नेहमीच पारंपारीक चिकनपासून थोड वेगळ काहीतरी करू म्हणून आंतरजालावर चिकनच्या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा धाबा स्टाईल चिकन ची रेसिपी दिसली. मुळ रेसिपीत मला पटले ते बदल करून खालील रेसिपी केली आहे.
साहित्यः
१ किलो चिकन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे
पाव वाटी दही
२ मोठे कांदे चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचून
हिंग पाव चमचा
हळद १ चमचा
२ -३ टोमॅटो मिस्करमध्ये फिरवून
२-३ मध्यम बटाटे मोठ्या फोडी करुन
लाल तिखट किंवा रोजच्या वापरातला मसाला ४-५ चमचे किंवा आपल्या आवडी नुसार
पाव वाटी बेसन (तव्यावर खमंग भाजून)
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धणे पावडर
खडा मसाला ल३-४ दालचिनीचे तुकडे, ४-५ लवंगा, ७-८ काळी मिरी, १ मोठी वेलची (बडी वेलची किंवा काळी वेलची), १ जायपत्री, तमालपत्र ३-४
चविनुसार मिठ
फोडणीसाठी तेल
१)
२)
चिकनला आल, लसुण,मिरची कोथिंबीरची केलेली पेस्ट, दही आणि हिंग हळद चोळून ठेवा.
३)
भांड्यात तेल गरम करुन त्यावर लसुण फोडणीला देऊन, खडा मसाला घाला व कांदा घालून त्याला गुलाबी रंग येई पर्यंत परता. आता ह्यात टोमॅटोची प्युरी घाला आणि ढवळून घ्या.
४)
हिंग, हळद, मसाला, भाजलेल बेसन हे सगळ भांड्यातील मिश्रणावर टाका. व चांगले परतून घ्या.
५)
आता ह्यावर चिकन व बटाट्याच्या फोडी घाला आणि गरजेनुसार पाणी घालून शिजत ठेवा. बटाट्याच्या फोडी शिजल्या की चिकनही शिजत. चिकन शिजल की त्यात मिठ, धणा पावडर व गरम मसाला टाका आणि परतून पुन्हा एक वाफ येऊद्या.
६)
वरून थोडी कोथिंबीर पसरा. तर अशा प्रकारे तयार झाले धाबा स्टाईल चिकन.
७)
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास !
चिकन आवडले.
--
चिकन मधे भाजलेल बेसन टाकण्यापाठी काय लॉजिक आहे.
सुंदर फोटो .. तो पा सु...
सुंदर फोटो .. तो पा सु...
पण बटाटे आणि बेसन टाकण्याचे प्रयोजन समजले नाही ..
बटाटे पुरवठा म्हणुन तसेच लहान
बटाटे पुरवठा म्हणुन तसेच लहान मुलांना खाण्यासाठी तसेच बटाटे मटण किंवा चिकन मधे टेस्टी लागतात. खोब-या वाटणा ऐवजी बेसन वापरतात दाटपणा येण्यासाठी.
बटाटा!!???!!!??
बटाटा टाकून ती कोंबडी बाटणार नाही का!
हा हे लक्षात नाही आल कोंबडी
In reply to बटाटा!!???!!!?? by तुषार काळभोर
हा हे लक्षात नाही आल कोंबडी बाटेल ते हाहा :))
हा हे लक्षात नाही आल कोंबडी
In reply to बटाटा!!???!!!?? by तुषार काळभोर
हा हे लक्षात नाही आल कोंबडी बाटेल ते हाहा :))
लसूण वापरत आहात तर् रेसिपीत
लसूण वापरत आहात तर् रेसिपीत हिंगाचे प्रयोजन समजले नाही !
हिंग आमच्या तिखटाच्या
In reply to लसूण वापरत आहात तर् रेसिपीत by mrcoolguynice
हिंग आमच्या तिखटाच्या प्रत्येक पदार्थात असते.
अरे हां. आणखी एक विचारायचे
अरे हां. आणखी एक विचारायचे राहिले जागुतै..
हिंग - याचा वापर खरेच गरजेचा असतो का? मागे एकदा मासे फ्राय करताना वापरला. पण चव बिघडली आणि नंतर हिंगाचे ढेकर यायला लागले. जास्त हिंग झाल्यामुळे असे झाले का??
हिंग ला दुसरा पर्याय काय??
लसणाचा फ्लेवर मीमीक
In reply to अरे हां. आणखी एक विचारायचे by बाप्पू
लसणाचा फ्लेवर मीमीक करण्यासाठी जैन मुनी हिंगाचा वापर करीत असत. कारण लसूण वर्ज्य ...
म्हणूनच मी वर त्या अर्थीची माझी शंका उपस्थित केलेली .
हिंग चिमुटभरच टाकायचे असते
In reply to अरे हां. आणखी एक विचारायचे by बाप्पू
हिंग चिमुटभरच टाकायचे असते पदार्थाचे प्रमाण जास्त असेल तर पाव चमचा खुप होते.
हिंग...
In reply to अरे हां. आणखी एक विचारायचे by बाप्पू
हिंगाचा मसाल्यातील उपयोग हा पोटात गॅस धरू नये ह्यासाठी असतो.
चवीसाठीही वापरला जातो. हिंग जास्त झाल्यास कडवट चव येते. तो अगदी चिमुटभर असावा. सर्वसाधारणपणे शेंगदाण्याच्या आकाराइतका वापरावा.