शतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :
लेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.

-साहित्य संपादक

धाबा स्टाईल चिकन

Primary tabs

जागु's picture
जागु in पाककृती
15 Jan 2019 - 4:10 pm

नेहमीच पारंपारीक चिकनपासून थोड वेगळ काहीतरी करू म्हणून आंतरजालावर चिकनच्या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा धाबा स्टाईल चिकन ची रेसिपी दिसली. मुळ रेसिपीत मला पटले ते बदल करून खालील रेसिपी केली आहे.

साहित्यः
१ किलो चिकन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे
पाव वाटी दही
२ मोठे कांदे चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचून
हिंग पाव चमचा
हळद १ चमचा
२ -३ टोमॅटो मिस्करमध्ये फिरवून
२-३ मध्यम बटाटे मोठ्या फोडी करुन
लाल तिखट किंवा रोजच्या वापरातला मसाला ४-५ चमचे किंवा आपल्या आवडी नुसार
पाव वाटी बेसन (तव्यावर खमंग भाजून)
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धणे पावडर
खडा मसाला ल३-४ दालचिनीचे तुकडे, ४-५ लवंगा, ७-८ काळी मिरी, १ मोठी वेलची (बडी वेलची किंवा काळी वेलची), १ जायपत्री, तमालपत्र ३-४
चविनुसार मिठ
फोडणीसाठी तेल

१)

२)

चिकनला आल, लसुण,मिरची कोथिंबीरची केलेली पेस्ट, दही आणि हिंग हळद चोळून ठेवा.
३)

भांड्यात तेल गरम करुन त्यावर लसुण फोडणीला देऊन, खडा मसाला घाला व कांदा घालून त्याला गुलाबी रंग येई पर्यंत परता. आता ह्यात टोमॅटोची प्युरी घाला आणि ढवळून घ्या.
४)

हिंग, हळद, मसाला, भाजलेल बेसन हे सगळ भांड्यातील मिश्रणावर टाका. व चांगले परतून घ्या.
५)

आता ह्यावर चिकन व बटाट्याच्या फोडी घाला आणि गरजेनुसार पाणी घालून शिजत ठेवा. बटाट्याच्या फोडी शिजल्या की चिकनही शिजत. चिकन शिजल की त्यात मिठ, धणा पावडर व गरम मसाला टाका आणि परतून पुन्हा एक वाफ येऊद्या.
६)

वरून थोडी कोथिंबीर पसरा. तर अशा प्रकारे तयार झाले धाबा स्टाईल चिकन.
७)

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

15 Jan 2019 - 6:54 pm | प्रसाद_१९८२

चिकन आवडले.
--
चिकन मधे भाजलेल बेसन टाकण्यापाठी काय लॉजिक आहे.

बाप्पू's picture

15 Jan 2019 - 7:53 pm | बाप्पू

सुंदर फोटो .. तो पा सु...
पण बटाटे आणि बेसन टाकण्याचे प्रयोजन समजले नाही ..

बटाटे पुरवठा म्हणुन तसेच लहान मुलांना खाण्यासाठी तसेच बटाटे मटण किंवा चिकन मधे टेस्टी लागतात. खोब-या वाटणा ऐवजी बेसन वापरतात दाटपणा येण्यासाठी.

पैलवान's picture

16 Jan 2019 - 7:57 am | पैलवान

बटाटा टाकून ती कोंबडी बाटणार नाही का!

हा हे लक्षात नाही आल कोंबडी बाटेल ते हाहा :))

हा हे लक्षात नाही आल कोंबडी बाटेल ते हाहा :))

लसूण वापरत आहात तर् रेसिपीत हिंगाचे प्रयोजन समजले नाही !

हिंग आमच्या तिखटाच्या प्रत्येक पदार्थात असते.

बाप्पू's picture

16 Jan 2019 - 11:05 pm | बाप्पू

अरे हां. आणखी एक विचारायचे राहिले जागुतै..
हिंग - याचा वापर खरेच गरजेचा असतो का? मागे एकदा मासे फ्राय करताना वापरला. पण चव बिघडली आणि नंतर हिंगाचे ढेकर यायला लागले. जास्त हिंग झाल्यामुळे असे झाले का??
हिंग ला दुसरा पर्याय काय??

mrcoolguynice's picture

17 Jan 2019 - 10:48 am | mrcoolguynice

लसणाचा फ्लेवर मीमीक करण्यासाठी जैन मुनी हिंगाचा वापर करीत असत. कारण लसूण वर्ज्य ...
म्हणूनच मी वर त्या अर्थीची माझी शंका उपस्थित केलेली .

हिंग चिमुटभरच टाकायचे असते पदार्थाचे प्रमाण जास्त असेल तर पाव चमचा खुप होते.