कधी कधी एवढ्या सगळ्या हिंदू पद्धती आणि देवतांचा हिंदूंनाही कंटाळा येतो की नाही, आणि ते ३३ कोटी देवतांचे तर भयंकर प्रकरण आहे. खासकरुन ज्यांना अहिंदू म्हणून रहायचे म्हणून हिंदू पद्धती आणि देवतां पासून कटाक्षाने दूर रहायचे तर त्यासाठी काय काय करावे ? याचे या उतार्यात काही उपाय सुचवले आहेत पण यातील काही देवतांपासून दूर रहाण्याचे प्रकार कायदा आणि आप्त स्वकीयांच्या अनुमतीने वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय सल्ल्याने आणि स्वजबाबदारीवर करावेत. धागा लेखकाचा उत्तरदायीत्वास नकार लागू आहे. हिंदूधर्मीय संकल्पनांबद्दलच्या अज्ञानातून डोळे झाकून होणार्या टोकाच्या अपप्रचाराला उत्तर देणारा हा लेख उपरोधिक आहे हे.वे.सा.न.ल.)
फुले आणि वस्त्र जेजे सुवासिक तसेच स्वादीष्ट मिष्ठान्न ते ते टाळावेत ते हिंदू देवतांना अर्पण करण्यासाठी वापरले जातात. सर्वदा मौनव्रतात रहावे कारण 'वाक' हि ऋग्वेदीय देवता आहे विशेषतः असंख्य (भाषिक) वर्णांचे उच्चारण मनातपण येऊ नयेत कारण अनेक पुजांमध्ये अनेक वर्णोच्चार वापरले गेले आहेत. कर्म आणि ज्ञान या हिंदू योग पद्धती आहेत, सत्य आणि परमेश्वराचे नातेही जवळचे आहे त्या पासून दूर रहावे. बरेच हिंदू त्यांच्या दिवसाची सुरवात 'कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती आणि हाताच्या मूळाशी ईश्वर आहे म्हणत करतात म्हणून हातांचा वापर टाळावा . विशेषतः सकाळी स्वतःच्या हातांकडे बघू सुद्धा नये त्यात चुकून हिंदू देवता दिसल्या तर तुमची अहिंदू धर्मीयता भ्रष्ट होऊ शकते. बुद्धी आणि विद्यांच्याही देवता असतात त्यांपासून दूर रहाणेही उत्तम. आपण अहिंदू असल्यास आपापल्या धर्मातील जे जे चांगले असेल आणि आपापल्या देवता आणि ज्ञान ते ते ही टाळावे लागेल कारण हिंदूंचा ऋग्वेद एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति असे काही तरी म्हणतो.
अध्यात्मिकच नव्हे तर सर्व पुस्तकांपासूनही दूर रहावे कारण त्यात सरस्वतीचा वास असू शकतो विशेषतः बुक्स ऑफ अकाउंट टाळावेत पैसा, सोने आणि झाडू आणि स्वच्छता उपकरणे वापरु नयेत साक्षात लक्ष्मीचे रूप असतात. पत्नीही लक्ष्मी स्वरुप म्हणून पत्नीचा, पती परमेश्वर म्हणून पतीचा त्याग करावा लागेल. काम हि सुद्धा देवता म्हणून कोणत्याही स्वरुपातील कामुक भावना आणि लैंगिकतेचा त्याग करावा लागेल. अहिंदूंनी मद, मोह, मत्सर लोभ आणि क्रोध यांचा मात्र अंगिकार करावा कारण हिंदूना त्यांचा त्याग करण्याचे ध्येय दिलेले असते.
तसे तर संपूर्ण सजीव सृष्टी पण विषेषतः अनेक प्राणी जसे सिंह हत्ती गाय बैल ते साप आणि उंदीर आणि अनेक वनस्पतीं जसे तुळस, उंबर , पिंपळ, वड यांच्या आत किंवा सोबत हिंदू देवतांचा वास असू शकतो, (आणि जिथे देवता नसतील तर हिंदु भूतेही असू शकतात पण पुढे महाभूतांची नावे येणार आहेत तेव्हा हिंदू भूतांपसून दूर रहाण्याचा तेवढा प्रश्न येणार नाही).
आकाशातील सप्तर्षींपासून दूर रहावे, नवग्रहांपासून दूर रहावे विशेषतः चंद्र आणि सुर्यप्रकाश टाळावा. (पारंपारीक असोत वा आधुनिक सर्वच दिव्यांचा प्रकाश टाळावा कारण हिंदू अगदी लाईट बल्ब ट्यूबलाईट लावला तरी नमस्कार करतात) सकाळ पहाट म्हणजे उषा देवता म्हणून पहाटेचा अनुभव घेऊ नये. डोक्यावर छत असेल असा कोणताही आश्रय घेऊ नये कारण छत असलेल्या जागेत वास्तू नावाची देवता वास करते. जंगलातही राहू नये कारण जंगलात अरण्यानी नावाची ऋग्वेदीय देवता वास करत असते. ढगाखाली किंवा पाऊसातही थांबू नये त्यांच्याही हिंदू देवता असतात.
पंच महाभूतांपासून दूर रहाण्यासाठी आकाशातून संचार करु नये (म्हणजे विमान प्रवास टाळावा तसे पहाता पुर्वी वाहन म्हणून प्राणी आणि आधूनिक जगात आधूनिक अॅटोमॅटीक वाहनांचीही हिंदू पुजा करताना दिसतात त्यामुळे अहिंदूंनी सर्वप्रकारच्या वाहनांचा त्याग करावा हे. वे सा.न.ल.), पाणि हा पंच महाभूतातील महत्वाचा घटक आहे त्याचे प्राशन अथवा स्नान नक्की नाकारावे. चुकून स्नान केले तरी नद्यांची नावे आठवू नयेत नद्यांचे दर्शन घेऊ नये हिंदू नद्यांना देवता समान मानतात. अग्नि जठरातला किंवा बाहेरचा दोंन्हींचा उपयोग वर्ज्य असावा. बाकी अजून तीन महाभूतांचा विचार पुढे करु.
तत्पुर्वी ईतर सर्व मानवप्राण्यांपासून दूर रहावे कारण इश्वरीय वास कोणत्याही ते प्रत्येक माणसात असु शकतो, अतिथींना नो एंट्रीचा बोर्ड लावावा, विशेषतः कुणासही गुरु शिक्षक करु नये असल्यास लगेच त्यागावे तसेच स्वतःचे माता पिता यांचा त्याग करावा, लहान मुलांपासूनही दूर रहावे. पृथी इश्वरी आणि पंचभाभूतीय माता आहे हिंदू संकल्पनेचा अपमान करण्यासाठी पृथ्वीवर तुम्ही चालू शकता पण पृथ्वी मातेच्या कुशीत झोपण्याची स्वतःस अनुमती चुकुनही देऊ नका. पृथ्वी प्रमाणेच देश सुद्धा अन्नदाता आहे, देशाच्या कल्पनेची तुलनाही मातृदेवतेशी करु लागले आहेत म्हणून देशावर प्रेम करणे टाळावे. आता एवढे व्यवस्थित जमले असेल तर अन्नत्याग करावा विशेषतः अन्न शिजवले जाण्यासाठी अजून दोन दोन हिंदू देवतांची मदत घ्यावी लागते म्हणून शिजवलेले अन्न पूर्णतः वर्ज्य असावे. पण वायू अशी देवता आहे जिच्या पासून दूर रहाण्यासाठी स्वतःचा श्वासोश्वास थांबवण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे त्या आधी खरेच अहिंदू व्हायचे आहे ना याचा विचार करावा पण उपरोकत पैकी काहीही करुन प्राण त्यागही होऊ देऊ नका कारण खासकरुन प्राणत्याग केला किंवा झाला तरी त्यासाठी यम या हिंदू देवतेकडे आधी पोहोचावे लागते आणि नास्तिक अथवा परधर्मीय असाल तरी हिंदू परमेश्वरापाशी पोहोचण्याची मोठीच शक्यता असू शकते -कारण देवाला तुमच्या पुण्यकर्माशी देणे घेणे आहे - त्यात पुन्हा पितर-अतिथी म्हणून पुढच्या पिढीत कुणि हिंदू होऊन जेवणे घालणार नाहीत याचीही खात्री नसते.
आता यात आता पर्यंत डझनपण देवता मोजलेल्या नाहीत अजून काही आमचे मिपाकर मंडळी सुचवतील अजून ३२ कोटी+च्या वरुन देवता शिल्लक आहेत म्हणून हिंदू देवतांपसून दूर रहाण्यासाठी अटोकाट प्रयत्न चालू ठेवा पण हिंदू देवतांपासून पूर्ण दूर रहाता येण्याची खात्री झाल्या शिवाय या लेखात लिहिले असले तरीही अनाठायी जोखीम घेऊ नकाच. त्यापेक्षा तुमच्या स्वतः इश्वराचा वास असू शकतो असेही हिंदू धर्म म्हणतो जमल्यास त्याची अनुभूती घेण्याचा प्रयास करा.
पण एवढे अवघड असूनही हिंदू संत जो जे वांछिल तो ते लाहो असे ही सांगतात त्यामुळे ज्यांना हिंदू पद्धती आणि देवतां पासून दूर जायचे आहे त्यांना त्यांचा मार्ग मिळो हि शुभेच्छा.
* लेखनाचा हेतू कुणाच्याही भावना दुखावणे नाही आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
* स्वजबबदारीवर लेखन वापर करण्यास कॉपीराईट मुक्त
* आमचे इतर काही मिपा लेख
** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
** श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?
** ऋग्वेदातील सुविचार
प्रतिक्रिया
23 Nov 2018 - 8:29 am | सुनील
माहितगार यांच्या अनाकलनीय लेखांपासून दूर राहण्यासाठी काय करावे?
(मनमोकळा) सुनील
23 Nov 2018 - 8:55 am | माहितगार
माहितगार शब्द असलेल्या लेख आणि प्रतिसादांपासून दुर रहाण्याचा साधा सोपा उपाय उपलब्ध आहे. गुगल शोध यंत्राचा प्रगत उपयोग करावा जमल्यास नको असलेले शब्द टाळणारी शोध प्रणाली विकसित करावी.
मनमोकळ्या प्रतिसादाला धन्यवाद देणारा मनमोकळा माहितगार
23 Nov 2018 - 8:55 am | अथांग आकाश
ख्खिक!

23 Nov 2018 - 11:58 am | किसन शिंदे
हा लेख खरेच सिरियस आहे काय?
23 Nov 2018 - 12:12 pm | माहितगार
हिंदू धर्माचा व्यवस्थित परिचय नसलेले अहिंदू विशेषतः अहिंदू धर्मीय काही टोकाचे प्रचारक / टिकाकार ज्या ज्या गोष्टी हिंदू करतात त्या त्या टाळण्या बद्दल डोळे झाकुन अती-आग्रही टोकाच्या भूमिका घेताना दिसतात . त्यांच्या दृष्टीकोणाच्या मर्यादा लक्षात आणून देणे हा लेखाचा उद्देश्य आहे.
अहिंदू धर्मीय काही टोकाचे प्रचारक / टिकाकार यांच्याकडून हिंदू धर्मीय परंपरा समजून भारतीय सांस्कृतिक गोष्टींचाही विरोध होताना दिसतो त्या बद्दल धर्म आणि संस्कृती यांची गल्लत टाळण्या बाबत माझा एक लेख मागे येऊन गेला आहे.
लेख उपरोधीक असला तरी उद्देश्य सकारात्मक आहे. लेखाचा उद्देश्य कुणाच्याही भावना दुखावणे नाही. लेखाचा सकाराम्तक उद्देश्य लक्षात आला असेल तर त्या अनुषंगाने सुधारणा सुचनांचे स्वागत असेल.
23 Nov 2018 - 11:47 pm | रविकिरण फडके
जसा हा लेख उपरोधिकपणे लिहिला आहे तशीच शुद्धलेखनाचीही मोडतोड मुद्दामच केली आहे का आपण?
(तसे नसेल तर) आपणच आपल्या भाषेची कदर केली नाही तर अन्यांनी ती करावी ही अपेक्षा अनाठायी होईल, नाही का?
पुनश्च क्षमस्व.
ता. क.
'कोटी' म्हणजे प्रकार या अर्थाने तो शब्द मुळात वापरला गेला. तेहेतीस प्रकारचे देव. 'तेहेतीस कोटी देव' हा त्याचा भ्रष्ट अवतार/ समजूत होय.
24 Nov 2018 - 8:56 am | माहितगार
इतरांच्या समजूतींना भ्रष्टतेचा शिक्का मारणे हि इब्राहमीक अरबी संस्कृती आहे तीचा आम्ही निषेध करतो. खरे म्हणजे ३३ नाही ३३ कोटी नव्हे किती जणांना देवत्व द्यावे यावर आणि म्हणून देवत्वाच्या प्रकारांवरही मर्यदा असू शकत नाही. हिंदूंना मुर्तीपूजा आणि अनेकेश्वरवादाचे समर्थनात एकतर अद्वैतामुळे नीटशी स्वतःचीच श्रद्धा नसते किंवा उगाचच अपराधीत्वाची भावना असते अशा अपराधी भावनेतून कशानुशा स्वरुपाच्या समर्थनाच्या भाकडपद्धती निवडल्या जातात. देवता आणि देवतांचे प्रकारही अनंत असतात सांगा की ठणकावून लाजता कशा पायी.
बाकी मराठी लेखनाचे म्हणाल तर माहितगार लिहीतो ते प्रमाण लेखन असते . मी लिहितो त्यानुसार इच्छूक वाचकांनी आणि व्याकरणकारांनी त्यांचे व्याकरण बदलून घ्यावे . या विषयावर माहितगारशी नाद करायचा नसतो हे एव्हाना बहुसंख्य मिपाकरांना माहित आहेच पण आपल्या सारख्या चुकल्या माकाल्यांना ठणकावून सांगावे लागते त्या बद्दल क्षमस्व.
24 Nov 2018 - 1:19 pm | विजुभाऊ
जाउ द्या हो. फडकेसाहेब.
का उगा टंकणी शिणवताय
24 Nov 2018 - 1:22 pm | माहितगार
जिथे मुद्दे खोडता येत नाहीत तेथे पिंका टाकणे चालू होते.
24 Nov 2018 - 10:23 am | कंजूस
तुम्ही घाबरात तर कोणताही धर्म त्रासदायक होतो.
धर्माचे एजंट तुम्हास सुखाने जगू देत नाहीत.
आणि तिसरे सरकारनेही पुरपुरुष/स्त्री/ इतर असा पर्याय मान्य केला तसा धर्म /निधर्म हेसुद्धा आणावे. मेल्यावर जाळण्यासाठी निधर्मींना जागा करून दिल्यास कोणाचाच त्रास होणार नाही.
24 Nov 2018 - 12:10 pm | माहितगार
कंजूसजी प्रश्न केवळ घाबरणे नघाबरणे असा नाही. घाबरण्याबद्दल विषय काढला तर आवश्यकता न तपासताच शक्तीप्रदर्शनाची भाषा सुरु होण्याचा संभव असतो. मुख्य प्रतिपक्षाच्या युक्तीवादाचा प्रतिवादाची सुयोग्य मांडणी मागे पडण्याचा संभव असतो.
प्रतिपक्षाचे युक्तिवाद काय असतात या बाबतच्या तौलनिक धर्मशास्त्रीय आणि सांस्कृतिक मांडण्यांकडे हिंदू धर्मीयांचे शतकोंशतके दुर्लक्ष होत राहीले आहे. प्रतिपक्षाची मांडणी काय आहे हेच ठाऊक नसेल अशा स्थितीत एकतर स्वपक्षाची वैचारीक मांडणीच होत नाही किंवा जी काही होते ती कच्ची आणि थातूरमातूर होते. स्वपक्षाच्या अयोग्य त्याज्य परंपरांना कवटाळण्याचे आणि जोपासना करण्या जोग्या परंपरांचाही वैचारीक बचाव न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा हिंदू धर्मीय करत आले आहेत.
मग राम कदमच्या दहिहंडीच्या कार्यक्रमात इर्मान ह्श्मी राम कदम बोलतो आहे त्यापेक्षा वेगळी वाक्य बोलतोय किंवा सध्या काँग्रेसचा एक त्यागी नावाचा कुणि नेता टिव्ही डिबेट मध्ये स्वतः अल्ला हु अकबर म्हणून दाखवतो पण त्याच्या सोबतचा काँग्रेसी मुल्ला जय श्रीराम म्हणण्याचे टाळून त्यागीला आस्यास्पद बनवतो. कुठे सुर्य नमस्कार आणि योगासनांना हिंदू धर्मीय आहे म्हणून विरोध केला जातो. प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तथाकथित हिंदू पुरोगामी सुद्धा सुर्य नमस्कार आणि योगासनांना हिंदू धर्मीयांपुरते मर्यादीत समजावयास लागून सुर्य नमस्कार आणि योगासनां च्या प्रचारकांवरच टिका करावयास लागतात. कुठे प्रसाद नाकारले जातात कुठे हिंदू सणांना शुभेच्छा न देण्याची आवाहने होतात आणि आजच्या काळात युट्यूबर (फेक नसलेल्या) व्हिडीओ फितीतून इतर धर्मीय कडवे प्रचार आणि प्रत्यक्ष जिवनात त्यांचे फालोवर्स अनुभवण्यास मिळत असतात. याचेच पर्यावसान पुढे द्वीराष्ट्रवाद ते आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू आणि भारत विरुद्ध प्रचाराचे अस्त्र म्हणूनही वापर होताना दिसतो. अजून एक उदाहरण देतो बरखादत्त उपस्थित असलेल्या एका न्युयॉर्कच्या कॉन्फरन्स मध्ये व्यासपिठावरील एका विदुषीने परमेश्वर एकच असतो या मुद्द्यावर सभागृहाची सहमती घेतली . आता याचा ना बरखा दत्तला फरक पडतो ना श्रोत्यांना पण त्यांचे वाले परमेश्वर न मानणार्यांचे विचार आणि संस्कृती बदलण्यासाठी फंडींग उपलब्ध होत रहाते.
कुठे कपाळावर टिकली लावली कानातले अथवा गळ्यातले घातले की हिंदू धर्मीय अशी संस्कृती आणि धर्म यांची गल्लत केली जाते. कुठे याचे पर्यावसान एखाद्या कॉन्व्हेंटात हातावर मेंदी काढली म्हणून छोट्या मुलींना छडी मार किंवा शाळेतून त्या दिवसापुरते तडीपारचा सामना करावा लागतो. फ्रान्स मध्ये पब्लिक प्लेसमध्ये धार्मिक चिन्न्हे वापरण्यावर मर्यादा असतात. मेंदीचे किंवा रांगोळी किंवा स्वस्तिकादी अशा बर्याच गोष्टी असतील क्लासैफीकेशन तुम्ही सांस्कृतिक करता की धार्मिक यावर प्रतिपक्षाला किती आणि कसा विरोध करायचा याची संधी मिळते.
फक्त नाकाने श्वास घेतल्याने हिंदू देवता फुफुसात जात नाही त्या प्रमाणे केवळ ओम म्हटल्याने किंवा रामाचे किंवा सुर्याचे नाव घेतल्याने तुम्ही त्या शब्दोच्चारांना देव मानले असे होत नाही अगदी नमन करतो म्हटले तरी देव मानले असे होतेच असे नाही हे प्रतिपक्षीयांच्या गळी उतरवण्याचे आज तागायत पार न पाडलेले मोठे आव्हान हिंदू धर्मीया समोर आहे.
जर देव एकच आहे तर मुर्तीत तो नसला तरी कोणत्याही मुर्ती समोरची अथवा मुर्ती शिवायची प्रार्थना देव स्विकारेलच . जर त्यांचा परमेश्वर एकटाच असेल तर त्याला खर्या खोट्या इतर कोणत्याही मानलेल्या देवांशी स्पर्धा असण्याचे द्वेष असण्याचे काहीच कारण नाही.
आता मी हे सर्व लेखन का केले याचे प्रयोजनच काय इथपासून सर्वसामान्य हिंदू धर्मीयाला प्रश्न पडावा इतपत त्याचे परधर्मीय अपप्रचाराकडे दुर्लक्ष असते. - तथाकथितांचे विचारावयासच नको त्यांना आपण इतरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याच्या बदल्यात आपल्याही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि संस्कृतीचा इतर धर्मिय आदर करतीलच असा गोड गैरसमज असतो- ज्यां हिंदू धर्मीयांचे लक्ष असते ते त्याचा प्रतिवाद प्रतिपक्षाच्या मांडणी बद्दलच्या अर्ध्या अधुर्या माहितीच्या आधारावर करतात किंवा आक्रस्ताळेपणा करतात मग प्रतिपक्षास हुकलेला हल्ला परतवणे आणि वरुन हिंदूंमधल्याच तथाकथितांचे साहाय्य मिळवणे अधिक सुलभ होत जाते. असे सगळे मला वाटते. एवढे सगळे स्पष्टीकरण द्यावे लागणे खरे तर लेखातील लेखन प्रयत्नाचे एका अर्थी अपयश तर नाही ना अशी शंका वाटते. पण आपण जे अभ्यासले त्या आधारावर आपल्याला जेवढे जमते तेवढे लिहावे एवढेच.
आपल्या प्रतिसादामुळे लिहीण्याचा योग आला. अनेक आभार.
24 Nov 2018 - 12:35 pm | माहितगार
आता आमेरीकेतील हि बातमी पहा
Missouri Pastor Calls Yoga and Hinduism ‘Demonic’ During Sermon
24 Nov 2018 - 10:25 am | कंजूस
* घाबरलात *
*पुरुष / स्त्री / इतर लिंगभेद *
24 Nov 2018 - 3:06 pm | कंजूस
>>असे सगळे मला वाटते. एवढे सगळे स्पष्टीकरण द्यावे लागणे खरे तर लेखातील लेखन प्रयत्नाचे एका अर्थी अपयश तर नाही ना अशी शंका वाटते.>>
असं काही वाटण्याची भीती नको. लेख आणि हेतू समजला आहे परंतू काही मुद्दे लेखी इथे लिहिता येत नाहीत.
24 Nov 2018 - 3:15 pm | कंजूस
हिंदुधर्मातच बऱ्याच देवदेवता आहेत असं काही नाही॥ जगात पाच तरी जुने धर्म आहेत त्यात एकापेक्शा अधिक देवदेवता आहेत किंवा होत्या. त्यात्या ठिकाणी ते जुने धर्म हाकलून नवीन एक देवता धर्माचा धुमधडाक्याने प्रचार आणि खूपदा अत्याचारानेही नवीन धर्म लादला तसं हिंदुनी करावं असंही नाही.
धर्म ही सुद्धा एक विकावू वस्तू आहे. व्यापाराचे नियम त्यासही लागू होतात. खप,मागणी, अनावश्यक वस्तू गळ्यात बांधणे, श्रीमंती दाखवण्यासाठी घ्यावी लागणारी वस्तू, मधल्यामधे रिकामटेकड्या लोकांचा उदरनिर्वाह.