यावर त्यात दाण्याचे कुट, वेलदोडा पुड घालुन मिक्सरमधुन बारीक करून घ्यावे. ह्या मिश्रणात गुलकंद मिसळून तुपाचा हात लाऊन त्याचे लहान लहान लाडु वळावेत. हे लाडू काजू-पिस्त्यांच्या कापामध्ये घोळवा. टिपः सगळे जिन्नस भाजून घातल्यामुळे लाडु भरपूर दिवस टिकतात.

वाचन 14934 प्रतिक्रिया 0